शिक्षण आणि आपण
शाळा संपल्यानंतर शिक्षण संपत का ? नाही. तर ते खऱ्या अर्थाने सुरू होत.माणसाच्या आयुष्यात कधीच शिक्षण संपत नाही .पण बहुतेक लोकांच्या बाबतीत अस होत नाही. त्याना वाटत की आता शाळा संपली, कॉलेज संपलं म्हणजे शिक्षण पण संपलं. मग त्या कडे आपण लक्ष देत नाही. आपण आपल्याच विश्वात रममाण होतो .
कुटुंब, नोकरी, सगळेच व्याप वाढतात . तुम्हाला काही नवीन शिकायचं आहे का ?असं कोणी विचारलं तर आपण सांगतो की शाळेत शिकलो तेच खूप आहे .मला काही शिकायची गरज नाही.मला सगळं माहीत आहे. मला सगळं कळत.
पण हे खरं असत का ?
याचा आपण कधी विचार करतो का ?
खरंच सगळं आपल्याला येत का? या प्रश्नाचे उत्तर आपण तटस्थ राहून आपल्या मनाला विचारायला हवं .आणि काय उत्तर येत हे ही पाहायला हवं.
आपण नेहमी शिकत राहील पाहिजे .स्वतः ला समृद्ध करत राहील पाहिजे.त्या साठी काय काय करायाचं . ते शोधून ते आत्मसात करण्यासाठी सदैव तयार असलं पाहिजे .
आपलं ज्ञान वाढवत राहील पाहिजे . नवीन नवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत .
आपण स्वतः ला समृद्ध करण्यासाठी जे काही कमवत असू त्या कमाई च्या 5% खर्च करावा . तो खर्च नवनवीन पुस्तके खरेदी करण्यासाठी, एखादा नवीन कोर्स करण्यासाठी, शरीर कमवण्यासाठी, आपल्या आनंदासाठी, छंद जोपासण्यासाठी करावा.
आपल्याला जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण खूप महत्त्वाची भूमिका बजावते . आर्थिक साक्षर होण्यासाठी सुध्दा आपण प्रयत्न केले पाहिजेत.
शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे .हे आपण वाचतो, बोलतो, इतरांना सांगतो, पण ते आपल्या जीवनात उतरवण्यासाठी काही प्रयत्न करत नाही .
शिक्षण कधी संपत नाही तर ते जीवनाच्या वाटेवर अधीकच वाढत जात.
शिक्षण म्हणजे स्वतः ला ओळखणे . जर हेच आपण थांबवलं तर आपण आपली स्वप्न साकार करू शकणार नाही .
शिक्षण आपल्याला समृद्ध करत म्हणून मला वाटत की माणसाने कायम शिकत राहावं.