संवाद हरवत चाललाय....
खरंच आपण एकमेकांशी संवाद साधतोय का ??
आपण आपल्याच विचारात मग्न असतो, विचार तरी करतोय का आपण ? सोशल मीडिया वरच वाचतो, ऐकतो , बघतो फक्त.... विचार करतच नाही
फक्त फॉरवर्ड करत असतो...
संवाद संपत चाललाय...
संवाद हरवत चाललाय....
एखादा तरी कृष्ण असावा आपल्या आयुष्यात...
मन मोकळं करण्यासाठी........
त्यानं हक्कानं म्हणावं आपल्याला
"अरे आज तुझा चेहरा असा का दिसतोय?"
" काही झालंय का ?
" काय झालंय..बोल ना .."
आणि मग मनात साचलेलं सगळं त्याच्याजवळ मोकळं करता यायला हवं.....
अगदी सगळंच निःसंकोचपणे बोलता यायला हवं....
जादूची कांडी फिरवल्यागत मन क्षणार्धात एकदम मोकळं होऊन जायला हवं.....
असं हक्काचं कोणी आहे का आपलं ?
अशी कोणती हक्काची माणसं आपल्या जवळ आहेत का ??
जी आपल्या मनाला उभारी देतील....
आपलं मन रिलॅक्स करतील....
त्यांच्याशी बोललं की एकदम फ्रेश वाटेल....
आपलं मन हलकं फुलकं होईल...
खळखळून हसू चेहऱ्यावर येईल.....
एकमेकांना चिडवता येईल, खेचता येईल...
वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करता येईल...
cool feeling देणारी ही माणसं आहेत का ?
असतील तर शोधा....
ज्यांच्याशी बोलावंच असं काही नाही, ती जवळ असली तरी भारी वाटतं...
ते एकमेकांशी बोलले नाहीत तरीही, ते विचारांत भेटतात. कधी एखाद्या गाण्यात, कधी सुगंधात,
तर कधी
शांत संध्याकाळी कातरवेळी....
त्यांचा सहवास आपल्याला आवडतो....
ते आपल्या जवळ आहेत ही फीलिंग आपल्याला सुखावते.....
मनाला एक वेगळाच आनंद देऊन जाते....
कधी कधी तिथे संवादाचीही गरज राहत नाही....
त्यांच्या विषयी आपल्या मनात आपुलकी, जिव्हाळा तर असतोच....
आपल्या मनाला जिवंत करणारी ही माणसं असली की मन एकदम रिलॅक्स होतं....
अशा माणसांन सोबत कुठलाच आडपडदा नसतो किंवा show-off ही नसतो....
अगदी आपल्या मनातलं, हृदयातलं आपल्याला सहज बोलता येतं, व्यक्त होता येतं....
कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला समजून तर घेतलं जातंच पण महत्त्वाचं म्हणजे
तुम्हाला ह्यांच्याकडून Judge केल्या जात नाही...!
म्हणूनच अशा व्यक्तींच्या सहवासात तुम्हांला अगदी निवांत वाटतं.... मन मोकळं वाटतं..
अशी माणसं आरशासारखी असतात.. गुण आणि दोष दोन्ही दाखवणारी.. विश्वासू !!
मनाच्या गाभाऱ्यात काही भावना अशा असतात ज्या तर्काने नाही तर आत्म्याने जोडलेल्या असतात.
काही भेटी या अपघाती नसतात, त्या नियतीने ठरवलेल्या असतात.
तर एक गहिरं, शांत, आत्मिक बंधन असतं. अंतर्मनात एकमेकांसाठी जागा असते...
अशी Happy Place असतील तर ती जीवापाड जपली पाहिजेत....
आयुष्याच्या या गडबडीत ती हरवायला नकोत.... "तुमच्याशी बोलून खूssप बरं वाटतंय" हे त्यांना नक्की सांगायालाच हवं...
कुणी आत्महत्या केली की वाटतं,
मन मोकळं करायला त्यांच्या जवळ असा एखादा हक्काचा माणूस नसेल ? जिथे अगदी खरंखुरं व्यक्त होता येईल?
कारण व्यक्त होणं ही प्रत्येकाचीच सर्वात मोठी गरज.... !!
त्याशिवाय मोकळा श्वास कसा घेता येणार ?
आज कोणीतरी आपलं मनापासून एकूण घेतं असेल तर आपण खरंच खूप लकी आहोत...
म्हणूनच आपण आपल्या आयुष्यातली असा कृष्ण कोण आहे का ते पहावं,
अशी हक्काची माणसं,
आपला Happy Place जपावा...
पण
आपणही कुणाचा तरी कृष्ण,
हक्काचं माणूस, Happy place नक्कीच असायला हवं... !!
नाही का ?
नियतीने ठरवलेली सुंदर भेट....
वाळवंटातल्या ओयासिस सारखी...
काही माणसं आयुष्यात येतात आणि तुमचं आयुष्य समृद्ध करतात....
तुम्हांला स्वतःच्या आत डोकावून पाहायला शिकवतात....
ती फक्त असतात. त्यांच एक वलय असत जे तुम्हांला नवनवीन विचार करण्यासाठी प्रवृत्त करत... जेव्हा ती नसतात तेव्हा ते वलय आपण प्रकर्षाने miss करतो...
काही माणसं अशीच असतात नाती जपणारी , माणसं जपणारी आणि त्यांना अर्थ देणारी...!
आपल्या मनाच्या गाभाऱ्यातील भावनांना अलगद जोडून घेणारी...
ज्या भावना तर्काने नाही तर आत्म्याने जोडलेल्या असतात.
काही भेटी या अपघाती नसतात,
त्या नियतीने ठरवलेल्या असतात.
आपली भेटही अशीच
आपली भेट झाली आणि हळू हळू नातं उमलत गेलं,
विश्वास घट्ट होत गेला, एकमेकांच्या भावना न बोलता ही समजु लागल्या..
तर एक गहिरं, शांत, आत्मिक बंधन निर्माण झालं. अंतर्मनात एकमेकांसाठी जागा तयार झाली...
अशा भेटीत ना कसला स्वार्थ आहे ना कसली अपेक्षा...
स्वच्छ आणि निखळ मनात जन्म घेणार हे नात खरंच खास आहे...
असं नातं कधी तरीच निर्माण होत..
अशा नात्यांमध्ये काही मागणं नसतंच, अपेक्षा ही नसतात तर असत फक्त देण...
आपल्या दोघांचं नातही असंच आहे
न सांगता जुंळलेले
न बोलता समजलेले
अशी भेट की जिथे शब्दांची गरज नसते
नजरेतून बोलणं होतं..
सर्व गोष्टी न बोलता ही जाणवतात....
तुझ्यासोबतच्या क्षणांना मोठेपणा नाही, चैनही नाही तर एक शांत आनंद आहे..
आयुष्यात आलेली परिस्थिती त्यातून मिळणारा अनूभव, वाढलेल्या जबाबदाऱ्या आणि शहाणपण यामुळे हळू हळू आपण व्यक्त होण्याचच विसरतो...
हा अबोला संपतो कधी माहीत आहे का ??
या अशा नियतीने ठरवलेल्या भेटीने...
या भेटीमुळे आपल्या मनातलं न सांगणारी, मनातच ठेवणारी.. मनात जपणारी...अशी माणसं मग व्यक्त होऊ लागतात... भावना व्यक्त करतात..
कारण जेव्हा त्यांना व्यक्त होता येत नसतं तेव्हा समोरचा त्याच्या डोळ्यांतून त्यांच्या भावना समजून घेतो...
त्यांचा विश्वास संपादन करतो...
आणि मग ही नाती बहरतात, फुलतात ती आपल्या उच्चतम शिखरावर जाण्यासाठी...
अशा नात्यांमध्ये एक सुंदरता निर्माण होते..
सुंदरता कशात असते...
माहीत आहे काय.... प्रामाणिकपणात...
मनापासून होणाऱ्या संवादात...
एखाद्या व्यक्तीसोबत वाटणाऱ्या निःशब्द, पण सुखद शांततेत...
खऱ्या आणि निस्वार्थी नात्यात...
स्वतःला कोणत्याही दिखाव्याशिवाय स्वीकारण्यात...
एखाद्या व्यक्तिकडून मिळणाऱ्या सहज प्रेमळपणात...
जीवनातील सर्वात सुंदर गोष्टी या वस्तू नसतात...
त्या असतात आपल्या आयुष्यात आलेल्या व्यक्ती...,(तुमच्यासारख्या)
त्यांच्या आठवणी आणि घालवलेले सुखद क्षण...
या अशा नात्याला नाव द्यायची घाई करू नये किंव्हा देऊ ही नये....
ते फक्त असतं... (कृष्ण आणि द्रौपदी सारख...)
लोकांना ही नाती समजणार नाहीत किव्हा ते समजण्यासाठी जी बौद्धिक कुवत लागते ना ती नसते प्रत्येकाकडे...
त्यामुळे आपण ते समजून सांगण्याचा अट्टाहासही करू नये...
वेळ बदलत असतो...
वेळेप्रमाणे नातीही बदलतात, त्यात दुरावा येतो... ही भेटही त्याला अपवाद असणार नाही...
पण तो पर्यंत तरी हे क्षण आपण जगूया, अनुभवू या आणि जपू या .."
ही आपली भेट चिरंतन राहील यासाठी प्रयत्न करूया.....
कुणाच्यातरी हातातलं काकण व्हावं...
कुणाच्यातरी गळ्यातला ताईत व्हावं...
कुणाच्या तरी अबोल भावनांची डायरी व्हावं...
