गुरुवार, २८ एप्रिल, २०२२

Sher Shivraj ' What a film ! ' शेर शिवराज ' जबरदस्त कलाकृती.......

 ' शेर शिवराज ' जबरदस्त कलाकृती.......


          चित्रपट सुरू होतो राजमाता जिजाऊ बाल शिवबाला गोष्ट सांगत असतात. ती गोष्ट म्हणजे हिरण्यकश्यपू , प्रल्हाद आणि नरसिंह यांची. याचाच संदर्भ वापरत चित्रपटातील पात्रांची ओळख होत जाते. 


           इतिहासातील खूप छोट्या छोट्या गोष्टी ची काळजी घेतली आहे. प्रत्येक प्रसंग मांडताना घेतलेली मेहनत जाणवत राहते. 


          आयुर्वेदाचा उपयोग कसा होतो किंव्हा महाराज कसे करत होते हे नव्याने समजले. खान हा पित्त प्रकृतीचा हे वैद्य त्याची नाडी न पाहता, त्याला न भेटता त्याच्या वर्णनावरून सांगतात. अशा व्यक्तीची   निर्णय क्षमता कमी करायची असेल तर त्याचं पित्त वाढवाव लागत आणि त्यासाठी त्याच्या आहारात मसालेदार पदार्थ असायला हवे त्यासाठी महाराजांनी केलेली योजना , या सगळ्या प्रसंगात   सगळ्या जगाने मान्य केलेल्या भारतीय आयुर्वेदाचा अभिमान वाटायला लागतो.  


          अंगापिंडाने मजबूत माणसाच्या नक्की शरीराच्या  कोणत्या भागावर वार केला म्हणजे तो गारद होईल. याची तपशीलवार माहिती सांगताना खानाला कस नेस्तनाबूत करायचं याचं नियोजन करणं... तसंच त्यासाठी कोणतं हत्यार वापराव याचे संदर्भ चित्रपटात येतात. वाघनख का वापरलं त्याचा शोध कसा लागला हे ही उत्तम रीतीने दाखवलं आहे. त्या हत्याराच नाव ' वाघनख ' का ठेवलं ते ही कळलं.


         खानाचे सैन्य , तोफा , घोडे , हत्ती , यांची माहिती मिळवताना त्याबरोबर एखादी मोहीम कशी राबविली जाते , त्यामध्ये कोणत्या बाबींन कडे लक्ष द्यायचं असत ते एकदम सखोल पणे लेखकाने उभं केलं आहे. 


        वैभव मांगले यांनी गोपीनाथ पंत साक्षात उभे केलेत. वागणं , बोलणं , हावभाव नादच.  बेरकी चाल , खुशामत करणे म्हणजे काय याची प्रचिती येते. गोड गोड बोलून समोरच्याला गाफील कस ठेवायचं आणि त्याबरोबरच आपल्याला हवं तसं काम त्याच्याकडून कसं करून घ्यायच हे दाखवताना वैभव मांगले त्याच कौतुक करण्यास भाग पाडतो. 


          25 ते 30 हजार सैन्य घेऊन निघालेल्या अफजल खानाला महाराज असा काही गनिमीकावा करतात  की जेव्हा महाराजांना भेटतो तेव्हा फक्त 10 सैन्य त्याच्या बरोबर असत. ते ही शामियान्या पासून काही अंतरावर..... 


          खानाच्या मोहीमेत असलेल्या सगळ्या व्यापारी मंडळींना महाराज आधीच गडावर बोलावून घेऊन हिशोब भेट झाल्यावर या अटीवर त्यांच्या कडून सगळ काही हिरे,माणिक , मोती , सोन यांची खरेदी .....


          शिवराज अष्टक मधील आतापर्यंत आलेल्या चित्रपटांमध्ये छ. शिवराय काही प्रसंगापुरते मर्यादित होते. ' पावनखिंड ' चित्रपटात बाजीप्रभूंची शौर्य गाथा दाखविली गेली पण ' शेर शिवराज ' हा चित्रपट म्हणजे छत्रपती आणि छत्रपती यांचा च आहे. महाराज आणि फक्त महाराजचं....

या आधीच्या चित्रपटात चिन्मय मांडलेकर यांना महाराज साकारताना काही मर्यादा होत्या. काही विशिष्ट प्रसंगापूरते त्याची भूमिका होती.

 

         शेर शिवराज मध्ये व्यापून राहतात ते महाराज. दिग्पाल लांजेकर यांनी त्यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’ या चित्रपटां मध्ये महाराजांच्या भूमिकेसाठी चिन्मय मांडलेकर यांना का निवडलंय याच उत्तर हा चित्रपट पाहून मिळत. चिन्मय ने महाराजांची भूमिका खरंच नाद केलीय. त्याने त्याची निवड सार्थ ठरवलीय. चिन्मय मांडलेकर अक्षरश:  महाराजांची भूमिका जगलेत. 



          दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’ मधील ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ या ऐतिहासिक चित्रपटानंतर ‘शेर शिवराज’ हा चित्रपट मनात घर करून राहतो. मरगळलेल्या समाजाच्या मनात शिवप्रभूंचा भव्य दिव्य इतिहास पुन्हा जागवण्यासाठी धन्यवाद. 


  ' श्री शिवराज अष्टक ' मधील पुढील चित्रपटासाठी  शुभेच्छा......


शनिवार, २३ एप्रिल, २०२२

YS Jagan Mohan Reddy जगमोहन रेड्डी एक अफलातून माणूस ....

जगमोहन रेड्डी एक अफलातून माणूस ....


       2019 च्या लोकसभा आणि विधानसभा  निवडणुकीत एकाच वेळी चंद्राबाबू नायडू यांना धूळ चारून जगमोहन रेड्डी यांनी आंध्रप्रदेश जिंकला. मुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय सुद्धा खूप चर्चेत राहिले आहेत. शिवाय लोकप्रियता ही वाढत असलेली दिसत आहे. 


           त्यांचं पूर्ण नाव येडुगुरी संदिंती जगनमोहन रेड्डी उर्फ जगन हे सध्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत कारण ही तसच आहे. त्यांनी आपलं सगळं मंत्रिमंडळ बरखास्त करून टाकलं आहे. जगन रेड्डी यांनी हा निर्णय का घेतलाय ? किव्हा ते असे निर्णय का घेतात ? नक्की या पाठीमागे काय कारण आहे ते आपण समजून घेऊ या..


          जगमोहन यांचे वडील YSR जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा जगमोहन रेड्डी हे आपल्या व्यवसायात गुंतलेले होते. 

पण जेंव्हा 2 सप्टेंबर 2009 ला YSR यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला तेव्हा जगमोहन रेड्डी यांना धक्का बसला. ज्या काँगेस पक्षासाठी YSR यांनी आपल जीवन खर्ची घातलं त्या काँग्रेस ने पुढे YSR यांचा पर्याय म्हणून त्यांच्या मुलाला म्हणजेच जगमोहन रेड्डी यांना नाकारल.


         जगमोहन रेड्डी आणि काँग्रेस यांच्यामध्ये कटुता निर्माण झाली. पुढे जगमोहन हे काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी आपल्या वडिलांच्या नावानेच 2011 ला ' YSR काँग्रेस ' हा नवीन पक्ष काढला. पण त्या वेळी केंद्रात काँग्रेसची सत्ता होती. काँग्रेस ने त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. जगमोहन यांच्या बाबतीत सुडाचं राजकारण सुरू झालं. 


           2012 मधील मे महिन्यात जगमोहन वर CBI चा छापा पडला. बेनामी संपत्तीच कारण दाखवून जगमोहन यांना अटक करण्यात आली. तसेच त्यांना 16 महिने तुरुंगात राहावं लागलं. 16 महिन्यांनी ते तुरुंगाबाहेर आले. 


          तुरुंगात असताना सुद्धा हे गप्प बसले नाहीत तर त्यांनी तेलंगणा च्या विरोधात उपोषण केलं. हा मुद्धा आंध्रप्रदेश मध्ये खूप गाजला. जगमोहन रेड्डी चर्चेत आले. तुरुंगातुन बाहेर आल्यावर जगमोहन यांनी आपला पक्ष बांधला. निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली. 


           केंद्रात सत्तांतर झालं होतं काँग्रेस सत्तेतून बाहेर फेकली गेली होती आणि मोदी सरकार स्थापन झाले होते. 

आंध्रप्रदेशात 2014 च्या निवडणुकीत त्यांना यश मिळालं नाही. पण ते निराश झाले नाहीत. त्यांनी 2019 ची तयारी सुरू केली. पक्षबांधणी कडे लक्ष दिलं. जनभावना समजून एक एक पाऊल टाकलं. त्यासाठी त्यांनी नोव्हेंबर 2017 रोजी प्रजा संकल्प यात्रा या नावाने 3,000 किमी लांबीची वॉकथॉन सुरू केली. जवळ जवळ अक्खा आंध्र त्यांनी पायाखाली घातला त्यांच्या या पायी यात्रांना भरपूर प्रतिसाद मिळला. वडिलांच्या पायावर पाय ठेवत त्यांनी शेतकरी, कामगार , गरीब यांच्याशी जवळीक साधली. त्यामुळे हजारोंच्या संख्येने लोक यामध्ये सहभागी होऊ लागले. जगमोहन यांचं नेतृत्व तावूनसुलाखून निघालं. 


          पुढे 2019 च्या निवडणूका आल्या आणि या वेळी जगमोहन यांनी बाजी मारली. आंध्र मधील 175 आमदारांन मध्ये जगमोहन यांच्या पक्षाने 151 जागा जिंकल्या. तसेच लोकसभेत ही 25 खासदार मध्ये 22 जागा त्यांनी जिंकल्या. आपले 22 खासदार त्यांनी लोकसभेत पाठवले. 


काही अफलातून निर्णय....


1. आंध्रप्रदेश ला 5 उपमुख्यमंत्री :- 

         मुख्यमंत्री म्हणून त्यांची लोकप्रियता वाढतच गेली. मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांनी आणखी एक धक्का दिला तो म्हणजे त्यांनी एकदाच 5 उपमुख्यमंत्री जाहीर करून टाकले. ज्यांनी ज्यांनी त्यांना मदत केली त्यांना त्यांनी न्याय दिला तसेच सगळ्यांना खुश करून राजकारण साधलं. 


2. चंद्राबाबू सरकारचे काही निर्णय रद्द :- 

        चंद्राबाबू यांच्या काळातील खूप निर्णय त्यांनी बदलून टाकले. हळू हळू त्यांनी लोकप्रियता वाढच गेली. 


3. राज्याला तीन राजधान्या हा विचार:- 

     एक धडाकेबाज निर्णय म्हणजे त्यांनी आंध्रप्रदेश या राज्याला त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या धर्तीवर तीन राजधान्या असाव्यात अशी चर्चा सुरू केली. 


4. एकाच वेळी 13 जिल्ह्याची निर्मिती :-

       एकाच वेळी आंध्रप्रदेशात 13 नवीन जिल्ह्याची निर्मिती केली. एका जिल्ह्याची निर्मिती करायची म्हंटल तरी किती आंदोलने होतात. मोर्चे निघतात. मतमतांतरे होतात. पण जगमोहन यांनी एका झटक्यात 13 जिल्हे निर्माण केले. 


5. सरकारच्या मध्यावधी काळात पूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त:- 

        सरकार जेव्हा अर्धा कार्यकाळ पूर्ण करेल तेव्हा सगळं मंत्रिमंडळ बदलण्यात येईल आणि नवीन मंत्रिमंडळ निर्माण केलं जाईल हा शब्द त्यांनी दिला होता तो त्यांनी पाळला आहे. 


        जगमोहन रेड्डी हे कष्ट करतच पुढे आलेले आहेत. ते जेव्हा गरज लागेल तेव्हा ते मोदी सरकारला पाठिंबा देतात त्यामुळे त्यांचे आणि केंद्र सरकारचे संबध चांगले आहेत त्यामुळे त्यांना राज्यातील विकास कामांसाठी त्याचा फायदा होतो. 


        जगमोहन यांना काँग्रेस पक्षाने संधी दिली नाही. त्यांचं नेतृत्व मान्य केलं नाही त्या जगमोहन यांनी आंध्र मधून काँगेसलाच संपवून टाकलं. आता ते 2024 च्या तयारीला लागले आहेत. 

Sri Lanka economic Crisis Reason श्रीलंकेतील आर्थिक संकटाची कारणे....

 

           श्रीलंका, हा देश हिंदी महासागरातील भारताच्या दक्षिणेस वसलेला द्वीप-देश आहे. आत्ता सध्या जी परिस्थिती श्रीलंकेत उद्भवली त्याची नक्की काय कारणे आहेत. या देशात नक्की काय झालय की इतक्या टोकाची महागाई वाढली आहे. पेट्रोल , डिझेल चे भाव गगनाला का भिडलेत. याच बरोबर दूध, अंडी, ब्रेड , तेल अशा जीवनावश्यक वस्तू सर्वमान्य माणसांना का घेणं परवडत नाही. त्याच बरोबर काही लोक हा देश सोडून का निघालेत.

           गॅस आठवड्यातून एकदा भेटत आहे. वीज तर फक्त 4 तास आहे. रस्त्यावरील दिवे सुद्धा बंद करण्याचा आदेश सरकारने काढला आहे वीज वाचवण्यासाठी, कागदाचा इतका तुडवडा पडला आहे की विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहे , वर्तमानपत्र सुध्दा बंद आहेत. 

 याची काही कारणे आहेत ते आपण पाहू .... 

1. विदेशी कर्जाचा भार :-  

          श्रीलंकेन सरकारने खूप मोठ्या प्रमाणात परकीय कर्ज घेतले. ते वाढतंच गेले. ते फेडण्यासाठी त्यांनी पुन्हा कर्ज घेतले. या कर्जाचा भर एवढा झाला की जवळ जवळ सरकारचा  90% पैसा परकीय कर्जातच जाऊ लागला. यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या आयतीसाठी सरकारकडे पैसा शिल्लक राहिला नाही. परिणामी या वस्तू सरकारला महागात खरेदी कराव्या लागल्या त्यामुळे त्याची किंमत खूप वाढली. 

2. कोरोना आल्यामुळे पर्यटन व्यवसाय ठप्प... 

           श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन व्यवसायाचा 12 ते 13 % वाटा आहे. पण एप्रिल 2019 पूर्ण देशात झालेले बॉम्ब हल्ले आणि यात 269 श्रीलंकन नागरिकांबरोबर 45 पर्यटकांचा पण मृत्यू झाला. यामुळे पर्यटनावर खूप परिणाम झाला.  पुढे 2020 मध्ये कोरोनामुळे हा व्यवसाय आणखी  ठप्प झाला आणि श्रीलंकेत येणार विदेशी चलनाचा तुटवडा निर्माण झाला. विदेशी चलन नसल्याने व्यापारावर परिणाम झाला. वस्तुंची आयात करण्यासाठी परकीय चलन नसल्याने त्यांची कमतरता निर्माण झाली. महागाई वाढली. पैशाचं मूल्य कमी झालं. कोरोनामुळे भरपूर श्रीलंकन नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या आणि ती दुसऱ्या देशातून स्वदेशी आली . त्यामुळे त्यांच्या मुळे येणार ( पगार ) परकीय चलन बंद झालं. 

3. रशिया युक्रेन युद्ध :-  

            श्रीलंकेत येणारे पर्यटकांची संख्या पहिली तर जवळ जवळ 70 % पर्यटक हे रशिया युक्रेन मधील असत पण आता युद्ध सुरू असल्यामुळे यामध्ये खूप मोठी घट झाली. परकीय चलन येण बंद झालं त्यामुळे चलनाचा साठा घटू लागला.  त्याचा परिणाम या छोट्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला. 

4. अचानक घेतलेला सेंद्रिय शेतीचा( Organic Farming) निर्णय :-  

           श्रीलंकेत जे सरकार निवडून आले होते त्यांनी कसलंही नियोजन न करता सगळ्या देशात सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला. आता आपल्याला वाटेल की सेंद्रिय शेतीचा निर्णय तर चांगलाच आहे. मग त्यातून कसं वाईट होणार आहे पण रासायनिक खते आणि औषधें बॅन केली त्यामुळे उत्पादन घटले. सेंद्रिय शेतीतून उत्पादन काढताना प्रथम ते कमी होत. ते वाढण्यासाठी वेळ लागतो. याचा कसलाही विचार न करता सरकारने हा निर्णय घेतला. तांदुळाच्या बाबतीत स्वयंपूर्ण असणारा श्रीलंका देशात तांदुळाची टंचाई निर्माण झाली. तो आयात करण्यासाठी 4.50 मिलियन डॉलर खर्च करावे लागले. चहाच उत्पादन घटल चहाची निर्यात करून येणार परकीय चलन सुद्धा घटल. विदेशी चलन येणं बंद झालं.  त्यामुळे उत्पादन कमी झालं त्यामुळे जीवनावश्यक वस्तूची टंचाई निर्माण झाली. परिणामी वस्तुंची किंमत वाढली.

5. VAT (Value-added tax) मध्ये कपात :-  

               सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात सांगितलं होतं की VAT मध्ये अर्धी कपात करू. हा कर 15% होता सरकारने तो 7.5 % केला. तस पाहिलं तर हा निर्णय योग्य होता. कारण कर कमी झाला तर खरेदी वाढते आणि लोक खूप खरेदी करतील पण हा निर्णय घेतला आणि अंमलबजावणी सुरू केली पण लगेच कोरोना आला त्यामुळे सरकारच्या अंदाजाप्रमाणे खरेदीत वाढ तर झालीच नाही. पण कमी खूप झाली. सरकारला मिळणारा टॅक्स पण कमी मिळाला. सरकारचे उपन्न कमी झालं. इतर बाबींवर खर्च करण्यासाठी सरकार कडे पैसा राहिला नाही.  

           मार्च महिन्यात श्रीलंकेत 1 डॉलर = 200 रुपये  तर हे प्रमाण एप्रिल महिन्यात 1 डॉलर = 300 रुपये झालं.

           पैशाचं मूल्य कमी होत गेलं. यामुळे आयात करताना खूप खर्च येतोय त्यामुळे वस्तूंची किंमत आवाक्या बाहेर गेली आहे.

           श्रीलंकन सरकार मधील 26 मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे पण पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांनी राजीनामा दिलेला नाही.

           या संकटातून सावरण्यासाठी भारत सरकारने श्रीलंकन सरकार ला मदत केली आहे तसेच जगातूनही अनेक देश मदत करतील अशी आशा आहे. या संकटातून श्रीलंका लवकरच बाहेर पडेल अशी आशा करू या.

New Education Policy 2020 नवीन शैक्षणिक धोरण 2020

 New Education Policy 2020

नवीन शैक्षणिक धोरण 2020

 

          आपल्या देशाने जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे. हे तिसरे शैक्षणिक धोरण आहे या आधी 1968 इंदिरा गांधी सरकारने पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केले होते. दुसरे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 ला राजीव गांधी सरकारने अंमलात आणले. आता मोदी सरकारने पुन्हा 34 वर्षांनंतर नवीन शैक्षणिक धोरण आणले आहे. कोरोनामुळे याची अंमलबजावणी काही काळ थांबली पण आता 2022 ला सरकार हे धोरण अंमलात आणण्याची तयारी करत आहे. डॉ. डी.

 के. कस्तुरीरंगन ( इस्रोचे माजी प्रमुख)   यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या धोरणाचा मसुदा तयार केला आहे.  तो मसुदा 31 मे 2019 ला सादर केला. डॉ. डी. के. कस्तुरीरंगन यांना पद्मश्री , पद्मभूषण , पद्मविभूषण हे तीनही पुरस्कार मिळालेले आहेत हे लक्षात घ्यायला हवं. शैक्षणिक धोरणाचे ध्येय काय आहे आणि त्याच्यातील महत्त्वाच्या तरतुदी कोणत्या हे आपण पाहू या ....


ध्येय :- 

" India a global knowledge super 

  power "

भारताला ग्लोबल नॉलेज सुपर पॉवर बनविणे हे ध्येय आहे.


तरतुदी :- 

1. मोफत व सक्तीचे शिक्षण आता 3 ते 18

    वर्षापर्यंत करण्यात आले. पूर्वी ते 6 ते 14

    वर्षांपर्यंत होते. 

2. पटनोंदणी 2030 पर्यंत 1 ली ते 12 वी 100%

    करण्याच ठरवलं आहे तसेच 2035 पर्यंत उच्च

    शिक्षणासाठी 50% ठरवलं आहे.

3. मानव संसाधन मंत्रालयाचे नाव बदलवून आता 

    ते शिक्षण मंत्रालय करण्यात येईल.

4. 15 ऑगस्ट 1995 मध्ये सुरू केलेली मध्यान्ह

    योजनेत आता दुपारच्या आहाराबरोबरच    

    नाष्ट्याची सोय करण्यात येईल.

5. GDP च्या 6% खर्च शिक्षणावर करण्यात येईल.

    सरकारच्या एकूण खर्चाच्या 20 % खर्च

    करण्यात येईल. ( आधी तो खर्च 10 % होता.)

6. राष्ट्रीय शिक्षण आयोग हा शिक्षण क्षेत्रातील

    सर्वोच्च संस्था असेल तसेच त्याचे अध्यक्ष 

    मा. पंतप्रधान असतील.

7. राष्ट्रीय संशोधन फाउंडेशन संशोधनासाठी निधी

    उपलब्ध करून दिला जाईल.

8. NAAC ला UGC पासून वेगळे करण्यात येईल.

9. जगातील टॉप 50 विद्यापीठाना आता भारतात

    त्यांची शाखा उघडता येईल. त्यासाठी त्यांना

    50 कोटी डिपॉझिट द्यावं लागेल. 



संरचना :- 

      तर सगळ्यात महत्त्वाच म्हणजे या शैक्षणिक धोरणात मागची जी संरचना म्हणजे 

10 + 2 + 3 होती.

 ती बदलण्यात आली. त्या ऐवजी 

  5 + 3 + 3 + 4 ही नवीन संरचना स्वीकारली   

  आहे. 

 ही संरचना नक्की कशी आहे ते पाहू या....


5 वर्ष 

   - पायाभूत शिक्षण

   - Fundamental Education

   - 3  ते 8 वर्ष वयोगट 

   - 1 ली व 2 री 

   - शालेयपूर्व शिक्षण , परीक्षा नाही ,

   - मेंदूला चालना देणारे खेळ , बुद्धीचा विकास

   - शाळेची आवड, ओढ ,आस्था निर्माण करणे

3 वर्ष 

   - 3 री , 4 थी , 5 वी 

   - माध्यम :- मातृभाषा 

   - Activity + study 

   - परीक्षेला सुरुवात 

   - पेपर , स्वतःच मूल्यमापन स्वतः , मित्र , शिक्षक

3 वर्ष 

   - 6 वी , 7 वी , 8 वी 

   - भारतीय भाषा 

   - व्यावसायिक शिक्षण

   - वेगवेगळे विषय

4 वर्षे

   - 9 वी , 10 वी , 11 वी , 12 वी 

   - बोर्ड नाही , 

   - विदेशी भाषा शिकू शकता , 

   - पाठांतरावर प्रश्न नाही तर विचारक्षमता डेव्हलप

     करण्यासाठी. 


School Hub / Complex / नॉलेजहब / युनिव्हर्सिटी हब तयार करण्यात येईल. त्यामध्ये उच्चशिक्षित शिक्षक उपलब्ध करून देण्यात येतील. 

 - संगीत , Science , Arts 

 - जो विषय शिकायचा तो शिकू शकतील. 

   कोणत्याही शाखेचे बंधन राहणार नाही. 

   Arts + कॉमर्स + Science एकत्रितपणे

   शिकता येईल.


पदवी संदर्भात सुद्धा बदल केला आहे. पदवी पूर्ण करण्याची सक्ती असणार नाही. 


3 / 4 वर्ष Graduation असेल. 

 1 ले वर्ष पूर्ण केले तर  :- सर्टिफिकेट कोर्स 

 2 रे वर्ष पूर्ण केले तर   :- डिप्लोमा 

 3 रे वर्ष पूर्ण केले तर   :- डिग्री 

 4 थे वर्ष पूर्ण केले तर  :- रिसर्च 

            4 थे वर्ष पूर्ण केले तर P G :- 1 वर्ष

            3 रे वर्ष पूर्ण केले तर P G :- 2 वर्ष 


मनासारखे विषय घेता येतील :- पॉलिटी / आर्टस् / मॅकॅनिकल / खेळ 


       जे काही विद्यार्थी शिकतील त्याचे त्यांना 

Credits मिळतील. हे credits त्यांच्या  UGC मध्ये अकाउंट मध्ये जमा होतील. 


        एकाच वेळी विद्यार्थी दोन डिग्री घेऊ शकतो. तो कोणताही विषय शिकू शकतो. युरोपियन देशातील नामांकित विद्यापीठात हे आधीपासून सुरू होत ते आता आपल्या देशात राबवल जाण्याची सुरुवात होत आहे. युरोपातच आहे असं नाही तर  पूर्वीच्या काळी भारतात सुद्धा ही पद्धती होती. तक्षशिला , नालंदा , वल्लभी या जुन्या काळातील विद्यापीठात अशी शिक्षण व्यवस्था होती. आपण पाश्चात्यांचे अनुकरण करताना यांचा आपल्याला विसर पडला होता. 


         शिकण्याचं दडपण न येता आनंद वाटला पाहिजे यासाठी हे धोरण मदत करणार आहे. शिक्षणातला होणार हा बदल खरच योग्य आहे. तसेच तो योग्य प्रकारे राबवला तर शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती होईल हे वेगळे सांगायला नको. अजून एक गोष्ट की हे धोरण आहे कायदा नाही. ते कसं राबवल जातंय त्यावर त्याच यश अपयश ठरणार आहे .


शनिवार, ९ एप्रिल, २०२२

Good Health is wealth ... निरोगी आरोग्य ही खरी संपत्ती

       संपत्ती म्हणजे नक्की काय ? त्याची व्याख्या काय आहे ? हे समजून घेतलं पाहिजे. खरी संपत्ती काय असते ? 

        तुमच्या वयाच्या 25 वर्षापर्यंत तुमची डिग्री ( शिक्षण ) काय आहे हे पाहिलं जातं. 40 व्या वर्षो तुम्ही किती कमावता हे पाहिलं जातं. आणि आयुष्याच्या उत्तरार्धात म्हणजे 50 वर्षानंतर तुम्ही किती निरोगी आहात हे महत्त्वाचे असतं. 

       60 वर्षानंतर तुमच्या कडे कोणतं पद आहे , किती पैसा आहे , अधिकार किती आहेत. याला काहीही किंमत असत नाही. अशा वेळी महत्त्वाच असत ते म्हणजे तुमचं निरोगी शरीर आणि तेच जर चांगले नसेल तरआयुष्यभर जे काही कमावलं ते या वेळी शून्य होत. 

        माणूस हा विचित्र प्राणी आहे तो पैसा कमवण्यासाठी त्याचं आरोग्य खर्च करतो आणि नंतर ते पुन्हा कमवण्यासाठी तो सगळा पैसा खर्च करतो. 
माणूस पैसा कमवण्यासाठी त्याच सगळ आयुष्य घालवतो. पैसा कमवण्यासाठी तो आरोग्याची हेळसांड करतो. खरं तर आरोग्य हिच खरी संपत्ती आहे.

         आपण खूप पैसा कमावला , संपत्ती गोळा केली. पण तिचा उपभोग घेण्यासाठी जर आपलं शरीर आपली साथ देत नसेल तर अशा संपत्ती चा काय उपयोग आहे. 

          आयुष्यात फक्त पैसा मिळवणं महत्वाचे नसतं तर तो मिळवत असताना त्याबरोबरच शरीर स्वास्थ्याकडे पण लक्ष देणे गरजेचे असते. पण आपण कायम शरीराकडे दुर्लक्ष करतो . वेगळ्याच गोष्टींना महत्व देतो. त्या मिळवण्यासाठी धावत असतो.
 पैसा मिळवण्यासाठी आपण किती प्रयत्न करतो पण आपलं आरोग्य निरोगी राहावं म्हणून किती लक्ष देतो विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. तर मग आज पासूनच विचार करा आणि आपलं आरोग्य कस उत्तम राहील या कडे लक्ष द्या.

           तर मग चला आपली खरी संपत्ती उत्तम राहील यासाठी प्रयत्न करू या.

" Good Health is Wealth. "






Shaarad Sir

उर्मिला

  उर्मिला... रामायण माहीत असत, पण उर्मिला नक्की कोण हेच काही जणांना माहीत नसतं... जेव्हा कळतं तेव्हा काय तर लक्ष्मणाची पत्नी एवढंच... एखादी ...