चिंता आणि चिता या दोन्ही गोष्टी माणसाच्या आयुष्यात वाईटच आहेत. चिता ही मेलेल्या माणसाला जाळते तर चिंता ही जिवंत माणसाला जाळत राहते.
काहींना चिंता करण्याची सवय असते. ते कायम कशानं कशाच्या चिंतेत असतात. काहीही कारण नसलं तरी ते चिंता करतात. कोणतही संकट आले नाही तरी ते का संकट आले नाही म्हणून चिंता करतात. अस करता करता त्यांना ती सवय लागते ही सर्वात भयानक गोष्ट आहे. चिंता करण्यामुळे आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चिंता केल्यामुळे प्रश्न सुटत नाहीत तर वेगळेच प्रश्न निर्माण होतात. हे जर होऊ द्यायचं नसेल तर चिंता न करता त्यावर कशी मात करता येईल. हे पाहायला हवं.
चिंता आणि चिंतन यामध्ये नक्की कोणता फरक आहे तर तो म्हणजे एखादा प्रश्न निर्माण झाला की त्याचाच विचार करणं म्हणजे चिंता पण तो प्रश्न कसा सोडवता येईल , त्यावर कशा प्रकारे मात करता येईल हा विचार करणं म्हणजे चिंतन. चिंतन केल्यावर समस्या सुटण्यास मदत होते किंव्हा समस्या सुटतात. पण जर आपण चिंता करत राहिलो तर समस्या आहे तशीच राहते. मानसिक त्रास होतो. मानसिक समस्या निर्माण होतात. आयुष्य वेगळीकडेचं भरकटत जात. छोट्या छोट्या समस्या मोठ्या होतात. योग्य निर्णय घेता येत नाही. सामाजिक जीवनात आपली पत राहत नाही. हे सगळं कशामुळे घडत तर ते विनाकारण चिंता करण्यामुळे.
चिंतन हे लाभदायक असते. आपण त्याच्यावरच आपल लक्ष केंद्रीय करावं. कोणत्याही गोष्टी बाबतीत आपण चिंतन करून निर्णय घेतला पाहिजे. चिंतन केल्याने छोट्या मोठ्या प्रश्नांची उत्तरे सहज सुटतात. आपली निर्णय क्षमता डेव्हल होते. योग्य वेळी योग्य निर्णय आपल्याला आयुष्यात उच्च स्थानी घेऊन जातात. या सर्वांसाठी चिंतन महत्त्वाची भूमिका बजावते.
कोणतेही समस्या आली तर आपला तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे त्यावर तिचं गांभीर्य ठरत आपण सकारात्मकतेने पाहिलं की तिच्यात संधी दिसू लागते. नकारात्मक दृष्टीने पाहिलं तर छोटी समस्या पण खूप मोठी होते. तुमचा दृष्टीकोन जर सकारात्मक असेल तर चिंता तुमच्या आयुष्यात यायला घाबरेल. ती तुमच्या पासून दूर राहील.
लक्षात ठेवा चिंता ना करता चिंतन करण्याची सवय आपण स्वतःला लावून घ्यायला हवी. कितीही मोठा प्रॉब्लेम आला तरी त्या प्रॉब्लेमचा विचार न करता. त्यातून बाहेर कस पडायचं हा विचार केला पाहिजे. तसं मनाला ट्रेनिंगच द्या.
चिंता मुक्ती कडे होणाऱ्या प्रवासाठी तुम्हां सगळ्यांना शुभेच्छा.....