सोमवार, २३ जानेवारी, २०२३

Human things: Sudha Murthy/गोष्टी माणसांच्या : सुधा मूर्ती

गोष्टी माणसांच्या 

सुधा मूर्ती 

अनुवाद :- लीला सोहोनी


लाल भाताची कणगी ह्या कथेत लेखिका दान देताना जे अपल्या कडे सर्वोत्तम आहे तेच द्यावं. दान स्वीकारणाऱ्याना परावलंबी आणि असहाय बनवू नका. श्रीमंत लोकांपेक्षा मध्यम वर्गीय आणि कनिष्ठ लोकच सढळ हाताने मदत करत असतात हे लक्षात घ्या.


मोठी माणसं किती साधी असतात त्यांचा कामाचा झपाटा कसा विलक्षण असतो ही बाब श्री अब्दुल कलाम या गोष्टीतून अनुभवायस येत.


" साधं राहणं ही काय साधी गोष्ट नाही याची प्रचिती येते."


खरा दागिना या कथेत शिक्षण किती महत्वाचे असते आणि त्याची खरी  किंमत अडाणी माणसांनाच असते. खरा दागिना म्हणजे काय नक्की तो कसा असतो. हे कळत आणि पुरुष सुशिक्षित झाला तर फक्त तोच सुशिक्षित होतो परंतु स्त्री सुशिक्षित झालीं तर ती संपूर्ण कुटुंब सुशिक्षित करते.


जे आर डी या गोष्टीत टेल्को कंपनी त्यामधली मुलाखत आणि जे आर डी यांना पाठवलेले तक्रार पत्र यांची माहिती अत्यंत मनोरंजन पद्धतीने मांडली आहे. जे आर डी स्वतः जेव्हा नारायण मूर्ती येईपर्यंत  सुधा मूर्ती सॊबत वाट पाहत उभे राहतात. तेव्हा त्यांच्यातील साधेपणा ठळकपणे जाणवतो.

सुधा मूर्तींना नवीन कंपनी सुरू करताना जे आर डी नी दिलेला संदेश अमूल्य आहे.


परीक्षा आणि परीक्षेतील मार्क महत्वाचे असतं नाहीत तर तुमची नीतिमूल्ये आणि त्यांचा तुम्ही जीवनात केलेला वापर हे महत्त्वाचं असत. ए फॉर ए ग्रेड नाही तर ए फॉर ऑनेस्टी हे छानपणे सांगितलं आहे.


आपण ज्या समाजामध्ये वाढलो त्या समाजाचं आपण काही तरी देणं लागतो. माणसाने समाजाचं ऋण परत करावं. हा उदात्त विचार सुधा मूर्तींना कसा आणि कोणामुळे सुचला हे " अम्मा, हे तुझं कर्तव्य नाही का ? या गोष्टी मधून त्यांनी उत्तम पणे मांडलय.


इतरांच्या कल्याणासाठी आपण कितीही वेदना सहन करण्याची ताकद ठेवली पाहिजे. स्वतःच्या आधी इतरांचा विचार हा गाभा ह्या गोष्टीतून व्यक्त होतो ... ' अॅनेस्थेशियाची कथा '


अनुभव हा माणसाचा सर्वात मोठा शिक्षक असतो.

अनुभवाने मिळणारे ज्ञान हे कोणत्याही शाळा कॉलेजात मिळत नाही. ते संपादन करण्यासाठी किती तरी वर्ष जावी लागतात. त्यामुळे वडीलधाऱ्या मंडळींचा सल्ला आपण घ्यायला हवा. तो जीवनात गरजेचा असतो ते ' वाटणी ' या कथेतून उत्तमपणे सांगितलं आहे.


सुधा मूर्ती यांची लेखन शैली अत्यंत सरळ, हलकी फुलकी, मनोरंजक आहे. नैतिक मूल्यांचे संदेश छोट्या छोट्या गोष्टींमधुन दिले आहेत.


वाचकाला या कथा वाचताना गुंतवून टाकतात. नारायण मूर्तींची भेट ,त्यांचं स्वप्न तसेच त्यांची बदललेली भूमिका यांबाबतची ही गोष्ट आहे.


वाचन माणसाला समृद्ध करत जात हे आपल्या आजोबांच म्हणणं आणि त्यासाठी खेड्यामध्ये वाचनालय उघडणे. 


आपली स्वप्ने पूर्ण करण्याची उर्मी , नैतिकता किती महत्वाची असते. समाधान आणि तृप्ती असणं हे गरजेचं असत. या सगळ्या बद्दल ह्या माणसांच्या गोष्टी खूप काही सांगतात...


एकदा वाचावयास हवं असं पुस्तक ....

रविवार, १५ जानेवारी, २०२३

चेरीच झाड आणि इतर ७ कथा - Ruskin Bond

 

 चेरीच झाड आणि इतर ७ कथा

                              -  रस्किन बॉंड

रस्किन बॉंड यांच्या लेखणीतून उतरलेल्या भावस्पर्शी आणि रोमांचकारी कथांचा संग्रह म्हणजे हे पुस्तक आहे. 

 या पुस्तकाचा मराठी अनुवाद नीलिमा भावे यांनी अगदी उत्तम केला आहे.


रस्किन बॉंड हे नाव वाचून तुम्हांला हा लेखक इंग्लिश वाटत असला तरी हा अस्सल भारतीय आहे. त्यांची सगळी जडणघडण ही भारतात झाली आहे. हिमालयाच्या कुशीत सिमला, डेहराडून या भागातच त्यांच्या जीवनाचा बराचसा काळ गेला.


या पुस्तकातील ८ कथा आपल्याला खिळवून ठेवतात.

वणव्यातील वाट ही कथा आपल्याला शिकवते की  कधीही जिद्द सोडू नये. जे काम करत असाल ते करत राहील पाहिजे. तुम्हांला एखाद्या संकटातून बाहेर पडायचं असेल तर प्रयत्न करत रहा. चालत राहा. घाबरून जाऊ नका. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून त्याच्या दिशेने वाटचाल करा.


देहराच्या घरी या कथेत मुलाचं आणि वडिलांचं प्रेम उत्कटपणे उभं करण्यात लेखक कमालीचा यशस्वी झालाय. मनाचे अंतरंगी भाव उत्कट पणे प्रगट झालेले दिसून येतात.


बिबट्या आणि चंद्र ही कथा डोंगर दर्यात राहणारे लोक त्यांना मूलभूत गरजा वेळच्या वेळी पूर्ण करण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो.

शाळा शिकण्यासाठीची पायपीट, दवाखान्यासाठी ७ ते ८ मैल करावी लागणारी घौडदौड, बिबट्याशी सामना करताना येणाऱ्या अडचणी यांची अतिशय आर्तपणे मांडणी केलेली आहे.


एखादं झाडच बी लावणं आणि त्याला वाढवत त्या सगळ्या प्रवासच साक्षीदार होणं यातील आनंद नक्की काय असतो हे अनुभवने. त्याच्या बरोबरच असलेल भावनिक नात याच वर्णन केल आहे.


इच्छा या कथेत माणसाचं आयुष्य कधीच त्याला वाटत तस पुढं जात नसतं. त्याच्या इच्छा पूर्ण होत नाही. त्याला कशा पद्धतीने काही गोष्टींवर समाधान मानावे लागते हे सांगण्यात लेखक यशस्वी होतो.


लहानपणीचे सखेसोबती यामध्ये प्राणी , पक्षी याच नक्की काय नात असत ते पुन्हा एकदा जाणवत राहते. लहान मुलांच भावविश्व किती मोठं असत. त्यामध्ये कोणाकोणाला स्थान असत हे दर्शविण्यात आलेले आहे.


अंत्ययात्रा यामध्ये माणूस कसा विचार करतो, प्रसंगानुरूप त्याची विचारशक्ती कशी बदलत जाते, माणसाला एकाकीपणाची अटळतेची जाणीव होते.


या कथा वाचताना आपण त्यामध्ये रंगून जातो. आपलं मनोरंजन होते तसेच त्या कथामधील पात्रांच्या जागी स्वतःला ठेवून पाहतो त्यांच्याशी आपले साधर्म्य साधण्यास लेखक प्रवृत्त करतो.


अशा या ८ कथां आपण अनुभवाव्यात यासाठी  आपणाला शुभेच्छा...


गुरुवार, ५ जानेवारी, २०२३

Hon'ble Prime Minister Modi and Simplicity/मा.पंतप्रधान मोदी आणि साधेपणा...

 30 डिसेंबर ला सकाळीच टी व्ही सुरू केला आणि कळलं की भारताचे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचे निधन झाले. बातमी पाहून दुःख झालं. कारण मोदी आणि त्यांचं मातृप्रेम हे देशाला परिचित आहे...


पंतप्रधान झालेला हा मुलगा जेव्हा आपल्या आईला  भेटायचा ना,  तेव्हा ना कधी बडेजाव पणा, ना काही विशेष सरकारी ताम-झाम....


या भेटीतून जाणवायचं ते फक्त मुलाचं आणि आईचं प्रेम....


आज जेव्हा ही बातमी आली तेव्हा वाटलं होतं की आता पंतप्रधान येतील सगळी सरकारी यंत्रणा कामाला लागेल.....


त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल...

देशातील सगळे VIP येतील दर्शनासाठी... 

सगळे टी व्ही चॅनेल्स हजर असतील...

हजारो लोक दर्शनासाठी रांगा लावतील ....

घोषणा दिल्या जातील ....

त्यांच्या स्मारकासाठी जागा कुठं असेल...

याच बरोबर ट्रॅफिक जाम कुठं कुठं होईल याच्या पण बातम्या येतील....


पण असं काहीच झाल नाही...


पहाटे साडे तीन वाजता हिराबा गेल्या. मोदींनी सकाळी सहा वाजेपर्यंत आपली सगळी सरकारी कामे मार्गी लावली आणि देशाला सांगितलं की आई गेली...


पंतप्रधान अगदी साध्या पध्दतीने घरी गेले कोणताच  सरकारी इंतजाम नाही....

लोकांची गर्दी नाही....


देशाच्या पंतप्रधांच्या आईचा सरकारी हॉस्पिटलमध्ये इलाज झाला आणि अंतिम यात्रा पण नगरपालिकेच्या रुग्णवाहिकेमधून झाली.....


देशाचे पंतप्रधान आपल्या आईला घेऊन सरकारी रुग्णवाहिकेमधून निघाले...

ना VIP रूट, ना सरकारी बंदोबस्त ....

एका मध्यमवर्गीय कुटुंबा प्रमाणे सगळं काही घडताना अख्या देशान पाहिलं...


सगळं बाजूला ठेऊन नरेंद्र मोदीनी अनवाणी चालत आपल्या आईला खांदा दिला.....



किती साध्या पध्दतीने आपल्या आईला पंतप्रधानांनी निरोप दिला. 


हे पाहून खरंच त्यांच्या बद्दलचा आदर अधिक वाढला....


सगळी कामे पोस्टपौंड केली असती तरी कोणी आक्षेप घेतला नसता. पण 

आईचा अंतिमसंस्कार उरकून पंतप्रधान 11 वाजता होणाऱ्या मेट्रोच्या व्हिडीओ कॉन्फरन्सला उपस्थित राहिले....


पंतप्रधान मोदींनी ठरवलं असत तर शासकीय इतमात अंत्यसंस्कार झाले असते.....


पण त्यांनी एकदम साध्या , मध्यमवर्गीय कुटुंबातील सदस्या प्रमाणे सगळ्या प्रथा पार पाडल्या....


देश अशा पंतप्रधानांना कायम लक्षात ठेवील...


Shaarad Sir

उर्मिला

  उर्मिला... रामायण माहीत असत, पण उर्मिला नक्की कोण हेच काही जणांना माहीत नसतं... जेव्हा कळतं तेव्हा काय तर लक्ष्मणाची पत्नी एवढंच... एखादी ...