MPSC / CSAT Qualifying नक्की काय बदल ?
महाराष्ट्र लोकसेवा आयोग विविध पदांसाठी परीक्षा घेत असतो. त्यामध्ये PSI , STI , ASST , तसेच राज्यसेवा पूर्व परीक्षा. राज्यसेवा पूर्व परीक्षा मध्ये जे दोन पेपर असतात त्यामधील दुसरा पेपर CSAT फक्त Qualifying असावा अशी मागणी खूप दिवसांपासून होती. त्यावर राज्य लोक सेवा आयोग विचार करत होता आणि आता आयोगाने राज्य सेवा पूर्व परीक्षेमध्ये काही बदल केला आहे.
तो बदल नक्की काय आहेते आपण पाहू या.
राज्य सेवा पूर्व परीक्षा देताना परीक्षार्थींना दोन पेपर द्यावे लागतात. त्यामध्ये
1. पेपर :- 1
2. CSAT
पेपर 1 मध्ये 100 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असतात.
तसेच पेपर 2 ( CSAT ) मध्ये 80 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 2.5 मार्क असतात.
एकूण 400 मार्कांची पूर्व परीक्षा असते. मेरिट ( कटऑफ ) 400 मार्कांनुसार लागतो.
बदल :-
पेपर 1 मध्ये काहीही बदल करण्यात आला नाही.
पेपर 2 म्हणजेच CSAT चे मार्क आता मुख्य परीक्षेसाठी पात्रतेसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत.
तर CSAT पेपर मध्ये तुम्हांला 33 % मार्क मिळवावे लागतील. फक्त पास व्हावे लागेल म्हणजे 200 मार्कांपैकी 66 मार्क मिळवावे लागतील.
CSAT मध्ये जर 33% मार्क मिळाले नाही तर तुम्हांला पेपर 1 मध्ये कितीही मार्क पडले तरी त्याचा उपयोग नाही.
पेपर 1 मध्ये जे मार्क मिळतील त्यावरच मेरिट लागेल. पण त्यासाठी तुम्हांला CSAT मध्ये पास व्हावे लागेलं. म्हणजे 33% मार्क मिळवावे लागतील. तरच तुमचे पेपर 1 चे मार्क ग्राह्य धरले जातील.
आज पासून पुढे येणाऱ्या सगळ्या परीक्षा साठी हा बदल असेल. CSAT मध्ये या आधी 50 प्रश्न हे उताऱ्यावर आधारित , बुद्धिमत्ता आणि गणित यावर 25 प्रश्न , डिसिजन मेकिंग वर 5 प्रश्न अशी विभागणी असे. आता यामध्ये काही बदल होऊ शकतो. किव्हा बदल होऊ शकत नाही. हे आयोग ठरवेल. उताऱ्यावरील प्रश्न कमी करून गणित आणि बुद्धिमत्ता यावर प्रश्नांची संख्या वाढू शकते जसे UPSC ने केलं आहे तसही महाराष्ट्र लोकसेवा आयोग करू शकतो.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग येणाऱ्या काळात कशा पद्धतीने बदल करतो ते पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.