शुक्रवार, १७ एप्रिल, २०२६

उर्मिला

 उर्मिला...

रामायण माहीत असत, पण उर्मिला नक्की कोण हेच काही जणांना माहीत नसतं...

जेव्हा कळतं तेव्हा काय तर लक्ष्मणाची पत्नी एवढंच...

उर्मिला


एखादी गोष्ट सांगणे आणि विचारणे यात फरक असतो ना..

विचारलं तर समोरच्याच मत विचारात घेतलं जातं.. त्याला होकार किंव्हा नकार द्यायची संधी असते, 

पण जेव्हा एखादी गोष्ट सांगितली जाते तेव्हा समोरच्याच मत अपेक्षित नसतं त्याला गृहीत धरलं जात....

प्रत्येक वेळी उर्मिलेला गृहीत धरलं गेलं...

लक्ष्मणाशी लग्न कर हे जनक सांगतात... 

( तिचं काय मत आहे विचारले जातं नाही..

सीतेसाठी स्वयंवर केल जात पण तिच्यासाठी....)

मी पण श्रीरामाबरोबर 14 वर्ष वनवासाला जाणार हे लक्ष्मण सांगतो... 

( तिच्या परवानगीची त्याला गरज वाटत नाही...)

सोबत जाण्याचा अधिकार तिला न देता, मागे राहणं हेच तिचं कर्तव्य आहे हे ठरवलं गेलं....

वनवास संपवून जेव्हा ते पुन्हा एकत्र आल्यावर सुद्धा लक्ष्मण तिला विचारात न घेता जलसमाधी घेतो.... 

पुन्हा ती एकटीच...



समाज म्हणतो की उर्मिलेने त्याग केला. पण त्याग कधी असतो माहीत आहे का..?

जेव्हा त्याग करणाऱ्याला ' नाही ' म्हणण्याचा अधिकार असतो तेव्हा....

इथे उर्मिलेकडे तो अधिकारच नाही. तिच्या आयुष्यातले निर्णय आधीच घेतले गेले आणि तिला फक्त त्यांना स्वीकारायला सांगितले....



रामायणात उर्मिला लक्ष्मणाची पत्नी म्हणून नव्हे तर फक्त एक स्त्री म्हणून होती, ती सगळं ऐकत होती, पाहत होती, प्रत्येक वाक्य तिच्या आयुष्यावर कोरलं जात होतं, पण तिच्यासाठी एकही वाक्य नव्हतं....

 " तुला काय हवं आहे ?” 



पण सगळं ऐश्वर्य असूनही ऐन तारुण्यात नवरा सोबत नसल्याचं दुःख....

ती तारुण्याची 14 वर्ष अपार संयमाने जाळते...

कोणीही तिच्या विरहाची गणना केली नाही कारण तिचा विरह, तिचा एकटेपणा दिसत नव्हता. ... 

ती फक्त शांतपणे जगत होती आणि शांत गोष्टी नेहमीच दुर्लक्षित राहतात.



सीतेचं दुःख आपल्याला मोजता येतं, कारण ते दिसत.( वनवास, अपहरण, अशोकवन, अग्निपरीक्षा) 

पण उर्मिलेचं दुःख मोजता येत नाही कारण ते दिसत नाही... 

खरं सांगायचं तर बाहेरच्या शत्रूशी लढणं सोपं असतं पण स्वतःच्या शांत एकटेपणाशी लढणं खूप कठीण असतं. म्हणूनच उर्मिलेचा त्याग कमी नाही...

तो फक्त दिसत नाही आणि जे दिसत नाही ते जगाला मान्य नसतं... 

समाज कोणाला महान ठरवतो माहीत आहे का ज्याच्या आयुष्यात संघर्ष असतो आणि तो दिसतो, सीतेचा संघर्ष दिसतो आणि या उलट उर्मिलेचा संघर्ष दिसत नाही... 

म्हणूनच समाज त्याला संघर्ष मानायलाच तयार नाही... 


सीतेच्या आयुष्यात मोठं मोठे संघर्ष आले तिने त्यांचा सामना केला..पण  उर्मिलेला प्रत्येक छोट्या क्षणांना सामोरे जावं लागलं... 

कधी कधी हे छोटे क्षणच जास्त जड असतात कारण ते सतत जगावे लागतात....



संपूर्ण आयुष्यात स्त्री स्वतः साठी कधी जगते का ?

वडिलांना काय वाटेल..? 

आईला काय वाटेल..?

नवऱ्याला काय वाटेल.. ? 

सासू ला काय वाटेल.. ?

मुलांना काय वाटेल.. ?

आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे

समाजाला काय वाटेल.. ?


या सगळ्यांचा विचार करत ती स्वतःला काय वाटतं हेच विसरून जाते... स्वतःसाठी जगायचं राहून जातं...

सगळ्यांच्या आवडी निवडी जपताना ती स्वतःला नक्की काय आवडत हेच विसरते...


उर्मिलेला ( आजच्या स्त्रीला ) पत्नी म्हणून पतीचं वर्चस्व नको असत. आणि पती रक्षणकर्ता म्हणूनही नको असतो...

तिला तिचा पती आयुष्यात सहचर म्हणून हवा असतो. 

प्रत्येक स्त्रीला पुरुषाकडून प्रेम हवं असतं. 

संवाद हवा असतो...

एकमेकांची काळजी घेणं, आवडनिवड बघणं...

एकमेकांप्रती आदर हवा असतो...


आज ही समाजात आपल्याला उर्मिला आढळते. जी नात्याच्या, प्रेमाच्या नावाखाली कायम तडजोड करत राहते... समजून घेते, स्वतःला कायम मागे ठेवते, स्वतःच अस्तित्व विसरून जाते, आणि समाज त्याला समजूतदारपणा , त्याग अशी सुंदर नाव देतो.


मी सुद्धा स्त्रियांना गृहीत धरत आलो आणि आजही धरतो पण आता कळतंय ते चुकीचं आहे....

हे उर्मिला वाचताना जाणवलं मला....


( ' उर्मिला ' हे पुस्तक वाचत असताना मी उर्मिलेबाबत आणखीही लेख वाचले...

त्या सगळ्यांचा परिपाक म्हणजे हा लेख...)

बुधवार, २५ मार्च, २०२६

राधा आणि प्रेम

 राधा आणि प्रेम


राधा म्हटलं की काय आठवत आपल्याला...

कृष्णावर 

अपार...

अनंत...

अथांग प्रेम करणारी सखी.....

कृष्णाला आयुष्यातील एक भाग न ठेवता पूर्ण आयुष्यच समजणारी....


प्रेम ही भावना अतिशय उत्कटपणे आयुष्यभर जगणारी....

कृष्णाची आयुष्याच्या शेवटपर्यंत वाट पाहणारी...


खरंच प्रेम ही भावना आपलं आयुष्यच होऊन जाऊ शकते का ?

इतकं प्रेम कोणी करू शकत का कोणावर..?

कोणताही प्रश्न न विचारता..?


तिकडे कृष्ण लग्न करतो...

किती तरी स्त्रिया त्याच्यावर प्रेम करतायेत...

त्याची किती लग्न झालीत...


हे सगळं माहीत असूनही तिचं प्रेम कमी होत नाही....

तिचा कृष्णावर असलेला अफाट विश्वास...

कृष्णाबाबत असलेली तिची आत्मियता कमीच होत नाही....

ती आयुष्यभर कृष्णासाठी तडजोड करते...

आणि सगळं असूनही ती त्याच्यावर न रागावता शेवटी क्षमा करून टाकते त्याला....



राधा काय शिकवते माहीत आहे का..?

- स्वतःला विसरून प्रेम करण...

- प्रेम ही जीवनातील सर्वोच्च भावना आहे...

- प्रेम हे तुम्हाला 'मुक्ती' देतं, 'अडकवून' ठेवत नाही...

- प्रेम म्हणजे एकमेकांवर असलेला प्रघाढ विश्वास...

- एखादी व्यक्ती तुमचं आयुष्य उजळवू टाकू शकते...

- खऱ्या प्रेमात शांती असते, गोंधळ नसतो...

- खऱ्या प्रेमात 'स्थिरता' (Stability) असते...

- प्रेम हा असा धागा आहे की जो आपल्या स्वत्वापासून तयार होतो आणि आपल्याला एका वैश्विक रचनेशी जोडतो...

- प्रेम ही मंद वाऱ्याची झुळूक ही आहे आणि वादळ ही...

- प्रेम आनंदाचा स्त्रोत असतं आणि तेच प्रेम वेदना, दुःख आणि अश्रूच मूळ पण असू शकत...

- प्रेम हे बंधन नसून ते एक प्रकारचं स्वातंत्र्य असत...

- एकमेकांचा अविभाज्य भाग होणं म्हणजे प्रेम...

- प्रेम म्हणजे एकजीव होणं, एकसुरी नाही...

- पेम हे सहज सुंदर असतं..



कृष्णाचं ही राधेवर उत्कट प्रेम आहे... 

त्याच्या आयुष्यात खूप स्त्रिया येतात, 

लग्न होत पण त्याच्या आयुष्यातली राधेची जागा कोण घेत नाही...

ती जागा कोण घेत नाही हे म्हणण्यापेक्षा कृष्ण ती जागा कोणाला घेऊ देत नाही...


कृष्ण राधेची कायम काळजी घेतो...

ती कशी आहे हे तो कायम जाणून घेत राहतो...

तिची खबरबात तो कायम घेत राहतो...

फक्त तो तिला भेटत नाही...

कारण त्यालाही माहीत आहे की तो राधेत अडकला की त्याचं असलेलं जीवितकार्य पूर्ण होणार नाही...

तो या सगळ्यात योग्य बॅलन्स ठेवतो...


कृष्णाच्या या situation ला मला आता आलेल्या धुरंधर मधील एक गाणं आठवतंय...

तेरी मोहब्बत में जलना भी है

और तुझसे बचके ही चलना भी है

कुछ रंग अपना बदलना भी है

मैंने ढलना तेरे रंग में है सदा...


राधा म्हणजे मोक्ष...


प्रेम हे जागृत, विवेकी आणि डोळस असावं. तस असेल तर त्या प्रेमाहून पावन आणि सुंदर कोणतीच गोष्ट नाही...


प्रेम ही सहज आणि सुंदर भावना आहे...

प्रेम कोणावरही आणि कधी ही होत..

ते ठरवूनही करता येतं नाही...

ते झालंय हे ही समजत नाही...

कळत नाही...

जाणवत नाही...

फक्त ते होत...

त्याला आपण थांबवूही शकत नाही...

त्यापासून दुरही जाऊ शकत नाही...


ते कधी कळतं माहीत आहे का जेव्हा कधी विरह निर्माण होतो, तेव्हा ते उत्कट पणे जाणवायला लागत...

अशा वेळेस ते निरपेक्षपणे स्वीकारायला हवं...

जगायला हवं...

ती भावना अनुभवायला हवी...

ती जपायला हवी...

कोणा दुसऱ्यासाठी नाही तर स्वतःसाठी...

कारण...

प्रेम तुम्हांला स्वतःच्या आधी दुसऱ्याचा विचार करायाला शिकवत...

तुमचा आत्मिक विकास करत...

तुम्हांला परिपूर्ण माणूस बनवत...

प्रेम म्हणजे मिळवणं नाही तर मुक्त करण...



पण आत्ताच्या काळात एखाद्या व्यक्तीवर इतकही प्रेम करू नये की ती तुमचं सगळं आयुष्यच होईल...

कारण...

एखादी व्यक्ती तुमचं आयुष्य उजळवू शकते, पण ती व्यक्ती तुमचं 'पूर्ण आयुष्य' असू शकत नाही...

कारण राधे सारखं प्रेम तुम्हांला करता येणार नाही...

कारण आज जीवन हे मुळातच प्रवाही आहे. ते एका ठिकाणी थांबवता येत नाही...

तुम्ही थांबू ही नका...

सगळ्यात आधी 

स्वतःवर प्रेम करायला शिका...!


 

सगळ्यात आवडल ते प्रेमाचं फुल आणि त्याच्या नऊ पाकळ्या...... 

कारण त्याशिवाय ते फुल सुगंधी होत नाही....


विश्वास, 

संवाद, 

आदर, 

आनंद, 

संयम, 

तडजोड, 

विकास,

आत्मियता,

क्षमा,

Shaarad Sir

उर्मिला

  उर्मिला... रामायण माहीत असत, पण उर्मिला नक्की कोण हेच काही जणांना माहीत नसतं... जेव्हा कळतं तेव्हा काय तर लक्ष्मणाची पत्नी एवढंच... एखादी ...