Sergeant Plan | Primary Education | सार्जंट योजना | Primary education लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Sergeant Plan | Primary Education | सार्जंट योजना | Primary education लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ६ जून, २०२४

Sergeant Plan | Primary Education | सार्जंट योजना | Primary education

 सार्जंट योजना


- दुसरे महायुद्ध सुरू असले तरी महायुद्धाच्या समाप्तीनंतर भारत हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास येणार, हे जवळपास ठरून गेले होते. 

- गांधीजींची सुटका झाल्यानंतर त्यांनी एक महत्त्वाचा विचार पुढे मांडला. तो असा -

- शिक्षणाचे क्षेत्र नवजात बालकाच्या जीवनाच्या प्रारंभापासून ते त्याच्या जीवनाच्या अंतापर्यंत पसरलेले आहे. 

- पहिले सात वर्षांचे शिक्षण हा त्यातला एक प्रधान भाग आहे आणि बालकांच्या परिपूर्ण व्यापक शिक्षण क्षेत्राची तजवीज करणे, हे राज्याचे आणि समाजाचे पवित्र व प्रधान कर्तव्य आहे. 

- त्यावेळी देशामध्ये केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळ विद्यमान होते आणि भारत सरकारचे शिक्षण सल्लागार जॉन सार्जंट यांनी या मंडळापुढे 1944 साली युद्धोत्तर भारतीय शिक्षणाची पुनर्रचना सूचित करणारी योजना सादर केली. ती म्हणजेच सार्जेंट योजना होय. 

- त्यामध्ये प्राथमिक शिक्षणाचा सखोल विचार करूनं योजना मांडलेली होती. 

- खरे तर किरकोळ बदल करून गांधीजींची मूलोद्योग शिक्षण पद्धतीच मान्य केलेली होती.

- वय वर्षे 6 ते 14 दरम्यानच्या सर्वांना मोफत, सक्तीचे व सार्वत्रिक शिक्षण द्यावे, असे म्हटले होते. त्याचे दोन भाग केले होते. 

(1) 1 ते 5 निम्नप्राथमिक 

(2) 6 ते 8 उच्च प्राथमिक.


¶ निम्नप्राथमिक सर्वांसाठी सक्तीचे आणि ज्यांना उच्च शिक्षण घेता येणार नाही, त्यांच्यासाठी उच्च प्राथमिक सुद्धा सक्तीचे होते.

¶ शिक्षण सक्तीचे करण्यासाठी उपस्थिती अधिकारी नियुक्त केले जावेत.

¶ शिक्षण कोणत्याही हस्तव्यवसायाच्या माध्यमातूनच दिले जावे.

¶ मूलोद्योगी शिक्षण पूर्णपणे स्वाश्रयी किंवा स्वावलंबी होऊ शकणार नाही, यासाठी शासनाने पुरेसे अनुदान द्यावे.

¶ निम्न प्राथमिक स्तरावर इंग्रजी भाषेचे शिक्षण देऊ नये.

¶ या स्तरावर पूर्णपणे सहशिक्षण द्यावे.

¶ उच्च प्राथमिक स्तरावर इंग्रजी शिक्षणाचा आग्रह नसावा पण ज्यांची मागणी असते, त्यांच्यासाठी सोय असावी.

¶ निम्न आणि उच्च प्राथमिक शाळांमध्ये शिक्षणाचे माध्यम मातृभाषा आणि फक्त मातृभाषाच असावे.

¶ दोन्ही स्तरांवरील शाळांमध्ये बाह्य परीक्षांऐवजी आंतरिक परीक्षांचीच तरतूद असावी. फार तर शिक्षण समाप्तीच्या वर्गात सार्वजनिक परीक्षा घेतली जावी.

¶ अशा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिकृत प्रमाणपत्रे द्यावीत.

¶ गुणवत्तेनुसार निवडक विद्यार्थ्यांसाठी विद्याविषयक व तांत्रिक माध्यमिक शाळांची सोय करावी.

¶ विद्यापीठीय पदवी अभ्यासक्रम केवळ निवडक व उच्च गुणवत्ता धारण करणाऱ्यांसाठीच असावेत.

¶ गुणवत्तेनुसार पूर्णकालिक किंवा अंशकालिक, तांत्रिक, व्यावसायिक व वाणिज्य शिक्षणाची सोय करावी. 

¶ दूध पुरवठा, वैद्यकीय तपासणी, दुपारचा अल्पोपहार, शारीरिक शिक्षण व मनोरंजन या सुविधा व सोयी उपलब्ध करून द्याव्यात

¶ अध्यापकांचे प्रशिक्षण महत्त्वाचे असून प्रशिक्षणाची तरतूद करण्यात यावी. अध्यापकांच्या सेवाशर्तीत सुधारणा करणे आवश्यक असून त्यांच्या सामाजिक व आर्थिक दर्जात सुधारणा घडवून आणावी.

¶ पदवीधर विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा म्हणून रोजंदारी केंद्रे स्थापन करावीत.

¶ सार्वजनिक ग्रंथालये सुरू करावेत, मनोरंजन केंद्रांचा विकास करावा, निरक्षरतेचे निर्मूलन करण्यासाठी प्रौढ शिक्षणासाठी पोषक जनमत तयार करावे.

¶ दिव्यांग व मतिमंद विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात यावे.


सार्जंट यांनी प्राथमिक शिक्षणासंबंधी एक मार्मिक निरीक्षण नोंदवले होते. ते म्हणजे 'भारतातील प्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांची संख्या लक्षात घेता किमान चाळीस वर्षे तरी प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे उद्दिष्ट साध्य होऊ शकणार नाही.'

Shaarad Sir

उर्मिला

  उर्मिला... रामायण माहीत असत, पण उर्मिला नक्की कोण हेच काही जणांना माहीत नसतं... जेव्हा कळतं तेव्हा काय तर लक्ष्मणाची पत्नी एवढंच... एखादी ...