रविवार, २६ डिसेंबर, २०२१

गृहिणींचा आत्मसन्मान राखणे आहे गरजेचे .....

          सामाजिक जीवनात जगत असताना कामांची विभागणी झालेली आहे. पुरुषाने कमावण्यासाठी घराबाहेर जायचं आणि स्त्री ने घर सांभाळायचं. पण अलीकडे स्रियां नोकरी करू लागल्या आहेत त्या नोकरी करत करत घर पण सांभाळतात. तसेच काही स्त्रीया घरातच काही छोटे छोटे व्यवसाय करत असतात. पण अजूनही काही स्त्रीया घर सांभाळत आहेत. जेव्हा एखादी स्त्री कमावते तेव्हा तिचा आत्मसन्मान राखला जातो पण जर ती कमावत नसेल तर तिला कसलाही मान दिला जात नाही. ती काहीच करत नाही घरातच असते. त्यासाठी house wife हा गोंडस शब्द वापरला जातो. 


          पण ती घरात असते म्हणून तर इतर बाहेर जाऊन काम करू शकतात आपली स्वप्न साकार करू शकतात. ती कुटुंबाची काळजी घेते त्यामुळे इतर बिनधास्त असतात. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला काय हवं काय नको हे ती पाहत असते. कुटुंबातील सगळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी ती उत्तम स्वयंपाक करते. पौष्टिक अन्न पदार्थ बनवून खायला घालते. घराची स्वच्छता ठेवते. ती कुटुंबातील सर्व सदस्यांची काळजी घेत असताना किती वेळ आणि किती काम करते ह्या कडे कोणीच लक्ष देत नाही. 


    तिच्या कामाची दखल पण घ्यायला आपल्या कडे वेळ नसतो. मग ती आई असो का पत्नी असो. आपल्याला कामाचा थकवा आला तर आपण एक दिवस काहीच काम करत नाही. निवांत आराम करत असतो कधी कधी कामाचा कंटाळा आला तर आपण 2 दिवस सुट्टी घेऊन आराम करतो त्यावेळी काहीच काम करत नाही. पण तसं घरातील गृहीणीच नसतं तिला घरातील काम करावंच लागत अगदी ती आजारी असली तरी तिची घरकामातून सुटका नसते. हा विचार आपण कधी करतो का ? का आपण ठरवून टाकलं आहे की तिला आरामाची गरज नाही. 


         समाजात जे पैसे कमावतात त्यांना मान असतो पण इतरांना काहीच किंमत नसते का ? आपण जर असा संकुचित विचार करत असू तर कुठं तरी चुकतंय. प्रत्येकाला मान द्यायला हवा. इथे कोणीही कमी प्रतीचा नाही. कोणतंही काम छोटं किंव्हा मोठं असत नाही. सगळीच काम श्रेष्ठ असतात मग ती काम करणारी माणसे कमी आणि मोठ्या दर्जाची कशी असू शकतात. आपण जर सर्वांचा सन्मान करू लागलो तर इतरही करू लागतील. गृहीणीचं महत्त्व समजून घ्यायला हवं. जो कोणी त्यांना कमी लेखत असेल त्यांनाही त्याचं महत्त्व समजून सांगाव लागेल. 


        आपण याची सुरुवात आपल्या घरापासून करूयात प्रथम आपल्या घरातील गृहीणींचा सन्मान राखु या. खरच हे खूप गरजेचं आहे. ते आपण मान्य करायला पाहिजे. पटतंय ना. 

गुरुवार, २३ डिसेंबर, २०२१

Learn to say No / नाही म्हणायला शिका .....

 

          दैनंदिन जीवन जगत असताना आपण योग्य वेळी नाही म्हणायला शिकलं पाहिजे. नाहीं तर इतर आपल्याला गृहीत धरतात आणि आपल्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देतात. त्या जबाबदर्याच्या ओझ्याखाली आपण घुसमटून जातो. अपेक्षांचे ओझे वाढत जाते. आणि त्यात आपण पूर्ण पणे घेरलो जातो. 

         योग्यवेळी आपण नाही म्हणायला शिकलं पाहिजे. आपण विचार करतो की त्याला वाईट वाटेल , आपल नात संपेल , आपली मैत्री संपेल. मित्र दुखावेल , नाही कसं म्हणायचं. नाही म्हटलं तर काय होईल...असे खूप विचार मनात येतात आणि त्यामुळे आपण नाही म्हणत नाही. पण या मुळेचं आपण अडचणीत येत असतो. स्वतःला संकटात टाकत असतो. त्या वेळी वाटत का नाही म्हणायला पाहिजे होत. 

        खरच जेव्हा अशी वेळ येते तेव्हा बिनधास्त नाही म्हणायला शिका. जे काही होईल ते होईल जास्त विचार करत बसू नका. स्पष्ट बोलण्याने समोरचा काही वेळ दुखावेल पण त्यालाही आपलं म्हणणं पटेल. पण आपण नाही म्हणायला उशीर केला तर नातं कायमच संपेल. 


          आपण कायम कोणतंही काम असो, की एखादा निर्णय असो , तर आपल्याला सगळे जण गृहीत धरतात. आपल्या विचाराला काहीही किंमत राहत नाही. एक वेळ चांगल्या कामासाठी आपल्याला गृहीत धरलं तर ठीक असतं पण इतर कामासाठी ते चुकीचे असतं. हे होऊ नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे. सजग राहायला हवं. 

         आणखी एक की विनाकारण आपण त्रास सहन करायचा. आधी आधी आपली माणसे आपल्याला गृहीत धरतात नंतर इतर ही तसंच करतात. हे अधिक त्रासदायक होऊ नये या साठी योग्य वेळी नाही म्हणायला शिकलं पाहिजे. 

        एखाद्या बाबतीतही नाही म्हणायचं हे ही एक कौशल्य आहे ते आपण आत्मसात केलं पाहिजे. सगळी काम आपण नसतात करायची तर काही कामे इतरांकडून करवून घ्यायची असतात. सगळं आपणच करत बसलो तर त्याचा उपयोग होणार नाही आणि आपला वेळही वाया जाणार.  

       स्पष्ट बोला पण असे स्पष्ट बोला कीं त्यामुळे इतरांना कष्ट होणार नाही आणि आपले नाते नष्ट होणार नाही. लक्षात ठेवा नाही हा शब्द ही खूप महत्त्वाचा आहे पण तो कधी आणि कसा वापरायचा हे माहिती हवं.




मंगळवार, २१ डिसेंबर, २०२१

मला आवडणारे पौराणिक पात्र.....

           पौराणिक कथांच मला लहानपणापासून एक अनामिक आकर्षण राहिलं आहे. मी लहान असताना टी व्ही वरती रामायण , महाभारत , श्रीकृष्णा , जय हनुमान या मालिका असत. या सगळ्या मालिकांमधील सगळ्या मी न चूकता पाहिल्या आहेत. पौराणिक कथा आणि त्यातील पात्र यांमधून खूप काही शिकायला मिळत. रामायण पाहताना राम किती साधा, सरळ, एकवचनी , एकपत्नी, वडिलांनी दिलेल्या वचनासाठी स्वतः राज्य त्याग करून वनवासात निघून जाणारा राम पहिला की भारी वाटत पण मला आवडतो तो कृष्ण.....

          सतत हसतमुख राहणारा कृष्ण. सगळंच जणू काही माहीत आहे असं वागणं. प्रत्येक संकटाच्या वेळी हतबल न होता त्यातून नक्की बाहेर कस पडायचं हे जाणून असणारा कृष्ण वेगळाच भासतो. बुद्धी आणि चातुर्याने सगळ्या संकटांचा सामना करता येतो हे कृष्णाकडे पाहिलं की कळतं. 

त्याच रूप मनावर गारुड करत. मोरपीस आणि हसरा चेहरा मनात घर करून राहत.

           मैत्री म्हणजे काय ते कळत. मित्रांमध्ये गरीब-श्रीमंत , राजा-सेवक, उच्च- नीच , सुंदर-कुरुप असं काहीच नसत असते ते मित्रप्रेम. मैत्रीत पद-प्रतिष्ठा असत नाही असते ती निखळ मैत्री. खरच तो हे नातं कसं असावं हे सांगतो.  

           कृष्णाचा जन्म कोठडीत झाला. त्याला मारण्याचे किती तरी प्रयत्न झाले पण त्यातून तो बाहेर पडला. स्वतःवर अन्याय झाला म्हणून त्याने दुसऱ्यावर कधी अन्याय केला नाही आणि होऊ ही दिला नाही. परिस्थिती कशी का असेना पण आपण सगळ्यांशी चांगलेच वागले पाहिजे. नियती योग्य वेळी न्याय करते. विनाकारण इतरांना  दोष देऊ नये. 

            महाभारतात तो तटस्थ राहू शकला असता पण तो योग्य बाजूने उभा राहिला. कौरवांन कडे किती महान योद्धे , अफाट सेना होती पण तो न्यायाच्या बाजूने उभा राहिला. ज्या गोष्टी आपल्या अखत्यारीत नाहीत त्या विषयी जास्त विचार न करता त्या मान्य कराव्यात. हे तो सांगतो.

 कृष्णाकडे पाहिलं की जीवनाकडे वेगळ्याच दृष्टीने पाहता येतं. आपण एखाद्या गोष्टी कडे कसे पाहतो त्यानुसार ती गोष्ट ठरत असते. महाभारतात रणांगणावर अर्जुनाला का ? कसं ? कोणासाठी ? लढल पाहीजे हे सांगतो. पण खरं तर तो सगळ्यांनाचं सांगत असतो की आपल्या आयुष्यात आपण कसं जगावं. जीवन जगताना आपण सगळेच अर्जुन असतो. या युद्धात आपल्याला जिंकायचं असेल तर कृष्णासारखा एक सारथी असायला हवा. 

कृष्ण सांगतो की एखाद्याचा निरोप घ्यायचा असेल तर झटकन निरोप घ्यावा..  निरोप घेताना रेंगाळू नये , जितका जास्त वेळ निरोप घ्यायला लावाल तितका जास्त त्रास होतो... 

         लहानपणी कृष्णाच्या कथा व त्यातील चमत्कार खूप भावतात आणि जस जसे आपण मोठे होऊ लागतो त्या प्रत्येक टप्यावर तो अधिकाधिक समजत जातो. 

आयुष्याच्या प्रत्येक टप्यावर तो नव्याने समजतो. जीवनात येणारे अनुभव आणि त्यानुसार कळतं जाणारा कृष्ण हे एक गूढ आहे. तो आपल्याला पूर्णत्वाकडे घेऊन जाण्यास मदत करतो. 

          खरच समृद्ध जीवन जगायचं असेल तर कृष्ण अभ्यासावा. तो आपलं जीवन व्यापून टाकतो. ते अधिकाधिक समृद्ध करण्यास मदत करतो. 

रविवार, १९ डिसेंबर, २०२१

Gym's craze for youth./ तरुणाईला लागलेले जीम चे वेड.....

           आजकाल आपण पाहतो की प्रत्येक तरुणाला सिक्स पॅक बॉडी हवी असते. आपलं शरीर आकर्षक असावं असं वाटत. बायसेप, ट्रायसेप, शोल्डर यांच वेड लागलं आहे. विशेष म्हणजे या सगळ्या गोष्टी म्हणजे तंदुरुस्त शरीर असं त्यांना वाटत पण खरंच जीम म्हणजे तंदुरुस्त शरीर आहे का ? जिम ने शरीर आकर्षक बनत तंदुरुस्त नाही.

           व्यायाम शरीरासाठी खूप आवश्यक आहे. पण तो शरीर निरोगी राहण्यासाठी मदत करणारा असावा. आज काल प्रत्येकाला आकर्षक शरीर हवंय. ते ही खूप लवकर. त्यासाठी जीम चा आधार घेतला जातो. लवकरात लवकर फिट दिसण्यासाठी स्टिरॉइड्स घेतले जातात. जे आपल्या शरीराला आतून कमजोर करतात. नैसर्गिक प्रतिकार शक्ती काढून घेतात. त्या प्रोटीन पावडर स्टिरॉइड्स मुळे शरीरावर विपरीत परिणाम होतात. आपण सुंदर तर दिसतो पण आतून कमजोर झालेलो असतो. जेव्हा आपण पाहतो की एखादा फिट बॉडी असणारा ऍक्टर हार्ट अटॅकने गेला तेव्हा आपल्याला धक्का बसतो. पण त्याच मूळ कारण म्हणजे आकर्षक दिसण्यासाठी केलेला व्यायामाचा अतिरेक .


             ​शरीर मजबूत बनवायचं आहे का फक्त आकर्षक बनवायचं आहे हे तरुणांनी लक्षात घ्याव. शरीर सजवयाच आहे का ते आतून मजबूत ठेवायचं आहे याचा विचार करावा. मोडकळीस आलेल्या घराला रंग आणि इतर सजावट करून ते बळकट होत नाही ते आतून मजबूत करण्यासाठी त्याचा पाया , ढाच्या वर काम करायला हवं. तसंच आपल्या शरीरचं आहे. त्याला पण सजवयाच्या नादात न पडता ते मजबूत कसं बनेल यावर लक्ष दिलं पाहिजे. जीम मध्येच शरीर आकर्षक होत असे नाही तर योगा, मेडिटेशन यांमुळे सुद्धा शरीर आतून बाहेरून मजबूत होते..

          कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. जीम मध्ये काहीजण आकर्षक दिसण्यासाठी प्रमाणापेक्षा खूप व्यायाम करतात. व्यायामाचा अतिरेक केला जातो त्यामुळे हृदयावर त्याचा दुष्परिणाम होतो. जीममुळे व्यायामाची योग्य वेळ पाळली जात नाही. कधीही आणि कितीही व्यायाम केला जातो. त्यामुळे शरीरावर वाईट परिणाम होतात. 

          व्यायाम म्हणजे शरीराला आतून मजबूत बनवण असत. त्याच्यात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणं असत. हे ज्या दिवशी तरुणाई ला समजेल त्यावेळी त्यांना जीम आणि व्यायाम यातील फरक समजेल.

 

गुरुवार, १६ डिसेंबर, २०२१

संप आणि नागरिक.......

          लोकशाही व्यवस्थेत मध्ये आपलं म्हणणं मांडण्यासाठी विविध मार्ग आहेत. संवाद साधून आपण सरकारशी आपली बाजू मांडू शकतो. उपोषण करून एखाद्या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधून घेऊ शकतो. काही कर्मचारी आपल्या संघटनांच्या माध्यमातून आपल्या मागण्या सरकार कडे मांडतात आणि त्यातुन मार्ग काढतात ...

          पण कधी कधी संप पुकारला जातो. काम बंद आंदोलन केले जाते. सार्वजनिक सुविधा पुरवणारे कर्मचारी ज्या वेळी असा संप करतात त्या वेळी त्याचा सगळ्यात जास्त त्रास होतो तो सर्वसामान्य नागरिकाला. कधी बँक कर्मचारी संप पुकारतात तर कधी एस स्टी कर्मचारी संप करतात. कधी रिक्षावाले संप करतात तर कधी बेस्ट कर्मचारी. सरकार आणि या संपकऱ्यांमध्ये लवकर वाटाघाटी होत नाहीत आणि त्याच्यात त्रासाला जातो तो सर्वसामान्य नागरिक. तो सगळ्यांमध्ये भरडला जातो. त्त्याची काहीही चूक असतं नाही पण त्रास त्यालाच होतो. 

           नागरिकांना सगळ्या सुविधा पुरवणे त्यांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करणं हे सरकारचे काम असतं. सार्वजनिक सुविधा या नागरिकांची गैरसोय होऊ नये या साठी असतात. त्यांना योग्य वेळी त्यांचा उपयोग करता यायला हवा यासाठी सरकारने काम केलं पाहिजे. पण ज्या वेळी संप पुकारला जातो त्यावेळी या व्यवस्था विस्कळीत होतात किव्हा कधी कधी पूर्णपणे बंद होतात. अशा वेळी नागरिकांना वेगवेगळ्या समस्यांशी तोंड द्यावे लागते. 

         तो सार्वजनिक सुविधा वापरतो, तो त्यावर विसंबून असतो,  सरकारच्या कारभारावर त्याचा विश्वास असतो नक्की काय चूक असते त्याची...  त्यामुळे त्याला शिक्षा मिळते. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्याची काहीही चूक असत नाही. 

         संपकरी त्याच्या हक्कासाठी भांडतात. त्यांना त्यांचा हक्क मिळायलाच पाहिजे या बद्दल दुमत नाही. पण संपकरी आणि सरकार यांच्या मध्ये भरडला जाती तो सामान्य नागरिक. त्याची नक्की काय चूक असते बरं....

       खरंच  सर्वांनी विचार करण्याची गरज आहे......

मंगळवार, १४ डिसेंबर, २०२१

Live in a relationship / लिव्ह एन रिलेशनशिप

 भारतीय समाजामध्ये आता काही नवीन संकल्पना रुजायला लागल्या आहेत. बदलत्या जगासोबत चालायचं, जुनं आता काही राहील नाही , परंपरागत गोष्टीतून बाहेर पडायला हवं , स्वातंत्र्य हवं याच्या नावाखाली तरुण पिढी लिव्ह एन रिलेशनशिप ला प्रोत्साहन देऊ लागली आहे. 

              नक्की ही संकल्पना आहे काय ? तर लग्नाआधीचं तरुण तरुणी एकत्र राहायचं त्याचं एकमेकांशी पटलं तर लग्न करायचं नाही तर एकमेकांना मोकळं करायचं. कसलीही बंधनं नाहीत. जबाबदाऱ्या नाहीत.

               लग्न करून जर एकमेकांशी पटलं नाही. त्यानंतर वाद सुरू झाले, घटस्फोट घ्यावा लागणार त्यापेक्षा आधीच लिव्ह एन रिलेशनशिप  मध्ये राहायचं. म्हणजे पुढचे त्रासच नकोत. कुटुंबातील व्यक्तींना पण त्रास नको. अशी कारणे देऊन लिव्ह एन रिलेशनशिप च समर्थन केलं जातं. 

               पण हे सामाजिक दृष्टीने बरोबर आहे का ? भारतीय समाज त्याला मान्यता देईल का ? ज्या देशात लग्न हा खूप महत्त्वाचा सोहळा मानाला जातो. दोन कुटुंब एकमेकांसोबत जोडली जातात. लग्न म्हणजे सात जन्मीचे बंधन मानले जाते. ते पवित्र बंधन टिकवण्यासाठी सर्वजण खूप प्रयत्न करतात. भारतीय संस्कृतीत वटपौर्णिमेसारखा सण आणि करवाचौथ हे सण जे पती आणि पत्नी मधील नात घट्ट करण्यासाठी साजरा केला जातो. अशा देशात लग्न न करता एक तरुण मुलगा आणि तरुण मुलगी एकत्र राहणे ही संकल्पनाच विचित्र आहे. 

              भारतासारख्या देशात जिथे वैवाहिक नातेसंबधांना पवित्र मानले जाते तिथे अशा संबंधांना मान्यता आहे का याचा ही विचार करावा लागेल. विवाह म्हणजे फक्त दोन व्यक्ती मधील नातं नसतं तर ते दोन कुटुंबातील नात असतं. 

              लिव्ह एन रिलेशनशिप ही संकल्पना अनैतिक संबंधांना प्रोत्साहन देते. त्यामध्ये जबाबदारीची जाणीव योग्य प्रमाणात होत नाही. नाही जमलं तर दुसरे पर्याय असतात आणि पर्याय असले की एक नात्यात विश्वास असत नाही. आज याच्या बरोबर उद्या त्याच्या बरोबर असं कोणतंही नात दीर्घ काळ टिकत नाही. लिव्ह एन रिलेशनशिप बहुतांश लोकांना मान्य नाही. त्यातून निर्माण झालेले प्रॉब्लेम कसे सोडवायचे याचीही योग्य माहिती नाही. 

             भारतासारख्या  देशात लिव्ह एन रिलेशनशिप योग्य ठरणार नाही. कारण आपल्या देशाला महान संस्कृतीचा वारसा लाभला आहे. समाजमन या  संकल्पनेला मानू शकत नाही. लग्नाचं नात पवित्र मानलं जातं आणि  लिव्ह एन रिलेशनशिप तर त्यातून सगळं पावित्र्यच नष्ट करत. 

रविवार, १२ डिसेंबर, २०२१

लहान कुटुंबामुळे मुलं एकटी पडत आहेत का ?

            कुटुंबव्यवस्था ही माणसाच्या जीवनात खूप महत्त्वाची भूमिका बजावत असते. कुटुंबामुळे आपल्या सामाजिक , आर्थिक , भावनिक गरजा पूर्ण होत असतात. लहान मुलांना कुटुंबामुळे सुरक्षितता लाभते. 

           आजच्या काळात एकत्रितकुटुंब विभक्त होत आहेत. नोकरी, वाद , आर्थिक या कारणानं कुटुंबातील लोक बाहेर राहू लागली आहेत. जो तो आपल्याच विश्वात गुंग आहे. आपलं काम आणि आपण मग कोण काय करतय याच कुणाला काही पडलं नाही. 

           एकत्रित कुटुंबामुळे सर्वांची भावनिक गरज पूर्ण होत होती. आजी, आजोबा, काका, काकी या सर्वांचा वावर कुटुंबात होत असायचा. कोणाला काही मदत लागली तर ती केली जात होती. लहान मुलांच्या मनात एकमेकां बद्दल प्रेम वाढत होते. आजी , आजोबांचा सहवास त्यांना लाभत होता त्यातून मुलं हळू हळू घडत होती. जबाबदारीची जाणीव त्यांना कुटुंबातच होत होती. इतरांशी कस वागायचं कसं बोलायचं याचं भान त्यांना होत. त्यासाठी काही विशेष शिकवण्याची गरज नव्हती. 

           मुलाचं भावनिक विश्व यामुळे समृद्ध होत होत. आजीच्या गोष्टी आणि आजोबा याच्या अनुभवातील प्रसंग यांचा मुलांच्या मनावर चांगला परिणाम होत होता. एकत्रित कुटुंबात सतत कोणी ना कोणी घरी असत होत त्या मुळे एकटेपणाची भावना म्हणजे काय ते मुलांना माहीत न्हवते. आपल्याबरोबर दुसऱ्यांचा विचार करायला मुलं आपोआप शिकत होती. जे काही असेल ते इतरांना देत होती.

            पण जस जशी कुटुंब लहान होत गेली तसं तसं मुलांचं भावविश्व कोमेजून जायला लागलं. घरात माणसं कमी झाली. आई वडील कामात गुंतले त्यामुळे त्यांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळ मिळेना. आजी आजोबा नसल्याने गाणी गोष्टी सांगायला कोणी उरलं नाही. मुलांशी संवाद कमी झाला. कुटुंबच छोट झालं त्यामुळे इतरांचा सहवास कमी झाला. भावनिक गरजा पूर्ण होण्यात अडचणी येऊ लागल्या. भाऊ बहीणी ज्या मोठया कुटुंबात त्यांच्याशी खेळण्यासाठी सहज उपलब्ध होत होती ती आता राहिली नाहीत. मुलं एकटी पडू लागली. 

          मुलांचा मोबाईलचा वापर वाढू लागला. आई वडील कामात असल्याने त्यांना मुलांसाठी वेळ देता येत नसल्याने त्यांनी त्यांना मोबाईल दिला आणि मुलं त्यामध्ये अडकून पडली. ती अधिकाधिक एकटी पडू लागली. 

          लहान कुटुंबात मुलांच्या भावनिक गरजा पूर्ण होण्यात अडचणी येत आहेत. एकटेपणात वाढ होत आहे. मुलं एकलकोंडी होऊ लागली आहेत. त्यांना वेळ देणं गरजेचं आहे. मोबाईल, टीव्ही, गेम च्या आर्टिफिशिल जगातून त्यांना बाहेर काढून वास्तविक जगात आणण्यासाठी प्रयत्न करणं गरजेच आहे. 


सोमवार, ६ डिसेंबर, २०२१

The giver should keep on giving / देणाऱ्याने देत जावे

                     देणाऱ्याने देत जावे,

                     घेणाऱ्याने घेत जावे. 

                     घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. "

              दिल्याने वाढत. हो खरच माणसाने नेहमी देण्याचा प्रयत्न करावा. ज्या परिस्थितीत तुम्ही असता त्या परिस्थितीत देण्यास सुरुवात करा. जेवढी तुमची ऐपत असेल तेवढ द्या. 

             माझ्याकडे काही नाही मी काय कुणाला देणार. जेव्हा माझ्याकडे येईल तेव्हा मी देईल. अस आपण म्हणत असतो पण खरं तर तुम्ही द्यायला सुरुवात करा आणि पहा तुमच्या कडे वेगाने अनेक गोष्टी यायला सुरुवात होतील. झाड आपली सावली, फळ , फुलं सगळयांना देत असते. ते कोणाशीही कसलाही भेदभाव करत नाही. तसचं निस्वार्थपणे आपण द्यायला ह

            रवींद्रनाथ टागोर म्हणतात की  " माणसाने आपली भरलेली ओंजळ कायम रिकामी करत जावी म्हणजे ती पुन्हा नव्या नव्या गोष्टीने भरत जाते." तुमच्या कडे जे काही असेल ते द्या. ज्ञान असेल तर ते वाटा. प्रेम द्या. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद येण्यासाठी प्रयत्न करा. कोणी आपल्याला काय दिलंय ते पाहू नका. आपण निस्वार्थ पणे द्यायला सुरुवात करा. कोणी तरी मला दिल तरच मी पण देणार. असा विचार म्हणजे तो व्यवहार असतो. आपल्याला व्यवहार करायचा नाही. निस्वार्थ पणे द्यायचं आहे. कशाचीही अपेक्षा न करता. 

           लक्षात ठेवा ज्या गोष्टी तुम्ही द्याल त्याच गोष्टी दुप्पट होऊन पुन्हा तुमच्या कडे परत येतील. त्यामुळे चांगलं असेल ते द्या. तुम्ही इतरांशी जस वागाल तसंच लोक तुमच्याशी वागतील. देत चला आणि त्यातील आनंद अनुभवा. तो आनंद काय असतो ते दिल्यानंतरचं कळत. 

          प्रेम, धन, अन्न, तिरस्कार, ज्ञान,आनंद जे असेल ते द्या. पण लक्षात ठेवा जे तुम्ही देताल ते पुन्हा चक्रवाढ होऊन तुमच्या कडे परत येत. आता तुम्ही ठरवा काय द्यायचं ते निर्णय सर्वस्वी तुमचा असेल. 


सोमवार, २९ नोव्हेंबर, २०२१

How do you live without happiness? / आनंदा शिवाय जीवन कसं जगता ?

          आपण पाहतो की आपल्या आजूबाजूला काहीजण निराश चेहऱ्याने वावरत असतात. जस काही यांना जगाची काळजी आहे.  कायम कसल्याना कसल्या चिंतेत राहत असतात. मनमोकळेपणे हसणं म्हणजे गंभीर गुन्हाच आहे असं त्यांना वाटत. जगातली सगळी दुःख अपल्यालाचं आहेत. अस त्यांना वाटत. 

           खरंच ही माणसं आनंद साजरा करत असतील का नाही हा प्रश्न पडतो. आनंद झाल्यावर तो बेभानपणे आपल्याला व्यक्त करता आला पाहिजे. तो साजरा करताना नाचता, गाता , ओरडता आलं पाहिजे. त्या सगळ्यातली मज्जा अनुभवता आली पाहिजे. 

           जगात अस कोणी आहे का की त्याला कशाचं दुःख नाही. तर अस कोणीही नसतं मग काही लोक सदैव दुःखात का असतात. आपण लक्षात घ्यायला हवं की दुःख हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे ते येणारचं आहे त्याला आपण थांबवू शकत नाही मग त्यातून बाहेर पडण्यासाठी  मार्ग काढायचा की त्याला कवटाळून स्वतःला त्रास करून घ्यायचा. बिनधास्त येणाऱ्या समस्येशी भिडायचं. त्यातून मार्ग काढायचा. आनंदात जगायचं आनंदात जगण्याची सवय लावून घ्यायची.ल्या

         कुठल्याही परिस्थितीत आनंद मानायचा. आयुष्यात कोणतीही प्रसंग आला तरी त्यामुळं आपण आनंदी व्हायचं का दुःख करत बसायचं हे आपलं मन ठरवतं. निर्णय हा आपलाच असतो. आपण आपल्या मनाला असं काही ट्रेंनिग द्यायचं की ते कायम आनंदच शोधेल. आपण स्वतःला इतकं आनंदी ठेवायचं की आपल्या कडे दुःख यायला सुद्धा घाबरल पाहिजे.

          छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधा आणि तो साजरा करा. मग कसलंही दुःख आलं तरी त्याला तुम्ही समर्थ पणे तोंड देऊ शकता. आनंद हा मानण्यात असतो. ज्या गोष्टी आपल्या अखत्यारीत नाहीत त्यांच्या विषयी चिंता करणे सोडा. जे काही आपल्या कडे आहे त्याचा विचार करा. आनंदी राहण्यासाठी प्रयत्न करा. 

         जीवनात सगळे प्रॉब्लेम आपल्याला सुटणार नाहीत पण असे काही प्रॉब्लेम असतात की ते आपण सोडून दिले की सुटतात. विनाकारण चिंता करत बसू नका. सगळं काही ठीक होणार आहे हे मनात म्हणत राहा. सकारात्मक राहण्यासाठी प्रयत्न करा. जीवनात आनंदी व्यक्ती सगळ्यांना आवडतात. त्यांचा सहवास आवडतो. रडणाऱ्यां पासून लोक दूर राहतात. त्यांची मैत्री सुद्धा त्यांना नको असते. 

         आनंदाशिवाय जगण्याचा मी विचार सुध्दा करू शकत नाही. आता तुम्ही ठरवा आयुष्य रडत रडत जगायचं का आनंदात जगायचं कारण ते काही थांबणार नाही. जस की आइस्क्रीम टेस्ट केली वितळते आणि नाही केली तरी वितळते.

 मग तसच आपल्या आयुष्याचं आहे. आता तुम्ही ठरवा टेस्ट करायचं का वेस्ट ???....



शुक्रवार, २६ नोव्हेंबर, २०२१

माझा देश बदलतोय आहे का ?....

          आजच्या तरुण पिढीला परदेशात जाण्याचं खूप आकर्षण असतं. परदेशातील जीवन, तेथील सुखसुविधा याचं कोड कौतुक असत. त्यामध्ये त्यांची चूक नाही. कारण लहानपना पासून त्यांच्या मनात परदेशात कसं चांगलं आहे , आपल्या देशात कसं वाईट आहे ते कधीच बदलणार नाही हे बिंबवलं जात. मग त्यांना पण मोठेपणी परदेशात जाण्याची ओढ असते. 

          पण आता माझा देश बदलत आहे. हो नक्कीच बदल होत आहे आणि तोही चांगला. अभिमान वाटावा असा. देशातील लोक आता नियमांचं पालन करन्याचा प्रयत्न करतायेत. जो देश कायम जगासमोर भिकेचा कटोरा घेऊन उभा राहायचा तो आज जगाला दिशा दाखवतोय, आणि जग सुद्धा त्याप्रमाणे चालतय. नवनवीन संशोधन होऊ लागलं आहे. त्याचा चांगला परिणाम जगावर होतोय. 

          जगासमोर आपला देश खंबीरपणे उभा आहे. आपली दखल जगाला घ्यायला भाग पाडतोय. विज्ञान, संशोधन, खेळ याबाबत जगावर छाप पाडायला सुरुवात झाली आहे. हे काही लगेच होणार नाही. त्याला वेळ जाऊ द्यावं लागेल. पण खूप मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. 

            लोकं जागरूक झाली आहेत. उच्च शिक्षणासाठी खर्च करू लागली आहेत. मुलींनाही उच्च शिक्षण मिळावे म्हणून धडपड करत आहेत. कोरोना आल्यानंतर ज्या पद्धतीने जगात हाहाकार माजला विकसित देशांकडे असणाऱ्या आरोग्य सुविधा पाहिल्या तर आपला देश त्यांच्या तुलनेत खूप मागे होता पण सरकार , लोकांनी ज्या पद्धतीने त्याचा सामना केला ते पाहिलं तर देश खूप बदलला आहे हे जाणवतं. 100 कोटी वॅक्सिन देण्यात जी काही यंत्रणा राबली ते पाहून जग थक्क झालंय. प्रत्येक भारतीयासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. जगात जे कोणी भारतीय राहत असतील त्यांना अभिमान वाटेल असं काम देशाने केलं आहे. 

         जगातील सर्वात मोठी लोकशाही भारतात आहे. लोकशाही राबवताना खूप समस्या आहेत पण तरीही भारतीयांचा लोकशाही वर विश्वास आहे. भारतात लोकशाही टिकून ठेवली आहे ती टिकवण्यासाठी नागरिक प्रयत्न करत आहेत. 

         देशात कसा आणि काय बदल होत आहे हे आपण आपल्या पुढील पिढीला समजावून सांगितलं पाहिजे. देशाबाबत त्यांच्या मनात आस्था निर्माण करायला हवी. जेणेकरून त्यांच्या मनात आपल्या देशाविषयी प्रेम वाढेल. 
           आपल्या देशात खूप समस्या आहेत. काही बाबतीत देश विकसित देशांच्या पाठीमागे आहे. भ्रष्टाचाराचा प्रश्न अजून पूर्णपणे संपला नाही. गरिबी, बेकारी चे प्रश्न आहेतच. पण त्या विरुद्ध लढा चालू आहे. आणि लवकरचं आपण त्या समस्या सोडवू अशी आशा आहे. भारत सध्या प्रगतीचा दिशेने वाटचाल करतोय. आव्हानांना सामोरे जातोय. जगाच्या पाठीवर भारत पुन्हा एकदा एक महाशक्ती म्हणून उदयाला येईल असा मला विश्वास आहे. 


बुधवार, २४ नोव्हेंबर, २०२१

Love: - The thing that leads to the completion of life / प्रेम :- आयुष्य पूर्णत्वाला नेणारी गोष्ट....

            प्रेम आंधळं असत. प्रेमात पडल्यावर माणसाला काहीही कळत नाही. प्रेमात पडल्यानं त्याची जिंदगी वाया गेली. तो प्रेमात आकंठ बुडाला आहे. उभारिच्या काळात प्रेमामुळं पोरग वाया गेलं. त्याच करियर बरबाद झालं. अशी चर्चा आपण कायम ऐकत असतो. पाहत असतो. खरंच प्रेम वाईट आहे का ?....  त्यामुळे जीवन वाया जात का ?.....  माणूस वेडा होतो का ?..... असे खूप प्रश्न समोर उभे राहतात. 

           सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रेम म्हणजे नक्की काय ? त्याचा अर्थ नक्की काय आहे ? ते आपल्याला समजलं आहे का ? नसेल तर त्यावर विचार करावा लागेल..

           प्रेम म्हणजे दुसऱ्यात विरघळून जाणे, स्वतःला समर्पित करणे किंवा दुसऱ्याच्यात एकात्म होणे नव्हे . स्वतःला विखरून टाकणे म्हणजे प्रेम नव्हे. 

 तर

प्रेम म्हणजे ......

स्वतः परिपक्व होणे.....

दुसऱ्यासाठी अवघे विश्व बनणे.....

स्वतःच्या बरोबरचं  प्रेमाचा विचार करणे .....

मी ... माझं... विसरून आमचं ,आपलं याचा विचार करणे....

दुसऱ्याच्या आनंदासाठी सदैव झटत राहणे......

प्रेम ही उच्च प्रेरणा देणारी गोष्ट आहे.


            प्रेम फक्त पुरुष आणि स्त्री याचंच असत का ? आई आणि मुला मध्ये..... भाऊ आणि बहीण यांच्यामध्ये...... भाऊ आणि भाऊ यांच्या मध्ये....... मित्रांमध्ये..... शिक्षक आणि विद्यार्थी यांमध्ये..... प्राणी पक्षी यांवर पण प्रेम असतं पण आपण त्याला एकदम संकुचित करून ठेवलंय. आपण त्याचा व्यापक अर्थ न घेता संकुचित अर्थ घेतो आणि तिथेच चुकतो....

             प्रेम माणसाला जगायला शिकवते. ते त्याला अंतर्बाह्य बदलवून टाकते. जगण्याची उमेद निर्माण करते. स्वतः वर प्रेम करायला शिकवते. आयुष्य पूर्णत्वाला नेण्यास प्रेम मदत करत.

            खरंच हे सगळं आपल्या आयुष्यात घडण्यासाठी माणसाने एकदा प्रेमात पडावं. भरभरून प्रेम करावं , त्यातील नशा अनुभवावी. 



सोमवार, २२ नोव्हेंबर, २०२१

Struggle and You / संघर्ष आणि आपण .......

          आपल्या आयुष्यात दररोज नवनवीन घटना घडतात. कधी त्या आपल्याला आनंद देतात तर कधी दुःख. पण आपल्याला दुःख नको असत हव असत ते फक्त सुख. पण लक्षात असू द्या दुःखाशिवाय आनंदाला किंमत असत नाही. जी गोष्ट आपल्याला हवी असते ती जर लगेच मिळाली तर त्याची आपल्याला किंमत राहत नाही. संघर्ष करून , कष्ट करून जर आपण एखादी गोष्ट मिळवली तर त्याचा आनंद आपण शब्दात वर्णन करू शकत नाही. आणि असा अनुभव घ्यायचा असेल तर संघर्ष खूप महत्त्वाचा आहे. त्याशिवाय जगण्यात मज्जाच नाही. हे आपण समजून घेतलं तर येणाऱ्या संकटाकडे पाहण्याचा आपल्याला वेगळाच दृष्टीकोन मिळतो.

           आयुष्यात संकट येणारचं आहेत ती आपण किती पण टाळण्याचा प्रयत्न केला तरी येतातचं. पण सगळ्यात महत्त्वाचे आहे की आपण त्याकडे कसे पाहतो. आपण जर संकटाकडे सकारात्मक दृष्टिने पाहिलं तर त्यामधून खूप काही शिकता येत. जर नकारात्मक विचार केला तर ती संकट आहे त्यापेक्षा मोठी होतात. लक्षात ठेवा संकट येतात ती आपली शक्ती काढून टाकण्यासाठी किंवा आपल्याला शक्ती देण्यासाठी पण ती सगळ्यात आधी आपल्याला विचारतात नक्की काय करायचं , निर्णय सर्वस्वी आपला असतो. आपण त्याकडे संधी म्हणून पाहिलं तर ती आपल्याला शक्ती देतात. आणि आपणं त्या कडे नकारात्मकतेन पाहिलं तर आपली शक्ती काढून घेतात. आता नक्की काय करायचं ते तुम्ही ठरवा. 

            संघर्ष करताना आपल्या मध्ये खूप बदल होतात. अनुभव मिळतो परत असं काही संकट आले तर आपण खंबीरपणे त्याला सामोरे जातो. कोणत्याही आणि कुठल्याही परिस्थितीला यशस्वी पणे तोंड देण्याची सवय लागते. आपलीच आपल्याला नव्याने ओळख होते. संकट आयुष्याकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टीकोण देऊन जातात. तो कोणत्याही शालेय पुस्तकात मिळत नाही. त्यासाठी संघर्ष करावा लागतो. आलेल्या परिस्थितीचा समर्थ पणे सामना करावा लागतो. आयुष्यात जर समर्थ पणे उभ राहायचं असेल तर संघर्षाला पर्याय नाही. हे आपण आपल्या मनावर आधी बिंबवलं पाहिजे. 

          जर जीवन जगत असताना संकट आलीच नाहीत तर ...? काय होईल याचाही विचार करा. अपयशा शिवाय यशाला किंमत नसते. 


                  मग सांगा आयुष्यात संकट येणं वाईट का चांगलं ? संघर्ष करण चांगलं की वाईट ? दैनंदिन आयुष्यात छोट्या मोठया लढाया होणाराचं त्यांपैकी काही आपण जिंकू काही हरू पण जीवनाच्या युद्धात मात्र आपण जिंकल पाहिजे. त्यासाठी सगळ्या महत्वाचा आहे तो म्हणजे संघर्ष........



रविवार, २१ नोव्हेंबर, २०२१

Cooking: - An art / स्वयंपाक :- एक कला.....

 


           स्वयंपाक करण ही तर बायकांची काम आहेत. तो त्यांनीच करावा. एखादा पुरुष जर स्वयंपाक करत असेल तर त्याला बायकी म्हणून संबोधले जाते. स्वयंपाक करणं हे काम आपलं नाही किंवा त्या कडे तुच्छतेने पाहिलं जातं. पण खरंच स्वयंपाक येणे किती गरजेचे आहे ,  त्याच काय महत्व असतं हे कळायला लागलं आहे. त्याकडे एक काम म्हणून न पाहता ती एक कला आहे असं म्हणून पाहिलं तर तो करताना आनंद अनुभवता येतो. 

           आजच्या स्पर्धेच्या युगात घरातील पुरुष आणि महिला या दोघांनाही नोकरी करावी लागते. मग घरी येऊन त्या महिलेला स्वयंपाक करावा लागतो. पण जर तो दोघांनीही केला तर तिलाही बरं वाटत. अशा परिस्थितीत पुरुषांनी स्वयंपाक करण्याच्या कामात खरंच मदत करणं गरजेचं आहे. जीवनात सर्व काही करायचं ते पोटासाठी मग त्यात कसंही आणि काहीही टाकायचं का ? जर आपल्याला स्वयंपाक येत असेल तर नवनवीन पदार्थ बनवून त्याची चव आपण घेऊ शकतो. जे आपल्याला हवं ते बनवून खाऊ शकतो. स्वयंपाक करताना नवनविन प्रयोग करू शकतो.

           स्वयंपाक करता आला की आपलं कोणावरही अवलंबून राहत नाही. घरी स्वयंपाकाच्या कामात आईला मदत करू शकतो. शिक्षण, नोकरी, व्यवसाय यांमुळे जरी बाहेर राहण्याची वेळ आली तर स्वयंपाक जर येत असेल तर आपली काही अडचण होत नाही. चांगलं पौष्टिक बनवून खाऊ शकतो. आरोग्याचे प्रश्न निर्माण होत नाहीत. 


          कोणतंही काम छोटं असत नाही. आजकाल आपण पाहतोय की बाहेर हॉटेलमध्ये कूक हे सर्रास पुरुषच आहेत. त्यांनी बनविलेले पदार्थ पाहिले की वाटत की असा स्वयंपाक आपल्यालाही यायला हवा. तुम्ही एक उत्तम स्वयंपाकी असाल तर बाहेरच्या जगात तुम्हाला खूप संधी आहेत. मोठमोठ्या हॉटेल मालक उत्तम कूकला भरपूर पगार देण्यासाठी तयार आहेत. पण तुमच्या कडे ते कौशल्य असलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हॉटेल,रेस्टॉरंट, ढाबा हे प्रसिद्ध होतात वा नावारूपाला येतात त्याच सगळं श्रेय त्या कूकच असत. 

          खरंच स्वयंपाक करता येणं खूप गरजेचं असतं. ज्यांना हे कौशल्य आत्मसात आहे ते खरच भाग्यवान आहेत पण ज्यांना याचा गंध नाही त्यांनी प्रयत्न पूर्वक हे शिकायला हवं अस मला वाटत. जे स्वयंपाक शिकण्यासाठी प्रयत्न करतायेत त्यांना माझ्या शुभेच्छा....


शनिवार, २० नोव्हेंबर, २०२१

Equality in the home: - Boy and girl / घरातील समानता :- मुलगा आणि मुलगी

          आपणं आजूबाजूला पाहत असतो की घरात जर मुलगा आणि मुलगी हे दोघे असतील तर मुलाला हवं ते करण्यासाठी पाठिंबा दिला जातो. त्याच जे काही स्वप्न असेल त्यासाठी घरचे त्याला मदत करतात. आर्थिक पाठींबा दिला जातो. जर त्या कुटुंबाची  परिस्थिती नसेल तर त्याच्या शिक्षणासाठी, व्यवसायासाठी, प्रकल्पा साठी कर्ज काढले जाते. त्याने काही कौतुकास्पद काम केलं तर त्याच घरात खुपचं कौतुक केलं जातं. या सगळया बद्दल माझा काहीही आक्षेप नाही. आणि आक्षेप असण्याचं कारण पण नाही. पण त्या मुलाच्या जागी त्याच घरातील मुलगी असेल तर तिच्यासाठी नक्की काय केलं जातं ? नसेल तर का ? सरळ प्रश्न आहे. 

         मुलगीला घरात कमी लेखल जात. ती आपल्यावर एक जबाबदारी आहे असं वागवलं जात. तिची स्वप्न काय आहेत याचं कोणालाही काही पडलं नसत. फक्त तिच योग्य वय होईपर्यंत जस जमेल तसं तिचं शिक्षण करायचं आणि वय झालं की लग्न करून देऊन जबाबदारीतून मुक्त व्हायचं. ती शिक्षणात उत्तम असली तरी तिच्या शिक्षणापेक्षा लग्नाला प्राधान्य दिलं जात. ती शिकून  काय करणार. तिला जरी नोकरी लागली तरी त्याचा आपल्या काय फायदा जो काही फ़ायदा होयाचा असेल तो तिच्या नवऱ्याला होणार मग कशाला ? बऱ्यापैकी घरांमध्ये अशी परिस्थिती असते.

          पण असं का घडत ? तर याला खूप कारणे आहेत. आपली  पुरुषप्रधान संस्कृती. लहानपणा पासून मुलांच्या मनावर बिंबवलं जात की मुलगा घर चालवणार आहे. जर कुटुंब पुढे जायचं असेल तर ते काम फक्त मुलगाच करू शकतो. तोच मोठा होऊन कुटूंब प्रमुख होणार आहे. मुलगा हाच म्हातारपणाची काठी असतो. तो वंशाचा दिवा आहे. वंश परंपरा पुढे जायची असेल तर त्यासाठी मुलगा हवा. अगदी छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा मुलाला घरात झुकत माप दिल जात. पण मुलीच्या बाबत मात्र असं होतं नाही किंव्हा तिला काटेकोर पणे नियमांचं पालन करावं लागतं. समाजात आणि कुटुंबात जी काही बंधने असतील ती फक्त मुलीवर असतात. तिला सर्वजण नियमात बांधून ठेवतात. मात्र मुलांना याबाबतीत मोकळीक असते. ना बंधने ना काही नियम. 

           समाज आता सुशिक्षित झाला आहे. पण मुलीच्या बाबतीत तो अजूनही योग्य शिक्षित झाला असं म्हणावसं वाटतं. मुलगा आणि मुलगी हे समान आहेत आणि त्यांना दोघांनाही घरात समाजात समानतेची वागणूक मिळायला हवी. आपण लहानपणापासून घरातील मुलांवर या गोष्टी बिंबवायला हव्यात. तेव्हा कुठं ते त्यांच्या घरातील मुलगा आणि मुलगी यांत भेदभाव करणार नाहीत. समाजात खूप खोलवर ही भेदभावाची मूळ गेलेली आहेत ती सहजासहजी संपणार नाहीत. त्यासाठी योग्य प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरापासून सुरुवात करावी. आपल्या मुलांमध्ये समानतेची भावना प्रयत्नपूर्वक रुजवावी .

          ज्या काही पूर्वसमज आहेत त्याबाबत जागृतची गरज आहे. ती जेव्हा आपल्या घरापासून होईल तेव्हाच बदल घडण्यास सुरुवात होईल. 

Corona Time schools and education / कोरोना काळातील शाळा आणि शिक्षण

        जागतिक महामारी म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो कोरोना आला. मार्च 2019 मध्ये सर्व शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली. कारण हा वेगळाच आजार होता. संपर्कामुळे तो वेगाने पसरतो. आणि त्याला थांबवायचं असेल तर संपर्क टाळायला हवा.  'दो गज की दुरी है जरुरी' या कारणामुळे शाळा पूर्ण पणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळा बंद झाली पण मग विद्यार्थी कुठे आणि कस शिकणार हा प्रश्न निर्माण झाला. परीक्षा कशा घ्यायच्या , त्याचं नियोजन कस करायचं हा प्रश्न उभा राहिला . या सगळ्यांवर उपाय म्हणून ऑनलाइन शिक्षण हा पर्याय समोर आला.
 
       पण ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मोबाईल हवा. इंटरनेट हवं. ह्याची जमवाजमव पालकांनी उपलब्ध करून दिली. आणि शिक्षण सुरू झालं. मुलांच्या हातात मोबाईल आला. ज्या मोबाईल ला शाळेत प्रवेश निषिद्ध होता आज त्यावरच शिक्षण सुरू झालं. गुगल मीट, झूम, युट्युब यामुळे शाळेचे वर्ग भरू लागले. मुलं आणि शिक्षक याचा दूरस्थ शिकणे आणि शिकविणे सुरू झालं. कोविड काळात शिक्षण थांबलं नाही. ते सुरू राहील. परीक्षा घेण्यात आल्या. पण काही दुर्लक्ष करता येणार नाहीत अशा गोष्टी समोर आल्यात.

        मुलांकडे मोबाईल आला तो अभ्यास करण्यासाठी ठीक आहे पण तो किती तरी वेळ त्यांच्या हातात राहिला . त्याला काही वेळ काळ राहिली नाही. त्याचा वापर शाळेसाठी कमी आणि इतर गोष्टी साठी जास्त होऊ लागला. 

        मुलं त्याच्यावर गेम खेळू लागली. लोकडॉउन मध्ये ती घरात मोबाईलमध्ये रमली. पुढे लोकडॉउन संपला पण या काही महिन्यात जी मोबाईल ची सवय त्यांना लागली ती सुटली नाही.मैदानी खेळणं न आवडता ती मोबाईल वरच गेम खेळू लागली. ऑनलाइन गेम मुळ मूळ वास्तविक जीवनापासून दूर गेली ती कृत्रिमतेत रमली  त्यामुळे शारीरिक व्यायाम कमी झाला. भूक मंदावली. डोळ्यांच आरोग्य खराब झालं. 

        इंटरनेट आणि त्यावर उपलब्ध असणाऱ्या अनेक गोष्टींचा मुलांच्या मनावर वाईट परिणाम होऊ लागला. Facebook वर सहज उपलब्ध होणारे विडिओ, त्याच प्रकारच्या व्हिडीओ सतत होणार भडिमार यांन मुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतोय. जे पाहायला नको किंव्हा ज्या गोष्टी त्यांना कळायला नको हव्या होत्या. त्याच गोष्ट सहजपणे त्यांना उपलब्ध झाल्या. अभ्यास बाजूला पडला आणि मुलं वेगळ्याच गोष्टीमध्ये रंगली. मुलांच्या शारीरिक,भावनिक ,मानसिक आरोग्य खरंच धोक्यात आलंय का ? हा विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण झालाय. मुलं एकटी राहू लागली कुटुंबापासून दूर जाऊ लागली आहेत. मित्रांना बरोबर खेळण्यापेक्षा त्यांना मोबाईल वर खेळणं आवडू लागलंय. 

         कोविड काळातील शिक्षण आणि ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जी काही साधने वापरण्यात आली त्यानं फायदा होण्यापेक्षा तोटेच भरपुर झालेत. वास्तविक जीवनापासून मुलं दूर जाऊ लागल्यात. त्यांना मोबाईल मधील आर्टिफिशिल जीवनच खर वाटू लागलंय हे धोकादायक आहे. कोविड काळातील शाळा, शिक्षण याचं स्वरूप खूप बदललं. पण या बदलेलेलं स्वरूप खरंच वरदान आहे का शाप याचा विचार केला तर ते वरदाना पेक्षा शाप आहे हे जाणवत . 

शनिवार, ४ सप्टेंबर, २०२१

Crisis is good / संकट येणं चांगलंच

                           संकट येणं चांगलंच

       प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी संकट येतात. ती येत राहतात. काही संकट मोठी तर काही छोटी असतात. त्यामुळे आपल्या आयुष्यात खूप काही बदलत असतं. काही बिघडत, नात्यांमध्ये दुरावा येतो. आपली चिडचिड होते. मला ज्यावेळी गरज असते त्यावेळस कोणीच मदतीला येत नाही. हे विचार सारखे मनात येतात त्यामुळे नात्यामध्ये दुरावा येतो. पैसे किती गरजेचे असतात हे समजते. शांत सुरळीत चाललेल्या आयुष्य विस्कळीत होऊन जातं. 

    

        संकट आली की ती चोहोबाजूंनी येतात. सगळ्या बाजूंनी आपल्यावर येऊन धडकतात. तेही एकाचं वेळी अशी संकट आली की ती आपल्या आयुष्यात महिना दोन महिने किंवा दोन चार वर्षेही राहतात. आपल्याला अगदी वैतागून सोडतात. आपल्या सरळमार्गी आयुष्याला खूप वळण घ्यावी लागतात. आपलं आयुष्य पार बदलून टाकतात. अगदी जीवन जगणं नकोस करतात. आपण कितीही म्हटलं नको तरी अशी संकट आपल्या आयुष्यात येतातचं. संपूर्ण जीवनात ती एक-दोन - चार कितीही वेळा येतात आणि ती आपल्याला सोसावी लागतात. अनुभवावी लागतात.


       पण अशा संकटांचा आपल्याला कितीही त्रास झाला. आयुष्य नकोसे झाले तरी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे या संकटांचा खूप फायदा होतो....


१. स्वतःची नव्याने ओळख :- 

        संकटांच्या काळात आपण इतरांशी कसे बोलतो , वागतो ,त्याला कस सामोरे जातो. त्या संकटांतून बाहेर पडण्यासाठी कोणते निर्णय घेतो हे आपल्याला समजत. याच बरोबर आपल्या कमकुवत बाजू लक्षात येतात. मर्यादा समजतात. याच बरोबर आपली शक्तीस्थाने काय आहेत याची नव्याने ओळख होते. 


२. नवी शिकवण :- 

         जीवन जगताना नवनव्या गोष्टी आपण शिकत असतो. मात्र ज्यावेळेस संकटं येतात तेंव्हा ती खूप काही शिकवून जातात. पण त्यासाठी गरज असते ती त्याकडे सकारात्मकपणे पाहण्याची. तसं आपण पाहू शकलो तर संकटात पण आपण संधी शोधू शकतो.


३. आपलं कोण :- 

         आपल्याला खरंच कोण मदत करत. आपलं कोण हे वाईट काळ असताना समजतं. वाईट काळात नक्की कोण कोण आपल्या बरोबर खंबीरपणे उभे राहत हे समजतं. आपल्या पाठीशी खरोखरच कोण आहेत हे समजण्यासाठी संकट आपली मदत करतात.


४. स्वतःविषयी विश्वास वाढतो :-

        जेंव्हा संकट असतात त्यावेळेस आपण त्याला कसं सामोरे गेलो त्यातून कसा मार्ग काढला. संघर्ष करताना आपण कसे घडत गेलो हे पाहिलं की पुन्हा नवीन संकटांशी झुंजण्याची शक्ती आपल्यात निर्माण होते. कितीही संकट आली तरी आपण ती परतून लावू असा विश्वास निर्माण होतो.


५. नम्रता :- 

        संकट आली की ती आपल्याला नम्रता शिकवतात. कसं ही उद्दामपणे वागणं बंद होत. आपल्या चुका समजतात. आपण सर्वांशी नम्रपणे वागायला लागतो. जीवन जगताना इतरांनाशी नम्रपणे वागणं खूप महत्त्वाचे असते हे संकट आपल्याला सांगून जातात.


६. जीवन समृद्ध :- 

       संकटांना घाबरून जायचं का ?  का त्यांना नाकारून तसच बेभानपणे जगत राहायचं आणि आपलं नुकसान करत राहायचं. का ती स्वीकारून त्यातुन मार्ग काढायचा. स्वतःमध्ये बदल करत संकटांना तोंड द्यायचं आणि त्यातून सहीसलामत बाहेर पडायचं हे आपल्याला ठरवायचे असत. वाईट काळाशी संघर्ष करून मार्ग काढत आपलं आयुष्य समृद्ध करत जायचं असत.


     संकट येतात ती तुमची शक्ती काढून घेण्यासाठी किंव्हा तुम्हांला अधिक शक्तिशाली करण्यासाठी पण शेवटी निर्णय तुम्हांलाचं घ्यावा लागतो. तुम्ही सकारात्मक असाल तर तुम्हांला संकट शक्ती देतात.  आणि तुम्ही नकारात्मक असाल तर ती तुमची शक्ती काढून घेतात. निर्णय शेवटी तुमचाचं ......

 

संघर्षातुन जीवन जगण्याची मजा काही वेगळीच असते...  


एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.


" आयुष्यात समस्या नसतातचं ,

  असतात ती फक्त आव्हाने ...."



🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏

शनिवार, २१ ऑगस्ट, २०२१

The changing world and you./ बदलते जग आणि आपण ...

                    बदलते जग आणि आपण ...


         जग अतिशय वेगाने बदलत आहे. पण आपल्याला बदल नको असतो. का तर त्या मध्ये एक प्रकारची अनिश्चितता असते. जे आहे जस आहे तसंच राहण्याची आपली मानसिकता असते. पण आपल्याला बदलांना सामोरे जावे लागेल. आपली इच्छा असो व नसो. 

बदलणाऱ्या या जगात आपल्याला टिकून राहायचं असेल तर नक्की काय करायला हवे........

यासाठी महत्वाच्या सात पायऱ्या.....


१. बदलाची भीती बाळगू नका :- 

           जीवनात खूप काही गोष्टी बदलत असतात. जे आपल्या बालपणी होतं ते आता नाही. त्यामध्ये अतिशय प्रमाणात बदल झाला आहे. तर बदलाला सामोरे जाताना त्याची भीती बाळगू नका. त्या बदलाचाचं एक भाग होऊन जा. जग कायम बदलत  असणार आहे. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका.


२. बदलत्या संधी ओळखा :- 

          जग विलक्षण वेगाने बदलत आहे. आपण त्या बदलत्या जगात कोणत्या संधी आहेत त्या शोधून त्यांचा लाभ घेतला पाहिजे. नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे. कोणत्याही घटनेकडे सकारात्मकतेने पाहण्याची स्वतःला सवय लावून घेतली की आपली प्रगतीकडे वाटचाल सुरू होते. 


३. स्वतः जबाबदारी घ्या  :- 

          आपण काही करू शकलो नाही किंवा आपली काही चूक झाली झाली तर कारणे देतो. परिस्थितीला दोष देतो. इतरांनामुळे मी कसा मागे पडलो हे सांगतो. पण हे करण्यासाठी वेळ वाया घालवू नका. जे काही घडलंय आपल्या आयुष्यात त्याची जबाबदारी स्वतः घ्या. त्यातील आपल्या चुका शोधा. कुठे कमी पडलो ते पहा आणि त्या दुरुस्त करून यशाकडे वाटचाल करा. इतरांना, परिस्थितीला दोष देत बसू नका. 


४. धाडसी व्हा :-

         अज्ञाताची भीती ही नैसर्गिक आहे. त्यात चूक काहीच नाही. पण कोणतंही संकट आलं की लगेच घाबरून न जाता. थोडा विचार करा. भीतीची पर्वा न करता नियोजन करा. योग्य निर्णय घ्या. कोणत्याही परिस्थिती समोर डगमगून न जाता त्याला सामोरे जा. संकटांना घाबरू नका. त्यातुन मार्ग काढा. 


५. स्वतःला सतत नव्याने घडवत रहा :- 

         नवनवीन गोष्टी , कौशल्य शिकत रहा. बदलत्या जगातील नवनवीन कौशल्य अंगी बाणवा. आजूबाजूला घडणाऱ्या बदलांमुळे आपल्या कार्यक्षेत्राशी निगडित संदर्भ सतत नव्याने शिकत राहा. जुन्या पध्दतींपेक्षा नव्या पद्धतीचा स्वीकार लवकरात लवकर करा.


६. सकारात्मक लोकांच्या संगतीत रहा :- 

         रडगाणे गाणारे, परिस्थिती कशी वाईट आहे. असे म्हणणारे,  इतरांना दोष देणारे अशा लोकांपासून दूर रहा. नेहमी सकारात्मक विचार करणारे मित्र निवडा. नवनवीन योजना अमलात आणणारे , नवनवीन संकल्पना मांडणाऱ्या मित्रांच्या संगतीत रहा. 

         आशावादी राहणे आणि आशावादी असणे त्यामुळे आपल्याला एक प्रकारचा उत्साह येतो.

 

७. जिंकण्यासाठीचं खेळा :- 

        कायम जिंकण्याचा विचार करा. आपली क्षमता काय आहे आणि आपण काय करू शकतो यावर सर्व शक्ती केंद्रीय करा. सातत्याने होणाऱ्या बदलांचा भाग व्हा. आपण जिंकणारच आहोत हे कायम मनात असू द्या. 


         नव्या बदलांचे , संकटांचे संधीत रूपांतर करायला शिका. जीवनात संकटांना घाबरून आपण थांबलो नाही. सतत चालत राहिलो तर आपल्याला यश नक्की मिळणारचं. चांगली कामे करत रहा. कारण चांगल्या कामांमुळे एकट्याचाच फायदा होत नाही. तर इतरांचाही फायदा होतो आणि कायम होत राहतो.


       जगात बदल ही एकमेव गोष्ट स्थिर आहे. जी कधीच बदलणार नाही. तेंव्हा त्याचा स्वीकार करा. बदलाला सामोरं जाण्यासाठी सतत तयार रहा. कारण बदलचं तुम्हांला यशाकडे आणि समृद्धीकडे नेत असतो. 


गुरुवार, १२ ऑगस्ट, २०२१

The money will be yours but the resources belong to the community / पैसे तुमचे असतील पण संसाधने समाजाची आहेत.

 " पैसे तुमचे असतील पण संसाधने समाजाची आहेत.

   त्यांचा वापर वापर करताना विचार करणे गरजेचे आहे. "


तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत. महागडी गाडी आहे आणि विनाकारण तुम्ही फेरफटका मारत असाल तर तुमचं चुकतंय . आता तुम्ही म्हणाल यात काय चूक आहे ? गाडी आमची आहे. तिच्यात पेट्रोल भरण्यासाठी लागणारा पैसा पण आमचाच आहे मग काय चूक आहे .


हो हे बरोबर आहे तुमचं.

पण ते पेट्रोल तुमचं नाही.

ते समाजाचं आहे. त्यावर फक्त तुमचाचं अधिकार नाही. ते योग्य कारणासाठी वापरलं गेलं पाहिजे.

तुम्ही ते विनाकारण वापर असाल तर दुसऱ्या कोणाला ते त्यांच्या कामासाठी मिळणार नाही.


आपण समाजात राहतो. जी काही नैसर्गिक संसाधने आहेत त्यावर सगळ्यांचाच अधिकार असतो. प्रत्येकाच्या गरजा पूर्ण होण्यासाठी त्याचा वापर झाला पाहिजे. त्या आपण जपुन वापरल्या पाहिजेत .


काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक लेख वाचला.

 तो दक्षिण आफ्रिकेचा जगप्रसिद्ध २७ वर्षाचा फुटबॉल खेळाडू सादिओ माने सेनेगल याचा तर या खेळाडूला अनेक वेळा लोकांनी त्याला हातात तुटलेल्या फोनसह पाहिलेले आहे .

भारतीय चलनानुसार पाहायला गेले तर एका आठवड्याची त्याची कमाई १ करोड ४० लाख रूपये आहे. 


एक मुलाखती दरम्यान मुलाखत घेणा-याने त्याला डिवचलेच की, 

तुमचा फोन तुटला आहे, तर तुम्ही तो बदलत का नाही ?.

त्याला उत्तर देताना तो  सहजपणे पत्रकाराला म्हणाला की, "मी ठीक करून घेईल" 


परंतु पत्रकाराचे ह्या उत्तराने समाधान झाले नाही म्हणून त्याने सेनेगलला दुसरा प्रश्न विचारला की, तुम्ही नवीन फोन का घेत नाही?? 

त्यावर सेनेगल बोलले की, " असे हजार फोन मी घेवू शकतो, १० फेरारी घेवू शकतो. २ जेट विमान खरेदी करू शकतो. डायमंडची घड्याळे खरेदी करू शकतो. 

परंतु ह्या सर्वांची मला गरज काय आहे ?? "


मी गरीब घरातूनच आलेलो आहे. गरीबी अत्यंत जवळून पाहिलेली आहे. अठरा विश्व दारिद्र्य असल्यामुळे मी शिक्षण घेऊ शकलो नाही. परंतु शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये म्हणून मी शाळा, कॉलेजेस बांधले आहेत. माझ्या जवळ चांगले बुट नव्हते, तेव्हा मी विना शुज खेळत होतो. अंगावर घालण्यासाठी चांगली कपडे नव्हती. एक वेळच्या जेवणाची चिंता आईच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. पाणी पिऊन आम्ही झोपायचो. आणि आज सर्व काही मला मिळत आहे तर त्याचा देखावा करण्याऐवजी मी माझी संपत्ती माझ्या लोकांसाठी खर्च करतो.


तुमच्याकडे खूप पैसा आहे मग तो तुम्ही कसाही खर्च करू शकत नाही. योग्य कारणास्तव त्याचा वापर करायला हवा. पैसे आहे म्हणून महागड्या वस्तू घ्यायच्या का ? तर नाही यावेळी थोडं थांबून विचार करायला हवा कि...

तुम्हांला त्या वस्तूंची खरंच गरज आहे का ??


हा विचार केला की सेनेगल म्हणतो ते पटत. योग्य कारणासाठी आपल्याकडील संपत्ती चा वापर करायला हवा. जेणेकरून त्याचा उपयोग समाजासाठी होईल.


 एक साधा नियम आहे.

आपल्याकडे जर प्रमाणापेक्षा खूप जास्त काही असेल तर ते इतरांना दिलं पाहिजे. 

 तो आपण सगळ्यांनी अंगिकारला तर आपण आपल्या पुढच्या पिढीला एक समृद्ध समाज देऊ शकू ......।।


शुक्रवार, ३० जुलै, २०२१

What exactly is winning ? / जिंकणं म्हणजे नक्की काय ?

 जिंकणं म्हणजे नक्की काय ????


       प्रत्येकाला 1 नंबर यायचं असतं कोणालाही दुसरा क्रमांक नको असतो. कोणतीही स्पर्धा असली की त्यात पहिला कोण येतो हेच पाहिलं जातं. पहिल्या क्रमांकाला खूप महत्त्व दिलं जात . त्याला महत्त्व दिलं गेलं पाहिजे यात दुमत नाहीच पण ज्यांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे त्याचंही कौतुक व्हावं . 


         पहिला आलं म्हणजे खरंच जिंकणं असतं का ? आणि दुसरा म्हणजे पराभव असतो का ? दुसऱ्यांच्या दुर्बलतेचा किंवा अज्ञानाचा फायदा घेऊन जिंकणं म्हणजे खरं जिंकणं असतं का ?


असच जर असेल तर त्या जिंकण्याला काहीही अर्थ नाही. 


मुंबई आणि गडचिरोली मधील दोन मुलांना एक प्रश्न विचारला .

प्रश्न :- " तुम्ही दोघेजण जंगलातून जात असताना जर तुमच्या समोर वाघ आला तर तुम्ही काय कराल ?"


मुंबई मधील मुलांने उत्तर दिलं :-" मी माझ्या मित्रापेक्षा जास्त वेगाने पळेल ."

का ? 

"तर मी त्याचा पेक्षा वेगाने पळालो तर वाघ त्याला पकडले आणि मी वाचेन."

 

गडचिरोली मधील मुलाने उत्तर दिलं :-" मी आणि माझा मित्र दोघे मिळून वाघाशी झुंज देऊ."


आपल्या मित्राला वाघाच्या तोंडी देऊन स्वतःचा जीव वाचवणारी पिढी निर्माण होत चाललीय.


त्यावेळी हा विचार प्रकर्षाने जाणवतो की काहीही करून जिंकणं हे एवढंच लक्ष आजच्या पिढीचं असतं. मग त्यासाठी वाट्टेल ते करायचं . पण जिंकायचचं....

हे नैतिक आहे का ?


स्पर्धा म्हटली की त्यात हार जीत आलीच. प्रत्येक वेळेस मीच कसा जिंकणार कधीतरी हार होणारचं की. 

त्यावेळेस ती मान्य करता आली पाहिजे. जो कोणी जिंकला आहे त्याच अभिनंदन करता आलं पाहिजे. 

असं जर जमत नसेल तर का नाही? हा विचार करावा लागेल.  ती सवय स्वतःला लावून घ्यावी लागेल.


पहिलं येणं म्हणजेच सर्व काही असतं असं नाही.काही दिवसांपूर्वी एक लेख वाचनात आला तो असा....


केनियाचा जगप्रसिद्ध धावपटु अबेल मुताई ॲालेम्पिक स्पर्धेत शेवटच्या राउंड मधे धावतांना अंतिम रेषेपासुन फक्त काही मीटर दूर होता त्याचे सर्व प्रतिस्पर्धी मागे होते. अबेलने सुवर्ण पदक जिंकल्यातच जमा होते. सर्व प्रेक्षक त्याच्या नावांचा जल्लोष करीत होते. तेवढ्यातच तो गैरसमजातून अंतिम रेषा समजून अंतिम रेषेच्या एक मीटर आधीच थांबला. 


त्याच्या मागुन येणाऱ्या स्पेनच्या इव्हान फर्नांडीसच्या लक्षात आले की अंतिम चिन्ह न समजल्यामुळे तो अंतिम रेषेच्या आधीच थांबला आहे. 


त्याने ओरडुन अबेलला पुढे जाण्यास सांगितले पण स्पॅनिश समजत नसल्याने तो हलला नाही शेवटी इव्हानने त्याला ढकलुन अंतिम रेषेपर्यंत पोचविले. त्यामुळे अबेल पहिला व इव्हान दुसरा आला. 


पत्रकारांनी इव्हानला विचारले, "तू असे का केलेस? तुला संधी असतांना तू पहिला क्रमांक का घालवलास ?"


इव्हान ने सांगितले, "माझे स्वप्न आहे की एक दिवस आम्ही अशी मानव जात बनू जी एकमेकांना मदत करेल. आणि मी पहिला क्रमांक घालविला नाही." 


रिपोर्टर पुन्हा म्हणाला, "पण तू केनियन स्पर्धकाला ढकलुन पुढे आणलेस ?"


यांवर इव्हान म्हणाला, "तो पहिला आलेलाच होता ही रेस त्याचीच होती !"


पण रिपोर्टर पुन्हा म्हणाला, "पण तू सुवर्ण पदक जिंकू शकला असतास !"


"त्या जिंकण्याला काय अर्थ होता ? माझ्या मेडलला मान मिळाला असतां ? माझी आई काय म्हणाली असती ? संस्कार हे पिढी दर पिढी पुढे पुढे जात असतात. मी पुढच्या पिढ्यांना काय दिले असते ?"


        

        खरंच इव्हान काय म्हणतो ते पाहिलं की कळतं पहिलं येण्यापेक्षाही किंव्हा सुवर्णपदक मिळवणं पेक्षा ही संस्कार किती महत्वाचे असतात. दुसऱ्याना पायाखाली चिरडून पुढं जाण्यात अर्थ नसतो.


ज्याची खरी गुणवत्ता असेल त्याला ते मिळायला हवं. हेच सांगताना इव्हान म्हणतो तो जिंकलेलाचं होता ही रेस त्याचीच होती. 


दुसऱ्यांच्या दुर्बलतेचा किंवा अज्ञानाचा फायदा घेऊन जिंकणं याला काहीही अर्थ नसतो. आपण जिंकणं म्हणजे दुसऱ्याला हरवणं असत का ?


जिंकणं ही व्यापक संकल्पना आहे. वरील स्पर्धेत इव्हानच खऱ्या अर्थाने जिंकला हे कळत .

पण तो तर दुसरा आला मग कसा जिंकला ???


म्हणून तर पहिलं येणं म्हणजे जिंकणं असत नाही.

हे आपण समजून घ्यायला हवं .


मंगळवार, २० जुलै, २०२१

Bitcoin / बिटकॉइन

 Bitcoin...

नमस्कार मित्रांनो आपण अलीकडच्या काही वर्षात एक नाव ऐकत आलोय ते म्हणजे 

बिटकॉइन ....

आता बिटकॉइन म्हणजे नक्की काय? क्रिप्टो करन्सी ही काय भानगड आहे. यांचा वापर कुठे आणि कसा होतो? डिजिटल करन्सी म्हणजे काय ? 

तिचा वापर दैनंदिन जीवनात कसा होतो हे आपण पाहूया.


प्रथम आपण क्रिप्टो करन्सी म्हणजे काय ते पाहू.

क्रिप्टोकरन्सी :-

सोप्या भाषेत सांगायचे तर क्रिप्टोकरन्सी म्हणजे आभासी चलन.  हे चलन आपल्या रुपया किंवा पैशासारखं भोतिक असत नाही. तसेच जसे आपले रुपये छापण्याचं काम देशाच सरकार आणि RBI करत असते. तस हे चलन कोणतंही सरकार किंवा बँक छापत नाही . 

हे फक्त ऑनलाइन असते. 


तर मग हे निर्माण कसं होत आणि त्याचा वापर कसा होतो. 


मित्रांनो क्रिप्टोकरन्सी ही मायनिंग द्वारे निर्माण होते आणि या करन्सीचा व्यहारात वापर ब्लॉकचैन मुळे होतो.


जगभरात प्रत्येक देशाने आपलं एक चलन स्वीकारले आहे. भारतात - रुपया , युरोपियन देशात - युरो ,  इंग्लड - पौंड आणि अमेरिकेत - डॉलर अशी विविध चलन आहेत . तसच या क्रिप्टो करन्सी मध्ये ही वेगवेगळ्या करन्सी आहेत .


जगभरातील काही क्रिप्टो करन्सी .....

1. बिटकॉइन

2. लाइटकॉइन

3. रिपल

4. इथेरियम

 अशा प्रकारच्या खूप करन्सी आहेत . त्यांचा वापर केला जातो. त्यामध्ये ज्या कडे भरपुर लोकांचा ओढा आहे तो म्हणजे बिटकॉइन.


बिटकॉइन म्हणजे काय ?

   सर्वात प्रथम बिटकॉइन ही एक प्रकारची क्रिप्टो करन्सी आहे . हे रुपया , डॉलर , युरो, यांसारखे एक चलन आहे. पण ते फक्त ऑनलाइन असत. कॉम्पुटर कोडद्वारे त्याला एनक्रिप्टेड किंवा लॉक केलेलं असतं. 


आपल्याला ज्या प्रकारे नोटा बँकेतुन मिळतात. तशाच प्रकारे बिटकॉइन हे ऑनलाईन साईटवर मिळतात. तुम्ही बिटकॉइन पासून तुम्हांला हवं ते खरेदी करू शकता.


जगभरातील अनेकांनी बिटकॉइन मध्ये व्यवहार करण्यास मान्यता दिली आहे.  पण पैशाचे व्यवहार ऑनलाईन व ऑनलाइन आपण करू शकतो. पण बिटकॉइनचे सगळे व्यवहार ऑनलाईन चं असतात. त्या व्यवहार कोणाचीही मध्यस्थी नसते.


बिटकॉइन चे दोन प्रकार आहेत.

1. क्लासिक बिटकॉइन BCT 

2. हार्डफोर्क बिटकॉइन BCH 


क्लासिक बिटकॉइन चे छोटे छोटे भाग पाडले जातात म्हणजे 1, 0.01 , 0.001 , 0.0001 , 

कारण तुम्हांला कमीत कमी मूल्याचे बिटकॉइन खरेदी करता यावेत .


बिटकॉइन चे फायदे....

1. कमीतकमी वेळात व्यवहार करता येतात.

2. 365 दिवस व्यवहार सुरु असतात .

3. मध्यस्थाची / बँकेची गरज नाही.

4. व्यवहार करताना कोणतेही डेबिट, क्रेडिट कार्ड।

     लागत नाही. केवळ ऑनलाईन वॉलेट बनवलं

     की झालं.

5. तुमची माहिती गुप्त ठेवली जाते . इतकी की ती

     बिटकॉइन यंत्रणा चालवणाऱ्यानाही माहिती

     नसते.


असे भरपूर फायदे आहेत पण हे वापरताना काही मर्यादा पण आहेत त्या खालीलप्रमाणे...


मर्यादा....

1. हे सर्वसामान्य चलन नाही .

2. तुम्हाला तुमचा टॅक्स याने भरता येणार नाही .

3. व्यवहारांवर कोणत्याही नियामकाचे वा

    सरकारचं नियंत्रण व लक्ष नसतं.

4. व्यवहारासाठी नियमच नाहीत त्यामुळे गैरवापर

    होण्याची शक्यता जास्त 

5. याच मुल्य प्रचंड प्रमाणात बदलत असत.


   बिटकॉइन मुळे काहीजण कमी वेळात श्रीमंत झाले हे आपण वाचतो ,पाहतो. तेंव्हा आपल्यालाही बिटकॉइन मध्ये गुंतवणूक करण्याचा मोह होतो. पण सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच प्रत्येकाने निर्णय घ्यावा. 

कारण पैसा तुमचा आहे आणि तो कसा वापरावा हा सर्वस्वी अधिकार तुमचाच आहे .



शनिवार, १० जुलै, २०२१

While living life. / जीवन जगताना

 जीवन जगताना......


जीवन इतक्या वेगाने कधी बदलल नाही. ते आज 21व्या शतकात बदलत आहे आणि हा वेग प्रचंड आहे. आपल्याला आपली ध्येय साध्य करायची असतील तर या वेगाशी स्पर्धा करावी लागेल. या वेगाबरोबर चालावं लागेल. नाहीतर या प्रचंड वेगातून आपण बाहेर फेकले जाऊ. आजच्या भाषेत outdated होऊ. असं होऊ द्यायचं नसेल तर या वेगाशी आपल्याला स्पर्धा करावी लागेल. त्या साठी काही बदल स्वीकारावे लागतील आणि ते बदल स्वतः मध्ये करावे लागतील. हे सगळं करताना माणुसकीच्या मूल्यांशी प्रामाणिक राहावं लागेल. सामाजिक मूल्ये न सोडता आपली प्रगती साधावी लागेल. 

त्या साठी काही विचार ....


1. स्वतःला अपडेट करत राहा :- 

   नवीन नवीन गोष्टी शिकत राहा. शिक्षण हे निरंतर चालू असते. खऱ्या अर्थाने शिक्षण शाळा संपल्यानंतरचं सुरू होत. नवीन कौशल्य शिका. ज्याचा आपल्याला आपल्या व्यवसायात ,नोकरीत,जे काही आपण काम करत असू त्यात उपयोग होईल. शिक्षण कधीचं वाया जात नाही. त्याचा कुठे ना कुठे उपयोग होत असतो. त्या साठी शिका जे आवडेल ते शिका. बिनधास्त.....

शिक्षणाबरोबरच शरीर निरोगी ठेवा. त्यासाठी दररोज जसा झेपेल तसा व्यायाम करा. " Health is Wealth " जीवनाच्या सर्वात शेवटी आपल्या जवळ काय राहत ता ते आरोग्य आणि ते चांगलं असेल तरच आपण सर्व काही करू शकतो. आपली स्वप्न पूर्ण झाली आणि त्याचा उपभोग घ्यायला आपल शरीर तर फिट असायला हवं ना. तेच नसेल तर काय उपयोग ?.....

स्वप्न पूर्ण करण्यासाठी शरीराची हेळसांड करू नका. शरीर कमवा. मन शांत ठेवण्यासाठी मेडिटेशन करा. नसेल जमत तर शिका. Youtube , playstore वर खूप apps आहेत त्यांचा वापर करा. स्वतःसाठी दिवसातून एक तास वेळ तरी काढा.


2. वेगवेगळ्या भाषा शिका :-

तुम्हांला जी आवडेल ती भाषा शिका. आताच्या काळात एखादी नवी भाषा शिकणे हे कधी नव्हे इतके सोपे झाले आहे. Mobile, Internet यांचा वापर करा. त्याच बरोबर English शिका. ती शिकल्याने कधी मराठीचा अपमान होत नाही. काळाची पावलं ओळखा. तीन भाषांवर प्रभूत्व निर्माण करा. त्यामुळे तुमचा मेंदूही तल्लख होतो. तो अधिक कार्यक्षमतेने काम करतो.


3. अन्य जाती धर्मावर टीका करू नका :- 

आपलाच धर्म चांगला आहे असं मानून इतर धर्माकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या धर्माचा,जातीचा, भाषेचा अभिमान जरूर बाळगला पाहिजे. पण त्या बरोबरच इतरांवर टीका करू नका. इतरांना वाईट म्हटलं की आपण चांगले होत नसतो. खोट्या धर्माभिमानातून बाहेर पडा. जे काही चांगले असेल ते त्या त्या धर्माकडून शिका. आत्मसात करा. स्वतःला समृद्ध करत रहा. 

जे जे चांगले ते ते घ्यावे,

जे जे वाईट ते सोडून द्यावे..


4. मदत करा :-

एकमेकांना मदत करा. ज्यांनी आपल्या कठीण काळात आपल्याला मदत केली त्यांना विसरू नका. तुम्ही मदत करण्यायोग्य झाल्यावर त्याची परतफेड करा. चांगले काम कोणी करत असेल तर त्यांना पाठींबा द्या. तुमच्या परीने मदत करा. नवीन काही करण्यासाठी प्रोत्साहन द्या . निरपेक्ष मदत करा.


5. माणसं जोडा :-

 भांडण ,राग,आकस यांपासून जितकं दूर राहता येईल तितकं दूर रहा. संयम ठेवा. भांडणामुळे दोघाचंही नुकसान होत हे कायम लक्षात ठेवा. खोटा अहंकार बाळगू नका. जेवढी जमतील ठेवढी माणसं जोडा. वाद घालू नका माघार घेत चला. क्षमा करा, माणसं सांभाळा. ते तुम्हांला कधी तरी मदत करतीलच. लोकांना ते जसे आहेत तसं स्वीकारा.  वादविवादांपासून दूर रहा. प्रत्येकाची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक जण आपल्या जागी बरोबर असतो हे समजलं की सगळे प्रश्न संपतात.


6. स्वतःला बदला :-

जेव्हा आपण जगाला बदलायचा नाद सोडून देतो आणि स्वतःला बदलायला लागतो तेंव्हाच आपली वाटचाल प्रगतीकडे होऊ लागते. कोण काय करतंय या कडे लक्ष न देता स्वतःला नक्की काय आवडतंय ते करा. स्वतःची तुलना इतरांना बरोबर करू नका. या जगात प्रत्येकजण वेगळा आहे. स्वतः मध्ये रममाण व्हा.


7. सुखाची संकल्पना :- 

सुखाच्या संकल्पना प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. तुमची सुखाची संकल्पना नक्की काय आहे ते ठरावा. नाही तर भौतिक गोष्टींच्या पाठीमागे  धावून आत्मिक सुख मिळणार नाही. सुख म्हणजे काय याचा शोध घ्या नाहीतर आयुष्य भर भौतिक गोष्टीं जमा करत राहाव्या लागतील पण आत्मिक सुख मिळणार नाही. त्या साठी तुमची सुखाची संकल्पना नक्की काय आहे याचा शोध घ्या.


8. कुटूंबाला वेळ द्या :-

हे सगळं आपण कशासाठी करतो तर ते कुटूंबासाठी पण हे करताना आपणच कुटुंबापासून दूर जातो. कुटूंबाला वेळ द्या. प्रेक्षणीयस्थळी चार दिवस सुट्टी काढून फिरा. आनंद कुटूंबासोबत साजरा करा. त्यांना वेळ द्या, नाहीतर आपण मिळवलेले यशाचं कौतुक करणार कोणी नसेल तर त्या यशालाही किंमत राहत नाही. 


9. समाजिक भान :-

समाजातील गरजू घटकांना मदत करा. आपला काही वेळ समाजाच्या प्रगतीसाठी द्या, आपल्या कुवतीनुसार देऊ शकतो ते समाजासाठी दिल पाहिजे. समाज तुम्हांला कधी तरी नक्कीच मदत करेन.

 

जीवनाच्या वेगात अशाच काही गोष्टी करत राहिलो तर आपण त्या वेगाशी साधर्म्य साधून त्याबरोबर सामर्थ्यपणे चालू शकतो, धावू शकतो यासाठी प्रयत्न पूर्वक या गोष्टी करू या. याच बरोबर जगाची नाही तर आपली आवड जोपासुया ....🙏🌹

मंगळवार, २ फेब्रुवारी, २०२१

2020 will be the year to Enrich Yourself ... 2020 स्वतःला समृद्ध करणार वर्ष...

 2020 स्वतःला समृद्ध करणार वर्ष...

ह्या वर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीला जगातील काही देशांत तो वेगाने पसरू लागला. त्या मुळे ते देश हळू हळू लॉकडाउन होऊ लागले.भारतात त्याचा प्रसार वाढू लागला आणि तो आणखी  पसरू नये म्हणून सरकारने संपूर्ण देश लॉकडाउन केला.

आपण सर्वजण घरात बंद झालो. आणि सुरू झाला प्रवास स्वतःला ओळखण्याचा. दररोजच्या कामात जे काही राहील होत ते करण्यासाठी वेळ मिळाला .

खरंच स्वतःला वेळ का द्यायला हवा याच उत्तर मिळाल.

नवीन  शिकलं पाहिजे . 

स्वतःला वेळ दिला पाहिजे .

स्वतःशी संवाद साधला पाहिजे .

हे आपण वाचत असतो ,एकमेकांना सांगत असतो. पण आपण करतो का ?

हे सगळं करायला वेळ दिला 2020 या वर्षात आलेल्या कोरोना ने

2020आणि कोरोनाने आपल्याला नक्की काय दिल ?


वेळ...

स्वच्छतेचे महत्त्व...

नवीन काही शिकण्याची संधी ...

माणसांची अफाट क्षमता...

कुटुंबाची खरी ओळख ...

समानता ...

स्वतःला स्वतः साठी वेळ ...

आपला देश किती महान आहे हे नव्याने समजले ...

गावाशी नाळ जोडली गेली ...


कोरोना आलाच तो खूप नव्या गोष्टी शिकवण्यासाठी. भरपूर वेळ मिळाला आणि या वेळेचं करायचं काय ? हा प्रश्न आधी पडला. मग काय करता येईल हा विचार सुरू झाला. विचार करतानाच माझा कशात अभ्यास कमीआहे हे मी शोधलं. 

मला समजलं की सामाजिक,शैक्षणिक आणि राजकीय साक्षरते बरोबर आपण आर्थिक साक्षरता पण व्हायला हवं.

आर्थिक साक्षर होण्यासाठी नक्की काय करता येईल हा प्रश्न पडला.आणि मग शोध सुरू झाला उत्तरांचा .

मी यासाठी मदत घेतली ती पुस्तके, googal, youtube, आर्थिक ब्लॉग, आर्थिक साक्षरतेची zoom वरील सेमिनार यांची.

या प्रवासात खूप गोष्टी समजल्या. खूप गोष्टी ज्या शिकायच्या राहून गेल्या होत्या त्या मी शिकलो.

आणि हे सर्व घडलं ते कोरोना मुळे.


माणसाकडे अफाट क्षमता आहे आणि तिची ओळख या कोरोनाने दिली. कोरोना सगळीकडे पसरू नये म्हणून संपूर्ण देश मा.पंतप्रधानानी लॉकडाउन केला. या मुळे देशातल्या मोठं मोठ्या शहरात कामगार अडकले. सगळी वाहने बंद. बस, रेल्वे, विमानसेवा, ट्रक सगळं कसं एका जागेवर थांबलं. पण घराकडे जाण्याची ओढ माणसांना गप्प बसू देईना.

काही जण मुंबई ते उत्तर प्रदेशात चालत गेली.

काही जण आपलं सगळं कुटूंब घेऊन जे मिळेल त्यावर आपली भूक भागवत घरी निघाली आणि पोहोचली.

कोणी चालत,कोणी सायकलवर,कोणी मोटारसायकल वर अशक्य वाटणारं शक्य झालेल पाहिलं.ही माणसं तक्रार करत बसली नाही जी साधन होती त्याचा वापर करून त्यांनी आपलं घर घाटलं.


आपण कधीही तक्रार करत बसायचं नाही.जी साधनं आहेत त्याचा वापर करत यश मिळवायचं.

आपला नाकर्ते पणा झाकण्यासाठी कधीही कारण द्यायची नाही हे मला कोरोनाने शिकवलं.


माणसाला आयुष्यात कुटुंब का गरजेचं असत ते या काळात प्रकर्षाने जाणवलं.कुटुंब आपल्याला कायम समृद्ध करत असत. कुटुंब म्हणजे नक्की काय अनुभवातून कळलं. कितीही मोठं संकट आली तरी कुटुंबाचा आधार असेल तर त्या वर आपण सहज मात करू शकतो. ते आपल्याला कायम आधार देत.याची नव्याने प्रचिती कोरोनामुळे आली.


नोकरीमुळे गावाला जायचं तर यात्रेला, लग्नाला,दिवाळी ला ते पण काही दहा- पंधरा दिवस पण कोरोनामुळे गावातच सात ते आठ महिने गेले. गावाशी जवळीकता वाढली .भावनिक बंध निर्माण झाले. खेड्यातील जीवनाचा आनंद लुटता आला.चाकोरीबद्ध झालेलं आयुष्य बदलून गेल.स्वछद जगण्याची मज्जा घेता आली.शेतीमधील कामाची ओळख झाली आणि ती करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात याची पण प्रचिती आली.हे सगळं घडलं ते या कोरोनामुळे...


सर्व जण एकाच पातळीवर आलेली दिसली.

कोण श्रीमंत, गरीब,राजकारणी, अधिकारी,पंतप्रधान, मुख्यमंत्री सगळेच घरी होते. कोणालाही वेगळे नियम नव्हते. खरी समानता नक्की काय असते याच उदाहरण पाहायला मिळालं. हे शक्य झालं कारण सांगायची गरज आहे का? ते तुम्हाला माहीतच आहे .


स्वतःला स्वतःसाठी वेळ मिळाला. आणि कळल की खरंच स्वतःला वेळ देणं गरजेचं असते. त्यामुळे स्वतःशी नव्याने ओळख झाली.  स्वामी विवेकानंद म्हणतात की , " दिवसभरातून एकदा तरी स्वतःशी संवाद साधा. तसे केले नाही तर  तुम्ही या जगातील एका चागल्या व्यक्तीला भेटण्याची संधी गमवाल .

अमेरिके सारख्या देशाने अर्थव्यवस्था वाचण्यासाठी देशात लॉकडाउन केला नाही. माणसांच्या जीवा पेक्षा अर्थव्यवस्थेला महत्त्व दिले. पण माझ्या देशाने माणस महत्वाची मानली त्यांना वाचवण्यासाठी अर्थव्यवस्था धोक्यात टाकली. मी लहान पणा पासून ऐकतोय की आपल्या देशात माणसांच्या जीवाची किंमत नाही. यूरोपीय देश कसे त्याच्या नागरिकांची काळजी घेतात. पण कोरोनाने नक्की काय खर आहे ते दाखवलं.

तथाकथित प्रगत देशांची आरोग्य व्यवस्था किती प्रगत आहे.आपली कशी आणि किती खराब आहे हे सांगणारे विचारवंतांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटली या कोरोनामुळे.

आपल्या देशातील लोकांनी स्वयंशिस्त काय असते ते जगाल दाखवल. पंतप्रधानांच्या एका आव्हानाला सगळ्या लोकांनी प्रतिसाद दिला. आणि यामुळे च आपण या संकटातून यशस्वी बाहेर पडलो. आपली संस्कृती किती महान आहे आणि ती बदलत्या काळात पण किती गरजेची आहे. तीच महत्व कमी झालेल नाही हे आपल्याला आणि जगालाही समजलं. हे प्रकर्षाने जाणवलं ते या वर्षात आलेल्या कोरोना मुळे.


कोरोना हा भयंकर रोग आहे पण त्यामुळे काही सकारात्मक तर काही नकारात्मक गोष्टी घडल्या.

पण आपण नेहमी सकारात्मक गोष्टी कडेच लक्ष द्यायचं. यामुळे आपण नक्की काय शिकलो,काय शिकायला मिळालं हे पाहायला हवं. खरं तर खूप काही गोष्टी आपण साधेपणाने करायला शिकलो.

लग्न अगदी साधेपणाने होऊ लागली.त्यात कुणाचा बडेजाव नाही. मुलीच्या लग्नाचा खर्चही खूप कमी झाला. लग्न साधेपणाने होऊ शकत नाही, हा सर्वात मोठा गैरसमज दूर झाला. सण- समारंभ साधेपणाने साजरे होऊ शकतात आणि त्यात तेव्हढाच आनंद असतो हे समजलं.


कोरोना खूप काही शिकवून गेला. स्वच्छता जीवनात किती महत्त्वाची असते हे समजलं आणि त्यामुळे स्वच्छतेची सवय लागली. साधं,सात्विक आणि घरी तयार केलेलं अन्न खाल्लं तर आपण लवकर आजरी पडत नाही.आपली प्रतिकार शक्ती वाढवायची असेल तर घरी तयार केलेले अन्न गरजेचं असतं.


शेवटी मला सांगावस वाटत की, 2020 आणि 

कोरोना जाता जाता मला समृद्ध करून गेले....



Shaarad Sir

उर्मिला

  उर्मिला... रामायण माहीत असत, पण उर्मिला नक्की कोण हेच काही जणांना माहीत नसतं... जेव्हा कळतं तेव्हा काय तर लक्ष्मणाची पत्नी एवढंच... एखादी ...