शनिवार, २६ डिसेंबर, २०२०

Not Everything is Ours / सगळं आपलं नसतं...

 सगळं आपलं नसतं....

हो....

हे खरं आहे ....

आणि हा निसर्गाचा नियम आहे. तो जेवढ्या लवकर आपल्याला समजेल तेव्हढ आपलं दुःख कमी होईल ...

पण आपल्याला हेच मान्य नसतं. सगळंच हवं असत. 

आणि मग सुरू होतात प्रॉब्लेम. ते सोडवण्यासाठी आपण आपली शक्ती खर्च करतो. पण नक्की कशामुळे प्रॉब्लेम निर्माण होतात त्या कडे लक्षच देत नाही. 


सगळ्या गोष्टी आपल्या हव्या असतात. इच्छा म्हणून हे ठीक आहे. पण आपल्यालाच मिळाल्या पाहिजेत हा हट्ट योग्य नसतो. 


आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी कशा मिळवता येतील याचा विचार केला पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न पण केले पाहिजेत. पण त्या मिळाल्या नाही तर काय?


त्रास करून घेणं , चिडचिड करणं, आपल्यात काही कमी तर नाही ना हा विचार करणं . याची खर तर काही गरज नसते. फक्त आपण तटस्थपने नैसर्गिक नियम समजावून घेतला पाहिजे .

तो एकदा समजला की प्रश्न संपतात. जगताना आनंद घेता येतो. 






गुरुवार, २४ डिसेंबर, २०२०

Education and you../ शिक्षण आणि आपण

शिक्षण आणि आपण

शाळा संपल्यानंतर शिक्षण संपत का ? नाही. तर ते खऱ्या अर्थाने सुरू होत.माणसाच्या आयुष्यात कधीच शिक्षण संपत नाही .पण बहुतेक लोकांच्या बाबतीत अस होत नाही. त्याना वाटत की आता शाळा संपली, कॉलेज संपलं म्हणजे शिक्षण पण संपलं. मग त्या कडे आपण लक्ष देत नाही. आपण आपल्याच विश्वात रममाण होतो . 

कुटुंब, नोकरी, सगळेच व्याप वाढतात . तुम्हाला काही नवीन शिकायचं आहे का ?असं कोणी विचारलं तर आपण सांगतो की शाळेत शिकलो तेच खूप आहे .मला काही शिकायची गरज नाही.मला सगळं माहीत आहे. मला सगळं कळत.
पण हे खरं असत का ? 
याचा आपण कधी विचार करतो का ?
खरंच सगळं आपल्याला येत का? या प्रश्नाचे उत्तर आपण तटस्थ राहून आपल्या मनाला विचारायला हवं .आणि काय उत्तर येत हे ही पाहायला हवं.

आपण नेहमी शिकत राहील पाहिजे .स्वतः ला समृद्ध करत राहील पाहिजे.त्या साठी काय काय करायाचं . ते शोधून ते आत्मसात करण्यासाठी सदैव तयार असलं पाहिजे .

आपलं ज्ञान वाढवत राहील पाहिजे . नवीन नवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत .

आपण स्वतः ला समृद्ध करण्यासाठी जे काही कमवत असू त्या कमाई च्या 5% खर्च करावा . तो खर्च नवनवीन पुस्तके खरेदी करण्यासाठी, एखादा नवीन कोर्स करण्यासाठी, शरीर कमवण्यासाठी, आपल्या आनंदासाठी, छंद जोपासण्यासाठी करावा.

आपल्याला जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण खूप महत्त्वाची भूमिका बजावते . आर्थिक साक्षर होण्यासाठी सुध्दा आपण प्रयत्न केले पाहिजेत. 

शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे .हे आपण वाचतो, बोलतो, इतरांना सांगतो, पण ते आपल्या जीवनात उतरवण्यासाठी काही प्रयत्न करत नाही . 

 शिक्षण कधी संपत नाही तर ते जीवनाच्या वाटेवर अधीकच वाढत जात.

शिक्षण म्हणजे स्वतः ला ओळखणे . जर हेच आपण थांबवलं तर आपण आपली स्वप्न साकार करू शकणार नाही . 

शिक्षण आपल्याला समृद्ध करत म्हणून मला वाटत की माणसाने कायम शिकत राहावं.



Shaarad Sir

उर्मिला

  उर्मिला... रामायण माहीत असत, पण उर्मिला नक्की कोण हेच काही जणांना माहीत नसतं... जेव्हा कळतं तेव्हा काय तर लक्ष्मणाची पत्नी एवढंच... एखादी ...