जीवन जगताना......
जीवन इतक्या वेगाने कधी बदलल नाही. ते आज 21व्या शतकात बदलत आहे आणि हा वेग प्रचंड आहे. आपल्याला आपली ध्येय साध्य करायची असतील तर या वेगाशी स्पर्धा करावी लागेल. या वेगाबरोबर चालावं लागेल. नाहीतर या प्रचंड वेगातून आपण बाहेर फेकले जाऊ. आजच्या भाषेत outdated होऊ. असं होऊ द्यायचं नसेल तर या वेगाशी आपल्याला स्पर्धा करावी लागेल. त्या साठी काही बदल स्वीकारावे लागतील आणि ते बदल स्वतः मध्ये करावे लागतील. हे सगळं करताना माणुसकीच्या मूल्यांशी प्रामाणिक राहावं लागेल. सामाजिक मूल्ये न सोडता आपली प्रगती साधावी लागेल.
त्या साठी काही विचार ....
1. स्वतःला अपडेट करत राहा :-
नवीन नवीन गोष्टी शिकत राहा. शिक्षण हे निरंतर चालू असते. खऱ्या अर्थाने शिक्षण शाळा संपल्यानंतरचं सुरू होत. नवीन कौशल्य शिका. ज्याचा आपल्याला आपल्या व्यवसायात ,नोकरीत,जे काही आपण काम करत असू त्यात उपयोग होईल. शिक्षण कधीचं वाया जात नाही. त्याचा कुठे ना कुठे उपयोग होत असतो. त्या साठी शिका जे आवडेल ते शिका. बिनधास्त.....
शिक्षणाबरोबरच शरीर निरोगी ठेवा. त्यासाठी दररोज जसा झेपेल तसा व्यायाम करा. " Health is Wealth " जीवनाच्या सर्वात शेवटी आपल्या जवळ काय राहत ता ते आरोग्य आणि ते चांगलं असेल तरच आपण सर्व काही करू शकतो. आपली स्वप्न पूर्ण झाली आणि त्याचा उपभोग घ्यायला आपल शरीर तर फिट असायला हवं ना. तेच नसेल तर काय उपयोग ?.....
स्वप्न पूर्ण करण्यासाठी शरीराची हेळसांड करू नका. शरीर कमवा. मन शांत ठेवण्यासाठी मेडिटेशन करा. नसेल जमत तर शिका. Youtube , playstore वर खूप apps आहेत त्यांचा वापर करा. स्वतःसाठी दिवसातून एक तास वेळ तरी काढा.
2. वेगवेगळ्या भाषा शिका :-
तुम्हांला जी आवडेल ती भाषा शिका. आताच्या काळात एखादी नवी भाषा शिकणे हे कधी नव्हे इतके सोपे झाले आहे. Mobile, Internet यांचा वापर करा. त्याच बरोबर English शिका. ती शिकल्याने कधी मराठीचा अपमान होत नाही. काळाची पावलं ओळखा. तीन भाषांवर प्रभूत्व निर्माण करा. त्यामुळे तुमचा मेंदूही तल्लख होतो. तो अधिक कार्यक्षमतेने काम करतो.
3. अन्य जाती धर्मावर टीका करू नका :-
आपलाच धर्म चांगला आहे असं मानून इतर धर्माकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या धर्माचा,जातीचा, भाषेचा अभिमान जरूर बाळगला पाहिजे. पण त्या बरोबरच इतरांवर टीका करू नका. इतरांना वाईट म्हटलं की आपण चांगले होत नसतो. खोट्या धर्माभिमानातून बाहेर पडा. जे काही चांगले असेल ते त्या त्या धर्माकडून शिका. आत्मसात करा. स्वतःला समृद्ध करत रहा.
जे जे चांगले ते ते घ्यावे,
जे जे वाईट ते सोडून द्यावे..
4. मदत करा :-
एकमेकांना मदत करा. ज्यांनी आपल्या कठीण काळात आपल्याला मदत केली त्यांना विसरू नका. तुम्ही मदत करण्यायोग्य झाल्यावर त्याची परतफेड करा. चांगले काम कोणी करत असेल तर त्यांना पाठींबा द्या. तुमच्या परीने मदत करा. नवीन काही करण्यासाठी प्रोत्साहन द्या . निरपेक्ष मदत करा.
5. माणसं जोडा :-
भांडण ,राग,आकस यांपासून जितकं दूर राहता येईल तितकं दूर रहा. संयम ठेवा. भांडणामुळे दोघाचंही नुकसान होत हे कायम लक्षात ठेवा. खोटा अहंकार बाळगू नका. जेवढी जमतील ठेवढी माणसं जोडा. वाद घालू नका माघार घेत चला. क्षमा करा, माणसं सांभाळा. ते तुम्हांला कधी तरी मदत करतीलच. लोकांना ते जसे आहेत तसं स्वीकारा. वादविवादांपासून दूर रहा. प्रत्येकाची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक जण आपल्या जागी बरोबर असतो हे समजलं की सगळे प्रश्न संपतात.
6. स्वतःला बदला :-
जेव्हा आपण जगाला बदलायचा नाद सोडून देतो आणि स्वतःला बदलायला लागतो तेंव्हाच आपली वाटचाल प्रगतीकडे होऊ लागते. कोण काय करतंय या कडे लक्ष न देता स्वतःला नक्की काय आवडतंय ते करा. स्वतःची तुलना इतरांना बरोबर करू नका. या जगात प्रत्येकजण वेगळा आहे. स्वतः मध्ये रममाण व्हा.
7. सुखाची संकल्पना :-
सुखाच्या संकल्पना प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. तुमची सुखाची संकल्पना नक्की काय आहे ते ठरावा. नाही तर भौतिक गोष्टींच्या पाठीमागे धावून आत्मिक सुख मिळणार नाही. सुख म्हणजे काय याचा शोध घ्या नाहीतर आयुष्य भर भौतिक गोष्टीं जमा करत राहाव्या लागतील पण आत्मिक सुख मिळणार नाही. त्या साठी तुमची सुखाची संकल्पना नक्की काय आहे याचा शोध घ्या.
8. कुटूंबाला वेळ द्या :-
हे सगळं आपण कशासाठी करतो तर ते कुटूंबासाठी पण हे करताना आपणच कुटुंबापासून दूर जातो. कुटूंबाला वेळ द्या. प्रेक्षणीयस्थळी चार दिवस सुट्टी काढून फिरा. आनंद कुटूंबासोबत साजरा करा. त्यांना वेळ द्या, नाहीतर आपण मिळवलेले यशाचं कौतुक करणार कोणी नसेल तर त्या यशालाही किंमत राहत नाही.
9. समाजिक भान :-
समाजातील गरजू घटकांना मदत करा. आपला काही वेळ समाजाच्या प्रगतीसाठी द्या, आपल्या कुवतीनुसार देऊ शकतो ते समाजासाठी दिल पाहिजे. समाज तुम्हांला कधी तरी नक्कीच मदत करेन.
जीवनाच्या वेगात अशाच काही गोष्टी करत राहिलो तर आपण त्या वेगाशी साधर्म्य साधून त्याबरोबर सामर्थ्यपणे चालू शकतो, धावू शकतो यासाठी प्रयत्न पूर्वक या गोष्टी करू या. याच बरोबर जगाची नाही तर आपली आवड जोपासुया ....🙏🌹
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा