शनिवार, १३ ऑगस्ट, २०२२

Real Rich And Fake Rich / खरी श्रीमंती आणि खोटी श्रीमंती

 Real Rich And Fake Rich /

खरी श्रीमंती आणि खोटी श्रीमंती 


समाजामध्ये जीवन जगत असताना श्रीमंत आणि गरीब ही दोन प्रकारची लोक आढळतात. पण श्रीमंती म्हणजे नक्की काय असते?

आपल्याला कसं श्रीमंत होता येईल ? हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. प्रत्येक जण श्रीमंत होण्यासाठी धडपड करत असतो. आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी आपल्याकडे भरपूर पैसा यावा असं प्रत्येकाला वाटत असतं. 


पण नक्की खरी श्रीमंती म्हणजे काय असते. ती कशी प्राप्त होते. नक्की कशाला श्रीमंती म्हणायचं.

लक्षात घ्या खरी श्रीमंती म्हणजे काय ते आपण पाहू.

 ● खरी श्रीमंती म्हणजे  

- तुमची बँकेत असणारी आपली Savings....

- तुम्ही केलेली  FD , तसेच पोस्टऑफिस मध्ये केलेली RD....

- तुम्ही स्वतःसाठी उघडलेले PPF Account आणि त्यात दर महिन्याला जमा करत असलेली थोडी थोडी रक्कम...

- NPS मध्ये गुंतवणूक केलेले पैसे जे महागाई दरानुसार वाढत जाणारे....

- एखादा best सुरू केलेला Mutual fund आणि त्यात शिस्तबद्ध पणे जमा करत असलेली रक्कम.......

- चांगल्या कंपनीचे कमी किमतीत घेतलेले Share ज्याची किंमत दिवसेंदिवस वाढत जाते....

- योग्य सल्ला घेऊन केलेला SIP....

- आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी घेतलेली Mediclaim Policie....

- आजकालच्या धावपळीच्या युगात वावरताना लवकरात लवकर घेतलेला टर्म इन्शुरन्स....

या सगळ्या माध्यमातून सतत केलीली पैशाची गुंतवणूक म्हणजे खरी श्रीमंती होय...


"  स्वतःला गुंतवणूकीची सवय लावून आर्थिक स्वातंत्र्याकडे केलेला सुंदर प्रवास  " 


श्रीमंती कडे वाटचाल करत असताना एका रात्रीत आपण श्रीमंत होऊ शकत नाही. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. बचतीची सवय लावून जमा केलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवला की आपला श्रीमंतीचा प्रवास सुरु होतो.


लक्षात ठेवा....

' खरी श्रीमंती तीच 

               जी दिसत नाही.  '

 


● खोटी श्रीमंती...

आता खोटी श्रीमंती ही नक्की काय भानगड आहे. 

तर श्रीमंत म्हणजे कोण हाच आपला मोठा गैरसमज झालाय की जे दिसते त्यालाच आपण खर समजतो. पण तस असत नाही. हे आपल्या लक्षात यायला हवं ...

तर यामध्ये कशाचा समावेश होतो तर खालील बाबींचा .....

-  भरपूर कर्ज काढून घेतलेले मोठे घर...

-  कर्जावर घेतलेली महागडी कार...

( जिची किंमत दिवसेंदिवस कमी होत जाते. )

- महागडे मोबाईल..Apple ( ज्याची खरं तर काहीच गरज असत नाही.

- दिखावा करण्यासाठी विनाकारण खरेदी केलेले महागडे कपडे...

- social media वर फोटो टाकण्यासाठी केलेला खर्च...

- Credit card ( क्रेडिट कार्ड च्या चक्रामध्ये अडकून वाया घालवलेली संपत्ती ) आपली संपत्ती जर कोण पोखरत असेल तर ते म्हणजे आपलं फुकट भेटतात म्हणून घेतले क्रेडिट कार्ड...

( आत्ताच ते फेकून द्या )

- Online Shopping ( गरज नसताना केलेली)


य सगळ्या गोष्टी आपल्या खिशातून पैसा घेऊन जातात. वाढवत नाहीत.


अशा श्रीमंतीला फसू नका. लोकांना दखवण्यासाठी  मिरवण्यासाठी पैसे खर्च करू नका.


लक्षात ठेवा.....

" खोटी श्रीमंती ती, जी दिसते पण

                    प्रत्यक्षात असतं नाही. " 


" जर तुमच्या डोक्यावर कोणत्याही प्रकारचे कर्ज नसेल आणि तुम्ही छोटीशी का होईना बचत करत असाल तर तुम्ही इतर खूप लोकांच्या पुढे आहात. ज्यांच्या डोक्यावर कर्ज आहे. "


" तुम्हांलाचं फेडावं लागेल अशा मोठ्या कर्जाच्या विळख्यात सापडूच नका. " सजग रहा. 


पैसा वापरण्यापूर्वी काही बाबी लक्षात घ्या :- 

◆ खर्च कमी ठेवा. 

कमीत कमी खर्च करण्याची सवय लावून घ्या. काटकसर आणि चिंगुसपणा यात फार थोडा फरक आहे तो समजून घ्या.

◆ तुमच्या मालमत्ता मजबूत ठेवा.

योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. पैसा वाढवण्यासाठी प्रयत्न करा. मालमत्ता मजबूत कशा होतील याकडे लक्ष द्या.

◆ आर्थिक मजबुती नंतर मोठं घर घ्या.

आधी आपल्या आर्थिक मजबुती कडे लक्ष द्या आणि मगच मोठं घर घेण्याचा विचार करा. विनाकारण मोठ्या कर्जाच्या विळख्यात अडकू नका.

◆ छानशी गाडी घ्या.

कार घेताना आपला जेवढा वार्षिक income असेल त्याच्या अर्ध्या किमतीची कार आपल्याकडे असावी.

◆ रॅट रेस मध्ये अडकून पडू नका.

शाळा - कॉलेज - नोकरी - कर्ज - EMI - निवृत्ती अशा Rat race मध्ये अडकून पडू नका.


आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी धडपड करा. ते एकदा मिळालं की तुम्हाला हवं ते करा.

 आयुष्य एन्जॉय करा.

आवडते ते काम करा.

मनसोक्त फिरा...

आयुष्य आनंदात जगा...


तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Shaarad Sir

उर्मिला

  उर्मिला... रामायण माहीत असत, पण उर्मिला नक्की कोण हेच काही जणांना माहीत नसतं... जेव्हा कळतं तेव्हा काय तर लक्ष्मणाची पत्नी एवढंच... एखादी ...