चेरीच झाड आणि इतर ७ कथा
- रस्किन बॉंड
रस्किन बॉंड यांच्या लेखणीतून उतरलेल्या भावस्पर्शी आणि रोमांचकारी कथांचा संग्रह म्हणजे हे पुस्तक आहे.
या पुस्तकाचा मराठी अनुवाद नीलिमा भावे यांनी अगदी उत्तम केला आहे.
रस्किन बॉंड हे नाव वाचून तुम्हांला हा लेखक इंग्लिश वाटत असला तरी हा अस्सल भारतीय आहे. त्यांची सगळी जडणघडण ही भारतात झाली आहे. हिमालयाच्या कुशीत सिमला, डेहराडून या भागातच त्यांच्या जीवनाचा बराचसा काळ गेला.
या पुस्तकातील ८ कथा आपल्याला खिळवून ठेवतात.
वणव्यातील वाट ही कथा आपल्याला शिकवते की कधीही जिद्द सोडू नये. जे काम करत असाल ते करत राहील पाहिजे. तुम्हांला एखाद्या संकटातून बाहेर पडायचं असेल तर प्रयत्न करत रहा. चालत राहा. घाबरून जाऊ नका. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून त्याच्या दिशेने वाटचाल करा.
देहराच्या घरी या कथेत मुलाचं आणि वडिलांचं प्रेम उत्कटपणे उभं करण्यात लेखक कमालीचा यशस्वी झालाय. मनाचे अंतरंगी भाव उत्कट पणे प्रगट झालेले दिसून येतात.
बिबट्या आणि चंद्र ही कथा डोंगर दर्यात राहणारे लोक त्यांना मूलभूत गरजा वेळच्या वेळी पूर्ण करण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो.
शाळा शिकण्यासाठीची पायपीट, दवाखान्यासाठी ७ ते ८ मैल करावी लागणारी घौडदौड, बिबट्याशी सामना करताना येणाऱ्या अडचणी यांची अतिशय आर्तपणे मांडणी केलेली आहे.
एखादं झाडच बी लावणं आणि त्याला वाढवत त्या सगळ्या प्रवासच साक्षीदार होणं यातील आनंद नक्की काय असतो हे अनुभवने. त्याच्या बरोबरच असलेल भावनिक नात याच वर्णन केल आहे.
इच्छा या कथेत माणसाचं आयुष्य कधीच त्याला वाटत तस पुढं जात नसतं. त्याच्या इच्छा पूर्ण होत नाही. त्याला कशा पद्धतीने काही गोष्टींवर समाधान मानावे लागते हे सांगण्यात लेखक यशस्वी होतो.
लहानपणीचे सखेसोबती यामध्ये प्राणी , पक्षी याच नक्की काय नात असत ते पुन्हा एकदा जाणवत राहते. लहान मुलांच भावविश्व किती मोठं असत. त्यामध्ये कोणाकोणाला स्थान असत हे दर्शविण्यात आलेले आहे.
अंत्ययात्रा यामध्ये माणूस कसा विचार करतो, प्रसंगानुरूप त्याची विचारशक्ती कशी बदलत जाते, माणसाला एकाकीपणाची अटळतेची जाणीव होते.
या कथा वाचताना आपण त्यामध्ये रंगून जातो. आपलं मनोरंजन होते तसेच त्या कथामधील पात्रांच्या जागी स्वतःला ठेवून पाहतो त्यांच्याशी आपले साधर्म्य साधण्यास लेखक प्रवृत्त करतो.
अशा या ८ कथां आपण अनुभवाव्यात यासाठी आपणाला शुभेच्छा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा