मुख्यमंत्री 'माझी लाडकी बहीण’ योजना
- मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी सोमवार 1 जुलै 2024 पासून अर्ज करता येणार आहेत.
- प्राप्त अर्जांची पडताळणी अंगणवाडी पर्यवेक्षक, प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका करतील. ग्रामसेवक देखील अर्जांची पडताळणी करू शकतात.
- त्यांनंतर अर्ज आमच्याकडे आल्यावर यादी अंतिम करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली जाईल.
- जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती लाभार्थींची अंतिम यादी जाहीर करेल आणि त्यांना लाभ मिळेल.
¶ अर्ज भरण्याची सुविधा :-
- अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, ग्रामपंचायत व महापालिकेचे वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्र व महा- इ- सेवा केंद्रे येथे पात्र महिलांना योजनेचा अर्ज भरता येणार आहे.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अॅपद्वारे/सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाइन भरले जाऊ शकतात.
- पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. ज्या महिलेस ऑनलाइन अर्ज सादर करता येत नसेल, त्याच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, ग्रामपंचायत/ वॉर्ड/ सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील. भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात / बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, सेतू सुविधा केंद्रांमध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाइन प्रविष्ट केला जाईल.
- अर्ज भरण्याची प्रक्रिया विनामूल्य राहील, असे आदेशात शासन निर्णयात नमूद आहे.
¶ योजनेचे स्वरुप :-
- प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) सक्षम बँक खात्यात दरमहा रु.1,500 इतकी रक्कम दिली जाईल.
- तसेच केंद्र/राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेव्दारे रु. 1,500 पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेव्दारे पात्र महिलेस देण्यात येईल.
¶ योजनेचे लाभार्थी :-
- महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.
¶ लाभार्थ्यांची पात्रता :-
● लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.
● राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.
● किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत.
● सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
● लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु. 2,50,000 पेक्षा जास्त नसावे.
¶ अपात्रता :-
● ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. 2,50,000 रुपयांपेक्षा अधिक आहे.
● ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
● ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत.
● सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेव्दारे रु. 1,500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल.
● ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे.
● ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
● ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे.
●ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत. सदर योजनेच्या "पात्रता" व "अपात्रता" निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेवून शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल.
¶ अर्ज भरण्याची प्रक्रिया :-
- अर्ज करण्याची सुरुवात : 1 जुलै
- अर्ज करण्याची शेवट तारीख : 15 जुलै
- प्रारूप निवड यादी प्रकाशित : 16 ते 20 जुलै
- प्रारूप यादीवर हरकत, तक्रार करणे: 21 ते 30 जुलै
- लाभार्थी अंतिम निवड यादी प्रकाशित: 1 ऑगस्ट
- लाभ देण्यास सुरुवात : 14 ऑगस्टपासून
¶ आवश्यक कागदपत्रे :- Mazil Ladki Bahin Yojana Required Documents (List of Documents)
● आधार कार्ड आवश्यक
● राज्याचे अधिवास प्रमाणपत्र अथवा राज्यातील जन्म दाखला
● बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
● पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्ड
● योजनेच्या अटी-शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
● अर्ज दाखल करताना अर्जदार महिला प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक
● मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये खालील बदल करण्यात आले आहेत
¶ 5 एकर जमिनीसाठी असणारी अट काढून टाकण्यात आली आहे.
¶ वयोमर्यादा 60 वरून 65 करण्यात आली आहे.
¶ अर्ज भरण्यासाठी ची मुदत 31 ऑगस्ट करण्यात आली आहे.
लागणारी कागदपत्रे,
¶ 15 वर्षे पूर्वीचे मतदान ओळखपत्र,पिवळे व केशरी रेशनकार्ड धारकांना उत्पन्नाचा दाखल्याची आवश्यकता नाही.
¶ जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड , आधार कार्ड,बँक खाते पासबुक पहिल्या पणाची झेरॉक्स,फोटो, हमीपत्र.
आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका यांच्या कडे सुद्धा ' नारीशक्ती दुत ' ॲप देण्याची प्रक्रिया सुरू आहे , लवकरच त्यांच्याकडे सुद्धा नोंदणी करता येणार आहे
● " तलाठी कार्यालयातून मिळवावे लागणारे दोन्ही दाखले आता लागणार नसल्याने आपल्या घराशेजारील सेंटर मध्ये जावून नोंदणी करता येणार आहे."

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा