नातं आणि ते दोघे
नातं दोन व्यक्तींमध्ये निर्माण होत आणि ते फुलत जात.
दोघानींही ते मनापासून स्वीकारलेले असत.
पण त्या नात्याचं ओझं होऊ नये किंव्हा आपण ते होऊ देऊ नये....
दोघांनाही स्वतंत्रपणे आपलं आयुष्य मनमुराद जगलं पाहिजे किंव्हा त्या नात्यात ते जगता आलं पाहिजे....
आपली आवड जपताना त्याला काय वाटेल किंव्हा तिला काय वाटेल हा विचार जर मनात येत असेल
तर नात अजूनही निरपेक्ष झालं नाही....
आपल्या आयुष्यावर किंव्हा आपल्या निर्णयावर त्याचा किव्हा तिचा कोणताही कंट्रोल असता कामा नये.....( सल्ला, मार्गदर्शन ठीक आहे..)
नात्यात तुम्ही गुदमरून जायला नको....
नातं तुमच्यावर कोणतंही बंधन घालणार नसावं तर ते तुम्हांला मुक्त करणार असावं.....
आनंद वाटणार असावं....
त्यात अवघडलेपण नसावं....
आपण स्वतंत्र विचार मांडावेत का नाही असा प्रश्नही त्यात पडू नये....
एकमेकांच्या स्वतंत्र विचारांचा आदर असावा तोही मनापासून....(' तुम्ही म्हणाल तसं ' हे ही नको..)
एखादी गोष्ट आवडली नाही तर बिनधास्तपणे ती सांगता यायला हवी....
दोघांचाही एकमेकांवर विश्वास असावा... विश्वासावरच तर नातं उभं असतं....
कोणतीच व्यक्ती परिपूर्ण असतं नाही पण नातं परिपूर्णता निर्माण करणार असावं.....(दोघांचीही)
आपण नात्यात म्हणतो की मी त्याला त्याच्या
गुण-दोषांसह स्वीकारलं आहे....
पण मला वाटत हे योग्य नाही तर -
नात्यात दोघांनीही एकमेकांना त्यांच्या गुणांसह आणि एकमेकांचे दोष दूर करत करत स्वीकारायचं असतं....
नात्यात कसलाही स्वार्थ नसावा, संशय नसावा...
त्यात असावा फक्त एक आश्वासक आधार तोही न बोलता जाणवणारा....
नात नवनवीन गोष्टी शिकवणार असावं...
नवनवीन गोष्टी शिकण्यास प्रोत्साहन देणार असावं,
एकूणच काय तर
नात तुम्हांला समृद्ध कारणार हवं...
आपल्यावर कोणतरी निरपेक्ष प्रेम करतंय, आपल्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतंय ही फीलिंग किती भारी आहे ना.....
जेव्हा नात्यात हे घडत ना तेव्हा ते नात जपायला हवं, ते नातं अनुभवायला हवं.... फुलवायला हवं.....
मग ते नातं कोणतंही असो........
तेच नातं शाश्वत असतं.......
- " शेवटी सांगायचं तर, काही नात्यांना ना राखीचा धागा लागतो, ना प्रेमाच्या वचनांची गरज असते. ते स्वतःचं अस्तित्व घेऊन जगते....
ते कधीच नावांच्या चौकटीत बंदिस्त होत नाही....
ते स्वतःचं स्वतंत्र विश्व घेऊन जगते..
आणि महत्वाच म्हणजे....
जिथं हृदय स्वच्छ आहे ना...
तिथंच ते शाश्वत राहतं... "


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा