रविवार, ९ एप्रिल, २०२३

मुलींना सरकार देणार 75000 रुपये लेक लाडकी योजना

 लेक लाडकी योजना

महाराष्ट्र राज्य सरकार मुलींच्या सक्षमीकरणासाठी विविध मार्गांचा अवलंब करत असते. महिला आणि मुलींना अधिकाधिक सक्षम कसं करता येईल यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असतं. त्याचाच एक भाग म्हणून 2023 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस यांनी लेक लाडकी ही योजना सादर केली..

महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प 2023


नक्की कशी आहे ही योजना ते आपण पाहू या..

या योजनेत मुलीचा जन्म झाला की ती 18 वर्षाची होईपर्यंत तिला 75,000 रुपये मिळतील..

त्याची विभागणी कशी केली ते आपण पाहू या ..


मुलीचा जन्म झाला की तिला 5000 रुपये दिले जातील.

ती पहिली मध्ये गेली की तिला 4000 रुपये मिळतील..

मुलगी 6 वीत गेली की तिला 6000 रुपये मिळतील...

ती अकरावीत गेली की तिला 8000 रुपये मिळतील...

जेव्हा ती 18 वर्षाची होईल तेंव्हा तिला 75000 हजार मिळतील...


● अटी :- 

1. पिवळे आणि केशरी रेशनकार्ड धारक कुटुंबातील मुलींसाठी ही योजना असेल..

2. मुलीच्या पुढील शिक्षणासाठी मिळणारे पैसे थेट मुलीच्या बँक खात्यात जमा केले जातील.

3. मुलीचा जन्म सरकारी रुग्णालयातच झाला असला पाहिजे. 

4. ते कुटुंब महाराष्ट्र राज्यातील मूळ कुटुंब असले पाहिजे. 

5. मुलीच्या पालकांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.


मुलीचा जन्म झाल्यापासून तिच्या शिक्षणापर्यंतची आर्थिक मदत राज्यशासनाकडून केली जाणार आहे. 


¶ समाजात असणारी मुलींबद्दलची असमानता दूर केली जाऊ शकते.

¶ यामुळे राज्यातील मुलींच्या संबंधित सकारात्मक विचार करण्यास समाज सुरुवात करेल

¶ ही योजना गरीब कुटुंबात जन्म झालेल्या मुलींना आर्थिक मदत देऊन त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करेल.

¶ गरीब कुटुंबात मुलींचा जन्म हे ओझे मानले जाणार नाही.


● थोडक्यात... 


*लेक लाडकी योजना*

 *महाराष्ट्र राज्य*

( पिवळे आणि केशरी रेशनकार्ड धारक कुटुंबातील मुलींसाठी )

मुलीचा जन्म : 5000 रुपये

मुलगी 4 थी :- 4000 रुपये

मुलगी 6 ली : 6000 रुपये

मुलगी 11 वी :- 8000 रुपये 

मुलगी 18 वर्षाची :- 75000 रुपये 


( मुलींच्या सक्षमीकरणासाठी )


सोमवार, २० फेब्रुवारी, २०२३

स्वातंत्र्य आणि आधुनिकतेच्या नावाखाली अनैतिकतेचा वेगाने प्रसार...

 स्वातंत्र्य आणि आधुनिकतेच्या नावाखाली अनैतिकतेचा वेगाने प्रसार...


सहजीवन , विवाह संस्था यांबाबत कसलीही आस्था राहिली नाही. तरुण पिढी जीवनभर समर्पण, त्याग , जबाबदारी आणि आदर या पासून खूप दूर गेली आहे. 


स्वातंत्र्य , स्वतःचाच विचार आधुनिकता यांच्या  नावाखाली लैंगिक हुकूमशाही हैदोस घालत आहे. आणि नाते, नैतिक मूल्ये , लग्न , कुटूंबसंस्था या पार  कोलमडून पडलेल्या आहेत.


आजच्या जगात विवाह बाह्य संबध म्हणजे फॅशन झाली आहे..

प्रत्येकाला यशस्वी व्हायचंय , पैसा मिळवायचाय , प्रसिद्ध हवीय हे सर्व चांगलच आहे पण त्यासाठी कोणताही मार्ग पत्करला जातोय. मार्ग महत्त्वाचा वाटत नाही फक्त ध्येय महत्त्वाचे वाटते मग त्यासाठी नैतिकतेचा बळी दिला जातोय..


महिला आणि पुरुष दोघेही कमावतात मग दोघांनाही स्पेस हवाय एकमेकांपासून आणि याच्या नावाखाली काय तर बाहेर आपल्या मित्र/मैत्रीण सोबत फिरणे. बॉस सोबत टूर ला जाणे याच पर्यावसान कशात होत तर अनैतिक संबंधात ....


लग्नानंतर रोमान्स कमी होत जातो. का तर 

तुम्ही तुमचं नात समजून घेत नाही, ते तुम्ही फुलवत नाही, त्याला वेळ देत नाही. 

तुमची नात्यामधील जबाबदारी समजून घेत नाही. तुमचं कर्तव्य काय आहे, याच भान ठेवत नाही. जोडीदाराचा विश्वासाला किंमत देत नाही. 


मी , माझं स्वातंत्र्य, माझी गरज , माझं सुख , माझं प्रेम, फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार यामुळे तर हे अनैतिक संबंधांना खतपाणी घातलं जात..


एक्सट्रा मॅरेटीयल अफेर ही कॉमन गोष्ट आहे. सध्या सगळीकडे तेच चाललंय. आपण केलं तर काय चूक केलं.. पण अशा गोंडस सबबी सांगून चुकीचं ते बरोबर होत नाही..


लक्षात घ्या 

नात टिकवायला शिका. त्यासाठी प्रयत्न करा. संयम, त्याग , आपल्या बरोबर दुसर्याचाही विचार करायला शिका.. 

वर्षानुवर्षे आपलीं संस्कृती उभी आहे ती या मूल्यांवर.. 

सोमवार, २३ जानेवारी, २०२३

Human things: Sudha Murthy/गोष्टी माणसांच्या : सुधा मूर्ती

गोष्टी माणसांच्या 

सुधा मूर्ती 

अनुवाद :- लीला सोहोनी


लाल भाताची कणगी ह्या कथेत लेखिका दान देताना जे अपल्या कडे सर्वोत्तम आहे तेच द्यावं. दान स्वीकारणाऱ्याना परावलंबी आणि असहाय बनवू नका. श्रीमंत लोकांपेक्षा मध्यम वर्गीय आणि कनिष्ठ लोकच सढळ हाताने मदत करत असतात हे लक्षात घ्या.


मोठी माणसं किती साधी असतात त्यांचा कामाचा झपाटा कसा विलक्षण असतो ही बाब श्री अब्दुल कलाम या गोष्टीतून अनुभवायस येत.


" साधं राहणं ही काय साधी गोष्ट नाही याची प्रचिती येते."


खरा दागिना या कथेत शिक्षण किती महत्वाचे असते आणि त्याची खरी  किंमत अडाणी माणसांनाच असते. खरा दागिना म्हणजे काय नक्की तो कसा असतो. हे कळत आणि पुरुष सुशिक्षित झाला तर फक्त तोच सुशिक्षित होतो परंतु स्त्री सुशिक्षित झालीं तर ती संपूर्ण कुटुंब सुशिक्षित करते.


जे आर डी या गोष्टीत टेल्को कंपनी त्यामधली मुलाखत आणि जे आर डी यांना पाठवलेले तक्रार पत्र यांची माहिती अत्यंत मनोरंजन पद्धतीने मांडली आहे. जे आर डी स्वतः जेव्हा नारायण मूर्ती येईपर्यंत  सुधा मूर्ती सॊबत वाट पाहत उभे राहतात. तेव्हा त्यांच्यातील साधेपणा ठळकपणे जाणवतो.

सुधा मूर्तींना नवीन कंपनी सुरू करताना जे आर डी नी दिलेला संदेश अमूल्य आहे.


परीक्षा आणि परीक्षेतील मार्क महत्वाचे असतं नाहीत तर तुमची नीतिमूल्ये आणि त्यांचा तुम्ही जीवनात केलेला वापर हे महत्त्वाचं असत. ए फॉर ए ग्रेड नाही तर ए फॉर ऑनेस्टी हे छानपणे सांगितलं आहे.


आपण ज्या समाजामध्ये वाढलो त्या समाजाचं आपण काही तरी देणं लागतो. माणसाने समाजाचं ऋण परत करावं. हा उदात्त विचार सुधा मूर्तींना कसा आणि कोणामुळे सुचला हे " अम्मा, हे तुझं कर्तव्य नाही का ? या गोष्टी मधून त्यांनी उत्तम पणे मांडलय.


इतरांच्या कल्याणासाठी आपण कितीही वेदना सहन करण्याची ताकद ठेवली पाहिजे. स्वतःच्या आधी इतरांचा विचार हा गाभा ह्या गोष्टीतून व्यक्त होतो ... ' अॅनेस्थेशियाची कथा '


अनुभव हा माणसाचा सर्वात मोठा शिक्षक असतो.

अनुभवाने मिळणारे ज्ञान हे कोणत्याही शाळा कॉलेजात मिळत नाही. ते संपादन करण्यासाठी किती तरी वर्ष जावी लागतात. त्यामुळे वडीलधाऱ्या मंडळींचा सल्ला आपण घ्यायला हवा. तो जीवनात गरजेचा असतो ते ' वाटणी ' या कथेतून उत्तमपणे सांगितलं आहे.


सुधा मूर्ती यांची लेखन शैली अत्यंत सरळ, हलकी फुलकी, मनोरंजक आहे. नैतिक मूल्यांचे संदेश छोट्या छोट्या गोष्टींमधुन दिले आहेत.


वाचकाला या कथा वाचताना गुंतवून टाकतात. नारायण मूर्तींची भेट ,त्यांचं स्वप्न तसेच त्यांची बदललेली भूमिका यांबाबतची ही गोष्ट आहे.


वाचन माणसाला समृद्ध करत जात हे आपल्या आजोबांच म्हणणं आणि त्यासाठी खेड्यामध्ये वाचनालय उघडणे. 


आपली स्वप्ने पूर्ण करण्याची उर्मी , नैतिकता किती महत्वाची असते. समाधान आणि तृप्ती असणं हे गरजेचं असत. या सगळ्या बद्दल ह्या माणसांच्या गोष्टी खूप काही सांगतात...


एकदा वाचावयास हवं असं पुस्तक ....

रविवार, १५ जानेवारी, २०२३

चेरीच झाड आणि इतर ७ कथा - Ruskin Bond

 

 चेरीच झाड आणि इतर ७ कथा

                              -  रस्किन बॉंड

रस्किन बॉंड यांच्या लेखणीतून उतरलेल्या भावस्पर्शी आणि रोमांचकारी कथांचा संग्रह म्हणजे हे पुस्तक आहे. 

 या पुस्तकाचा मराठी अनुवाद नीलिमा भावे यांनी अगदी उत्तम केला आहे.


रस्किन बॉंड हे नाव वाचून तुम्हांला हा लेखक इंग्लिश वाटत असला तरी हा अस्सल भारतीय आहे. त्यांची सगळी जडणघडण ही भारतात झाली आहे. हिमालयाच्या कुशीत सिमला, डेहराडून या भागातच त्यांच्या जीवनाचा बराचसा काळ गेला.


या पुस्तकातील ८ कथा आपल्याला खिळवून ठेवतात.

वणव्यातील वाट ही कथा आपल्याला शिकवते की  कधीही जिद्द सोडू नये. जे काम करत असाल ते करत राहील पाहिजे. तुम्हांला एखाद्या संकटातून बाहेर पडायचं असेल तर प्रयत्न करत रहा. चालत राहा. घाबरून जाऊ नका. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून त्याच्या दिशेने वाटचाल करा.


देहराच्या घरी या कथेत मुलाचं आणि वडिलांचं प्रेम उत्कटपणे उभं करण्यात लेखक कमालीचा यशस्वी झालाय. मनाचे अंतरंगी भाव उत्कट पणे प्रगट झालेले दिसून येतात.


बिबट्या आणि चंद्र ही कथा डोंगर दर्यात राहणारे लोक त्यांना मूलभूत गरजा वेळच्या वेळी पूर्ण करण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो.

शाळा शिकण्यासाठीची पायपीट, दवाखान्यासाठी ७ ते ८ मैल करावी लागणारी घौडदौड, बिबट्याशी सामना करताना येणाऱ्या अडचणी यांची अतिशय आर्तपणे मांडणी केलेली आहे.


एखादं झाडच बी लावणं आणि त्याला वाढवत त्या सगळ्या प्रवासच साक्षीदार होणं यातील आनंद नक्की काय असतो हे अनुभवने. त्याच्या बरोबरच असलेल भावनिक नात याच वर्णन केल आहे.


इच्छा या कथेत माणसाचं आयुष्य कधीच त्याला वाटत तस पुढं जात नसतं. त्याच्या इच्छा पूर्ण होत नाही. त्याला कशा पद्धतीने काही गोष्टींवर समाधान मानावे लागते हे सांगण्यात लेखक यशस्वी होतो.


लहानपणीचे सखेसोबती यामध्ये प्राणी , पक्षी याच नक्की काय नात असत ते पुन्हा एकदा जाणवत राहते. लहान मुलांच भावविश्व किती मोठं असत. त्यामध्ये कोणाकोणाला स्थान असत हे दर्शविण्यात आलेले आहे.


अंत्ययात्रा यामध्ये माणूस कसा विचार करतो, प्रसंगानुरूप त्याची विचारशक्ती कशी बदलत जाते, माणसाला एकाकीपणाची अटळतेची जाणीव होते.


या कथा वाचताना आपण त्यामध्ये रंगून जातो. आपलं मनोरंजन होते तसेच त्या कथामधील पात्रांच्या जागी स्वतःला ठेवून पाहतो त्यांच्याशी आपले साधर्म्य साधण्यास लेखक प्रवृत्त करतो.


अशा या ८ कथां आपण अनुभवाव्यात यासाठी  आपणाला शुभेच्छा...


गुरुवार, ५ जानेवारी, २०२३

Hon'ble Prime Minister Modi and Simplicity/मा.पंतप्रधान मोदी आणि साधेपणा...

 30 डिसेंबर ला सकाळीच टी व्ही सुरू केला आणि कळलं की भारताचे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचे निधन झाले. बातमी पाहून दुःख झालं. कारण मोदी आणि त्यांचं मातृप्रेम हे देशाला परिचित आहे...


पंतप्रधान झालेला हा मुलगा जेव्हा आपल्या आईला  भेटायचा ना,  तेव्हा ना कधी बडेजाव पणा, ना काही विशेष सरकारी ताम-झाम....


या भेटीतून जाणवायचं ते फक्त मुलाचं आणि आईचं प्रेम....


आज जेव्हा ही बातमी आली तेव्हा वाटलं होतं की आता पंतप्रधान येतील सगळी सरकारी यंत्रणा कामाला लागेल.....


त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल...

देशातील सगळे VIP येतील दर्शनासाठी... 

सगळे टी व्ही चॅनेल्स हजर असतील...

हजारो लोक दर्शनासाठी रांगा लावतील ....

घोषणा दिल्या जातील ....

त्यांच्या स्मारकासाठी जागा कुठं असेल...

याच बरोबर ट्रॅफिक जाम कुठं कुठं होईल याच्या पण बातम्या येतील....


पण असं काहीच झाल नाही...


पहाटे साडे तीन वाजता हिराबा गेल्या. मोदींनी सकाळी सहा वाजेपर्यंत आपली सगळी सरकारी कामे मार्गी लावली आणि देशाला सांगितलं की आई गेली...


पंतप्रधान अगदी साध्या पध्दतीने घरी गेले कोणताच  सरकारी इंतजाम नाही....

लोकांची गर्दी नाही....


देशाच्या पंतप्रधांच्या आईचा सरकारी हॉस्पिटलमध्ये इलाज झाला आणि अंतिम यात्रा पण नगरपालिकेच्या रुग्णवाहिकेमधून झाली.....


देशाचे पंतप्रधान आपल्या आईला घेऊन सरकारी रुग्णवाहिकेमधून निघाले...

ना VIP रूट, ना सरकारी बंदोबस्त ....

एका मध्यमवर्गीय कुटुंबा प्रमाणे सगळं काही घडताना अख्या देशान पाहिलं...


सगळं बाजूला ठेऊन नरेंद्र मोदीनी अनवाणी चालत आपल्या आईला खांदा दिला.....



किती साध्या पध्दतीने आपल्या आईला पंतप्रधानांनी निरोप दिला. 


हे पाहून खरंच त्यांच्या बद्दलचा आदर अधिक वाढला....


सगळी कामे पोस्टपौंड केली असती तरी कोणी आक्षेप घेतला नसता. पण 

आईचा अंतिमसंस्कार उरकून पंतप्रधान 11 वाजता होणाऱ्या मेट्रोच्या व्हिडीओ कॉन्फरन्सला उपस्थित राहिले....


पंतप्रधान मोदींनी ठरवलं असत तर शासकीय इतमात अंत्यसंस्कार झाले असते.....


पण त्यांनी एकदम साध्या , मध्यमवर्गीय कुटुंबातील सदस्या प्रमाणे सगळ्या प्रथा पार पाडल्या....


देश अशा पंतप्रधानांना कायम लक्षात ठेवील...


शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०२२

Kantara : What a Film

 कांतारा ....


एक राजा ज्याच्या कडे सगळं काही आहे पण आत्मिक सुख नाही... 

मनशांती नाही....


ती मिळवण्यासाठी त्याने केलेले प्रयत्न....


शेवटी एका जंगलातील आदिवासी लोकांच्या देवापाशी त्याला सुखाची अनुभूती होते. आणि तो त्या देवाला घरी घेऊन जायचं म्हणतो पण हा देव तर या जंगलातील लोकांचा असतो...


मग तो दैव च एका आदिवासी माणसाच्या अंगात येऊन सांगतो की जंगलाची जमीन आदिवासी लोकांना (त्यांच्या देवाला ) दान केल्यावर त्याला त्या दैवाला घरी घेऊन जाता येईल.... 

राजाला 

मिळालेली शांती ...

आत्मिक समाधान .... तसच राहील..



पण अट अशी की ती जमीन पुन्हा माघारी घ्यायची नाही ....


पुढील पिढीने ती जमीन घेण्यासाठी केलेला प्रयत्न... सरकार...स्थानिक लोक .... यांमधील संघर्ष म्हणजे कांतारा....



आपली संस्कृती आणि नक्की काय आहे तिचा किती उदात्त विचार आहे हे कांतारा मध्ये दाखवलंय....


आपल्या प्रथा परंपराची केलेली जपवणूक म्हणजे कांतारा....


आपल्या प्रथा परंपरा यामागे नक्की काय विचार आहे हे समजून घ्यायच असेल तर कांतारा अनुभवला पाहिजे...


फक्त जंगल वाचवायच नाही तर त्या जंगलाचाच एक भाग असणाऱ्या लोकांना ही वाचवलं पाहिजे....


सरकार आणि जंगलात राहणाऱ्या जमाती यांचा संघर्ष नक्की का होतो आणि तो जर टाळायचा असेल तर काय ???

 याच उत्तर म्हणजे कांतारा.....


भारतीय संस्कृती मध्ये किती तरी वेगवेगळ्या प्रथा आहेत त्यापैकी कर्नाटकाच्या जंगलातील एका परंपरेवर आधारित चित्रपट आहे....


चित्रपट पाहताना दैव अंगात आलेला माणूस जेव्हा ओरडतो तेव्हा भीती अनामिक भीती वाटते पण त्याही पेक्षा या संस्कृती बद्दल आदर वाटतो....

तिच्या बाबत आणखी माहिती घेण्याची इच्छा प्रबळ होते....



आपण मॉर्डन आहोत ....

प्रत्येक गोष्टीत लॉजिक शोधयचं असत किंव्हा त्याचा अट्टाहास ....

दैव अंगात येणं...

देवाला दंडवत आणि लोटांगण घालण्याची प्रथा....

आपल्या परंपरा चुकीच्याच आहेत अस आपल्या मनावर बिंबवण्याचा केलेले प्रयत्न....


पण कांतारा पाहून बाहेर पडताना या सगळ्या गोष्टीविषयी आदर वाटतो.... 

त्यामागचा खरा विचार समजतो....

आपल्या प्रथा, परंपरा ,संस्कृती आपण का जपली पाहिजे याचं उत्तर मिळतं....


वृषभ शेट्टी हा नक्की काय हिरो आहे हे पाहायचं असेल तर कांतारा पहावा.....


चित्रपटातील एक एक प्रसंग तुमची नजर खिळवून ठेवतो....


शेवटची 15 मिनिटे तर वृषभ शेट्टी ने काय  अभिनय केलाय..... नादच....


कांतारा सिनेमा गृहात अनुभवावी अशी कलाकृती...


रविवार, ९ ऑक्टोबर, २०२२

Universal Postal day/जागतिक टपाल दिन

 जागतिक टपाल दिन 


सगळ्या जगात 9 ऑक्टोबर हा जागतिक टपाल दिन म्हणून साजरा केला जातो.


आजकालच्या युगात सगळं कसं फास्ट झालं आहे. इंटरनेट च्या युगात लगेच आपण एकमेकांना संदेश पाठवू शकतो..


पंरतु टपाल सेवा ही खुप जुनी आहे. 20 ते 25 वर्षां पूर्वी टपाल सेवा एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत होती. सामान्य माणसाला एक आधार म्हणून पोस्ट काम करत होते.


आता पोस्ट सुद्धा डिजिटल झाले आहे. या आधुनिक जगात टिकण्यासाठी पोस्ट सेवेने सुद्धा त्याच्यात बदल केला आहे. इंटरनेट चा अधिकाधिक वापर करत आहे. 


युनिव्हर्सल पोस्टल युनियन चा हा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो.

पोस्टाला या काळात अधिकाधिक अपडेट ठेवण्यासाठी पोस्टामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.


' Post for Planet ' ही या टपाल दिनाची थीम आहे.


युनिव्हर्सल पोस्टल युनियन :-

या संस्थेची स्थापना 9 ऑक्टोबर 1874 झाली.

भारत या युनियन चा सदस्य 1 जुलै 1876 झाला. पहिला आशियायी देश म्हणून भारत या युनियन चा सदस्य ठरला.


पोस्टाला नवसंजीवनी देण्यासाठी भारत सरकार सध्या नवनवीन संकल्पना राबवत आहे.

Shaarad Sir

उर्मिला

  उर्मिला... रामायण माहीत असत, पण उर्मिला नक्की कोण हेच काही जणांना माहीत नसतं... जेव्हा कळतं तेव्हा काय तर लक्ष्मणाची पत्नी एवढंच... एखादी ...