शनिवार, २३ एप्रिल, २०२२

Sri Lanka economic Crisis Reason श्रीलंकेतील आर्थिक संकटाची कारणे....

 

           श्रीलंका, हा देश हिंदी महासागरातील भारताच्या दक्षिणेस वसलेला द्वीप-देश आहे. आत्ता सध्या जी परिस्थिती श्रीलंकेत उद्भवली त्याची नक्की काय कारणे आहेत. या देशात नक्की काय झालय की इतक्या टोकाची महागाई वाढली आहे. पेट्रोल , डिझेल चे भाव गगनाला का भिडलेत. याच बरोबर दूध, अंडी, ब्रेड , तेल अशा जीवनावश्यक वस्तू सर्वमान्य माणसांना का घेणं परवडत नाही. त्याच बरोबर काही लोक हा देश सोडून का निघालेत.

           गॅस आठवड्यातून एकदा भेटत आहे. वीज तर फक्त 4 तास आहे. रस्त्यावरील दिवे सुद्धा बंद करण्याचा आदेश सरकारने काढला आहे वीज वाचवण्यासाठी, कागदाचा इतका तुडवडा पडला आहे की विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहे , वर्तमानपत्र सुध्दा बंद आहेत. 

 याची काही कारणे आहेत ते आपण पाहू .... 

1. विदेशी कर्जाचा भार :-  

          श्रीलंकेन सरकारने खूप मोठ्या प्रमाणात परकीय कर्ज घेतले. ते वाढतंच गेले. ते फेडण्यासाठी त्यांनी पुन्हा कर्ज घेतले. या कर्जाचा भर एवढा झाला की जवळ जवळ सरकारचा  90% पैसा परकीय कर्जातच जाऊ लागला. यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या आयतीसाठी सरकारकडे पैसा शिल्लक राहिला नाही. परिणामी या वस्तू सरकारला महागात खरेदी कराव्या लागल्या त्यामुळे त्याची किंमत खूप वाढली. 

2. कोरोना आल्यामुळे पर्यटन व्यवसाय ठप्प... 

           श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन व्यवसायाचा 12 ते 13 % वाटा आहे. पण एप्रिल 2019 पूर्ण देशात झालेले बॉम्ब हल्ले आणि यात 269 श्रीलंकन नागरिकांबरोबर 45 पर्यटकांचा पण मृत्यू झाला. यामुळे पर्यटनावर खूप परिणाम झाला.  पुढे 2020 मध्ये कोरोनामुळे हा व्यवसाय आणखी  ठप्प झाला आणि श्रीलंकेत येणार विदेशी चलनाचा तुटवडा निर्माण झाला. विदेशी चलन नसल्याने व्यापारावर परिणाम झाला. वस्तुंची आयात करण्यासाठी परकीय चलन नसल्याने त्यांची कमतरता निर्माण झाली. महागाई वाढली. पैशाचं मूल्य कमी झालं. कोरोनामुळे भरपूर श्रीलंकन नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या आणि ती दुसऱ्या देशातून स्वदेशी आली . त्यामुळे त्यांच्या मुळे येणार ( पगार ) परकीय चलन बंद झालं. 

3. रशिया युक्रेन युद्ध :-  

            श्रीलंकेत येणारे पर्यटकांची संख्या पहिली तर जवळ जवळ 70 % पर्यटक हे रशिया युक्रेन मधील असत पण आता युद्ध सुरू असल्यामुळे यामध्ये खूप मोठी घट झाली. परकीय चलन येण बंद झालं त्यामुळे चलनाचा साठा घटू लागला.  त्याचा परिणाम या छोट्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला. 

4. अचानक घेतलेला सेंद्रिय शेतीचा( Organic Farming) निर्णय :-  

           श्रीलंकेत जे सरकार निवडून आले होते त्यांनी कसलंही नियोजन न करता सगळ्या देशात सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला. आता आपल्याला वाटेल की सेंद्रिय शेतीचा निर्णय तर चांगलाच आहे. मग त्यातून कसं वाईट होणार आहे पण रासायनिक खते आणि औषधें बॅन केली त्यामुळे उत्पादन घटले. सेंद्रिय शेतीतून उत्पादन काढताना प्रथम ते कमी होत. ते वाढण्यासाठी वेळ लागतो. याचा कसलाही विचार न करता सरकारने हा निर्णय घेतला. तांदुळाच्या बाबतीत स्वयंपूर्ण असणारा श्रीलंका देशात तांदुळाची टंचाई निर्माण झाली. तो आयात करण्यासाठी 4.50 मिलियन डॉलर खर्च करावे लागले. चहाच उत्पादन घटल चहाची निर्यात करून येणार परकीय चलन सुद्धा घटल. विदेशी चलन येणं बंद झालं.  त्यामुळे उत्पादन कमी झालं त्यामुळे जीवनावश्यक वस्तूची टंचाई निर्माण झाली. परिणामी वस्तुंची किंमत वाढली.

5. VAT (Value-added tax) मध्ये कपात :-  

               सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात सांगितलं होतं की VAT मध्ये अर्धी कपात करू. हा कर 15% होता सरकारने तो 7.5 % केला. तस पाहिलं तर हा निर्णय योग्य होता. कारण कर कमी झाला तर खरेदी वाढते आणि लोक खूप खरेदी करतील पण हा निर्णय घेतला आणि अंमलबजावणी सुरू केली पण लगेच कोरोना आला त्यामुळे सरकारच्या अंदाजाप्रमाणे खरेदीत वाढ तर झालीच नाही. पण कमी खूप झाली. सरकारला मिळणारा टॅक्स पण कमी मिळाला. सरकारचे उपन्न कमी झालं. इतर बाबींवर खर्च करण्यासाठी सरकार कडे पैसा राहिला नाही.  

           मार्च महिन्यात श्रीलंकेत 1 डॉलर = 200 रुपये  तर हे प्रमाण एप्रिल महिन्यात 1 डॉलर = 300 रुपये झालं.

           पैशाचं मूल्य कमी होत गेलं. यामुळे आयात करताना खूप खर्च येतोय त्यामुळे वस्तूंची किंमत आवाक्या बाहेर गेली आहे.

           श्रीलंकन सरकार मधील 26 मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे पण पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांनी राजीनामा दिलेला नाही.

           या संकटातून सावरण्यासाठी भारत सरकारने श्रीलंकन सरकार ला मदत केली आहे तसेच जगातूनही अनेक देश मदत करतील अशी आशा आहे. या संकटातून श्रीलंका लवकरच बाहेर पडेल अशी आशा करू या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Shaarad Sir

उर्मिला

  उर्मिला... रामायण माहीत असत, पण उर्मिला नक्की कोण हेच काही जणांना माहीत नसतं... जेव्हा कळतं तेव्हा काय तर लक्ष्मणाची पत्नी एवढंच... एखादी ...