गुरुवार, २८ एप्रिल, २०२२

Sher Shivraj ' What a film ! ' शेर शिवराज ' जबरदस्त कलाकृती.......

 ' शेर शिवराज ' जबरदस्त कलाकृती.......


          चित्रपट सुरू होतो राजमाता जिजाऊ बाल शिवबाला गोष्ट सांगत असतात. ती गोष्ट म्हणजे हिरण्यकश्यपू , प्रल्हाद आणि नरसिंह यांची. याचाच संदर्भ वापरत चित्रपटातील पात्रांची ओळख होत जाते. 


           इतिहासातील खूप छोट्या छोट्या गोष्टी ची काळजी घेतली आहे. प्रत्येक प्रसंग मांडताना घेतलेली मेहनत जाणवत राहते. 


          आयुर्वेदाचा उपयोग कसा होतो किंव्हा महाराज कसे करत होते हे नव्याने समजले. खान हा पित्त प्रकृतीचा हे वैद्य त्याची नाडी न पाहता, त्याला न भेटता त्याच्या वर्णनावरून सांगतात. अशा व्यक्तीची   निर्णय क्षमता कमी करायची असेल तर त्याचं पित्त वाढवाव लागत आणि त्यासाठी त्याच्या आहारात मसालेदार पदार्थ असायला हवे त्यासाठी महाराजांनी केलेली योजना , या सगळ्या प्रसंगात   सगळ्या जगाने मान्य केलेल्या भारतीय आयुर्वेदाचा अभिमान वाटायला लागतो.  


          अंगापिंडाने मजबूत माणसाच्या नक्की शरीराच्या  कोणत्या भागावर वार केला म्हणजे तो गारद होईल. याची तपशीलवार माहिती सांगताना खानाला कस नेस्तनाबूत करायचं याचं नियोजन करणं... तसंच त्यासाठी कोणतं हत्यार वापराव याचे संदर्भ चित्रपटात येतात. वाघनख का वापरलं त्याचा शोध कसा लागला हे ही उत्तम रीतीने दाखवलं आहे. त्या हत्याराच नाव ' वाघनख ' का ठेवलं ते ही कळलं.


         खानाचे सैन्य , तोफा , घोडे , हत्ती , यांची माहिती मिळवताना त्याबरोबर एखादी मोहीम कशी राबविली जाते , त्यामध्ये कोणत्या बाबींन कडे लक्ष द्यायचं असत ते एकदम सखोल पणे लेखकाने उभं केलं आहे. 


        वैभव मांगले यांनी गोपीनाथ पंत साक्षात उभे केलेत. वागणं , बोलणं , हावभाव नादच.  बेरकी चाल , खुशामत करणे म्हणजे काय याची प्रचिती येते. गोड गोड बोलून समोरच्याला गाफील कस ठेवायचं आणि त्याबरोबरच आपल्याला हवं तसं काम त्याच्याकडून कसं करून घ्यायच हे दाखवताना वैभव मांगले त्याच कौतुक करण्यास भाग पाडतो. 


          25 ते 30 हजार सैन्य घेऊन निघालेल्या अफजल खानाला महाराज असा काही गनिमीकावा करतात  की जेव्हा महाराजांना भेटतो तेव्हा फक्त 10 सैन्य त्याच्या बरोबर असत. ते ही शामियान्या पासून काही अंतरावर..... 


          खानाच्या मोहीमेत असलेल्या सगळ्या व्यापारी मंडळींना महाराज आधीच गडावर बोलावून घेऊन हिशोब भेट झाल्यावर या अटीवर त्यांच्या कडून सगळ काही हिरे,माणिक , मोती , सोन यांची खरेदी .....


          शिवराज अष्टक मधील आतापर्यंत आलेल्या चित्रपटांमध्ये छ. शिवराय काही प्रसंगापुरते मर्यादित होते. ' पावनखिंड ' चित्रपटात बाजीप्रभूंची शौर्य गाथा दाखविली गेली पण ' शेर शिवराज ' हा चित्रपट म्हणजे छत्रपती आणि छत्रपती यांचा च आहे. महाराज आणि फक्त महाराजचं....

या आधीच्या चित्रपटात चिन्मय मांडलेकर यांना महाराज साकारताना काही मर्यादा होत्या. काही विशिष्ट प्रसंगापूरते त्याची भूमिका होती.

 

         शेर शिवराज मध्ये व्यापून राहतात ते महाराज. दिग्पाल लांजेकर यांनी त्यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’ या चित्रपटां मध्ये महाराजांच्या भूमिकेसाठी चिन्मय मांडलेकर यांना का निवडलंय याच उत्तर हा चित्रपट पाहून मिळत. चिन्मय ने महाराजांची भूमिका खरंच नाद केलीय. त्याने त्याची निवड सार्थ ठरवलीय. चिन्मय मांडलेकर अक्षरश:  महाराजांची भूमिका जगलेत. 



          दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’ मधील ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ या ऐतिहासिक चित्रपटानंतर ‘शेर शिवराज’ हा चित्रपट मनात घर करून राहतो. मरगळलेल्या समाजाच्या मनात शिवप्रभूंचा भव्य दिव्य इतिहास पुन्हा जागवण्यासाठी धन्यवाद. 


  ' श्री शिवराज अष्टक ' मधील पुढील चित्रपटासाठी  शुभेच्छा......


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Shaarad Sir

उर्मिला

  उर्मिला... रामायण माहीत असत, पण उर्मिला नक्की कोण हेच काही जणांना माहीत नसतं... जेव्हा कळतं तेव्हा काय तर लक्ष्मणाची पत्नी एवढंच... एखादी ...