सुपर मून, ब्लड मून , स्ट्रॉबेरी मून आणि ब्लू मून....
नमस्कार मित्रांनो....
दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला काही संकल्पना नक्की काय आहेत. त्या कशा संदर्भात वापरतात हे माहीत नसतं. पण त्या संकल्पना आपण वर्तमानपत्र , टी व्ही यांन मधून आपण वाचत, ऐकत असतो.
अशाच काही संकल्पना ज्या आपण वारंवार ऐकतो, वाचतो त्या नक्की काय आहेत ते पाहू या.....
सुपरमून....
आपल्याला चंद्र माहीत आहे तसेच चंद्रग्रहण कशाला म्हणतात हे ही माहीत असते. ते कशामुळे होते हे आपण शिकलो आहे.
पण आता हा सुपरमून म्हणजे नक्की काय ?
तर सुपरमून म्हणजे " चंद्र सामान्य
आकारापेक्षा खूप मोठा दिसणे. अशी साधी संकल्पना आहे."
चंद्र सामान्य आकारापेक्षा मोठा का दिसतो. तर त्याचे कारण म्हणजे तो पृथ्वीच्या सर्वात जवळ येतो. ही एक खगोलीय घटना आहे.
सुपरमून कधी दिसतो ? तर जेव्हा चंद्र पृथ्वी पासून 3,60,000 कि.मी किंव्हा त्याहून कमी अंतरावर असेल तेव्हा त्याला आपण सुपरमून म्हणतो..
या वेळी चंद्र नेहमी दिसतो त्या पेक्षा 14 % मोठा दिसतो आणि 30 % अधिक उजळ दिसतो.
काही लोकांचा असा विश्वास आहे की सुपरमून दिसणे हे वाईट असते. त्याचा परिणाम वाईट होतो. त्यामुळे भूकंप , पूर , त्सुनामी अशा घटना घडतात. पण हे कुठेच काहीही सिद्ध झालेले नाही. त्याचा परिणाम समुद्राच्या लाटांवर होतो पण तो अत्यंत कमी म्हणजे लाटेची उंची 4 सेमी ने वाढते. याचं कारण म्हणजे गुरुत्वाकर्षण .
ब्लडमून....
अजून एक संकल्पना म्हणजे ब्लडमून.
" ब्लडमून म्हणजे चंद्रग्रहणावेळी जेव्हा पृथ्वीच्या सावलीने चंद्र पूर्ण व्यापलेला असतो तेंव्हा कधी कधी तो काळा होण्याऐवजी लाल होतो. तेंव्हा त्याला ब्लडमून म्हणतात. "
तसेच त्याला ' रेड ब्लडमून ' असेही म्हणतात.
स्ट्रॉबेरीमून ....
" जेंव्हा पौर्णिमेच्या दिवशी चंद्र सामान्य आकारापेक्षा खूप मोठा दिसतो आणि त्याचा रंग स्ट्रॉबेरी सारखा गुलाबी होतो त्या वेळेस त्याला स्ट्रॉबेरीमून म्हणतात."
तसेच जून महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला काही भागात Red Moon , Hot Moon किंव्हा Honey Moon सुद्धा म्हणतात .
ब्लूमून....
"जेंव्हा एक इंग्रजी महिन्यात दोन पौर्णिमा येतात तेंव्हा दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला ब्लुमून म्हणतात."
पण मित्रांनो ब्लुमून म्हणजे चंद्र निळ्या रंगाचा दिसत नाही. पण ही घटना दुर्मिळ असते. किंव्हा कधी तरीच घडते. अशा घटनेसाठी Once in a Blue Moon असा वाक्प्रचार वापरतात. म्हणजे
" कधीतरी साठीसमासी " म्हणतात.
चंद्राची पृथ्वी भोवती फिरण्याची कक्षा ही लंबवर्तुळाकार आहे. जेंव्हा तो पृथ्वी पासून जास्तीत जास्त अंतरावर म्हणजे 4,06,692 कि.मी असतो तेंव्हा त्या स्थितीला अपभू स्थिती म्हणतात.
तर जेंव्हा तो पृथ्वी पासून कमीत कमी अंतरावर म्हणजेच 3,56,500 कि. मी असतो तेंव्हा त्या स्थितीला उपभू स्थिती म्हणतात. आणि यामुळे Super Moon , Blood Moon , Strawberry Moon , Blue Moon या घटना घडतात. नवनवीन संकल्पना उदयाला येतात .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा