बुधवार, ५ नोव्हेंबर, २०२५

सतत स्वतःला ग्रेट समजणं...

 सतत स्वतःला ग्रेट समजणं...

आपण जे काही करतो तेच बरोबर असत. 

मला सगळ्यातलं सगळं कळत ह्या अविर्भावात जगणं हा काही लोकांचा स्वभाव असतो....


आपल्याला आयुष्यात असे काही लोक भेटतात...

माझ्यामुळेच झालं... 

मीच केलं...

कोणा दुसऱ्याच काम नाही...

मी होतो म्हणून हे झालं नाही तर काहीच झालं नसतं....

या सगळ्या गोष्टींचा मीच कर्ता करविता आहे....

असं छातीठोकपणे सांगणारे भेटतात

ह्या माणसांनच ऐकताना वैताग येतो...


प्रत्येकवेळी हेच बरोबर... 

हेच खरे.....

हेच महत्त्वाचे.....

असं असतं का?


कधी कधी वाटतं हा काही मानसिक आजार तर नाही ना ???


अशा लोकांना स्वतःचं महत्त्व जास्त वाटतं. त्यांना कायम वाटतं की तेच खास आहेत, 

वेगळे आहेत, 

आणि सगळ्यांनी त्यांचं कौतुकच केलं पाहिजे...


असं नाही घडलं तर मग ते चिडतात...

त्यांचा इगो दुखावला जातो...


काही दिवसांपूर्वी  “नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी” या मानसिक प्रवृत्ती वर एक लेख वाचला होता त्यात हेच सांगितले होत...


स्वतःला बद्दल अभिमान बाळगणं ठीक आहे पण त्याला काही लिमिट आहे की नाही....

पण ही लोक कायम मी - मी करत असतात...


मित्रांच्या ग्रुपमध्ये बोलताना, स्टाफ मध्ये, कट्ट्यावर ते इतरांचं ऐकत नाहीत, फक्त आपल्याच अनुभवांवर, यशावर बोलतात. आणि बोलत जातात...

वैताग येईपर्यंत...


लहानपणी सगळ्यांचचं कौतुक होतं पण पुढे त्याचा परिणाम हा असा होतो...

त्यांना तेच खरं वाटायला लागतं आणि मग हे सुरू होत...


स्वतःच्याच कोड कौतुकात राहणारे हे लोक मग इतरांना तुच्छ समजतात. इतरांच्या भावना समजून घेत नाहीत किंव्हा त्यांना त्या कळत नाहीत. मग यांचे नातेसंबंध टिकताना गडबड होते....

पण अशांना हे स्वतःलाच कळत नाही..

कारण त्यांना वाटतं, ते नेहमी बरोबर आहेत.


जो स्वतःचं नेहमी बरोबर समजत असतो अशा माणसाला आपण बदलू शकत नाही...

कारण अशा माणसांसाठी त्यांच्या चुकांपेक्षा त्यांचा अहंकार मोठा असतो....

त्यांना दुसर्यांना समजून घ्यायचंच नसत...

आपल्याच वागण्याचं ते कायम समर्थन करत असतात....


अशी माणसं आपल्या आयुष्यात भेटली तर आपण काय करायचं ..

सगळ्यात महत्त्वाचं चिडायच नाही...

त्यांचा कितीही राग आला तरी शांत राहायचं....

(आपण संयम शिकतो...)

आपण काहीचं नाही करायचं...

फक्त शांत राहायचं...

स्वतःसाठी आपण शांतता निवडायची...


ही एक मानसिक प्रवृत्ती आहे किव्हा आजार आहे हे समजून घ्यायचं....

त्यांना “ऐकून घेणारा” कुणी तरी हवा असतो.


आपण ती भूमिका पार पाडायची....

आणि आपल्यासाठी मनशांती निवडायची...


तुमचा कोणी मित्र, मैत्रीण, नातेवाईक, असं तुमच्या भोवती कोणी आहे का.. ???


असेल तर शांतपणे एकूण घेण्यासाठी तुम्हांला शुभेच्छा....😊


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Shaarad Sir

उर्मिला

  उर्मिला... रामायण माहीत असत, पण उर्मिला नक्की कोण हेच काही जणांना माहीत नसतं... जेव्हा कळतं तेव्हा काय तर लक्ष्मणाची पत्नी एवढंच... एखादी ...