Elon Musk and Twitter...
इलॉन मस्क आणि ट्विटर...
नमो शेतकरी महासन्मान योजना
केंद्र सरकार देशभरात पीएम किसान सन्मान निधी योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबाला दरवर्षी 6 हजार रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते. दर 4 महिन्यांच्या अंतरानं 2 हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जातो.
आता राज्य सरकार केंद्र सरकारच्या या 6 हजार रुपयांमध्ये आणखी 6 हजार रुपयांची भर घालणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना प्रती वर्ष 12 हजार रुपये मिळतील. ही योजना अशी आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जे लाभार्थी आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
केंद्र सरकार जेवढे पैसे या लाभार्थ्यांना देतं, तितकेच राज्य सरकारही देणार आहे.
– पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी काय करायला हवं?
उत्तर - पीएम किसान सन्मान निधीचा 2 हजार रुपयांचा हप्ता ज्या बँक खात्यावर जमा होतो, ते बँक खातं आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
जगातील सर्वात श्रीमंत माणूस, जगप्रसिद्ध टेस्ला कंपनीचे सीईओ Elon Musk यांनी Twitter विकत घेण्यासाठी 41. 3
9 अब्ज डॉलर ची ऑफर दिली होती. आणि आता ते त्यांनी विकत2 घेतल. पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यांना Twitter का विकत घ्यायचं होत ? असं काय आहे Twitter मध्ये जे इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मध्ये नाही ? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
Elon Musk हे Twitter चा वापर कसा करतात हे पाहिलं तर या प्रश्नाचे उत्तर मिळते. Musk हे Twitter चा वापर आपल्या प्रोडक्ट चं मार्केटिंग करण्यासाठी अत्यंत खुबीने करतात. त्याचा फायदा ते आपल्या व्यवसायासाठी करतात. Elon Musk ह्यांचे Twitter वर फॉलोव्हर्स खूप आहेत आणि त्यांनी एखादं Twit केलं की त्याच्यावर मिलियन ट्विट चा पाऊस पडतो. त्यामुळे जरी एखादं नवीन प्रोडक्ट बाजारात आणायचे असेल तर सगळ्यात स्वस्त जाहिरात करण्यासाठी twitter सारखा मंच नाही. Twittet मुळे जगातील खूप साऱ्या लोकांशी संपर्क येतो.
सोशल मीडिया ची ताकद Elon Musk यांना माहीत आहे. ते काही न काही ट्विट करून आपलं अकाउंट नेहमी चर्चेत ठेवतात.
जेव्हा जेव्हा Elon Musk ट्विट करतात तेंव्हा तेव्हा जागतिक बाजारात खळबळ माजते. उदाहरण सांगायचं झालं तर काही दिवसांपूर्वी जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने पत्रकार परिषदेदरम्यान कोका कोला या कोल्ड्रिंकच्या बाटल्या बाजूला केल्या आणि पाणी पिण्यास सांगितलं. या त्याच्या कृतीमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं होत. पण त्यामुळे
कोका कोला कंपनीचे शेअर्स 1.6 टक्क्यांनी खाली घसरले होते . कोका कोला कंपनीला 4 बिलिअन डॉलर्सचं म्हणजे जवळ जवळ 29,000 कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागलं होत. यावरून आपल्याला अंदाज लावता येईल की Elon Musk च्या ट्विटमुळे मार्केट मध्ये काय काय होत असेल. या सर्व कारणानं मुळे Elon Musk यांना ट्विट करण्याआधी SEC ची परवानगी घ्यावी लागते. ही अट दूर व्हावी यासाठी Elon Musk यांनी प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही.
Elon Musk यांनी bitcoin बाबत एक ट्विट केलं होतं की आता त्यांची कंपनी टेस्ला bitcoin चा वापर करणार आणि मग काय जो तो bitcoin खरेदी करू लागला. त्यामुळे bitcoin ची किंमत कमी वेळात खूप वाढली. पण काही दिवसांनी Elon ने ट्विट केलं की पर्यावरणाच कारणांमुळे bitcoin वापरू शकत नाही. त्यामुळे bitcoin ची किंमत घसरली.
Elon Musk हे मार्केट मध्ये योग्य वेळी गुंतवणूक करतात. ट्विट मुळे मार्केट वाढलं की त्यांच प्रॉफिट मार्केट मधून काढून घेतात. यामध्ये छोटे इन्व्हेस्टर अडकतात. Elon Musk यांसारखे मोठे इन्व्हेस्टर पैसे कमावण्यासाठी ते Twitter चा वापर करतात. Twitter ने मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना सुद्धा बॅन केलं होतं म्हटल्यावर ते कोणालाही बॅन करू शकत. Elon ला Twitter चा वापर स्वतःच्या मनाप्रमाणे करायचा आहे. त्यासाठी बॅन ची टांगती तलवार त्यांच्यावर नको आहे.
एवढे पैसे खर्च करून Twitter विकत घेण्यापेक्षा Elon स्वतःचा नवीन प्लॅटफॉर्म तयार का करत नाही हा प्रश्न पडतो पण या आधीही Elon ने नवीन काही निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो काही success झाला नाही. Twitter हा एक स्टेबल प्लॅटफॉर्म आहे. नवीन काही तयार करून तो स्टेबल करण्यासाठी खूप वेळ लागेल आणि तितका वेळ सुद्धा Elon कडे नाही त्यामुळे आहे त्याचाच वापर स्वतंत्र पणे करण्यासाठी Elon ला Twitter विकत घ्यायचं होत आणि ते आता घेतलं आहे.
फ्रीडम ऑफ स्पीच चे कारण सांगून Elon यांनी खूप वेळा Twitter वर पोल घेतले होते. तसेच ज्यांनी ज्यांनी त्यांच्या Tesla संदर्भात वेगळं मत मांडले ते इलॉन मस्क यांना रूचल नाही. आपल्या विरोधात मांडलेले मत त्यांना पटत नाही ते त्या संदर्भात action घेतात. आता तर ते स्वतःच Twitter चे मालक झाले आहेत आता ते त्यांच्या विरोधातील मत प्रवाहांना नक्की ते कस उत्तर देतात ते पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.






