गुरुवार, १३ एप्रिल, २०२३

Criteria as a National Party in India राष्ट्रीय पक्ष म्हणून निकष

 10 एप्रिल 2023 म्हणजे सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्षां संदर्भात माहीत जाहीर केली यामध्ये काही नवीन पक्षाला राष्ट्रीय दर्जा दिला गेला तर काही राजकीय पक्षांचा दर्जा काढून टाकण्यात आला.

Criteria as a National Party in India राष्ट्रीय पक्ष म्हणून 
निकष 


यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाला (AAP) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला.

तर 

● राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP)

● तृणमूल काँग्रेस (TMC) 

● कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (CPI) 


या तीनही पक्षांचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतला.


तसेच निवडणूक आयोगाने असंही जाहीर केलं की  राष्ट्रवादी काँग्रेस( नागालॅण्ड ) आणि तृणमूल काँग्रेसचा (मेघालय )या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून जो दर्जा असेल तो कायम राहील. 

कारण की आताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी चांगली कामगिरी केली आहे.

 

राजकिय पक्ष म्हणून जो दर्जा असतो त्या बद्दलही निवडणूक आयोगाने काहीराजकीय पक्षांचा राज्यपक्ष म्हणून असलेला दर्जा काढून घेतला यामध्ये.....

● राष्ट्रीय समाज पार्टी (पश्चिम बंगाल)

● पीएमके (पुद्दुचेरी)

● राष्ट्रीय लोकदल (उत्तर प्रदेश)

●भारत राष्ट्र समिती (आंध्र प्रदेश), 

● पीडीए (मणिपूर), 

● एमपीसी (मिझोराम ) 


या सहा पक्षांचा राज्यस्तरीय पक्ष म्हणून असलेला दर्जा काढून घेतला.


राजकिय पक्षांना राष्ट्रीय दर्जा मिळतो कसा आणि त्याचे काय निकष असतात ते आज आपण पाहू या...


◆ राष्ट्रीय पक्ष म्हणजे काय ?


● ज्या राजकीय पक्षाची चार राज्यांत किंव्हा त्यापेक्षा अधिक राज्यांमध्ये नोंदणी आहे.

● ज्या राजकीय पक्षांना शेवटच्या लोकसभा किंव्हा विधानसभा निवडणुकीत पक्षांच्या उमेदवारांना 6% पेक्षा अधिक वैध मते मिळालेली असावीत.

● शेवटच्या लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाचे कमीत कमी 4 खासदार निवडणूक आलेले असावेत.

● तसेच कमीत कमी तीन राज्यांत लोकसभेच्या एकूण जागांपैकी 2 % जागा जिंकल्या असाव्यात.


या सगळ्या अटी पूर्ण करणाऱ्या राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून निवडणूक आयोग दर्जा देतो.

आणि या अटींची पूर्तता जर एखादा पक्ष करत नसेल तर त्याची राजकीय पक्ष म्हणून मान्यता काढून घेतली जाते.


हे झाल राष्ट्रीय पक्ष म्हणून तर राज्यपक्ष यासाठी सुद्धा काही अटींची पुर्तता करावी लागते...


राज्यपक्ष/प्रादेशिक पक्ष :-

● झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यामध्ये कमीत कमी 6% वैध मते त्या पक्षाला मिळालेली असावीत. किंव्हा त्या राजकिय पक्षाचे कमीतकमी दोन आमदार असावेत.

● झालेल्या लोकसभा निवडणुकीत कमीत कमी 6% वैध मते त्या पक्षाला मिळालेली असावीत. किंव्हा त्या राजकिय पक्षाचे कमीतकमी एक खाजदार निवडून आलेला असावा.

● विधानसभा निवडणुकीत कमीतकमी 3% जागा त्या पक्षाने जिंकलेल्या असाव्यात किंव्हा 3 आमदार निवडून आलेले असावेत. या दोन्ही पैकी जे अधिक असेल ते आयोग ग्राह्य धरेल.

● लोकसभा निवडणुकीत 25 जागांमागे कमीतकमी 1 तरी जागा त्या पक्षाने जिंकलेली असावी.

● लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्या राजकिय पक्षांना एकूण 8 % वैध मते मिळालेली असावीत.


आता केंद्रीय निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली ती कशी त्याबाबत माहिती घेऊया...

¶ आम आदमी पक्षाने दिल्ली , गोवा , पंजाब आणि गुजरात या राज्यांमध्ये मतदानाचे निकष पूर्ण केले आहेत.

¶ गुजरात मध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने 13 % मते मिळवलेली आहेत तिथे त्यांना फक्त 6 % मते हवी होती..

¶ गुजरात हे आम आदमी पक्षाचे 6 % पेक्षा जास्त मते मिळविण्याचे चौथे राज्य आहे...

¶ गोवा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने 6 % च्या पेक्षा जास्त मते मिळाली आहेत.

¶ पंजाब आणि दिल्ली या दोन राज्यांत या पक्षाची सत्ताचं आहे..


आता आम आदमी पक्ष हा भाजपा आणि काँग्रेस प्रमाणे राष्ट्रीय पक्ष म्हणून गणला जाणार आहे.


तर आपल्या महाराष्ट्रामधील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष याची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता का काढून घेतली ते पाहू या ..

● राष्ट्रीवादी पक्षाची स्थापना झाली ती 10 जून 1999 मध्ये.

● या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळावी ती लगेच 10 जानेवारी 2000 ला.

● परंतु 2014 च्या निवडणुकीपासून जो राष्ट्रीय पक्ष म्हणून असणारे निकष हा पक्ष पूर्ण करू शकला नाही. 

● राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने वेळोवेळी नोटीस पाठवून याची माहिती दिलेली आहे. परंतु निकषात ना बसल्यामुळे त्याची मान्यता काढून टाकली गेली.

● तसेच आत्ता झालेल्या निवडणूकीत गोवा , मणिपूर, मेघालय , नागालँड आणि अरुणाचल प्रदेश 

मध्ये पक्षाचे मतदार कमी झालेले आहेत.


या कारणांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेला दर्जा निवडणूक आयोगाने काढून घेतला आहे...


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Shaarad Sir

उर्मिला

  उर्मिला... रामायण माहीत असत, पण उर्मिला नक्की कोण हेच काही जणांना माहीत नसतं... जेव्हा कळतं तेव्हा काय तर लक्ष्मणाची पत्नी एवढंच... एखादी ...