शुक्रवार, १४ एप्रिल, २०२३

MH SET Result, Cut Off Marks 2023

 MH SET Result, Cut Off Marks 2023..

MH SET 2023



 26 मार्च 2023 रोजी झालेल्या महाराष्ट्र सेट परीक्षेचा निकाल केव्हा लागेल किंव्हा त्याची Merit  list कधी लागेल.


सावित्रीबाई फुले विद्यापीठाने 26 मार्च 2023 रोजी राज्य पात्रता परीक्षा घेतली. अनेक विद्यार्थ्यांनी सेट दिली. आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती निकालाची...


MH SET निकाल सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवर कट-ऑफ गुणांसह ऑनलाइन उपलब्ध असेल. 


setexam.unipune.ac.in 

या साईट वर तुम्ही निकाल घोषित झाल्यावर पाहू शकता. तसेच कट ऑफ मार्क्स पाहू शकता.

परीक्षार्थी आपला निकाल तपासू शकतील. श्रेणीनिहाय पात्रता गुणही दिले जातील.


महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (SET) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे दरवर्षी महाराष्ट्र राज्यातील महाविद्यालय आणि विद्यापीठातील सहायक प्राध्यापक पदासाठी उमेदवारांची पात्रता तपासण्यासाठी घेतली जाते. 



दरवर्षी MH SET निकाल विद्यापीठाच्या वेबसाइटवर ऑनलाइन जाहीर केला जातो.


आता नक्की कधी निकाल लागेल तर हे समजण्यासाठी आपल्याला मागील वर्षी झालेल्या SET परीक्षेचा निकाल कधी लागला ते पाहावं लागेल..


तर 26 sept 2021 ला जी SET परीक्षा झाली तिचा निकाल 27 जानेवारी 2022 ला लागला म्हणजे हा time पाहिला तर जवळजवळ 4 महिन्यांनी निकाल लागलेला आपणास दिसून येतो..


त्याआधीही झालेल्या महाराष्ट्र सेट परीक्षा आणि त्यांचा निकाल लागण्याचा Time पाहिला तर तो कमीतकमी 100 दिवस आहे.


म्हणजे 26 मार्च 2023 ला झालेली SET परीक्षेचा निकाल july च्या पहिल्या आठवड्यात लागू शकतो.


तरीही या वेळी नक्की काय होतय ते पाहू या... निकाल लागल्यानंतर तो पाहण्यासाठी तुमच्याकडे

User ID आणि Password गरजेचा असेल.

 


जे परीक्षार्थी SET उत्तीर्ण होतील ते उमेदवार महाराष्ट्रातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदावर काम करू शकतील किंव्हा त्यासाठी पात्र होतील...


Eligibility Criteria/पात्रता निकष :- 


● महाराष्ट्र सेट परीक्षेला बसण्यासाठी तुम्ही 55% नी पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असते.

● कास्ट मधील उमेदवार असतील तर ते 50 % नी पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल.

● महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (सेट) देण्यासाठी वयोमर्यादेची कोणतीही अट नाही.

● तुम्हीची ज्या विषयात पदव्युत्तर पदवी असेल त्या विषयाची तुम्ही SET परीक्षा देऊ शकता.



MH SET Cut Off 2023 :-

महाराष्ट्र सेट परीक्षेचा कट ऑफ किती लागेल आणि कोणत्या विषयात किती असेल ते आपण मागील परीक्षांच्या कट ऑफ वरून आपल्याला समजू शकते..


MH SET कट ऑफ 2023 विषयानुसार व कॅटेगरी नुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर घोषित केला जातो.


MH SET Cut off....

Open :- 50 ते 55 

SC & ST :- 40 ते 45

Obc :- 45 ते 50



How To Check MH SET 2023 Result

महाराष्ट्र SET चा निकाल कसा तपासायचा तर....

● प्रथम सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जा.

● Result वर क्लिक करा. मग त्यानंतर तुम्ही तुमचा User ID आणि Password टाका..

● MH SET चा निकाल तुम्हांला दिसेल.

● तुमचा निकाल तपासा आणि मग तुमची मार्कशीट डाउनलोड करा आणि प्रिंट आउट काढा. 


ज्या उमेदवारांनी पात्रता प्राप्त केली असेल त्यांना  विद्यापीठाकडून MH SET ई-प्रमाणपत्र मिळेल. ज्याचा उपयोग तुम्हाला महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करताना होईल.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Shaarad Sir

उर्मिला

  उर्मिला... रामायण माहीत असत, पण उर्मिला नक्की कोण हेच काही जणांना माहीत नसतं... जेव्हा कळतं तेव्हा काय तर लक्ष्मणाची पत्नी एवढंच... एखादी ...