रविवार, १४ मे, २०२३

The Kerala Story

 The Kerala Story



केरळ मधील बेपत्ता होणाऱ्या आणि त्यांना आयसिस मध्ये कसं सामील केलं जातं याच वास्तववादी चित्रण केलं आहे.
आता हा आकडा 32000 हजार असो किंव्हा नसो तो 32 जरी असला तरी घातक आहे..
ही कथा आहे 3 मुलींची ज्या नर्सिंग शिकण्यासाठी येतात. त्यातील शालिनी उनींकृष्णन हीच कशा पद्धतीने धर्मांतरण केलं जातं आणि तिला कसं आयसिस साठी तयार केलं जातं.
तुमचं ब्रेनवॉश कसं केलं जातं , तुम्हांला तुमचा धर्म, तुमचा देव कसा योग्य नाही हे पटवून दिल जात. तुमच्या मनात तुमच्या धर्माबद्दल आदर राहणार नाही हे नकळत सांगितलं जातं.
हा चित्रपट आपल्याला अस्वस्थ करतो. तसेच विचार करायला भाग पाडतो. काही जणांना तो भावानेशी खेळ वाटतो तर काहींना तो प्रोपेगंडा वाटतो.  
पण 
दिग्दर्शक काही गोष्टी वस्तुनिष्ठपणे आपल्या समोर मांडतो. 
द काश्मीर फाईल पाहताना ज्यांनी एका वेगळया वातावरणाचा अनुभव घेतला त्यांना जाणवतो की हा चित्रपट वेगळा आहे.
नर्सिंग शिकण्यासाठी आलेल्या त्या तीन मुलींच्या बाबत काय काय घडत हे हा चित्रपट मांडतो..
आपला धर्म कसा वाईट आणि बुरखा जवळचा त्यांना वाटू लागतो. तसेच आपल्या धर्मातील प्रथा परंपरा यांन पासून या मुली दूर कशा जाऊ लागतात त्याला कोणकोणत्या गोष्टी कारणीभूत ठरतात हे दिग्दर्शकाने अतिशय प्रभावीपणे मांडल आहे.
संयुक्त राष्ट्राच्या जेल मध्ये जेव्हा ह्या फातिमा ला अतिरेकी म्हणून पकडलं जात आणि तू आता अतिरेक्यांवची सगळी माहिती आम्हाला दे असं म्हटल्यावर ती आपली गोष्ट सांगते 
ती म्हणजे    The Kerala Story ..
या चित्रपटात जे दाखवलय त्यांना पुरावे आहेत असं दिग्दर्शक म्हणतो आणि ज्या मुलींना या नरक यातनांना सामोरे जावे लागले त्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींशी झालेला संवाद शेवटी तो दाखवतो..
चित्रपटावर बंदी घालण्यात यावी असं जे लोक म्हणतायेत त्यांनी चित्रपट अगोदर पहा. सगळ्याच मुस्लिम समाजाला वाईट म्हणून दाखवलं नाहीय..
त्यातील जे कोणी धर्मांध आहेत त्यांच्या बद्दल हा चित्रपट भाष्य करतो...
एखाद्या चित्रपटात पाटील, पुजारी यांना वाईट पध्दतीने दाखवलं जात तेव्हा काय ते सगळे त्यावर बंदी आणा असा सूर 
लावतात का ? 
विचार करा ...
हा चित्रपटा मधील सगळ्यात USB वाक्य म्हणजे 
" तुम्ही आम्हांला आपली संस्कृती , धर्म कसा योग्य आहे याबद्दल अधिक का नाही सांगितलं.."
हा चित्रपट पाहिल्यानंतर जाणवत की ...
आपण आपल्या धर्माची सविस्तर माहिती आपल्या मुलांना सांगायला हवी. 
त्यांच्यात धर्म कसा रुजेल हे पाहायला हवे. 
आपली संस्कृती ही प्राचीन आहे. तसेच आपले सण , प्रथा ,परंपरा ह्या विज्ञानावरच आधारित आहेत.
निसर्गाशी त्या कशा एकरूप आहेत हे आपल्या मुलांच्या मनावर बिंबवण हे किती गरजेचं आहे...
तुमच्या मुला - मुलींचे विचार जर परिपक्व असतील तर ते अशा लोकांच्या प्रभावा खाली येणार नाहीत.
तसेच आतंगवादी संघटना आणि त्या लोकांपासून स्वतःचा बचाव करू शकतील...


गुरुवार, ११ मे, २०२३

देव प्रत्येक गोष्टीची काळजी घेईल

  

          आपण जीवन जगत असताना खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी करत बसतो. हे कसं होईल. त्याच काय होईल. आता तो कसा जगणार. आपण लक्ष दिलं नाही तर काय होईल. विनाकारण आपण चिंता करत बसतो. किती मोठं संकट आहे त्यातून आपण कसे बाहेर पडणार ? 


         देव प्रत्येकाची काळजी घेत असतो. तो प्रत्येकाला संकटाशी झुंजण्याची शक्ती देत असतो. फक्त आपण त्याच्या वर विश्वास ठेवला पाहिजे.  देव आपल्या पाठीशी आहे तो आपली काळजी नक्की घेईल हा विश्वास मनात ठेवून परिस्थितीचा सामना केला पाहिजे. 

         संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्वात महत्त्वाच म्हणजे आपला आत्मविश्वास. देव आपल्या पाठीशी आहे तो आपलं चांगलंच करेल. हा विश्वास मनात ठेवला तर सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात. 

         लक्षात असू द्या जर तुमच्या आयुष्यात संकट आली तर देव तुम्हांला त्यातून बाहेर पडण्यासाठी जी शक्ती लागते ती आधीच देत असतो. पर्वताच्या उंच टोकावरून जर त्याने तुम्हांला ढकललं असेल तर त्यावर विश्वास ठेवा एक तर तो तुम्हांला खाली पडण्याआधी कॅच करेल किंव्हा तो तुम्हाला उडायला शिकवेल. पण तुमचा त्यावर विश्वास असला पाहिजे. 

        बिनधास्त देवावर विश्वास ठेवा. काळजी करणं सोडा. आनंदात जीवन जगा. आयुष्याची सगळी गणित सोडवण्याचा अट्टहास करायचा नाही काही गणित सोडून दिली का ती सुटतात. देवावर विश्वास ठेवा. अंधविश्वास नको. कोणीतरी आपल्यापाठीमागे खंबीर पणे उभं आहे ही भावना माणसाला सुखावते. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास ती त्याला समर्थ करते. हा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करा. आयुष्य जगण्याची मजा अनुभवा.

           वर्तमान काळात जगायला शिकलं पाहिजे. जीवनात खूप समस्या आहेत. त्या फक्त आपल्यालाचं नाहीत. सगळ्यांना थोड्याफार फरकाने त्या असतात पण त्यांचा बाऊ करायचा की सहज त्या सोडवायच्या तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण यासाठी जो काही विश्वास लागतो तो मिळवण्यासाठी आपल्याला मदतीला येतो तो देव. तो सगळ्या गोष्टीची काळजी घेत असतो. हे आपण लक्षात घ्यायला हवं.

मंगळवार, २ मे, २०२३

Good Health is wealth ... निरोगी आरोग्य ही खरी संपत्ती

 Good Health is wealth ... निरोगी आरोग्य ही खरी संपत्ती 


  संपत्ती म्हणजे नक्की काय ? त्याची व्याख्या काय आहे ? हे समजून घेतलं पाहिजे. खरी संपत्ती काय असते ? 

        तुमच्या वयाच्या 25 वर्षापर्यंत तुमची डिग्री ( शिक्षण ) काय आहे हे पाहिलं जातं. 40 व्या वर्षो तुम्ही किती कमावता हे पाहिलं जातं. आणि आयुष्याच्या उत्तरार्धात म्हणजे 50 वर्षानंतर तुम्ही किती निरोगी आहात हे महत्त्वाचे असतं. 

       60 वर्षानंतर तुमच्या कडे कोणतं पद आहे , किती पैसा आहे , अधिकार किती आहेत. याला काहीही किंमत असत नाही. अशा वेळी महत्त्वाच असत ते म्हणजे तुमचं निरोगी शरीर आणि तेच जर चांगले नसेल तरआयुष्यभर जे काही कमावलं ते या वेळी शून्य होत. 

        माणूस हा विचित्र प्राणी आहे तो पैसा कमवण्यासाठी त्याचं आरोग्य खर्च करतो आणि नंतर ते पुन्हा कमवण्यासाठी तो सगळा पैसा खर्च करतो. 
माणूस पैसा कमवण्यासाठी त्याच सगळ आयुष्य घालवतो. पैसा कमवण्यासाठी तो आरोग्याची हेळसांड करतो. खरं तर आरोग्य हिच खरी संपत्ती आहे.

         आपण खूप पैसा कमावला , संपत्ती गोळा केली. पण तिचा उपभोग घेण्यासाठी जर आपलं शरीर आपली साथ देत नसेल तर अशा संपत्ती चा काय उपयोग आहे. 

          आयुष्यात फक्त पैसा मिळवणं महत्वाचे नसतं तर तो मिळवत असताना त्याबरोबरच शरीर स्वास्थ्याकडे पण लक्ष देणे गरजेचे असते. पण आपण कायम शरीराकडे दुर्लक्ष करतो . वेगळ्याच गोष्टींना महत्व देतो. त्या मिळवण्यासाठी धावत असतो.
 पैसा मिळवण्यासाठी आपण किती प्रयत्न करतो पण आपलं आरोग्य निरोगी राहावं म्हणून किती लक्ष देतो विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. तर मग आज पासूनच विचार करा आणि आपलं आरोग्य कस उत्तम राहील या कडे लक्ष द्या.

           तर मग चला आपली खरी संपत्ती उत्तम राहील यासाठी प्रयत्न करू या.

" Good Health is Wealth. "






रविवार, २३ एप्रिल, २०२३

Elon Musk and Twitter

 Elon Musk and Twitter...

इलॉन मस्क आणि ट्विटर...

नमो शेतकरी महासन्मान योजना


केंद्र सरकार देशभरात पीएम किसान सन्मान निधी योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबाला दरवर्षी 6 हजार रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते. दर 4 महिन्यांच्या अंतरानं 2 हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जातो.


आता राज्य सरकार केंद्र सरकारच्या या 6 हजार रुपयांमध्ये आणखी 6 हजार रुपयांची भर घालणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना प्रती वर्ष 12 हजार रुपये मिळतील. ही योजना अशी आहे.


पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जे लाभार्थी आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.


केंद्र सरकार जेवढे पैसे या लाभार्थ्यांना देतं, तितकेच राज्य सरकारही देणार आहे.


– पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी काय करायला हवं?

उत्तर - पीएम किसान सन्मान निधीचा 2 हजार रुपयांचा हप्ता ज्या बँक खात्यावर जमा होतो, ते बँक खातं आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.


            जगातील सर्वात श्रीमंत माणूस, जगप्रसिद्ध टेस्ला कंपनीचे सीईओ Elon Musk यांनी  Twitter विकत घेण्यासाठी 41. 3


9 अब्ज डॉलर ची ऑफर दिली होती. आणि आता ते त्यांनी विकत2 घेतल. पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यांना Twitter का विकत घ्यायचं होत ? असं काय आहे Twitter मध्ये जे इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मध्ये नाही ? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 

 

             Elon Musk हे Twitter चा वापर कसा करतात हे पाहिलं तर या प्रश्नाचे उत्तर मिळते. Musk हे Twitter चा वापर आपल्या प्रोडक्ट चं मार्केटिंग करण्यासाठी अत्यंत खुबीने करतात. त्याचा फायदा ते आपल्या व्यवसायासाठी करतात. Elon Musk ह्यांचे Twitter वर फॉलोव्हर्स खूप आहेत आणि त्यांनी एखादं Twit केलं की त्याच्यावर मिलियन ट्विट चा पाऊस पडतो. त्यामुळे जरी एखादं नवीन प्रोडक्ट बाजारात आणायचे असेल तर सगळ्यात स्वस्त जाहिरात करण्यासाठी twitter सारखा मंच नाही. Twittet मुळे जगातील खूप साऱ्या लोकांशी संपर्क येतो.


            सोशल मीडिया ची ताकद Elon Musk यांना माहीत आहे. ते काही न काही ट्विट करून  आपलं अकाउंट नेहमी चर्चेत ठेवतात. 


           जेव्हा जेव्हा Elon Musk ट्विट करतात तेंव्हा तेव्हा जागतिक बाजारात खळबळ माजते. उदाहरण सांगायचं झालं तर काही दिवसांपूर्वी  जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने पत्रकार परिषदेदरम्यान कोका कोला या  कोल्ड्रिंकच्या बाटल्या बाजूला केल्या आणि पाणी पिण्यास सांगितलं. या त्याच्या कृतीमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं होत. पण त्यामुळे 

कोका कोला कंपनीचे शेअर्स 1.6 टक्क्यांनी खाली घसरले होते .  कोका कोला कंपनीला  4 बिलिअन डॉलर्सचं म्हणजे जवळ जवळ 29,000 कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागलं होत. यावरून आपल्याला अंदाज लावता येईल की Elon Musk च्या ट्विटमुळे मार्केट मध्ये काय काय होत असेल.  या सर्व कारणानं मुळे Elon Musk यांना ट्विट करण्याआधी SEC ची परवानगी घ्यावी लागते. ही अट दूर व्हावी यासाठी Elon Musk यांनी प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही. 


            Elon Musk यांनी bitcoin बाबत एक ट्विट केलं होतं की आता त्यांची कंपनी टेस्ला bitcoin चा वापर करणार आणि मग काय जो तो bitcoin खरेदी करू लागला. त्यामुळे bitcoin ची किंमत कमी वेळात खूप वाढली. पण काही दिवसांनी Elon ने ट्विट केलं की पर्यावरणाच कारणांमुळे bitcoin वापरू शकत नाही. त्यामुळे bitcoin ची किंमत घसरली. 


          Elon Musk हे मार्केट मध्ये योग्य वेळी गुंतवणूक करतात. ट्विट मुळे मार्केट वाढलं की त्यांच प्रॉफिट मार्केट मधून काढून घेतात. यामध्ये छोटे इन्व्हेस्टर अडकतात. Elon Musk यांसारखे मोठे इन्व्हेस्टर पैसे कमावण्यासाठी ते Twitter चा वापर करतात. Twitter ने मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना सुद्धा बॅन केलं होतं म्हटल्यावर ते कोणालाही बॅन करू शकत. Elon ला Twitter चा वापर स्वतःच्या मनाप्रमाणे करायचा आहे. त्यासाठी बॅन ची टांगती तलवार त्यांच्यावर नको आहे. 

 

           एवढे पैसे खर्च करून Twitter विकत घेण्यापेक्षा Elon स्वतःचा नवीन प्लॅटफॉर्म तयार का करत नाही हा प्रश्न पडतो पण या आधीही Elon ने नवीन काही निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो काही success झाला नाही. Twitter हा एक स्टेबल प्लॅटफॉर्म आहे. नवीन काही तयार करून तो स्टेबल करण्यासाठी खूप वेळ लागेल आणि तितका वेळ सुद्धा Elon कडे नाही त्यामुळे आहे त्याचाच वापर स्वतंत्र पणे करण्यासाठी Elon ला Twitter विकत घ्यायचं होत आणि ते आता घेतलं आहे. 


          फ्रीडम ऑफ स्पीच चे कारण सांगून Elon यांनी खूप वेळा Twitter वर पोल घेतले होते. तसेच ज्यांनी ज्यांनी त्यांच्या Tesla संदर्भात वेगळं मत मांडले ते इलॉन मस्क यांना रूचल नाही. आपल्या विरोधात मांडलेले मत त्यांना पटत नाही ते त्या संदर्भात action घेतात. आता तर ते  स्वतःच Twitter चे मालक झाले आहेत आता ते त्यांच्या विरोधातील मत प्रवाहांना नक्की ते कस उत्तर देतात ते पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. 


बुधवार, १९ एप्रिल, २०२३

The greatest Master /जीवनात सर्वात मोठा गुरु काळ असतो...

 The greatest Master /जीवनात सर्वात मोठा गुरु काळ असतो...


             माणूस जन्माला आला की त्याच शिक्षण सुरू होते. घरी त्याचा पहिला गुरु आई असते. शाळेला प्रारंभ झाला की शिक्षक त्याचे गुरू होतात. ज्याच्या कडून आपण काही तरी नवनवीन शिकत असतो ते आपले गुरू असतात. गुरू फक्त शाळेतच भेटत नाही तर ते आयुष्याच्या वाटेवर खूप ठिकाणी भेटतात आणि आपल आयुष्य नवनव्या गोष्टीनी भरून टाकतात. जगण्याची प्रेरणा देतात. नवीन काहीतरी करण्याची उर्मी आपल्यात निर्माण करतात.  पण या सगळ्या जीवन प्रवासात खूप काही शिकवून जाणारा एक मोठा गुरू असतो. त्याचं नाव काळ, वेळ हो काळचं.....


              जीवनात माणसं ओळखायला कोण शिकवत असेल तर तो म्हणजे काळ. आपली माणस कोणती , आपल्याला संकटात अडकवणारी कोण आहेत. संकटातुन बाहेर काढणारी कोण , मदत करणारे कोण याची एकदम अचूक उत्तर देणारा गुरू म्हणजे काळ. 


              आपली क्षमता नक्की काय आणि किती हे आपल्याला सप्रमाण दाखवून देतो तो काळ. विविध प्रसंगांना कसं सामोरं जायचं ते काळ शिकवतो. 


               जीवनात येणारी संकट ही कितीही मोठी असली तरी ती आपल्या आयुष्यापेक्षा मोठी असत नाहीत. हे नेहमी सांगणारा हा गुरू असतो. आपल्यावर दुःखाचा डोंगर जरी कोसळला तर काय करायचा. तर संयम ठेवायचा आणि काही काळ शांत राहायचं. त्यामुळे त्या दुःखाची तीव्रता कमी होते. कमी झालेली तीव्रता आपल्याला जाणवते पण त्यासाठी काही काळ दयावा लागतो. जीवनात अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला सापडत नाही त्याची उत्तरे कोणाकडेच मिळत नाही. आपण त्या प्रश्नांनमध्ये गुरफटून जातो. हाती काहीच लागत नाही अशा वेळी एक करायचं वेळ जाऊ द्यायचा आणि हा जाणार वेळच/ काळच आपल्याला त्यांची उत्तरे देतो. 

               काळ आपल्याला खूप काही शिकवत असतो. पण आपली शिकण्याची वृत्ती असायला हवी. श्रीमंतीत माजू नये आणि गरिबीत लाजू नये. हे शिकवण्याचं महत्त्वाचे काम करतो तो म्हणजे काळ. आपली खरी ओळख आपल्यालाच करून देण्याच काम काळ करत असतो. खूप असे प्रसंग जीवनात येतात की त्यावेळी आपले निर्णय चुकतात. पण त्यातून शिकण्यासाठी मदत करतो तो म्हणजे  काळ. 

                अनुभवा सारखा गुरू नाही. पण विविध अनुभव देण्याचं काम काळ करत असतो. काळ खूप साऱ्या गोष्टी आपल्याला शिकवत असतो. त्याच्या भट्टीत आपलं आयुष्य तावून सुलाखून निघत. भरपूर अनुभव देऊन आपलं आयुष्य अधिकाधिक समृद्ध करण्याचं काम काळ करत असतो. हे काम निरंतर चालू असते. 

                जीवनात आपल्याला अनेक गुरू लाभतात. त्यामध्ये कोणी मोठा कोणी छोटा असत नाही. गुरू हा गुरुच असतो. लहान मोठा असं काही असत नाही. जो नवनवीन ज्ञान देतो तो गुरू. मग आपण ज्ञानाला लहान मोठं ठरवू शकतो का ? तर नाही ना. कारण कोणतं शिक्षण कुठे उपयोगी पडेल हे आपण सांगू शकत नाही. मग आपण हा गुरू मोठा तो गुरू लहान अस म्हणू शकत नाही. जो तो आपल्या ठिकाणी श्रेष्ठच असतो.


शनिवार, १५ एप्रिल, २०२३

Jai bhim/जय भीम

 जय भीम हा काल TV वर पहिला आणि कायद्याची ताकत नक्की काय असते ते कळाले. कायदा सगळ्यांसाठी कसा काम करतो ते कळलं.



तामिळनाडूमध्ये काही वर्षांपूर्वी घडलेल्या एका सत्‍य घटनेवर आधारीत ‘जय भीम’ हा चित्रपटआहे. ती घटना नक्की काय होती, या घटनेत हेबियस  कॉर्पस ( Habeas Corpus ) कधी वापरला जातो , त्यामुळे के होऊ शकत हे सांगण्यात आलं आहे. 

चित्रपटाकडे वळण्याआधी हेबियस कॉर्पस म्हणजे काय ते आपण समजून घेऊ....


        भारतीय संविधानात नागरिकांना काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत. त्या अधिकारावर काही गदा आली तर त्या विरोधात आपल्या राज्यघटनेत  एक कलम आहे. त्या कालमामुळे कोणत्याही व्यक्तीचे मूलभूत अधिकार बाधित झाल्यास, नागरिकांच्‍या मुलभूत अधिकारांवर गदा आणण्‍याचा प्रयत्‍न केला गेल्‍यास त्‍या विरोधात याचिकेच्‍या  माध्‍यमातून आवाज उठविता येतो.  ते म्हणजे कलम 32.

या मध्ये ' हेबियस कॉर्पस ' याचा समावेश होतो.या याचिकेच्‍या माध्‍यमातून मुलभूत अधिकारांवर गदा आल्‍यास नागरिकांना न्‍यायालयात दाद मागता येते. उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय या याचिकेची गांभीर्याने दखल घेते.


            Habeas Corpus /हेबियस काॅर्पस ( बंदीप्रत्‍यक्षीकरण ) म्हणजे कैद्‍याला न्‍यायालयासमोर प्रत्‍यक्ष हजर करा, असे न्‍यायालयाने आदेशीत करावे, अशी मागणी करणारी याचिका. काही प्रकरणांमध्‍ये पोलीस एखाद्या व्यक्तीला अटक करून तुरुंगात टाकतात. त्यांच्याकडे त्या बाबत योग्य कारणे नसतात .मग त्या व्यक्तीला त्या बाबत न्यायालयात जाता येतं.

तर त्यासाठी हेबियस काॅर्पस याचा आधार घ्यावा लागतो. जर पोलीस त्या व्यक्तीच्या अटकेची योग्य कारणे न्यायालयासमोर सादर करू शकले नाही तर संबंधितांची निर्दोष मुक्तता केली जाते.

 

         चित्रपटात हेबियस कॉर्पस चा कसा वापर करावा, त्यामुळे काय होऊ शकत हे आपल्याला कळतं. आपल्या आजूबाजूला आपण पाहतो की अनेकांना अन्यायाला सामोरे जावं लागतं. अन्याय वेगवेगळ्या समाजात होत असततात. मग आपण काय करतो. निमूटपणे सहन करतो किंवा बघून गप्प बसतो. पण, अन्यायाला वाचा फोडणारं कुणीतरी हवं ना!

        सामाजिक गट परस्परांविरोधात कसे लढतात. व्यवस्था आणि त्यात काम करणारी माणसे आणि त्यावर राज्य करणारी माणसं  यांच एकमेकांशी कशा प्रकारे लागेबंद असतात . यातील काहीं माणसं किती क्रूरपणे वागतात. हे या चित्रपटात दाखविण्यात आलं आहे. 


ही घटना घडते ती आदिवासी राजकन्नू आणि त्याची पत्नी सेंगानी यांच्या बरोबर .


         चोरी कुणी केली आहे हे पोलिसांना आधीच माहीत असतं. त्या चोरी करणाऱ्या बरोबर ते वाटाघाटी करून त्याला सोडून देतात . पण आता चोर तर  ठरवावा लागेल ना , म्हणून ते या आदिवासी लोकांना पकडतात आणि चोरी कबूल करण्यासाठी प्रयत्न करतात. त्यासाठी त्यांना अमानुष पणे मारतात. त्यामध्ये च राजकन्नू तुरुंगात मृत्यू होतो. आणि मग सगळी यंत्रणा हे झालेलं निस्तरण्यात कामाला लागते .....


पोलीस प्रशासन त्याचं नाव खराब होऊ नये म्हणून झटतात तर सरकारी वकील त्याचं पद आणि त्याला मिळणारी आमदारकी साठी पोलीस प्रशासन आणि सरकार च्या बाजूने उभा राहतो.....


पण या सगळ्यामध्ये राजकन्नू ची बायको सेंगानी ती 

 तिच्या पतीला वाचवण्यासाठी पुढे येते. न्याय मिळवण्यासाठी खंबीरपणे उभी राहती....

तिला केस मागे घेण्यासाठी लावणारे पोलीस, विरोधी वकील, गावातले सरपंच, तिच्या जातीची लोक या सर्वांना न जुमानता ती लढा देते ....


         या लढ्यात तिची साथ देतो तो वकील चंद्रू . चंद्रू एक उत्तम वकिल आणि अन्यायाविरोधात लढणारा आहे.  मानवाधिकार प्रकरण तो हाताळत असतो. तो या आदिवासीची केस लढताना अनेक घृणास्पद सत्य उघडकीस आणतो. कायद्याच दुरुपयोग करणारे आणि त्याच कायद्याचा योग्य वापर करून गरिबांना न्याय मिळवून देणारे ....

या दोन्ही बाजू चित्रपटात प्रकर्षाने जाणवतात ....

आपल्या कामाशी प्रामाणिक राहणे म्हणजे काय ते समजत .....


         हा चित्रपट पाहिल्यानंतर कनिष्ठ वर्गावर कशा प्रकारे अन्याय केला जातो किंव्हा होतो ते आपल्याला जाणवत. चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे. त्यातून जे काही सांगायचं आहे ते चित्रपट पाहणाऱ्याला पर्यंत पोहोचत.


व्यवस्थेमध्ये किती भ्रष्टपणा असू शकतो ते समजतं....

आर्थिक विषमतेमुळे काय काय घडत ते समजत ...

जाती-पातीची मूळ समाजातआणि लोकांच्या मनात किती खोल पर्यंत रुजली आहेत याची जाणीव होते .... 

        कायदा सर्वांसाठी समान आहे . जो चुकतो मग तो कोणीही असेना त्याला कायदद्याच्या नियमाने शिक्षा दिली जाते . न्याय मिळविण्याचा अधिकार सर्वांना आहे. 

न्यायपालिका सर्वोच्च स्थानी आहे याची जाणीव करू देण्यास हा चित्रपट यशस्वी झाला आहे ...


Shaarad Sir

उर्मिला

  उर्मिला... रामायण माहीत असत, पण उर्मिला नक्की कोण हेच काही जणांना माहीत नसतं... जेव्हा कळतं तेव्हा काय तर लक्ष्मणाची पत्नी एवढंच... एखादी ...