गुरुवार, ११ मे, २०२३

देव प्रत्येक गोष्टीची काळजी घेईल

  

          आपण जीवन जगत असताना खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी करत बसतो. हे कसं होईल. त्याच काय होईल. आता तो कसा जगणार. आपण लक्ष दिलं नाही तर काय होईल. विनाकारण आपण चिंता करत बसतो. किती मोठं संकट आहे त्यातून आपण कसे बाहेर पडणार ? 


         देव प्रत्येकाची काळजी घेत असतो. तो प्रत्येकाला संकटाशी झुंजण्याची शक्ती देत असतो. फक्त आपण त्याच्या वर विश्वास ठेवला पाहिजे.  देव आपल्या पाठीशी आहे तो आपली काळजी नक्की घेईल हा विश्वास मनात ठेवून परिस्थितीचा सामना केला पाहिजे. 

         संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्वात महत्त्वाच म्हणजे आपला आत्मविश्वास. देव आपल्या पाठीशी आहे तो आपलं चांगलंच करेल. हा विश्वास मनात ठेवला तर सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात. 

         लक्षात असू द्या जर तुमच्या आयुष्यात संकट आली तर देव तुम्हांला त्यातून बाहेर पडण्यासाठी जी शक्ती लागते ती आधीच देत असतो. पर्वताच्या उंच टोकावरून जर त्याने तुम्हांला ढकललं असेल तर त्यावर विश्वास ठेवा एक तर तो तुम्हांला खाली पडण्याआधी कॅच करेल किंव्हा तो तुम्हाला उडायला शिकवेल. पण तुमचा त्यावर विश्वास असला पाहिजे. 

        बिनधास्त देवावर विश्वास ठेवा. काळजी करणं सोडा. आनंदात जीवन जगा. आयुष्याची सगळी गणित सोडवण्याचा अट्टहास करायचा नाही काही गणित सोडून दिली का ती सुटतात. देवावर विश्वास ठेवा. अंधविश्वास नको. कोणीतरी आपल्यापाठीमागे खंबीर पणे उभं आहे ही भावना माणसाला सुखावते. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास ती त्याला समर्थ करते. हा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करा. आयुष्य जगण्याची मजा अनुभवा.

           वर्तमान काळात जगायला शिकलं पाहिजे. जीवनात खूप समस्या आहेत. त्या फक्त आपल्यालाचं नाहीत. सगळ्यांना थोड्याफार फरकाने त्या असतात पण त्यांचा बाऊ करायचा की सहज त्या सोडवायच्या तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण यासाठी जो काही विश्वास लागतो तो मिळवण्यासाठी आपल्याला मदतीला येतो तो देव. तो सगळ्या गोष्टीची काळजी घेत असतो. हे आपण लक्षात घ्यायला हवं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Shaarad Sir

उर्मिला

  उर्मिला... रामायण माहीत असत, पण उर्मिला नक्की कोण हेच काही जणांना माहीत नसतं... जेव्हा कळतं तेव्हा काय तर लक्ष्मणाची पत्नी एवढंच... एखादी ...