सोमवार, १५ मे, २०२३

Why did BJP lose in Karnataka?

 कर्नाटक मध्ये भाजप का हरली...


     

भाजपा कर्नाटक निवडणूकीत का हरली ? नक्की काय कारणे आहेत ? बजरंग बली चा आशीर्वाद काँग्रेस ला का मिळाला ? जो की सगळ्यांना वाटत होतं की यामुळे Bjp चा फायदा होईल पण हे उलट का झालं ? 

नक्की काय चुकलं Bjp चं..?

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा काय परिणाम झाला ..?

हिजाब विवाद याचा फायदा नक्की कोणाला झाला Bjp ला का Jds ला का काँग्रेस ला ?


Bjp च्या जागा काँग्रेसने घेतलेल्या आपल्याला दिसून येतात. पण जर आपण पाहिलं तर मागच्या वेळी Bjp ला जे 36% मतदान झालं होतं त्याच या वर्षी खूप कमी प्रमाण झालं नाही तर ते 35 % आहे म्हणजे फक्त 1 % मतदान Bjp च कमी झालेले आपल्याला दिसून येत तरी पण जागा खूप कमी झालेल्या दिसतायेत..


कारण JDS ला मागच्या वेळी 18% मतदान झालं होतं पण या वेळी JDS ला 13% मतदान झालं आणि ही कमी झालेली सगळी मत काँग्रेस कडे गेली..

Bjp ने हिंदुत्ववादी विचार ठेवल्यामुळे सगळी मुस्लिम मते JDS ला न जाता काँग्रेसला मिळाली कारण काँग्रेस जिकू शकेल असा मुस्लिम मतदारांना वाटल. त्यामुळे काँग्रेसच्या जागा वाढल्या आणि Bjp आणि JDS च्या कमी झाल्या...


राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा नक्की काय फरक पडला तर ज्या भागातून ही यात्रा गेली त्या भागातील 48 विधानसभा जागां पैकी काँग्रेसने 32 जागा जिकल्या... म्हणजे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम झाला हे ही मान्य करायला हवं..


मोदींच्या सभांचा काय परिणाम झाला तर मोदीं मुळे तरी Bjp चा सन्मान जनक पराभव झाला असे काही जण म्हणतायेत..

पण शिवकुमार व सिद्धरामय्या यांनी प्रचार करताना सांगितले की प्रधानमंत्री येणार नाहीत राज्य चालवण्यासाठी तर हा स्थानिक मुद्दा आहे. देशात वेगळ्या समस्या आहेत तर कर्नाटक मध्ये वेगळया. यामुळे योग्य सरकारची निवड करा. शिवकुमार व सिद्धरामय्या यांनी काँग्रेस विरुद्ध पंतप्रधान हा मुद्दा येऊ न देता काँग्रेस विरुद्ध बोम्मई हा मुद्यावर प्रचार केला.


आता ज्या ठिकाणी हिजाब चा मुद्दा निर्माण झाला त्या ठिकाणी काय झालं. तर हा विवाद भरपूर गाजला. मीडियाने पण भरपूर कव्हरेंज केलं पण या जागी म्हणजे उडपी या ठिकाणी Bjp चा उमेदवार निवडणूक जिंकला. 


लिंगायत समाज Bjp सोबत राहिला नाही. त्यामध्ये फूट पडली लिंगायत समाजावचे नेते Bjp ला सोडून गेले. लिंगायत समाजाचे नेते येडुरप्पा हे रिटायर्ड झाले. त्यांनी सगळा जोर लावून Bjp चा प्रचार केला नाही. येडुरप्पा समर्थकांना वाटले की जरी Bjp जिंकलं तरी येडुरप्पाना काय मिळणार ना मुख्यमंत्री ना पद यामुळे यांच्या समर्थकांनी जोर लावून प्रचार केला नाही..


मुस्लिमांच 4 %  आरक्षण संपवून लिंगायत आणि एका जातीला देण्याचा निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. यामुळे मुस्लिम समाज नाराज झाला. Sc च आरक्षण इतर जातींमध्ये वाटण्याचा निर्णय असो किंव्हा मुस्लिम आरक्षण यातून Bjp ला फायदा झाला नाही...


40 % कमिशन सरकार ही घोषणा काँग्रेसने दिली कारण भ्रष्टाचार... 

आणि बोम्मई सरकारने या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध कोणतीही मोठी कार्यवाही केली नाही. त्यामुळे लोकांच्या मनात Bjp सरकार विषयी रोष निर्माण झाला आणि काँग्रेस ने त्याला हवा दिली...


Bjp ने कोणत्याही स्थानिक मुद्यांवर प्रचार केला नाही लोकांच्या मनात सरकार विषयी राग होता अँटीइन्कबन्सी ही होती.


या सगळ्या मुद्द्यांचा विचार केला तर कळत की 

 Bjp का हरली... 


अजून काहींमुद्दे तुम्हांला वाटत असतील तर comments करा....


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Shaarad Sir

उर्मिला

  उर्मिला... रामायण माहीत असत, पण उर्मिला नक्की कोण हेच काही जणांना माहीत नसतं... जेव्हा कळतं तेव्हा काय तर लक्ष्मणाची पत्नी एवढंच... एखादी ...