Information आणि Knowledge
माहिती आणि ज्ञान
माहिती म्हणजेच ज्ञान, बुद्धिमत्ता आहे असा आपण गैरसमज करून घेतला आहे...
खूप सगळी माहिती आहे म्हणजे तो खूप बुद्धिमान, हुशार ज्ञानी आहे....
असं असतं का खरंच....
भरमसाठ माहितीचा वेगानं मारा ज्या ठिकाणी केला जातो ते शिक्षण चांगले....
ती शाळा चांगली....ज्या शाळेत भरपूर अभ्यास दिला जातो... सुट्या न देता ती जास्तीत जास्त दिवस ती शाळा भरते म्हणजे ती खूप चांगली शाळा असते..... खरंच ???
तुमच्या जीवनात मूलभूत परिवर्तन जे करते ना ते खरे शिक्षण...
शिक्षण म्हणजे फक्त चटपटीत माहिती नाही....
शालेय जीवनात अजून एक फ़ॅड आलेलं ते म्हणजे 1 ली पासूनच स्पर्धा परीक्षा....
मग त्यांचे बक्षीस वितरण समारंभ ... कार्यक्रम.... सोहळे......
मार्गदर्शन पण एखादा अधिकाऱ्याचे भाषण...
या स्पर्धा परीक्षेत टिकण्यासाठी पालक आपल्या मुलांचे बालपण संपवतात त्यांना बालपणाचा आनंद घेऊ देत नाहीत....
त्यांना केवळ माहिती डोक्यात जमा करणारे रोबोट तयार करत आहेत...
पालक बाजारात ज्याला मागणी असते ते उत्पादन तयार करतात मुलं घडवत नाही...
बाजारात चालणार एक प्रोडक्ट तयार करण्यात धन्यता मानतात.....
मूळ संकल्पना समजून न घेता फक्त माहिती जमा केली जाते....
माहिती जमा करत असल्यामुळे त्यालाच ज्ञान समजल्यामुळे वेगळा विचार कसा करावा.....
आलेली समस्या, प्रश्न कसा समजून घ्यावा, हेच कळत नाही ....
जे कृष्णमूर्ती म्हणतात की आजचं शिक्षण हे विद्यार्थ्यांना
How to think शिकवत नाही तर...
रेडिमेड उत्तरांचे what to think शिकवते...
विचार करण्यापेक्षा स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी फक्त माहिती जमवण्यासाठी मेहनत घेतात, मात्र प्रत्यक्ष कामात त्यांना निर्णय घेणे, प्रश्न सोडवणे, समायोजन, राजकीय दडपण, समोर मोह याच्याशी झगडावे लागते...
पण त्याचा या परीक्षेशी आणि माहितीशी काहीही संबंध नसतो.
एखाद्या घरी गेलो की पालक मुलांना पोपटपंची करायला लावतात....
आदर्श शाळेत गेले की हमखास तेथील मुले राजधानी ते जगातील विविध माहिती पाठ सांगतात...
300 ते 400 पर्यंत चे पाढे पाठ दाखवतात...
अशा वेळी मला खरचं कीव वाटते .....
विविध प्रकारची माहिती केवळ डोक्यात कोंबून तयार केलेले रोबोट बघताना.....
विज्ञानाच्या संकल्पना समजून घेत आहेत का ?
का फक्त व्याख्या पाठ करून त्या परीक्षेत उतरून मार्क घेत आहेत....?
नवीन शोध लावण्यासाठी विचार केला जातोय का??
आपण फक्त copy - पेस्ट करणारी पिढी तयार करत आहोत...
IT मध्ये काय आहे फक्त copy - पेस्ट करणारी ही मंडळी...
ज्याला ते येतंय त्याला जास्त पॅकेज....
नवीन शोध नवा विचार आहे का ???
फक्त स्ट्रेस स्ट्रेस आणि स्ट्रेस.....
इतिहास शिकायचा म्हणजे सणावळ्या पाठ करणे..... एवढाच असतो का इतिहास ?
इतिहास शिकायचा नसतो तर इतिहासातून शिकायचं असतं हे ह्यांना समजणार आहे का ???
भूगोल म्हणजे विविध देशांच्या राजधान्या, ग्रह, तारे यांची नावे विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष माहित झाले की संपले असं असत का ?
तर भूगोलामध्ये आज हवामान बदलापासून अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत त्याबाबत चिंतन करायला तो शिकतोय का ????
चिकित्सा करण्यापेक्षा आज केवळ माहितीलाच ज्ञान समजले जाते आणि त्यातून फक्त पोपटपंची करण्यालाच बुद्धिमत्ता मानल्यामुळे शिक्षणातून फक्त पदव्या घेतल्या जातात....
समाजाच्या, देशाच्या आणि व्यक्तिगत आयुष्यातील प्रश्नांचा सखोल विचार करण्याची क्षमताच निर्माण होत नाही..
जगण्याच्या प्रश्नाला कसे भिडायचे हे शिक्षण शिकवत नाही...
मग थोड्या तणावाने डिप्रेशन येतं...
आपल्या रोजच्या जगण्यातील प्रश्न सोडवताना या माहितीचा काही उपयोग होतो का ?
हा प्रश्न स्वत;लाच विचारायला हवा....
माझ्या शेतात कोणती पिके घ्यावी कोणती पिके चांगली येतील हे मला माहीत नसते पण आफ्रिकेच्या शेतात काय पिकते ? ही माहिती मात्र माझ्या डोक्यात शिक्षण व्यवस्था कोंबत राहते....
परिसरातील निसर्गाचे ज्ञान हेच जगणे असताना त्याला मात्र शिक्षणात ज्ञान मानले जात नाही
आणि निरर्थक जगण्याशी संबंधित नसलेल्या माहितीला ज्ञान मानल्याने सगळा राडा झालेला दिसतो.....
आपल्या जगण्याचा अर्थ लावणे म्हणजे शिक्षण...
छोट्या छोट्या गोष्टीतील आनंद घेणे म्हणजे शिक्षण....
आपली आवड जपणे म्हणजे शिक्षण....
आपल्या जगण्याच्या प्रश्नांबद्दल अंतर्मुख होणे म्हणजे शिक्षण....
आपल्या भावना नक्की काय आहेत हे समजणे त्याचे समायोजन करता येणे म्हणजे शिक्षण....
आपले नातेसंबंध समजून घेणे म्हणजे शिक्षण...
तणाव दूर करणे म्हणजे शिक्षण..
या गोष्टी मुलांना शिकवणे जास्त महत्त्वाचे आहे.
म्हणून Information सोडून Knowledge ला शिक्षणात महत्वाचे स्थान द्यायला हवे....
मुलांना आणि पालकांना यातील मूलभूत फरक समजून सांगायला हवा.....
पटतंय का ????







