शनिवार, १८ ऑक्टोबर, २०२५

Information आणि Knowledge

 Information आणि Knowledge

माहिती आणि ज्ञान




माहिती म्हणजेच ज्ञान, बुद्धिमत्ता आहे असा आपण गैरसमज करून घेतला आहे...

खूप सगळी माहिती आहे म्हणजे तो खूप बुद्धिमान, हुशार ज्ञानी आहे....


असं असतं का खरंच....

भरमसाठ माहितीचा वेगानं मारा ज्या ठिकाणी केला जातो ते शिक्षण चांगले....

ती शाळा चांगली....ज्या शाळेत भरपूर अभ्यास दिला जातो... सुट्या न देता ती जास्तीत जास्त दिवस ती शाळा भरते म्हणजे ती खूप चांगली शाळा असते..... खरंच ???


तुमच्या जीवनात मूलभूत परिवर्तन जे करते ना ते खरे शिक्षण...

शिक्षण म्हणजे फक्त चटपटीत माहिती नाही....


शालेय जीवनात अजून एक फ़ॅड आलेलं ते म्हणजे 1 ली पासूनच स्पर्धा परीक्षा.... 

मग त्यांचे बक्षीस वितरण समारंभ ... कार्यक्रम.... सोहळे......

मार्गदर्शन पण एखादा अधिकाऱ्याचे भाषण...

या स्पर्धा परीक्षेत टिकण्यासाठी पालक आपल्या मुलांचे बालपण संपवतात त्यांना बालपणाचा आनंद घेऊ देत नाहीत.... 

त्यांना केवळ माहिती डोक्यात जमा करणारे रोबोट तयार करत आहेत...

पालक बाजारात ज्याला मागणी असते ते उत्पादन तयार करतात मुलं घडवत नाही... 

बाजारात चालणार एक प्रोडक्ट तयार करण्यात धन्यता मानतात.....


मूळ संकल्पना समजून न घेता फक्त माहिती जमा केली जाते....

माहिती जमा करत असल्यामुळे त्यालाच ज्ञान समजल्यामुळे वेगळा विचार कसा करावा.....

आलेली समस्या, प्रश्न कसा समजून घ्यावा, हेच कळत नाही ....


जे कृष्णमूर्ती म्हणतात की आजचं शिक्षण हे विद्यार्थ्यांना

 How to think शिकवत नाही तर...

रेडिमेड उत्तरांचे what to think शिकवते...


विचार करण्यापेक्षा स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी फक्त माहिती जमवण्यासाठी मेहनत घेतात, मात्र प्रत्यक्ष कामात त्यांना निर्णय घेणे, प्रश्न सोडवणे, समायोजन, राजकीय दडपण, समोर मोह याच्याशी झगडावे लागते...

पण त्याचा या परीक्षेशी आणि माहितीशी काहीही संबंध नसतो.


एखाद्या घरी गेलो की पालक मुलांना पोपटपंची करायला लावतात....

आदर्श शाळेत गेले की हमखास तेथील मुले राजधानी ते जगातील विविध माहिती पाठ सांगतात...

300 ते 400 पर्यंत चे पाढे पाठ दाखवतात...


अशा वेळी मला खरचं कीव वाटते .....

विविध प्रकारची माहिती केवळ डोक्यात कोंबून तयार केलेले रोबोट बघताना.....



विज्ञानाच्या संकल्पना समजून घेत आहेत का ? 

का फक्त व्याख्या पाठ करून त्या परीक्षेत उतरून मार्क घेत आहेत....?

नवीन शोध लावण्यासाठी विचार केला जातोय का??

आपण फक्त copy - पेस्ट करणारी पिढी तयार करत आहोत...

IT मध्ये काय आहे फक्त copy - पेस्ट करणारी ही मंडळी... 

ज्याला ते येतंय त्याला जास्त पॅकेज....

नवीन शोध नवा विचार आहे का ??? 

फक्त स्ट्रेस स्ट्रेस आणि स्ट्रेस.....


इतिहास शिकायचा म्हणजे सणावळ्या पाठ करणे..... एवढाच असतो का इतिहास ?

इतिहास शिकायचा नसतो तर इतिहासातून शिकायचं असतं हे ह्यांना समजणार आहे का ???


भूगोल म्हणजे विविध देशांच्या राजधान्या, ग्रह, तारे यांची नावे विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष माहित झाले की संपले असं असत का ? 

तर भूगोलामध्ये आज हवामान बदलापासून अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत त्याबाबत चिंतन करायला तो शिकतोय का ????


चिकित्सा करण्यापेक्षा आज केवळ माहितीलाच ज्ञान समजले जाते आणि त्यातून फक्त पोपटपंची करण्यालाच बुद्धिमत्ता मानल्यामुळे शिक्षणातून फक्त पदव्या घेतल्या जातात....


समाजाच्या, देशाच्या आणि व्यक्तिगत आयुष्यातील प्रश्नांचा सखोल विचार करण्याची क्षमताच निर्माण होत नाही.. 

जगण्याच्या प्रश्नाला कसे भिडायचे हे शिक्षण शिकवत नाही...

मग थोड्या तणावाने डिप्रेशन येतं...


आपल्या रोजच्या जगण्यातील प्रश्न सोडवताना या माहितीचा काही उपयोग होतो का ? 

हा प्रश्न स्वत;लाच विचारायला हवा....


माझ्या शेतात कोणती पिके घ्यावी कोणती पिके चांगली येतील हे मला माहीत नसते पण आफ्रिकेच्या शेतात काय पिकते ?  ही माहिती मात्र माझ्या डोक्यात शिक्षण व्यवस्था कोंबत राहते....


परिसरातील निसर्गाचे ज्ञान हेच जगणे असताना त्याला मात्र शिक्षणात ज्ञान मानले जात नाही 

आणि निरर्थक जगण्याशी संबंधित नसलेल्या माहितीला ज्ञान मानल्याने सगळा राडा झालेला दिसतो.....


आपल्या जगण्याचा अर्थ लावणे म्हणजे शिक्षण...

छोट्या छोट्या गोष्टीतील आनंद घेणे म्हणजे शिक्षण....

आपली आवड जपणे म्हणजे शिक्षण....

आपल्या जगण्याच्या प्रश्नांबद्दल अंतर्मुख होणे म्हणजे शिक्षण....

आपल्या भावना नक्की काय आहेत हे समजणे  त्याचे समायोजन करता येणे म्हणजे शिक्षण....

आपले नातेसंबंध समजून घेणे म्हणजे शिक्षण...

तणाव दूर करणे म्हणजे शिक्षण..

 

या गोष्टी मुलांना शिकवणे जास्त महत्त्वाचे आहे.

म्हणून Information सोडून Knowledge ला शिक्षणात महत्वाचे स्थान द्यायला हवे....

मुलांना आणि पालकांना यातील मूलभूत फरक समजून सांगायला हवा.....


पटतंय का ????

गुरुवार, १६ ऑक्टोबर, २०२५

संवाद हरवत चाललाय....

 संवाद हरवत चाललाय....

संवाद हरवत चाललाय....


खरंच आपण एकमेकांशी संवाद साधतोय का ??

आपण आपल्याच विचारात मग्न असतो, विचार तरी करतोय का आपण ? सोशल मीडिया वरच वाचतो, ऐकतो , बघतो फक्त.... विचार करतच नाही 

फक्त फॉरवर्ड करत असतो...


 

संवाद संपत चाललाय...


संवाद हरवत चाललाय....


एखादा तरी कृष्ण असावा आपल्या आयुष्यात...

मन मोकळं करण्यासाठी........


त्यानं हक्कानं म्हणावं आपल्याला

"अरे आज तुझा चेहरा असा का दिसतोय?"

" काही झालंय का ? 

" काय झालंय..बोल ना .."

आणि मग मनात साचलेलं सगळं त्याच्याजवळ मोकळं करता यायला हवं.....

अगदी सगळंच निःसंकोचपणे बोलता यायला हवं....

जादूची कांडी फिरवल्यागत मन क्षणार्धात एकदम मोकळं होऊन जायला हवं.....

असं हक्काचं कोणी आहे का आपलं ?


अशी कोणती हक्काची माणसं आपल्या जवळ आहेत का ?? 

जी आपल्या मनाला उभारी देतील....

आपलं मन रिलॅक्स करतील....

त्यांच्याशी बोललं की एकदम फ्रेश वाटेल....

आपलं मन हलकं फुलकं होईल...

खळखळून हसू चेहऱ्यावर येईल.....

एकमेकांना चिडवता येईल, खेचता येईल...

वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करता येईल...

cool feeling देणारी ही माणसं आहेत का ?

असतील तर शोधा....


ज्यांच्याशी बोलावंच असं काही नाही, ती जवळ असली तरी भारी वाटतं...

ते एकमेकांशी बोलले नाहीत तरीही, ते विचारांत भेटतात. कधी एखाद्या गाण्यात, कधी सुगंधात, 

तर कधी

शांत संध्याकाळी कातरवेळी....

त्यांचा सहवास आपल्याला आवडतो....

ते आपल्या जवळ आहेत ही फीलिंग आपल्याला सुखावते.....

मनाला एक वेगळाच आनंद देऊन जाते....

कधी कधी तिथे संवादाचीही गरज राहत नाही....


त्यांच्या विषयी आपल्या मनात आपुलकी, जिव्हाळा तर असतोच....

आपल्या मनाला जिवंत करणारी ही माणसं असली की मन एकदम रिलॅक्स होतं....


अशा माणसांन सोबत कुठलाच आडपडदा नसतो  किंवा show-off ही नसतो....

अगदी आपल्या मनातलं, हृदयातलं आपल्याला सहज बोलता येतं, व्यक्त होता येतं....


कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला समजून तर घेतलं जातंच पण महत्त्वाचं म्हणजे 

तुम्हाला ह्यांच्याकडून Judge केल्या जात नाही...! 

म्हणूनच अशा व्यक्तींच्या सहवासात तुम्हांला अगदी निवांत वाटतं.... मन मोकळं वाटतं..


अशी माणसं आरशासारखी असतात.. गुण आणि दोष दोन्ही दाखवणारी.. विश्वासू !! 

मनाच्या गाभाऱ्यात काही भावना अशा असतात ज्या तर्काने नाही तर आत्म्याने जोडलेल्या असतात. 

काही भेटी या अपघाती नसतात, त्या नियतीने ठरवलेल्या असतात. 

 तर एक गहिरं, शांत, आत्मिक बंधन असतं. अंतर्मनात एकमेकांसाठी जागा असते...


अशी Happy Place असतील तर ती जीवापाड जपली पाहिजेत.... 

आयुष्याच्या या गडबडीत ती हरवायला नकोत....  "तुमच्याशी बोलून खूssप बरं वाटतंय" हे त्यांना नक्की सांगायालाच हवं...


कुणी आत्महत्या केली की वाटतं,

मन मोकळं करायला त्यांच्या जवळ असा एखादा हक्काचा माणूस नसेल ? जिथे अगदी खरंखुरं व्यक्त होता येईल?

कारण व्यक्त होणं ही प्रत्येकाचीच सर्वात मोठी गरज.... !! 

त्याशिवाय मोकळा श्वास कसा घेता येणार ? 

आज कोणीतरी आपलं मनापासून एकूण घेतं असेल तर आपण खरंच खूप लकी आहोत...


म्हणूनच आपण आपल्या आयुष्यातली असा कृष्ण कोण आहे का ते पहावं, 

अशी हक्काची माणसं, 

आपला Happy Place जपावा... 

पण 

आपणही कुणाचा तरी कृष्ण,

 हक्काचं माणूस, Happy place नक्कीच असायला हवं... !! 


नाही का ?





नियतीने ठरवलेली सुंदर भेट....

वाळवंटातल्या ओयासिस सारखी...


काही माणसं आयुष्यात येतात आणि तुमचं आयुष्य समृद्ध करतात....

तुम्हांला स्वतःच्या आत डोकावून पाहायला शिकवतात....

ती फक्त असतात. त्यांच एक वलय असत जे तुम्हांला नवनवीन विचार करण्यासाठी प्रवृत्त करत... जेव्हा ती नसतात तेव्हा ते वलय आपण प्रकर्षाने miss करतो...


काही माणसं अशीच असतात नाती जपणारी ,   माणसं जपणारी आणि त्यांना अर्थ देणारी...!


आपल्या मनाच्या गाभाऱ्यातील भावनांना अलगद  जोडून घेणारी... 

ज्या भावना तर्काने नाही तर आत्म्याने जोडलेल्या असतात. 


काही भेटी या अपघाती नसतात, 

त्या नियतीने ठरवलेल्या असतात. 


आपली भेटही अशीच

आपली भेट झाली आणि हळू हळू नातं उमलत गेलं,

विश्वास घट्ट होत गेला, एकमेकांच्या भावना न बोलता ही समजु लागल्या..

तर एक गहिरं, शांत, आत्मिक बंधन निर्माण झालं. अंतर्मनात एकमेकांसाठी जागा तयार झाली...


अशा भेटीत ना कसला स्वार्थ आहे ना कसली अपेक्षा...

स्वच्छ आणि निखळ मनात जन्म घेणार हे नात खरंच खास आहे...

असं नातं कधी तरीच निर्माण होत..

अशा नात्यांमध्ये काही मागणं नसतंच, अपेक्षा ही नसतात तर असत फक्त देण...

आपल्या दोघांचं नातही असंच आहे 

न सांगता जुंळलेले

न बोलता समजलेले


अशी भेट की जिथे शब्दांची गरज नसते

नजरेतून बोलणं होतं..

सर्व गोष्टी न बोलता ही जाणवतात....



तुझ्यासोबतच्या क्षणांना मोठेपणा नाही, चैनही नाही तर एक शांत आनंद आहे..



आयुष्यात आलेली परिस्थिती त्यातून मिळणारा अनूभव, वाढलेल्या जबाबदाऱ्या आणि शहाणपण यामुळे हळू हळू आपण व्यक्त होण्याचच विसरतो...

हा अबोला संपतो कधी माहीत आहे का ?? 


या अशा नियतीने ठरवलेल्या भेटीने...

 

या भेटीमुळे आपल्या मनातलं न सांगणारी, मनातच ठेवणारी.. मनात जपणारी...अशी माणसं मग व्यक्त होऊ लागतात... भावना व्यक्त करतात..


कारण जेव्हा त्यांना व्यक्त होता येत नसतं तेव्हा समोरचा त्याच्या डोळ्यांतून त्यांच्या भावना समजून घेतो...

त्यांचा विश्वास संपादन करतो...

आणि मग ही नाती बहरतात, फुलतात ती आपल्या उच्चतम शिखरावर जाण्यासाठी... 

अशा नात्यांमध्ये एक सुंदरता निर्माण होते..


सुंदरता कशात असते... 

माहीत आहे काय.... प्रामाणिकपणात... 

मनापासून होणाऱ्या संवादात... 

एखाद्या व्यक्तीसोबत वाटणाऱ्या निःशब्द, पण सुखद शांततेत... 

खऱ्या आणि निस्वार्थी नात्यात... 

स्वतःला कोणत्याही दिखाव्याशिवाय स्वीकारण्यात... 

एखाद्या व्यक्तिकडून मिळणाऱ्या सहज प्रेमळपणात... 

जीवनातील सर्वात सुंदर गोष्टी या वस्तू नसतात...

त्या असतात आपल्या आयुष्यात आलेल्या व्यक्ती...,(तुमच्यासारख्या) 

त्यांच्या आठवणी आणि घालवलेले सुखद क्षण...


या अशा नात्याला नाव द्यायची घाई करू नये किंव्हा देऊ ही नये....

ते फक्त असतं... (कृष्ण आणि द्रौपदी सारख...)


लोकांना ही नाती समजणार नाहीत किव्हा ते समजण्यासाठी जी बौद्धिक कुवत लागते ना ती नसते प्रत्येकाकडे...

त्यामुळे आपण ते समजून सांगण्याचा अट्टाहासही करू नये... 


वेळ बदलत असतो...

वेळेप्रमाणे नातीही बदलतात,  त्यात दुरावा येतो... ही भेटही त्याला अपवाद असणार नाही...

पण तो पर्यंत तरी हे क्षण आपण जगूया, अनुभवू या आणि जपू या .."


ही आपली भेट चिरंतन राहील यासाठी प्रयत्न करूया.....


कुणाच्यातरी हातातलं काकण व्हावं...

कुणाच्यातरी गळ्यातला ताईत व्हावं...

कुणाच्या तरी अबोल भावनांची डायरी व्हावं...




सोमवार, ६ ऑक्टोबर, २०२५

नातं आणि ते दोघे

 नातं आणि ते दोघे


नातं दोन व्यक्तींमध्ये निर्माण होत आणि ते फुलत जात.

दोघानींही ते मनापासून स्वीकारलेले असत.






पण त्या नात्याचं ओझं होऊ नये किंव्हा आपण ते होऊ देऊ नये....


दोघांनाही स्वतंत्रपणे आपलं आयुष्य मनमुराद जगलं पाहिजे किंव्हा त्या नात्यात ते जगता आलं पाहिजे....


आपली आवड जपताना त्याला काय वाटेल किंव्हा तिला काय वाटेल हा विचार जर मनात येत असेल 

तर नात अजूनही निरपेक्ष झालं नाही....


आपल्या आयुष्यावर किंव्हा आपल्या निर्णयावर त्याचा किव्हा तिचा कोणताही कंट्रोल असता कामा नये.....( सल्ला, मार्गदर्शन ठीक आहे..)


नात्यात तुम्ही गुदमरून जायला नको....

नातं तुमच्यावर कोणतंही बंधन घालणार नसावं तर ते तुम्हांला मुक्त करणार असावं.....

आनंद वाटणार असावं....

त्यात अवघडलेपण नसावं....

आपण स्वतंत्र विचार मांडावेत का नाही असा प्रश्नही त्यात पडू नये....

एकमेकांच्या स्वतंत्र विचारांचा आदर असावा तोही मनापासून....(' तुम्ही म्हणाल तसं ' हे ही नको..)


एखादी गोष्ट आवडली नाही तर बिनधास्तपणे ती सांगता यायला हवी....

दोघांचाही एकमेकांवर विश्वास असावा... विश्वासावरच तर नातं उभं असतं....


कोणतीच व्यक्ती परिपूर्ण असतं नाही पण नातं परिपूर्णता निर्माण करणार असावं.....(दोघांचीही)


आपण नात्यात म्हणतो की मी त्याला त्याच्या 

गुण-दोषांसह स्वीकारलं आहे.... 

पण मला वाटत हे योग्य नाही तर - 

नात्यात दोघांनीही एकमेकांना त्यांच्या गुणांसह आणि एकमेकांचे दोष दूर करत करत स्वीकारायचं असतं....


नात्यात कसलाही स्वार्थ नसावा, संशय नसावा...

त्यात असावा फक्त एक आश्वासक आधार तोही न बोलता जाणवणारा....


नात नवनवीन गोष्टी शिकवणार असावं...

नवनवीन गोष्टी शिकण्यास प्रोत्साहन देणार असावं,

एकूणच काय तर

नात तुम्हांला समृद्ध कारणार हवं...


आपल्यावर कोणतरी निरपेक्ष प्रेम करतंय, आपल्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतंय ही फीलिंग किती भारी आहे ना..... 

जेव्हा नात्यात हे घडत ना तेव्हा ते नात जपायला हवं, ते नातं अनुभवायला हवं.... फुलवायला हवं.....


मग ते नातं कोणतंही असो........

तेच नातं शाश्वत असतं.......



 - " शेवटी सांगायचं तर, काही नात्यांना ना राखीचा धागा लागतो, ना प्रेमाच्या वचनांची गरज असते. ते स्वतःचं अस्तित्व घेऊन जगते....

ते कधीच नावांच्या चौकटीत बंदिस्त होत नाही....

ते स्वतःचं स्वतंत्र विश्व घेऊन जगते..

आणि महत्वाच म्हणजे....


जिथं हृदय स्वच्छ आहे ना...

तिथंच ते शाश्वत राहतं... "


मंगळवार, १६ जुलै, २०२४

नालंदा विद्यापीठ | Nalanda University

 नालंदा विद्यापीठ




- जगातील पहिली आंतरराष्ट्रीय निवासी शाळा आणि नागार्जुन ते आर्यभट्टांपर्यंत विद्वान भिक्षू आणि शिक्षकांचे घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'महाविहार'ची पुनर्स्थापना करण्याचे अनेक वर्षे चाललेले प्रयत्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केल्यामुळे फळाला आले. 

- बिहारमध्ये नवीन कॅम्पस डिझाइन केले.


- बिहारमधील पाटणाच्या पूर्वेस सुमारे 90 किमी अंतरावर असलेल्या नयनरम्य राजगीर टेकड्यांशेजारी वसलेले कायाकल्पित नालंदा विद्यापीठ.

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 जून रोजी विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन केले.

- जरी त्याचा इतिहास बुद्धाच्या काळापर्यंत गेला असला तरी, 'नालंदा महाविहार' याप्रमाणे तो ओळखला जात होता.

- सम्राट कुमारगुप्ताने 5 व्या शतकात स्थापन केला होता, आणि तो पुढील 700 वर्षांपर्यंत भरभराटीला आला आणि एका समक्रमित शिक्षण अनुभवाला चालना देत होता.


- जगातील पहिले निवासी विद्यापीठ नागार्जुन, आर्यभट्ट आणि धर्मकीर्ती या विद्वान भिक्षू आणि शिक्षकांच्या प्रामाणिकपणामुळे टिकून होते. - त्यांच्याकडे 2,000 शिक्षक आणि 10,000 विद्यार्थी होते.


- चिनी प्रवासी ह्युएन-त्सांग, ज्यांनी विद्यापीठाविषयी तपशीलवार माहिती लिहिली होती आणि स्वतः तेथे पाच वर्षे विद्यार्थी होते, त्यांच्या आठवणींमध्ये असे म्हणतात की ज्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश घ्यायचा होता आणि फक्त 20% पात्र होते.

- त्यांच्यासाठी कठोर तोंडी प्रवेश परीक्षा होती. 

- नालंदा येथे शिकविल्या जाणाऱ्या विषयांमध्ये बौद्ध धर्मग्रंथ (महायान आणि हीनयान दोन्ही शाळांचे), तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र, तत्वमीमांसा, तर्कशास्त्र, व्याकरण, खगोलशास्त्र आणि वैद्यकशास्त्र यांचा समावेश होता.

- विद्यापीठाने चीन, कोरिया, जपान, तिबेट, मंगोलिया, श्रीलंका आणि दक्षिण पूर्व आशियासारख्या दूरच्या ठिकाणांहून विद्वानांना आपल्या कॅम्पसकडे आकर्षित केले. 

- त्या विद्वानांनी नालंदा येथील वातावरण, वास्तुकला आणि शिक्षण, तसेच नालंदा शिक्षकांच्या सखोल ज्ञानाविषयी नोंदी ठेवल्या आहेत. 


- 1812 मध्ये स्कॉटिश सर्वेक्षक फ्रान्सिस बुकानन-हॅमिल्टन यांनी शिकण्याच्या आसनाचे अवशेष प्रथम शोधले. 

- 1861 मध्ये, सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी अधिकृतपणे प्राचीन विद्यापीठ म्हणून ओळखले.


- मार्च 2006 मध्ये, बिहार राज्य विधानसभेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना, दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी प्राचीन विद्यापीठाच्या पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव मांडला होता.

- भारताच्या संसदेने नालंदा विद्यापीठ कायदा, 2010 संमत केला आणि सप्टेंबर 2014 मध्ये, विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीची नोंदणी झाली.


मास्टर प्लॅन :- 

- भारताशिवाय एकूण 17 देशांनी - ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, भूतान, ब्रुनेई, कंबोडिया, चीन, इंडोनेशिया, लाओस, मॉरिशस, म्यानमार, न्यूझीलंड, पोर्तुगाल, सिंगापूर, दक्षिण कोरिया, श्रीलंका, थायलंड आणि व्हिएतनाम - विद्यापीठ स्थापन करण्यात मदत केली आहे.

- या देशांचे राजदूत श्री. मोदी यांच्या हस्ते कॅम्पसच्या उद्घाटनाला उपस्थित होते.

- 2013 मध्ये, प्रसिद्ध वास्तुविशारद BV दोशी यांच्या वास्तुशिल्प कन्सल्टंट्सने प्रस्तावित केलेल्या कॅम्पससाठीचा मास्टर प्लॅन आंतरराष्ट्रीय स्पर्धेनंतर निवडला गेला. 



-विद्यापीठाचे अभ्यागत भारताचे राष्ट्रपती आहेत. कुलपती आणि प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष प्रा.अरविंद पनगरिया आहेत. 

- अभयकुमार सिंग हे कुलगुरू आहेत. 

- हे विद्यापीठ बौद्ध अभ्यास, तत्त्वज्ञान आणि तुलनात्मक धर्मांमध्ये पदव्युत्तर आणि डॉक्टरेट कार्यक्रम देते. 

- भाषा आणि साहित्य; इकोलॉजी आणि पर्यावरणीय अभ्यास; शाश्वत विकास आणि पर्यावरण; आणि, आंतरराष्ट्रीय संबंध आणि शांतता अभ्यास. 

- सध्या 20 हून अधिक देशांतील विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेत आहेत.


- विद्यापीठाने 2014 मध्ये 15 विद्यार्थ्यांची पहिली तुकडी स्कूल ऑफ हिस्टोरिकल स्टडीज आणि स्कूल ऑफ इकोलॉजी अँड एन्व्हायर्नमेंटल स्टडीजमध्ये दाखल केली.

- नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन, जे 2007 पासून या प्रकल्पाशी संबंधित होते, ते पहिले कुलपती आणि तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे पहिले पाहुणे होते.


विद्यापीठाच्या अधःपतनाची कथा :- 

- 1200 च्या सुमारास तुर्की आक्रमक बख्तियार खिलजीने त्याचा नाश केला.

- काही तज्ञांचा असा दावा आहे की या प्रदेशात बौद्ध धर्माच्या अधोगतीबरोबरच या विद्यापीठाचा नैसर्गिक क्षय झाला.  


- इंडियन्स: अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ अ सिव्हिलायझेशन या पुस्तकाचे लेखक नमित अरोरा म्हणतात.

“खिलजीच्या मोहिमेच्या चाळीस वर्षांनंतर, मिन्हाज अल-सिराजच्या पर्शियन अहवालात खिलजीने एका मठाचा नाश केला आणि तेथील भिक्षूंच्या हत्येबद्दल सांगितले. पण ही नालंदा नव्हती. विद्वानांनी या मठाची ओळख नालंदापासून 12 किमी अंतरावर असलेल्या ओदंतपुरी म्हणून केली आहे. त्याचे वर्णन एका तटबंदीच्या शहरात (आता बिहार शरीफ येथे), एक राजकीय आणि आर्थिक केंद्र आहे, आणि म्हणून ते लष्करी लक्ष्य मानले गेले. खिलजी कधीही नालंदाला गेल्याची कोणतीही नोंद नाही, ज्याला राजकीय किंवा आर्थिक आकर्षण नव्हते किंवा ते त्या वेळी धर्माचे भरभराटीचे केंद्र नव्हते,” 


- “एक शतकाहून अधिक काळ, नालंदाला निधी कपातीमुळे त्रास सहन करावा लागला आणि कमी होत गेली, त्यानंतर सेना घराण्याच्या ब्राह्मणी राजांनी सक्रिय केला. 

- खिलजीच्या खूप आधी त्याचे अनेक भिक्षू दक्षिणेतून पळून गेले होते. 

- 1234-36 मध्ये नालंदा अजूनही लंगडत होती, तिला बोधगयाचा राजा बुद्धसेनाने पाठिंबा दिला होता.


- विद्यापीठापासून अवघ्या 60 किमी अंतरावर असलेल्या बक्तियारपूर रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याची मागणी बिहार विधानसभा आणि राज्यसभेतही करण्यात आली आहे.

- बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मात्र बख्तियारपूर हे त्यांचे जन्मस्थान असल्याचे सांगत या मागण्या फेटाळून लावल्या आहेत. 

- “जेव्हा नालंदा विद्यापीठाचा कायदा संसदेत मांडण्यात आला, तेव्हा एका खासदाराने म्हटले होते की प्रसिद्ध विद्यापीठाचा नाश करणाऱ्याने बख्तियारपूरमध्ये तळ ठोकला होता. आता, त्याच ठिकाणी जन्मलेला माणूस नालंदा विद्यापीठाची पुनर्बांधणी करत आहे,” श्री कुमार 2021 मध्ये म्हणाले.


सोमवार, १५ जुलै, २०२४

अमृत ​​योजना | Atal Mission for Rejuvenation and Urban Transformation

 अमृत ​​योजना

- अटल मिशन फॉर रिजुव्हेनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (AMRUT) 25 जून 2015 रोजी देशभरातील 500 निवडक शहरांमध्ये सुरू करण्यात आली ज्यात सुमारे 60% शहरी लोकसंख्या समाविष्ट आहे.



- अटल मिशनचे लक्ष्य मूलभूत पायाभूत सुविधा वाढवणे आणि निवडक शहरांसाठी शहरी सुधारणांची अंमलबजावणी करणे , पाणीपुरवठा, सीवरेज, ड्रेनेज, हिरवीगार जागा, मोटारी नसलेली वाहतूक आणि क्षमता वाढवणे यांचा समावेश आहे.


अमृत ​​2.0 योजना :- 

- ही योजना 1 ऑक्टोबर 2021 रोजी 5 वर्षांच्या कालावधीसाठी म्हणजेच आर्थिक वर्ष  2021-22 पासून ते 2025-26 या कालावधीसाठी AMRUT 1.0 लाँच करून सुरू करण्यात आली.

- देशातील 500 शहरांमधून सुमारे 4,900 वैधानिक शहरांना पाणीपुरवठा करण्याचे सार्वत्रिक कव्हरेज आणि AMRUT योजनेच्या पहिल्या टप्प्यात समाविष्ट असलेल्या 500 शहरांमधील सांडपाणी व्यवस्थापनाचे कव्हरेज हे त्याचे उद्दिष्ट आहे .

AMRUT 2.0 चे उद्दिष्ट :- 

- सिटी वॉटर बॅलन्स प्लॅन (CWBP) विकसित करून प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर, जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन आणि जलसंवर्धन करून पाण्याच्या वर्तुळाकार अर्थव्यवस्थेला चालना देणे हे आहे .

- मिशनमध्ये गैर-महसुली पाण्याची कपात, शहरी नियोजन, शहरी वित्त बळकट करणे इत्यादीद्वारे नागरिकांचे जीवन सुलभ करण्यासाठी सुधारणा अजेंडा आहे.

AMRUT 2.0 चे इतर घटक :- 

- पाण्याचे न्याय्य वितरण, सांडपाण्याचा पुनर्वापर, जलस्रोतांचे मॅपिंग आणि शहरे/नगरांमध्ये निरोगी स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठीपे जल सर्वेक्षण .

- पाण्याच्या क्षेत्रातील नवीनतम जागतिक तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी पाण्यासाठी तंत्रज्ञान उप-मिशन .

- माहिती, शिक्षण आणि दळणवळण (IEC) मोहिमेद्वारे जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यात येते.


AMRUT 2.0 योजनेची स्थिती :-

- AMRUT 2.0 साठी एकूण खर्च रु. मार्च 2023 पर्यंत सुरू असलेल्या प्रकल्पांसाठी 2,99,000 कोटी.

● प्रभाव :- 

- अमृतने महिलांच्या जीवनावर अनेक सकारात्मक परिणाम केले आहेत . 

- पाणी आणण्याचे प्रयत्न कमी झाल्यामुळे महिला आता त्यांच्या वेळेचा अधिक उत्पादनक्षम मार्गाने उपयोग करू शकतात.

- त्यामुळे सुरक्षित पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेमुळे रोगाचा भार कमी झाला आहे.


● आव्हाने :- 

- योजनेची अंमलबजावणी होऊनही, दरवर्षी सुमारे 200,000 लोक अपुरे पाणी, स्वच्छता आणि स्वच्छतेमुळे मरतात .

- असुरक्षित पाणी आणि स्वच्छतेमुळे 2016 मध्ये भारतातील रोगांचा भार चीनच्या तुलनेत प्रति व्यक्ती 40 पट जास्त आहे आणि त्यात थोडीशी सुधारणा दिसून येत आहे.

- NITI आयोगाच्या अहवालात असे सूचित केले आहे की सुमारे 21 प्रमुख शहरे त्यांचे भूजल कमी करतील, 2030 पर्यंत भारतातील 40% लोकसंख्येला पिण्याचे पाणी उपलब्ध होणार नाही.

- जवळपास 31% शहरी भारतीय कुटुंबांमध्ये पाईपद्वारे पाण्याचा अभाव आहे तर 67.3% पाईप सीवरेज सिस्टीमला जोडलेले नाहीत.


अंमलबजावणीतील आव्हाने :- 

● राज्य प्रकल्प :-

- नियमित निधी रिलीज असूनही, बिहार आणि आसाम सारख्या राज्यांनी अद्याप प्रकल्प पूर्ण करणे किंवा PPP मॉडेलचा वापर करणे बाकी आहे , परिणामी बहुतेक राज्यांमध्ये 50% पेक्षा कमी अंमलबजावणी पूर्ण झाली आहे.

● व्याप्ती :-

- योजनेमध्ये सर्वांगीण दृष्टिकोनाऐवजी प्रकल्प-केंद्रित दृष्टीकोन समाविष्ट आहे.

- AMRUT आणि स्वच्छ भारत मिशन सारख्या इतर योजनांमधील ओव्हरलॅपमुळे निधी वाटपाची आव्हाने आणि विशिष्ट नागरी समस्यांचे निराकरण करण्यासाठी कामाचा ताण वाढू शकतो.

- अमृत 2.0 केवळ पाणी आणि सीवरेजमध्ये स्थलांतरित झाल्यापासून हवेच्या गुणवत्तेचा बिघाड कायम राहिल्याने राष्ट्रीय स्वच्छ वायु कार्यक्रम सुरू करण्यात आला, ज्यामुळे AMRUT 1.0 मधील हवेच्या गुणवत्तेचे प्रश्न सोडवले गेले.

- स्थानिक प्रकल्प राबविण्यासाठी आर्थिक संसाधनांमध्ये विविधता आणणे आवश्यक आहे .

- सर्वांगीण दृष्टीकोन : हवामानातील बदल , पर्जन्यमानाचे स्वरूप आणि विद्यमान पायाभूत सुविधा लक्षात घेता , शहरी जल व्यवस्थापनाने विकसित होत असलेल्या आव्हानांना सामोरे जावे.


- या योजनेसाठी निसर्गावर आधारित उपाय आणि लोककेंद्रित दृष्टीकोन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना सशक्त बनवणारी सर्वसमावेशक कार्यपद्धती आवश्यक आहे.

- सामुदायिक सहभाग: स्वयंसेवी संस्था आणि निवासी संघटनांसह सामुदायिक गटांच्या सहभागाला प्रोत्साहन देणे , तळागाळातील लोकांकडून कल्पना आणि अभिप्राय मागवून गृहनिर्माण योजनांची परिणामकारकता वाढवू शकते.

- ज्या यशस्वी केस स्टडीजमध्ये स्वच्छता आणि स्वच्छता लक्षणीयरीत्या सुधारली गेली आहे , त्यांचा अभ्यास करणे गृहनिर्माण उपक्रमांमधील समान आव्हानांना तोंड देण्यासाठी मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करू शकते.

- उदाहरणार्थ, डहाणू तालुक्यात “ सर्वांसाठी पाण्याची उपलब्धता” उपक्रमाचा उद्देश स्थानिक आदिवासी समुदायांना पिण्यायोग्य पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हा आहे.

- आरोग्य आणि गृहनिर्माण समस्यांशी संबंधित उद्योग-विशिष्ट संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी नाविन्यपूर्ण केंद्रे स्थापन केल्याने नाविन्यपूर्ण उपाय आणि तंत्रज्ञानाला चालना मिळू शकते.

मंगळवार, ९ जुलै, २०२४

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग | National Commission for Backward Classes

 राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग (NCBC)

National Commission for Backward Classes




NCBC म्हणजे काय?

- 102 वा घटना दुरुस्ती कायदा, 2018 राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला (NCBC) घटनात्मक दर्जा प्रदान करतो.

- सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांबाबतच्या तक्रारी आणि कल्याणकारी उपाय तपासण्याचे अधिकार आहेत.

- पूर्वी NCBC ही सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत एक वैधानिक संस्था होती.


NCBC ची पार्श्वभूमी काय आहे?

- काका कालेलकर आणि बीपी मंडल यांच्या अंतर्गत अनुक्रमे 1950 आणि 1970 मध्ये दोन मागासवर्गीय आयोग नेमण्यात आले.


- काका कालेलकर आयोग हा पहिला मागासवर्ग आयोग म्हणूनही ओळखला जातो.

- 1992 च्या इंद्रा साहनी प्रकरणात, सुप्रीम कोर्टाने लाभ आणि संरक्षणाच्या उद्देशाने विविध मागासवर्गीयांचा समावेश आणि वगळण्यासाठी मनोरंजन, तपासणी आणि शिफारस करण्यासाठी कायमस्वरूपी संस्था तयार करण्याचे निर्देश सरकारला दिले होते.

- या निर्देशांनुसार संसदेने 1993 मध्ये राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग कायदा मंजूर केला आणि NCBC ची स्थापना केली.

- मागासवर्गीयांच्या हिताचे अधिक प्रभावीपणे रक्षण करण्यासाठी 2017 ची 123 वी घटना दुरुस्ती विधेयक संसदेत सादर करण्यात आले.

- राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग कायदा, 1993 रद्द करण्यासाठी संसदेने एक वेगळे विधेयक देखील मंजूर केले आहे, त्यामुळे 1993 चा कायदा विधेयक मंजूर झाल्यानंतर अप्रासंगिक झाला.

- ऑगस्ट 2018 मध्ये या विधेयकाला राष्ट्रपतींची संमती मिळाली आणि NCBC ला घटनात्मक दर्जा मिळाला.


NCBC ची रचना काय आहे?

- आयोगामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि अध्यक्षांनी त्यांच्या हाताने आणि नियुक्त केलेल्या इतर 3 सदस्यांसह 5 सदस्यांचा समावेश आहे.

- अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इतर सदस्यांच्या सेवाशर्ती आणि पदाचा कार्यकाळ राष्ट्रपतीद्वारे निश्चित केला जातो.


NCBC बाबत घटनात्मक तरतुदी काय आहेत?

- कलम 340, इतर गोष्टींबरोबरच "सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांना ओळखणे", त्यांच्या मागासलेपणाच्या परिस्थिती समजून घेणे आणि त्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शिफारसी करणे आवश्यक आहे.

- 102 व्या घटना दुरुस्ती कायद्याने नवीन कलम 338 B आणि 342 A समाविष्ट केले.

- या दुरुस्तीमुळे कलम 366 मध्ये बदल करण्यात आले आहेत.

- अनुच्छेद 338B NCBC ला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांच्या तक्रारी आणि कल्याणकारी उपाय तपासण्याचे अधिकार प्रदान करते

- कलम 342 अ राष्ट्रपतींना विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग निर्दिष्ट करण्याचा अधिकार देते.

- ते संबंधित राज्याच्या राज्यपालांशी सल्लामसलत करून हे करू शकतात.

- मात्र, मागासवर्गीय यादीत सुधारणा करायची असल्यास संसदेने तयार केलेला कायदा आवश्यक असेल.


NCBC चे अधिकार आणि कार्ये काय आहेत?

- आयोग सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी संविधानात किंवा इतर कोणत्याही कायद्यांतर्गत अशा संरक्षणाच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी प्रदान केलेल्या सुरक्षेशी संबंधित सर्व बाबींची चौकशी आणि देखरेख करतो.

- हे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी आणि केंद्र आणि कोणत्याही राज्याच्या अंतर्गत त्यांच्या विकासाच्या प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी सहभागी होते आणि सल्ला देते.


- ते राष्ट्रपतींना, दरवर्षी आणि आयोगाला योग्य वाटेल अशा वेळी, त्या सुरक्षा उपायांच्या कार्याचा अहवाल सादर करते. 

- राष्ट्रपतींनी असे अहवाल संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर ठेवले.

- असा कोणताही अहवाल किंवा त्याचा कोणताही भाग, कोणत्याही राज्य सरकारशी संबंधित असलेल्या कोणत्याही बाबीशी संबंधित असल्यास, अशा अहवालाची प्रत राज्य सरकारकडे पाठवली जाईल.

- NCBC ला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांचे संरक्षण, कल्याण आणि विकास आणि प्रगती यांच्या संदर्भात अशी इतर कार्ये पार पाडावी लागतील, जसे की, संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदींच्या अधीन राहून, नियमाने निर्दिष्ट केले आहे.

- खटला चालवताना त्याला दिवाणी न्यायालयाचे सर्व अधिकार आहेत.


नवीन आयोग त्याच्या मागील आवृत्तीपेक्षा कसा वेगळा आहे?

- नवीन कायद्याने हे मान्य केले आहे की ओबीसींना आरक्षणासोबतच विकासाचीही गरज आहे. 

- सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय (SEBC) विकासासाठी अधिनियमात तरतूद आहे आणि विकास प्रक्रियेत नवीन NCBC ची भूमिका आहे.

- मागासवर्गीयांच्या तक्रार निवारणाचे अतिरिक्त कार्य नवीन NCBC वर सोपवण्यात आले आहे.

- अनुच्छेद 342(A) अधिक पारदर्शकता आणते कारण मागासलेल्या यादीत कोणताही समुदाय जोडण्यासाठी किंवा हटवण्यासाठी संसदेची संमती घेणे अनिवार्य केले आहे.

- यादी-समावेश आणि आरक्षणाव्यतिरिक्त, प्रत्येक समुदायाचा सर्वसमावेशक आणि सर्वांगीण विकास आणि विकास आणि कल्याणाच्या सर्व मापदंडांमध्ये समानतेच्या दिशेने प्रगती करणे आवश्यक आहे.


अंतर्निहित समस्या काय आहेत?

- राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची नवीन आवृत्ती विश्वासार्ह आणि प्रभावी सामाजिक न्याय संरचना प्रदान करण्याची शक्यता नाही असे मानले जाते.

- नवीन NCBC ची शिफारस सरकारवर बंधनकारक नाही.

- मागासलेपणाची व्याख्या करण्याची कोणतीही जबाबदारी नसल्यामुळे, विविध जातींचा ओबीसी म्हणून समावेश करण्याच्या मागणीचे सध्याचे आव्हान ते हाताळू शकत नाही.

- NCBC चे जुने जेनेरिक नाव कायम ठेवून आणि शरीराला त्याच्या आत्म्यापासून वेगळे करून (अनुच्छेद 340), सरकारने संविधानाच्या अंतर्गत विशेष संरक्षणाची संपूर्ण योजना धोक्यात आणली.

- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तज्ञ संस्थेची वैशिष्ट्ये नवीन NCBC च्या रचनेत प्रदान केलेली नाहीत.

- केवळ संवैधानिक दर्जा आणि अधिक कृतींनी तळागाळातील समस्या सुटणार नाहीत कारण अलीकडील डेटामध्ये SC/ST आणि OBC श्रेणींचे  प्रतिनिधित्व दिसून आले आहे.

- अनुच्छेद 338B (5) NCBC च्या सल्लामसलत करून मागासवर्गीय यादीच्या नियतकालिक पुनरावृत्तीच्या अनुसूचित जातीच्या आदेशावर मौन आहे.


पुढे जाण्याचा मार्ग काय असू शकतो?

- रचना SC ने अनिवार्य केलेल्या तज्ञ संस्थेचे वैशिष्ट्य प्रतिबिंबित केली पाहिजे.

- सरकारने जाती जनगणनेचे निष्कर्ष आणि आयोगाच्या शिफारशींची माहिती सार्वजनिक डोमेनमध्ये ठेवली पाहिजे.

- आयोगाची रचना लैंगिक संवेदनशीलता आणि भागधारकांचे प्रतिनिधित्व प्रतिबिंबित करते.

- व्होट बँकेच्या राजकारणाने मूल्याधारित राजकारणाला वाव दिला पाहिजे जेणेकरून समाजातील खऱ्या अर्थाने मागासलेल्या घटकांनाच आरक्षणाचा लाभ मिळेल.

बुधवार, ३ जुलै, २०२४

Mazil Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री 'माझी लाडकी बहीण’ योजना

 मुख्यमंत्री 'माझी लाडकी बहीण’ योजना 


- मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी सोमवार 1 जुलै 2024 पासून अर्ज करता येणार आहेत.

-  प्राप्त अर्जांची पडताळणी अंगणवाडी पर्यवेक्षक, प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका करतील. ग्रामसेवक देखील अर्जांची पडताळणी करू शकतात. 

- त्यांनंतर अर्ज आमच्याकडे आल्यावर यादी अंतिम करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली जाईल. 

- जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती लाभार्थींची अंतिम यादी जाहीर करेल आणि त्यांना लाभ मिळेल.


अर्ज भरण्याची सुविधा :- 

- अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, ग्रामपंचायत व महापालिकेचे वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्र व महा- इ- सेवा केंद्रे येथे पात्र महिलांना योजनेचा अर्ज भरता येणार आहे. 

- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अॅपद्वारे/सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाइन भरले जाऊ शकतात. 

- पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. ज्या महिलेस ऑनलाइन अर्ज सादर करता येत नसेल, त्याच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, ग्रामपंचायत/ वॉर्ड/ सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील. भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात / बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, सेतू सुविधा केंद्रांमध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाइन प्रविष्ट केला जाईल. 

- अर्ज भरण्याची प्रक्रिया विनामूल्य राहील, असे आदेशात शासन निर्णयात नमूद आहे.


योजनेचे स्वरुप :- 

- प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) सक्षम बँक खात्यात दरमहा रु.1,500 इतकी रक्कम दिली जाईल. 

- तसेच केंद्र/राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेव्दारे रु. 1,500 पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेव्दारे पात्र महिलेस देण्यात येईल.


योजनेचे लाभार्थी :-

- महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.


लाभार्थ्यांची पात्रता :-

● लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.

● राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.

● किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत.

● सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.

● लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु. 2,50,000 पेक्षा जास्त नसावे.


अपात्रता :-

● ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. 2,50,000 रुपयांपेक्षा अधिक आहे.

● ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.

● ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत.

● सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेव्दारे रु. 1,500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल.

● ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे.

● ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.

● ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे.

●ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत. सदर योजनेच्या "पात्रता" व "अपात्रता" निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेवून शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल.


अर्ज भरण्याची प्रक्रिया :- 

- अर्ज करण्याची सुरुवात : 1 जुलै

- अर्ज करण्याची शेवट तारीख : 15 जुलै

- प्रारूप निवड यादी प्रकाशित : 16 ते 20 जुलै

- प्रारूप यादीवर हरकत, तक्रार करणे: 21 ते 30 जुलै

- लाभार्थी अंतिम निवड यादी प्रकाशित: 1 ऑगस्ट

- लाभ देण्यास सुरुवात : 14 ऑगस्टपासून


आवश्यक कागदपत्रे :- Mazil Ladki Bahin Yojana Required Documents (List of Documents) 

● आधार कार्ड आवश्यक

● राज्याचे अधिवास प्रमाणपत्र अथवा राज्यातील जन्म दाखला

● बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत

● पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्ड

● योजनेच्या अटी-शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

● अर्ज दाखल करताना अर्जदार महिला प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक




● मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये खालील बदल करण्यात आले आहेत 


¶ 5 एकर जमिनीसाठी असणारी अट काढून टाकण्यात आली आहे.


¶ वयोमर्यादा 60 वरून 65 करण्यात आली आहे.


¶ अर्ज भरण्यासाठी ची मुदत 31 ऑगस्ट करण्यात आली आहे.

 


लागणारी कागदपत्रे, 

¶ 15 वर्षे पूर्वीचे मतदान ओळखपत्र,पिवळे व केशरी रेशनकार्ड धारकांना उत्पन्नाचा दाखल्याची आवश्यकता नाही.


¶ जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड , आधार कार्ड,बँक खाते पासबुक पहिल्या पणाची झेरॉक्स,फोटो, हमीपत्र.


आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका यांच्या कडे सुद्धा  ' नारीशक्ती दुत ' ॲप देण्याची प्रक्रिया सुरू आहे , लवकरच त्यांच्याकडे सुद्धा नोंदणी करता  येणार आहे


● " तलाठी कार्यालयातून मिळवावे लागणारे दोन्ही दाखले आता लागणार नसल्याने आपल्या घराशेजारील सेंटर मध्ये जावून नोंदणी करता येणार आहे."

Shaarad Sir

उर्मिला

  उर्मिला... रामायण माहीत असत, पण उर्मिला नक्की कोण हेच काही जणांना माहीत नसतं... जेव्हा कळतं तेव्हा काय तर लक्ष्मणाची पत्नी एवढंच... एखादी ...