गोष्टी माणसांच्या
सुधा मूर्ती
अनुवाद :- लीला सोहोनी
लाल भाताची कणगी ह्या कथेत लेखिका दान देताना जे अपल्या कडे सर्वोत्तम आहे तेच द्यावं. दान स्वीकारणाऱ्याना परावलंबी आणि असहाय बनवू नका. श्रीमंत लोकांपेक्षा मध्यम वर्गीय आणि कनिष्ठ लोकच सढळ हाताने मदत करत असतात हे लक्षात घ्या.
मोठी माणसं किती साधी असतात त्यांचा कामाचा झपाटा कसा विलक्षण असतो ही बाब श्री अब्दुल कलाम या गोष्टीतून अनुभवायस येत.
" साधं राहणं ही काय साधी गोष्ट नाही याची प्रचिती येते."
खरा दागिना या कथेत शिक्षण किती महत्वाचे असते आणि त्याची खरी किंमत अडाणी माणसांनाच असते. खरा दागिना म्हणजे काय नक्की तो कसा असतो. हे कळत आणि पुरुष सुशिक्षित झाला तर फक्त तोच सुशिक्षित होतो परंतु स्त्री सुशिक्षित झालीं तर ती संपूर्ण कुटुंब सुशिक्षित करते.
जे आर डी या गोष्टीत टेल्को कंपनी त्यामधली मुलाखत आणि जे आर डी यांना पाठवलेले तक्रार पत्र यांची माहिती अत्यंत मनोरंजन पद्धतीने मांडली आहे. जे आर डी स्वतः जेव्हा नारायण मूर्ती येईपर्यंत सुधा मूर्ती सॊबत वाट पाहत उभे राहतात. तेव्हा त्यांच्यातील साधेपणा ठळकपणे जाणवतो.
सुधा मूर्तींना नवीन कंपनी सुरू करताना जे आर डी नी दिलेला संदेश अमूल्य आहे.
परीक्षा आणि परीक्षेतील मार्क महत्वाचे असतं नाहीत तर तुमची नीतिमूल्ये आणि त्यांचा तुम्ही जीवनात केलेला वापर हे महत्त्वाचं असत. ए फॉर ए ग्रेड नाही तर ए फॉर ऑनेस्टी हे छानपणे सांगितलं आहे.
आपण ज्या समाजामध्ये वाढलो त्या समाजाचं आपण काही तरी देणं लागतो. माणसाने समाजाचं ऋण परत करावं. हा उदात्त विचार सुधा मूर्तींना कसा आणि कोणामुळे सुचला हे " अम्मा, हे तुझं कर्तव्य नाही का ? या गोष्टी मधून त्यांनी उत्तम पणे मांडलय.
इतरांच्या कल्याणासाठी आपण कितीही वेदना सहन करण्याची ताकद ठेवली पाहिजे. स्वतःच्या आधी इतरांचा विचार हा गाभा ह्या गोष्टीतून व्यक्त होतो ... ' अॅनेस्थेशियाची कथा '
अनुभव हा माणसाचा सर्वात मोठा शिक्षक असतो.
अनुभवाने मिळणारे ज्ञान हे कोणत्याही शाळा कॉलेजात मिळत नाही. ते संपादन करण्यासाठी किती तरी वर्ष जावी लागतात. त्यामुळे वडीलधाऱ्या मंडळींचा सल्ला आपण घ्यायला हवा. तो जीवनात गरजेचा असतो ते ' वाटणी ' या कथेतून उत्तमपणे सांगितलं आहे.
सुधा मूर्ती यांची लेखन शैली अत्यंत सरळ, हलकी फुलकी, मनोरंजक आहे. नैतिक मूल्यांचे संदेश छोट्या छोट्या गोष्टींमधुन दिले आहेत.
वाचकाला या कथा वाचताना गुंतवून टाकतात. नारायण मूर्तींची भेट ,त्यांचं स्वप्न तसेच त्यांची बदललेली भूमिका यांबाबतची ही गोष्ट आहे.
वाचन माणसाला समृद्ध करत जात हे आपल्या आजोबांच म्हणणं आणि त्यासाठी खेड्यामध्ये वाचनालय उघडणे.
आपली स्वप्ने पूर्ण करण्याची उर्मी , नैतिकता किती महत्वाची असते. समाधान आणि तृप्ती असणं हे गरजेचं असत. या सगळ्या बद्दल ह्या माणसांच्या गोष्टी खूप काही सांगतात...
एकदा वाचावयास हवं असं पुस्तक ....