बुधवार, ४ मे, २०२२

The Growing Popularity of Southern Films / दाक्षिणात्य चित्रपटांची वाढती लोकप्रियता...

              हिंदी चित्रपट आणि दाक्षिणात्य चित्रपट यांमध्ये पाहिलं तर सध्या दाक्षिणात्य चित्रपटांकडे लोकांचा ओढा असलेला दिसून येतो. हिंदी चित्रपटांन पेक्षा तरुण वर्ग सध्या दाक्षिणात्य चित्रपट पाहायला आपला वेळ देतोय....

           बाहुबली , बाहुबली 2 , पुष्पा , RRR , KGF2 , हे चित्रपटांनी बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातन मध्ये पाहिलं तर मनोरंजनाचा तडका जबरदस्त आहे. हे चित्रपट भव्य आणि दिव्य करण्यासाठी खूप मेहनत घेतलेली जाणवत राहते. त्याबरोबरच काही कारणे आपण पाहू की ज्यामुळे प्रेक्षकवर्ग दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळला...

कारणे....

1. सामान्य माणसाला मनोरंजन हवं असत आणि ते जर लार्जर दॅन लाईफ असेल तर प्रेक्षकांना ते आवडत. माणूस आपल्या जीवनाच्या समस्यां बाजूला ठेऊन आनंद मिळवण्यासाठी सिनेमा पाहायला जात असतो. हिंदी चित्रपटात सध्या तोच तो पणा येतोय आणि ह्या कहाण्या पाहून प्रेक्षक कंटाळला आहे. 

2. दाक्षिणात्य चित्रपटात साधी कहाणी खूप मनोरंजन पद्धतीने मांडली जाते. तो चित्रपट बनवताना वेगवेगळ्या बाजूनी मेहनत घेतलेली जाणवते. 

3. भारतीय संस्कृती बरोबरच स्थानिक प्रथा परंपरा याची योग्य गुंफण असते. कथेत आपली संस्कृती पाहून प्रेक्षक सुखावतो. विनाकारण प्रबोधनाचे डोस दाक्षिणात्य चित्रपटात पाजले जात नाहीत. 

4. वैचारिक चित्रपट म्हणून काही चित्रपट ठीक आहेत पण तुम्ही उठ सूट त्याचाच मारा करता असाल तर प्रेक्षक वैतागतो त्याला मनोरंजन हवं असत निखळ मनोरंजन आणि तेच जर तुम्ही देण्यात कमी पडत असाल तर तो तुमच्याकडे पाठ फिरवतो. अशीच गत सध्या हिंदी चित्रपटांची झालेली आहे. पण दाक्षिणात्य चित्रपटात त्याला वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. त्यामुळे त्याचा ओढा तिकडे आहे. 

5. हिंदी चित्रपटांमध्ये राबवला जाणारा अजेंडा लोकांच्या लक्षात येऊ लागला आहे. आधुनिकतेच्या नावाखाली काही ही दाखवण्याचा अट्टहास प्रेक्षकांना आवडेनासा झाला आहे. एकत्रित कुटुंब व्यवस्था , नातेसंबंध या याबाबत हिंदी चित्रपटात टोकाची भूमिका मांडलेली असते आणि याउलट दाक्षिणात्य चित्रपटात गाव , परिवार , प्रथा , परंपरा आणि नात्यांची गुंफण अशी काही केलेली असते की चित्रपट पाहताना मनोरंजना बरोबरच संस्कृती जपल्याचा आनंद ही होतो....

6. नवनवीन कथा , त्याचे संदर्भ , ते पडद्यावर दाखवताना वापरलेल नवनवीन तंत्रज्ञान यांमुळे हे चित्रपट एका वेगळ्या पातळीवर प्रेक्षकांना घेऊन जातात. डान्स च्या स्टेप्स , डायलॉग , संगीत , चित्रपटाचे चित्रण या सगळ्या बाबतीत दाक्षिणात्य चित्रपटांचं कौतुक करावंसं वाटतं. त्यामुळेच भारतातच नव्हे तर जगात सुद्धा ' पुष्पा ' चे डायलॉग फेमस होतात आणि डान्स स्टेप्स व्हायरल होतात. त्यावर लाखो लोक रील बनवतात. 

          दाक्षिणात्य चित्रपटांचं कौतुक करताना हिंदी चित्रपटाना नाव ठेवण हा उद्देश नाही आहे पण नक्की प्रेक्षकवर्ग हिंदी कडून या चित्रपटानकडे का वळतोय हे ही पाहणं गरजेचं आहे. तोच प्रेक्षक आपल्या कडे कसा येईल याचा विचार बॉलीवूडने करण्याची गरज आहे. 

          हिंदी चित्रपट सृष्टीने हे समजून घेतल पाहिजे की जे उत्तम असेल तिकडेच लोकांचा ओढा असेल. काही तरी वाद करून , वेगळीच विधाने करून लोकांचं लक्ष आपल्या कडे वेधण्यापेक्ष्या आपल्या चित्रपटांची गुणवत्ता वाढवत नेणच गरजेचं आहे. 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Shaarad Sir

उर्मिला

  उर्मिला... रामायण माहीत असत, पण उर्मिला नक्की कोण हेच काही जणांना माहीत नसतं... जेव्हा कळतं तेव्हा काय तर लक्ष्मणाची पत्नी एवढंच... एखादी ...