सोमवार, १० एप्रिल, २०२३

Money : Owner or Slave पैसा गुलाम की मालक

 पैसा हा हुशार माणसाचा गुलाम आणि मूर्खांचा मालक असतो का? याबाबत विचार करूया. 



How to use money


         आपल्या शिक्षणाची सुरुवात लहानपणासुन होते. त्यात शाळा खूप महत्त्वाची भूमिका बजावते. शाळेत आपण खूप साऱ्या गोष्टी शिकतो. भाषा, गणित, इतिहास, विज्ञान असे भरपूर विषय शिकतो. पण सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आपल्याला दैनंदिन जीवनात खूप महत्त्वाचा असतो तो म्हणजे पैसा कमावणे आणि तो वापरणे. पण तोच विषय आपल्याला शाळेत शिकवला जात नाही. 

          सामाजिक , शैक्षणिक , भावनिक , राजकिय शिक्षणाबरोबर आत्ताच्या काळात आर्थिक शिक्षण हे खूप महत्त्वाचे आहे. पैसा कमावणे आणि तो वापरणे हे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला पैसा वापरता आला नाही तर कितीही पैसा मिळाला तरी तुम्ही श्रीमंत राहणार नाही तर काही वर्षात पुन्हा गरीब होतान. म्हणूनच पैसा कमवण्याबरोबरच तो वापरायलाही शिका.


         श्रीमंत आणि गरीब यामध्ये नक्की कोणता फरक असतो ? विचार केला आहे का ? तर तो म्हणजे तुमची पैसा कमावण्याची क्षमता. ज्याची क्षमता अधिक तो अधिक पैसा कमावतो आणि ज्याची क्षमता कमी त्याच्या कडे कमी पैसा असतो. श्रीमंत, गरीब , मध्यम वर्ग असे गट पडतात ते यामुळेच.

          लक्षात ठेवा तुम्ही पैसा मिळवण्याचं कौशल्य शिकला की तुम्ही श्रीमंती कडे वाटचाल करू लागता. हीच तुमची खरी संपत्ती असते. हे ज्याला समजत तो स्वतः काम करत नाही तर पैशाला कामाला लावतो. पैसा त्याच्यासाठी काम करतो. ज्याकडे हे कौशल्य नसत तो आयुष्यभर पैशासाठी काम करतो.

          तुम्ही कोणतेही काम करत असा. नोकरी , व्यवसाय हे करत असताना त्या क्षेत्रात अधिक चांगल कसं करता येईल या साठी प्रयत्न करत राहा. नवनवीन शिकत राहा. आज जे काही काम तुम्ही केलं, त्यापेक्षा जास्त आणि चांगलं काम मी उद्या कसं करीन ह्याचा विचार रोज करत राहा.

             हे सगळं करण्यासाठी काय करावं लागेल ते पहा. मला अधिक काय नवीन शिकून घेता येईल याचा विचार करा.  स्वतःची पैसे कमावण्याची क्षमता वाढविण्यासाठी एखादं कौशल्य शिकून घ्या. हळू हळू तुमची हे कौशल्य वाढत जाईल. जे काही कराल ते सर्वोत्तम करण्यासाठी जीव ओता आणि पहा चमत्कार. तुमची संपत्ती वाढत वाढत जाईल. 


           हुशार माणसं पैशाला कामाला लावतात ते त्याला आपला गुलाम बनवतात. हे करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर आपण एक्सपर्ट बनलं पाहिजे. त्यासाठी पुस्तके , युट्युब , इंटरनेट , माहितीपर ब्लॉग याची मदत घ्या शिका. ज्ञान वाढवत न्या. एखादा उपयुक्त कोर्स शिका त्यासाठी जे काही पैसे लागतील ते द्या. या जगात फुकट काहीच मिळत नाही. शिकण्यात इन्व्हेस्टमेंट करा ती कायम अधिक फायदा देते. 
​

            मूर्ख लोक पैसा गुंतवणूक करत नाहीत. पण खर्च फालतू गोष्टी वर करतात. त्याचा योग्य वापर करत नाहीत. मोठी स्वप्न पहायची पण ती पूर्ण करण्यासाठी कोणतीही कार्यवाही करायची नाही. मग कसे होणार तुमचं. 


 स्वतः सक्षम व्हा. आर्थिक तज्ञांच्या मतानुसार तुम्ही तुमच्या उत्पन्नाच्या 5 % हिस्सा तुमच्या स्वतःसाठी खर्च केला पाहिजे. त्यात नवनवीन कौशल्य शिकणं.


        आपल्या क्षेत्रात अपडेट राहणं नवीन आयडिया शोधन यासाठी त्याचा वापर करावा. ज्या गोष्टी आपल्याला येत नाहीत त्या तज्ञ लोकांकडून शिकल्या पाहिजेत. त्यासाठी कष्ट करा. आपली क्षमता वाढवत राहा. स्वतःला सिद्ध करा.


            माझ्याकडे पैसा आला की मी मला पाहिजे ते करीन असं मूर्ख लोक म्हणतात पण असं होतं नसत कधीच तर लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही काही तरी कराल तेव्हाच तुमच्या कडे पैसा येईल.हीच तुमची खरी संपत्ती आहे. तुम्ही तुमच्या क्षमता ओळखा आणि त्याच्यावर काम करायला सुरुवात करा. जेव्हा हे तुम्ही कराल तेव्हा तुम्हांला पैशाच्या पाठीमागे धावावं लागणार नाही. तर तोच तुमच्या पाठीमागे धावत येईल.

 
        आर्थिक साक्षर जी लोक असतात ती पैशाला गुलाम बनवून हवं ते मिळवतात आणि मूर्ख लोक पैशाचे गुलाम होतात.

 
       आता सर्वस्वी प्रश्न तुमचा आहे तुम्हांला पैशाचं गुलाम व्हायचंय का त्याला तुमचा गुलाम करायचय.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Shaarad Sir

उर्मिला

  उर्मिला... रामायण माहीत असत, पण उर्मिला नक्की कोण हेच काही जणांना माहीत नसतं... जेव्हा कळतं तेव्हा काय तर लक्ष्मणाची पत्नी एवढंच... एखादी ...