जगमोहन रेड्डी एक अफलातून माणूस ....
2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकाच वेळी चंद्राबाबू नायडू यांना धूळ चारून जगमोहन रेड्डी यांनी आंध्रप्रदेश जिंकला. मुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय सुद्धा खूप चर्चेत राहिले आहेत. शिवाय लोकप्रियता ही वाढत असलेली दिसत आहे.
त्यांचं पूर्ण नाव येडुगुरी संदिंती जगनमोहन रेड्डी उर्फ जगन हे सध्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत कारण ही तसच आहे. त्यांनी आपलं सगळं मंत्रिमंडळ बरखास्त करून टाकलं आहे. जगन रेड्डी यांनी हा निर्णय का घेतलाय ? किव्हा ते असे निर्णय का घेतात ? नक्की या पाठीमागे काय कारण आहे ते आपण समजून घेऊ या..
जगमोहन यांचे वडील YSR जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा जगमोहन रेड्डी हे आपल्या व्यवसायात गुंतलेले होते.
पण जेंव्हा 2 सप्टेंबर 2009 ला YSR यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला तेव्हा जगमोहन रेड्डी यांना धक्का बसला. ज्या काँगेस पक्षासाठी YSR यांनी आपल जीवन खर्ची घातलं त्या काँग्रेस ने पुढे YSR यांचा पर्याय म्हणून त्यांच्या मुलाला म्हणजेच जगमोहन रेड्डी यांना नाकारल.
जगमोहन रेड्डी आणि काँग्रेस यांच्यामध्ये कटुता निर्माण झाली. पुढे जगमोहन हे काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी आपल्या वडिलांच्या नावानेच 2011 ला ' YSR काँग्रेस ' हा नवीन पक्ष काढला. पण त्या वेळी केंद्रात काँग्रेसची सत्ता होती. काँग्रेस ने त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. जगमोहन यांच्या बाबतीत सुडाचं राजकारण सुरू झालं.
2012 मधील मे महिन्यात जगमोहन वर CBI चा छापा पडला. बेनामी संपत्तीच कारण दाखवून जगमोहन यांना अटक करण्यात आली. तसेच त्यांना 16 महिने तुरुंगात राहावं लागलं. 16 महिन्यांनी ते तुरुंगाबाहेर आले.
तुरुंगात असताना सुद्धा हे गप्प बसले नाहीत तर त्यांनी तेलंगणा च्या विरोधात उपोषण केलं. हा मुद्धा आंध्रप्रदेश मध्ये खूप गाजला. जगमोहन रेड्डी चर्चेत आले. तुरुंगातुन बाहेर आल्यावर जगमोहन यांनी आपला पक्ष बांधला. निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली.
केंद्रात सत्तांतर झालं होतं काँग्रेस सत्तेतून बाहेर फेकली गेली होती आणि मोदी सरकार स्थापन झाले होते.
आंध्रप्रदेशात 2014 च्या निवडणुकीत त्यांना यश मिळालं नाही. पण ते निराश झाले नाहीत. त्यांनी 2019 ची तयारी सुरू केली. पक्षबांधणी कडे लक्ष दिलं. जनभावना समजून एक एक पाऊल टाकलं. त्यासाठी त्यांनी नोव्हेंबर 2017 रोजी प्रजा संकल्प यात्रा या नावाने 3,000 किमी लांबीची वॉकथॉन सुरू केली. जवळ जवळ अक्खा आंध्र त्यांनी पायाखाली घातला त्यांच्या या पायी यात्रांना भरपूर प्रतिसाद मिळला. वडिलांच्या पायावर पाय ठेवत त्यांनी शेतकरी, कामगार , गरीब यांच्याशी जवळीक साधली. त्यामुळे हजारोंच्या संख्येने लोक यामध्ये सहभागी होऊ लागले. जगमोहन यांचं नेतृत्व तावूनसुलाखून निघालं.
पुढे 2019 च्या निवडणूका आल्या आणि या वेळी जगमोहन यांनी बाजी मारली. आंध्र मधील 175 आमदारांन मध्ये जगमोहन यांच्या पक्षाने 151 जागा जिंकल्या. तसेच लोकसभेत ही 25 खासदार मध्ये 22 जागा त्यांनी जिंकल्या. आपले 22 खासदार त्यांनी लोकसभेत पाठवले.
काही अफलातून निर्णय....
1. आंध्रप्रदेश ला 5 उपमुख्यमंत्री :-
मुख्यमंत्री म्हणून त्यांची लोकप्रियता वाढतच गेली. मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांनी आणखी एक धक्का दिला तो म्हणजे त्यांनी एकदाच 5 उपमुख्यमंत्री जाहीर करून टाकले. ज्यांनी ज्यांनी त्यांना मदत केली त्यांना त्यांनी न्याय दिला तसेच सगळ्यांना खुश करून राजकारण साधलं.
2. चंद्राबाबू सरकारचे काही निर्णय रद्द :-
चंद्राबाबू यांच्या काळातील खूप निर्णय त्यांनी बदलून टाकले. हळू हळू त्यांनी लोकप्रियता वाढच गेली.
3. राज्याला तीन राजधान्या हा विचार:-
एक धडाकेबाज निर्णय म्हणजे त्यांनी आंध्रप्रदेश या राज्याला त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या धर्तीवर तीन राजधान्या असाव्यात अशी चर्चा सुरू केली.
4. एकाच वेळी 13 जिल्ह्याची निर्मिती :-
एकाच वेळी आंध्रप्रदेशात 13 नवीन जिल्ह्याची निर्मिती केली. एका जिल्ह्याची निर्मिती करायची म्हंटल तरी किती आंदोलने होतात. मोर्चे निघतात. मतमतांतरे होतात. पण जगमोहन यांनी एका झटक्यात 13 जिल्हे निर्माण केले.
5. सरकारच्या मध्यावधी काळात पूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त:-
सरकार जेव्हा अर्धा कार्यकाळ पूर्ण करेल तेव्हा सगळं मंत्रिमंडळ बदलण्यात येईल आणि नवीन मंत्रिमंडळ निर्माण केलं जाईल हा शब्द त्यांनी दिला होता तो त्यांनी पाळला आहे.
जगमोहन रेड्डी हे कष्ट करतच पुढे आलेले आहेत. ते जेव्हा गरज लागेल तेव्हा ते मोदी सरकारला पाठिंबा देतात त्यामुळे त्यांचे आणि केंद्र सरकारचे संबध चांगले आहेत त्यामुळे त्यांना राज्यातील विकास कामांसाठी त्याचा फायदा होतो.
जगमोहन यांना काँग्रेस पक्षाने संधी दिली नाही. त्यांचं नेतृत्व मान्य केलं नाही त्या जगमोहन यांनी आंध्र मधून काँगेसलाच संपवून टाकलं. आता ते 2024 च्या तयारीला लागले आहेत.