शनिवार, १४ मे, २०२२

Can a situation like Sri Lanka happen in India ? श्रीलंकेसारखी परिस्थिती भारतात होऊ शकते का?

Can a situation like Sri Lanka happen in India ? श्रीलंकेसारखी परिस्थिती भारतात होऊ शकते का?


             श्रीलंका या देशात सध्या जी परिस्थिती उद्भवली आहे. तशी परिस्थिती भारतात उद्भवू शकते का ? सध्या श्रीलंकेत लोक रस्त्यावर आलेली आहेत. जाळपोळ , आंदोलने सुरू आहेत. पंतप्रधान यांनी राजीनामा दिला आहे. देश भयानक परिस्थिती मध्ये आहे. असं भारतात होऊ शकतं का ? हे पाहण्या पूर्वी श्रीलंकेत अस का झालं ते पाहू या..


- उत्पन्नापेक्षा अधिक  कर्ज 

- Tax मध्ये 50 % कपात

-  Free सुविधा 

-  कोरोनामुळे पर्यटनावर परिणाम 

-  सेंद्रिय शेतीचे अयोग्य नियोजन 


             सोप्या शब्दात सांगायचे असेल तर तुमचं Income कमी असेल व खर्च जास्त असेल आणि तो करण्यासाठी तुम्ही Lone घेत असाल तर तुमची अवस्था श्रीलंकेसारखी होईल.


            भारतात अशी परिस्थिती येऊ शकते का तर याचा विचार केला तर कळतं की भारतात जी राज्यसरकार आहेत त्यांनी नक्की किती कर्ज घ्यावं याचा रेशो ठरविला गेलेला आहे तसाच तो आपल्या देशाने किती कर्ज घ्यावं याचाही रेशो ठरविला आहे. 


नियम :- 

आपल्या देशाने  आपल्या GDP च्या 40 % पेक्षा जास्त कर्ज घेऊ नये. 

राज्य सरकारने आपल्या GSDP च्या 20 % पेक्षा जास्त कर्ज घेऊ नये.

पण याची अंमलबजावणी होते का ? हे प्रमाण पाळलं जात का ? तर नाही .


          आपली राज्य सरकारे हे नियम गंभीरपणे घेत नाहीत . काही राज्य सरकार त्यामध्ये विशेषतः पंजाब राज्य. याने आपल्या GSDP च्या  जवळजवळ 53% कर्ज घेतले आहे. त्याबरोबरच दुसरं राज्य आहे राजस्थान यांनी GSDP च्या 39 % कर्ज घेतलं आहे. तिसर राज्य आहे पश्चिम बंगाल या 

राज्याने आपल्या GSDP च्या 38 % कर्ज घेतलं आहे. 


          एवढं कर्ज असेल तर तुमचं उत्पन्न हे कर्ज फेडण्यासाठी खर्च होत मग तुम्ही नवीन काय काम करणार. उदाहरण घ्यायचं झालं तर पंजाबची  100 रुपये incom असेल तर 53 रुपये कर्जातच जातात मग ते infrastructure वर काय आणि किती खर्च करणार. खर्च करायचा असेल तर मग घ्या Lone .  देशाची अवस्था पण खूप चांगली नाही केंद्र सरकारच lone limit GDP च्या 40 % आहे पण सध्या 59 % lone केंद्र सरकारवर आहे. या कडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही तर ही अवस्था वाढत वाढत जाऊन शेवटी आपला श्रीलंका होईल. 


          कोणतंही सरकार विचार करत की आमच्या कडे 5 वर्ष सत्ता आहे मग घ्या कर्ज आणि द्या फुकट / Free ही सगळ्यात वाईट प्रथा पडत आहे. त्यामुळेच अशी राज्य आणि देश कर्जाच्या खाईत बुडत आहेत. आपल्या देशात जरी काही राज्य या कर्जाच्या डोंगरखाली बुडाली तरी आपलं भारत सरकार त्यांना बाहेर काढेल पण जर देशाची अवस्था अशी झाली तर काय ? 


          देश आणि राज्य कर्जात बुडण्याला जबाबदार कोण तर आपण / जनता सगळं Free हवं असत आपल्याला. Free Gas , Free light , Free Water , Free Food हवं असत मग निवडणूक जाहीरनामा ही तसाच बनवला जातो पण त्याचा दूरगामी परिणाम काय होईल याचा विचार केला जात नाही. जो तो विचार करतो की आम्ही 5 वर्ष असणार आहोत पुढचं पुढे पाहिलं येणार सरकार पण याचा सगळ्यात जास्त परिणाम होतो सामान्य लोकांवर...


          मागील 2 वर्षात कोरोनामुळे खूप परिणाम झालेला आहे.  Lone वाढत गेलं आहे. पण जर तुम्ही आता Lone घेऊन Infrastructure Develop करत असाल, Port बांधत असाल , कारखाने निर्माण करत असाल , रोजगार उपलब्ध करत असाल , Road बनवत असाल तर ठीक आहे . त्यासाठी घेतलेले Lone योग्य आहे . त्यातून  Income वाढत असेल तर राज्य आणि देश विकासाच्या वाटेवर जातो. 


          Lone घेऊन जर Free Gas , Free Light , Free water हे देत असाल तर तुमचा श्रीलंका झालाच म्हणून समजा. फुकट ची सवय वाईटच .


गुरुवार, १२ मे, २०२२

IPL : The Game of Money | IPL पैशांचा खेळ

IPL : The Game of Money


         IPL जेंव्हा पासून सुरू झालं तेंव्हा पासून प्रश्न पडला की Team खरेदी करण्यासाठी एवढा पैसा हे लोक का देतात ? त्यानंतर एक एक खेळाडूला कितीतरी कोटी रुपये दिले जातात. मग हा पैसा त्या टीम मालकाला कसा काय परत मिळणार ? 

ते त्यातून किती पैसा कामावणार ?

एवढा पैसा हे लोक का खर्च करतात ?



         2008 ला जेव्हा IPL सुरु झालं तेव्हाची रक्कम आणि आता 2022 मध्ये Team चा लिलाव पहिला तर असे असंख्य प्रश्न पडतात. नक्की काय Game आहे ते आपण पाहू.


         जेव्हा मुकेश अंबानीनी मुंबई इंडियन्स Team 2008 ला सगळ्यात जास्त पैसे म्हणजे 450 कोटी रुपयांना विकत घेतली तेव्हा त्याची खूप चर्चा झाली होती. पण या वेळच्या IPL मध्ये 2022 च्या लखनऊ सुपर जायंट या नव्या Team ला खरेदी करण्यासाठी कितीची बोली लागलीय माहीत आहे का ? 7090 करोड . हो एक टीम खरेदी करण्यासाठी एवढी बोली लागली आहे. कोणी खरेदी केलीय ? तर ते आहेत RPG group चे मालक संजीव गोयंका. 


            पहिल्या IPL मधील सगळ्या टीम चा खर्च 3000 ते 4000 करोड होता आणि 2022 ची एक Team ची किंमत आहे 7090 करोड. तर दुसरी Team विकत घेOतली 5625 कोटी मध्ये CVC group ने. आता एवढी मोठी रक्कम खर्च का करतायेत संजीव गोयंका आणि CVC Group ? त्यांचा पैसा किती माघारी येईल ? ते त्यातून नक्की किती कमाई करतील ? तर हा Game नक्की कशाचा आहे.


           2022मध्ये जेव्हा  2 नव्या Team निर्माण होणार हे ठरलं तेव्हा त्यांना खरेदी करण्यासाठी बोली लागली पण नक्की कोण बोली लावू शकत होत तर त्याचा Criteria ठरवला गेला. ज्यांची personal income 2500 करोड असेल किव्हा त्यांच्या कंपनीची income 3000 करोड असेल. 


         संजीव गोयंका यांनी 7090 कोटी मध्ये Team खरेदी केली. ही फक्त Team चे पैसे जे BCCI ला घेणार. खेळाडू खरेदी वेगळी , त्यांचं व्यवस्थापनसाठी वेगळे. हॉटेल , प्रवास यांसाठी वेगळे पैसे द्यावे लागणार. मग आता हे यातून कमवणार किती ? 


यांचे पैसे रिकव्हर होणार कसे ते आपण पाहू ...


1. मीडिया राइट :-

          पैसे मिळणार कोठून तर मीडिया राइट IPL दाखवणार कोण यासाठी बोली लागली जाते. कोणत्या चॅनेल वर मॅच असतील. पा या वर्षी Star India मागील 5 वर्षासाठी 16200 कोटींना IPL चे राइट खरेदी केले होते. आता यापुढील 5 वर्षासाठी खरेदी साठी 32000 कोटींची बेस प्राईस ठेवली आहे. यातुन निम्मे पैसे BCCI कडे आणि निम्मे पैसे या सगळ्या टीम ला मिळणार. 


2. जाहिरात ( Advertisement) :- 

         Match ज्या ग्राउंड वर असतील तिथे तिथे दाखवल्या जाणाऱ्या जाहिराती मधून मिळणारा पैसा अर्धा BCCI आणि अर्धा सगळ्या Team वाटून घेतात. या सगळ्या मधून मागच्या वर्षी प्रत्येक Team मालकाला 200 ते 250 कोटी मिळाले आहेत. यापुढे तर प्रत्येक Team ला 400 ते 500 कोटी मिळतील. Team ची खरेदी ही 10 वर्षा साठी असेल. प्रत्येक वर्षी 400 ते 500 कोटी...


3. ब्रँडिंग :-

           प्रत्येक Team चे वेगवेगळ्या ब्रँड शी करार आहेत. त्यातून त्यांना पैसे मिळतात. तसेच Team चे खेळाडूंना जाहिरातीमधून मिळणारे उत्पन्न सुद्धा मिळते. IPL टीम मालक यांमधून आपला पैसा cover करतात. 


4. Team Event :-

         आपल्या IPl Team  च्या खेळाडूंचे जे इव्हेंट होतात त्यामधून जो पैसा मिळतो तो ही मालकाला मिळत असतो. 


5. Match Ticket :- 

ज्या ज्या ठिकाणी match होतील त्या त्या ठिकाणचे तिकिटाचे काही टक्के पैसे यांना मिळतात. 


गुरुवार, ५ मे, २०२२

When it was done, forget it / झालं गेलं गंगेला मिळालं......

       आपण खूप गोष्टी मनाला लावून घेतो. खरंच याची गरज असते का ?  दैनंदिन जीवनात खूप घडामोडी घडत असतात. त्यातील काही आपल्याला आवडतात तर काही नावडतात. पण खरंच त्यामुळे दुःख करत बसणं बरोबर असत का ?

         एखादा आपल्या मनासासारखं वागला नाही की आपल्याला त्रास होतो. पण सगळेजण आपल्याला वाटेल तस कसं वागतील आ आणि त्यांनी तस वागावं ही अपेक्षा च मुळात चूक आहे. हे आपण समजून घ्यायला हवं. तो माझ्या सोबत असा वागला म्हणून मी आता त्याच्या बरोबर कधीच बोलणार नाही. किंव्हा त्याचं तोंड ही पहाणार नाही याचा काहींना खूप अभिमान असतो. पण अशा आपल्या स्वभावामुळे आपण खूप माणसे गमावतो. हे आपल्याला कळत पण नाही. 

         मांणसाने जे काही झालं ते विसरून जायला हवं. आणि नवीन सुरुवात करायला हवी. आयुष्य खूप छोट आहे ते आपण भांडण्यात , एकमेकांवर रागवण्यात , अबोला धरण्यात , अहंकारात वाया घालवू नये. जे काही गैरसमज असतील ते दूर करावेत. सगळ्या गोष्टी धरून बसायचं नसतं. सोडून देत चला. आणि आयुष्य आनंदाने जगा. मित्र एकमेकांवर काही कारणांमुळे रागवतात आणि आपापला अहंकार जपत ते एकत्र येत नाही. क्षुल्लक कारणानं नात तुटत. पण आयुष्य थांबत नाही ते चालत रहात. यात आपल्या आयुष्यातील खूप वेळ वाया जातो. नातं संपत.


         आयुष्य आनंदाने जगण्यासाठी चूक झाली तर मान्य करा. एखादा चुकला तर क्षमा करा. एकमेकांत गैरसमज झाले तर ते दूर करा. विनाकारण अहंकारपायी नाती तोडू नका. सगळ्यांना एकत्र घेऊन चालत राहा. 

आपण जे देतो तेच आपल्याला परत मिळत. म्हणून दुसर्यांना आनंद घ्या. जे झालं ते झालं ते सोडून देत चला. 

" झालं गेलं गंगेला मिळालं  "

या वाक्यात खूप गहन अर्थ सामावला आहे. तोच जर आपण आपल्या आयुष्यात आणला तर जगण्यातील मज्जा अनुभवता येईल......
विचार करा.....

MPSC / CSAT Qualifying नक्की काय बदल ?

 MPSC / CSAT Qualifying नक्की काय बदल ?


महाराष्ट्र लोकसेवा आयोग विविध पदांसाठी परीक्षा घेत असतो. त्यामध्ये PSI , STI , ASST , तसेच राज्यसेवा पूर्व परीक्षा. राज्यसेवा पूर्व परीक्षा मध्ये जे दोन पेपर असतात त्यामधील दुसरा पेपर CSAT फक्त Qualifying असावा अशी मागणी खूप दिवसांपासून होती. त्यावर राज्य लोक सेवा आयोग विचार करत होता आणि आता आयोगाने राज्य सेवा पूर्व परीक्षेमध्ये काही बदल केला आहे. 

तो बदल नक्की काय आहेते आपण पाहू या.


राज्य सेवा पूर्व परीक्षा देताना परीक्षार्थींना दोन पेपर द्यावे लागतात. त्यामध्ये 

1. पेपर :- 1

2. CSAT


पेपर 1 मध्ये 100 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असतात. 

तसेच पेपर 2  ( CSAT ) मध्ये 80 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 2.5 मार्क असतात. 

एकूण 400 मार्कांची पूर्व परीक्षा असते. मेरिट ( कटऑफ )  400 मार्कांनुसार लागतो. 


बदल :- 


पेपर 1 मध्ये काहीही बदल करण्यात आला नाही. 


पेपर 2 म्हणजेच CSAT चे मार्क आता मुख्य परीक्षेसाठी पात्रतेसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत. 

तर CSAT पेपर मध्ये तुम्हांला 33 % मार्क मिळवावे लागतील. फक्त पास व्हावे लागेल म्हणजे 200 मार्कांपैकी 66 मार्क मिळवावे लागतील. 


CSAT मध्ये जर 33% मार्क मिळाले नाही तर तुम्हांला पेपर 1 मध्ये कितीही मार्क पडले तरी त्याचा उपयोग नाही. 


पेपर 1 मध्ये जे मार्क मिळतील त्यावरच मेरिट लागेल. पण त्यासाठी तुम्हांला CSAT मध्ये पास व्हावे लागेलं. म्हणजे 33% मार्क मिळवावे लागतील. तरच तुमचे पेपर 1 चे मार्क ग्राह्य धरले जातील. 


आज पासून पुढे येणाऱ्या सगळ्या परीक्षा साठी हा बदल असेल. CSAT मध्ये या आधी 50 प्रश्न हे उताऱ्यावर आधारित , बुद्धिमत्ता आणि गणित यावर 25 प्रश्न , डिसिजन मेकिंग वर 5 प्रश्न अशी विभागणी असे. आता यामध्ये काही बदल होऊ शकतो. किव्हा बदल होऊ शकत नाही. हे आयोग ठरवेल. उताऱ्यावरील प्रश्न कमी करून गणित आणि बुद्धिमत्ता यावर प्रश्नांची संख्या वाढू शकते जसे UPSC ने केलं आहे तसही महाराष्ट्र लोकसेवा आयोग करू शकतो.


महाराष्ट्र लोकसेवा आयोग येणाऱ्या काळात कशा पद्धतीने बदल करतो ते पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. 

बुधवार, ४ मे, २०२२

The Growing Popularity of Southern Films / दाक्षिणात्य चित्रपटांची वाढती लोकप्रियता...

              हिंदी चित्रपट आणि दाक्षिणात्य चित्रपट यांमध्ये पाहिलं तर सध्या दाक्षिणात्य चित्रपटांकडे लोकांचा ओढा असलेला दिसून येतो. हिंदी चित्रपटांन पेक्षा तरुण वर्ग सध्या दाक्षिणात्य चित्रपट पाहायला आपला वेळ देतोय....

           बाहुबली , बाहुबली 2 , पुष्पा , RRR , KGF2 , हे चित्रपटांनी बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातन मध्ये पाहिलं तर मनोरंजनाचा तडका जबरदस्त आहे. हे चित्रपट भव्य आणि दिव्य करण्यासाठी खूप मेहनत घेतलेली जाणवत राहते. त्याबरोबरच काही कारणे आपण पाहू की ज्यामुळे प्रेक्षकवर्ग दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळला...

कारणे....

1. सामान्य माणसाला मनोरंजन हवं असत आणि ते जर लार्जर दॅन लाईफ असेल तर प्रेक्षकांना ते आवडत. माणूस आपल्या जीवनाच्या समस्यां बाजूला ठेऊन आनंद मिळवण्यासाठी सिनेमा पाहायला जात असतो. हिंदी चित्रपटात सध्या तोच तो पणा येतोय आणि ह्या कहाण्या पाहून प्रेक्षक कंटाळला आहे. 

2. दाक्षिणात्य चित्रपटात साधी कहाणी खूप मनोरंजन पद्धतीने मांडली जाते. तो चित्रपट बनवताना वेगवेगळ्या बाजूनी मेहनत घेतलेली जाणवते. 

3. भारतीय संस्कृती बरोबरच स्थानिक प्रथा परंपरा याची योग्य गुंफण असते. कथेत आपली संस्कृती पाहून प्रेक्षक सुखावतो. विनाकारण प्रबोधनाचे डोस दाक्षिणात्य चित्रपटात पाजले जात नाहीत. 

4. वैचारिक चित्रपट म्हणून काही चित्रपट ठीक आहेत पण तुम्ही उठ सूट त्याचाच मारा करता असाल तर प्रेक्षक वैतागतो त्याला मनोरंजन हवं असत निखळ मनोरंजन आणि तेच जर तुम्ही देण्यात कमी पडत असाल तर तो तुमच्याकडे पाठ फिरवतो. अशीच गत सध्या हिंदी चित्रपटांची झालेली आहे. पण दाक्षिणात्य चित्रपटात त्याला वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. त्यामुळे त्याचा ओढा तिकडे आहे. 

5. हिंदी चित्रपटांमध्ये राबवला जाणारा अजेंडा लोकांच्या लक्षात येऊ लागला आहे. आधुनिकतेच्या नावाखाली काही ही दाखवण्याचा अट्टहास प्रेक्षकांना आवडेनासा झाला आहे. एकत्रित कुटुंब व्यवस्था , नातेसंबंध या याबाबत हिंदी चित्रपटात टोकाची भूमिका मांडलेली असते आणि याउलट दाक्षिणात्य चित्रपटात गाव , परिवार , प्रथा , परंपरा आणि नात्यांची गुंफण अशी काही केलेली असते की चित्रपट पाहताना मनोरंजना बरोबरच संस्कृती जपल्याचा आनंद ही होतो....

6. नवनवीन कथा , त्याचे संदर्भ , ते पडद्यावर दाखवताना वापरलेल नवनवीन तंत्रज्ञान यांमुळे हे चित्रपट एका वेगळ्या पातळीवर प्रेक्षकांना घेऊन जातात. डान्स च्या स्टेप्स , डायलॉग , संगीत , चित्रपटाचे चित्रण या सगळ्या बाबतीत दाक्षिणात्य चित्रपटांचं कौतुक करावंसं वाटतं. त्यामुळेच भारतातच नव्हे तर जगात सुद्धा ' पुष्पा ' चे डायलॉग फेमस होतात आणि डान्स स्टेप्स व्हायरल होतात. त्यावर लाखो लोक रील बनवतात. 

          दाक्षिणात्य चित्रपटांचं कौतुक करताना हिंदी चित्रपटाना नाव ठेवण हा उद्देश नाही आहे पण नक्की प्रेक्षकवर्ग हिंदी कडून या चित्रपटानकडे का वळतोय हे ही पाहणं गरजेचं आहे. तोच प्रेक्षक आपल्या कडे कसा येईल याचा विचार बॉलीवूडने करण्याची गरज आहे. 

          हिंदी चित्रपट सृष्टीने हे समजून घेतल पाहिजे की जे उत्तम असेल तिकडेच लोकांचा ओढा असेल. काही तरी वाद करून , वेगळीच विधाने करून लोकांचं लक्ष आपल्या कडे वेधण्यापेक्ष्या आपल्या चित्रपटांची गुणवत्ता वाढवत नेणच गरजेचं आहे. 

 

 

गुरुवार, २८ एप्रिल, २०२२

Sher Shivraj ' What a film ! ' शेर शिवराज ' जबरदस्त कलाकृती.......

 ' शेर शिवराज ' जबरदस्त कलाकृती.......


          चित्रपट सुरू होतो राजमाता जिजाऊ बाल शिवबाला गोष्ट सांगत असतात. ती गोष्ट म्हणजे हिरण्यकश्यपू , प्रल्हाद आणि नरसिंह यांची. याचाच संदर्भ वापरत चित्रपटातील पात्रांची ओळख होत जाते. 


           इतिहासातील खूप छोट्या छोट्या गोष्टी ची काळजी घेतली आहे. प्रत्येक प्रसंग मांडताना घेतलेली मेहनत जाणवत राहते. 


          आयुर्वेदाचा उपयोग कसा होतो किंव्हा महाराज कसे करत होते हे नव्याने समजले. खान हा पित्त प्रकृतीचा हे वैद्य त्याची नाडी न पाहता, त्याला न भेटता त्याच्या वर्णनावरून सांगतात. अशा व्यक्तीची   निर्णय क्षमता कमी करायची असेल तर त्याचं पित्त वाढवाव लागत आणि त्यासाठी त्याच्या आहारात मसालेदार पदार्थ असायला हवे त्यासाठी महाराजांनी केलेली योजना , या सगळ्या प्रसंगात   सगळ्या जगाने मान्य केलेल्या भारतीय आयुर्वेदाचा अभिमान वाटायला लागतो.  


          अंगापिंडाने मजबूत माणसाच्या नक्की शरीराच्या  कोणत्या भागावर वार केला म्हणजे तो गारद होईल. याची तपशीलवार माहिती सांगताना खानाला कस नेस्तनाबूत करायचं याचं नियोजन करणं... तसंच त्यासाठी कोणतं हत्यार वापराव याचे संदर्भ चित्रपटात येतात. वाघनख का वापरलं त्याचा शोध कसा लागला हे ही उत्तम रीतीने दाखवलं आहे. त्या हत्याराच नाव ' वाघनख ' का ठेवलं ते ही कळलं.


         खानाचे सैन्य , तोफा , घोडे , हत्ती , यांची माहिती मिळवताना त्याबरोबर एखादी मोहीम कशी राबविली जाते , त्यामध्ये कोणत्या बाबींन कडे लक्ष द्यायचं असत ते एकदम सखोल पणे लेखकाने उभं केलं आहे. 


        वैभव मांगले यांनी गोपीनाथ पंत साक्षात उभे केलेत. वागणं , बोलणं , हावभाव नादच.  बेरकी चाल , खुशामत करणे म्हणजे काय याची प्रचिती येते. गोड गोड बोलून समोरच्याला गाफील कस ठेवायचं आणि त्याबरोबरच आपल्याला हवं तसं काम त्याच्याकडून कसं करून घ्यायच हे दाखवताना वैभव मांगले त्याच कौतुक करण्यास भाग पाडतो. 


          25 ते 30 हजार सैन्य घेऊन निघालेल्या अफजल खानाला महाराज असा काही गनिमीकावा करतात  की जेव्हा महाराजांना भेटतो तेव्हा फक्त 10 सैन्य त्याच्या बरोबर असत. ते ही शामियान्या पासून काही अंतरावर..... 


          खानाच्या मोहीमेत असलेल्या सगळ्या व्यापारी मंडळींना महाराज आधीच गडावर बोलावून घेऊन हिशोब भेट झाल्यावर या अटीवर त्यांच्या कडून सगळ काही हिरे,माणिक , मोती , सोन यांची खरेदी .....


          शिवराज अष्टक मधील आतापर्यंत आलेल्या चित्रपटांमध्ये छ. शिवराय काही प्रसंगापुरते मर्यादित होते. ' पावनखिंड ' चित्रपटात बाजीप्रभूंची शौर्य गाथा दाखविली गेली पण ' शेर शिवराज ' हा चित्रपट म्हणजे छत्रपती आणि छत्रपती यांचा च आहे. महाराज आणि फक्त महाराजचं....

या आधीच्या चित्रपटात चिन्मय मांडलेकर यांना महाराज साकारताना काही मर्यादा होत्या. काही विशिष्ट प्रसंगापूरते त्याची भूमिका होती.

 

         शेर शिवराज मध्ये व्यापून राहतात ते महाराज. दिग्पाल लांजेकर यांनी त्यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’ या चित्रपटां मध्ये महाराजांच्या भूमिकेसाठी चिन्मय मांडलेकर यांना का निवडलंय याच उत्तर हा चित्रपट पाहून मिळत. चिन्मय ने महाराजांची भूमिका खरंच नाद केलीय. त्याने त्याची निवड सार्थ ठरवलीय. चिन्मय मांडलेकर अक्षरश:  महाराजांची भूमिका जगलेत. 



          दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’ मधील ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ या ऐतिहासिक चित्रपटानंतर ‘शेर शिवराज’ हा चित्रपट मनात घर करून राहतो. मरगळलेल्या समाजाच्या मनात शिवप्रभूंचा भव्य दिव्य इतिहास पुन्हा जागवण्यासाठी धन्यवाद. 


  ' श्री शिवराज अष्टक ' मधील पुढील चित्रपटासाठी  शुभेच्छा......


शनिवार, २३ एप्रिल, २०२२

YS Jagan Mohan Reddy जगमोहन रेड्डी एक अफलातून माणूस ....

जगमोहन रेड्डी एक अफलातून माणूस ....


       2019 च्या लोकसभा आणि विधानसभा  निवडणुकीत एकाच वेळी चंद्राबाबू नायडू यांना धूळ चारून जगमोहन रेड्डी यांनी आंध्रप्रदेश जिंकला. मुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय सुद्धा खूप चर्चेत राहिले आहेत. शिवाय लोकप्रियता ही वाढत असलेली दिसत आहे. 


           त्यांचं पूर्ण नाव येडुगुरी संदिंती जगनमोहन रेड्डी उर्फ जगन हे सध्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत कारण ही तसच आहे. त्यांनी आपलं सगळं मंत्रिमंडळ बरखास्त करून टाकलं आहे. जगन रेड्डी यांनी हा निर्णय का घेतलाय ? किव्हा ते असे निर्णय का घेतात ? नक्की या पाठीमागे काय कारण आहे ते आपण समजून घेऊ या..


          जगमोहन यांचे वडील YSR जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा जगमोहन रेड्डी हे आपल्या व्यवसायात गुंतलेले होते. 

पण जेंव्हा 2 सप्टेंबर 2009 ला YSR यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला तेव्हा जगमोहन रेड्डी यांना धक्का बसला. ज्या काँगेस पक्षासाठी YSR यांनी आपल जीवन खर्ची घातलं त्या काँग्रेस ने पुढे YSR यांचा पर्याय म्हणून त्यांच्या मुलाला म्हणजेच जगमोहन रेड्डी यांना नाकारल.


         जगमोहन रेड्डी आणि काँग्रेस यांच्यामध्ये कटुता निर्माण झाली. पुढे जगमोहन हे काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी आपल्या वडिलांच्या नावानेच 2011 ला ' YSR काँग्रेस ' हा नवीन पक्ष काढला. पण त्या वेळी केंद्रात काँग्रेसची सत्ता होती. काँग्रेस ने त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. जगमोहन यांच्या बाबतीत सुडाचं राजकारण सुरू झालं. 


           2012 मधील मे महिन्यात जगमोहन वर CBI चा छापा पडला. बेनामी संपत्तीच कारण दाखवून जगमोहन यांना अटक करण्यात आली. तसेच त्यांना 16 महिने तुरुंगात राहावं लागलं. 16 महिन्यांनी ते तुरुंगाबाहेर आले. 


          तुरुंगात असताना सुद्धा हे गप्प बसले नाहीत तर त्यांनी तेलंगणा च्या विरोधात उपोषण केलं. हा मुद्धा आंध्रप्रदेश मध्ये खूप गाजला. जगमोहन रेड्डी चर्चेत आले. तुरुंगातुन बाहेर आल्यावर जगमोहन यांनी आपला पक्ष बांधला. निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली. 


           केंद्रात सत्तांतर झालं होतं काँग्रेस सत्तेतून बाहेर फेकली गेली होती आणि मोदी सरकार स्थापन झाले होते. 

आंध्रप्रदेशात 2014 च्या निवडणुकीत त्यांना यश मिळालं नाही. पण ते निराश झाले नाहीत. त्यांनी 2019 ची तयारी सुरू केली. पक्षबांधणी कडे लक्ष दिलं. जनभावना समजून एक एक पाऊल टाकलं. त्यासाठी त्यांनी नोव्हेंबर 2017 रोजी प्रजा संकल्प यात्रा या नावाने 3,000 किमी लांबीची वॉकथॉन सुरू केली. जवळ जवळ अक्खा आंध्र त्यांनी पायाखाली घातला त्यांच्या या पायी यात्रांना भरपूर प्रतिसाद मिळला. वडिलांच्या पायावर पाय ठेवत त्यांनी शेतकरी, कामगार , गरीब यांच्याशी जवळीक साधली. त्यामुळे हजारोंच्या संख्येने लोक यामध्ये सहभागी होऊ लागले. जगमोहन यांचं नेतृत्व तावूनसुलाखून निघालं. 


          पुढे 2019 च्या निवडणूका आल्या आणि या वेळी जगमोहन यांनी बाजी मारली. आंध्र मधील 175 आमदारांन मध्ये जगमोहन यांच्या पक्षाने 151 जागा जिंकल्या. तसेच लोकसभेत ही 25 खासदार मध्ये 22 जागा त्यांनी जिंकल्या. आपले 22 खासदार त्यांनी लोकसभेत पाठवले. 


काही अफलातून निर्णय....


1. आंध्रप्रदेश ला 5 उपमुख्यमंत्री :- 

         मुख्यमंत्री म्हणून त्यांची लोकप्रियता वाढतच गेली. मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांनी आणखी एक धक्का दिला तो म्हणजे त्यांनी एकदाच 5 उपमुख्यमंत्री जाहीर करून टाकले. ज्यांनी ज्यांनी त्यांना मदत केली त्यांना त्यांनी न्याय दिला तसेच सगळ्यांना खुश करून राजकारण साधलं. 


2. चंद्राबाबू सरकारचे काही निर्णय रद्द :- 

        चंद्राबाबू यांच्या काळातील खूप निर्णय त्यांनी बदलून टाकले. हळू हळू त्यांनी लोकप्रियता वाढच गेली. 


3. राज्याला तीन राजधान्या हा विचार:- 

     एक धडाकेबाज निर्णय म्हणजे त्यांनी आंध्रप्रदेश या राज्याला त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या धर्तीवर तीन राजधान्या असाव्यात अशी चर्चा सुरू केली. 


4. एकाच वेळी 13 जिल्ह्याची निर्मिती :-

       एकाच वेळी आंध्रप्रदेशात 13 नवीन जिल्ह्याची निर्मिती केली. एका जिल्ह्याची निर्मिती करायची म्हंटल तरी किती आंदोलने होतात. मोर्चे निघतात. मतमतांतरे होतात. पण जगमोहन यांनी एका झटक्यात 13 जिल्हे निर्माण केले. 


5. सरकारच्या मध्यावधी काळात पूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त:- 

        सरकार जेव्हा अर्धा कार्यकाळ पूर्ण करेल तेव्हा सगळं मंत्रिमंडळ बदलण्यात येईल आणि नवीन मंत्रिमंडळ निर्माण केलं जाईल हा शब्द त्यांनी दिला होता तो त्यांनी पाळला आहे. 


        जगमोहन रेड्डी हे कष्ट करतच पुढे आलेले आहेत. ते जेव्हा गरज लागेल तेव्हा ते मोदी सरकारला पाठिंबा देतात त्यामुळे त्यांचे आणि केंद्र सरकारचे संबध चांगले आहेत त्यामुळे त्यांना राज्यातील विकास कामांसाठी त्याचा फायदा होतो. 


        जगमोहन यांना काँग्रेस पक्षाने संधी दिली नाही. त्यांचं नेतृत्व मान्य केलं नाही त्या जगमोहन यांनी आंध्र मधून काँगेसलाच संपवून टाकलं. आता ते 2024 च्या तयारीला लागले आहेत. 

Shaarad Sir

उर्मिला

  उर्मिला... रामायण माहीत असत, पण उर्मिला नक्की कोण हेच काही जणांना माहीत नसतं... जेव्हा कळतं तेव्हा काय तर लक्ष्मणाची पत्नी एवढंच... एखादी ...