IPL : The Game of Money
IPL जेंव्हा पासून सुरू झालं तेंव्हा पासून प्रश्न पडला की Team खरेदी करण्यासाठी एवढा पैसा हे लोक का देतात ? त्यानंतर एक एक खेळाडूला कितीतरी कोटी रुपये दिले जातात. मग हा पैसा त्या टीम मालकाला कसा काय परत मिळणार ?
ते त्यातून किती पैसा कामावणार ?
एवढा पैसा हे लोक का खर्च करतात ?
2008 ला जेव्हा IPL सुरु झालं तेव्हाची रक्कम आणि आता 2022 मध्ये Team चा लिलाव पहिला तर असे असंख्य प्रश्न पडतात. नक्की काय Game आहे ते आपण पाहू.
जेव्हा मुकेश अंबानीनी मुंबई इंडियन्स Team 2008 ला सगळ्यात जास्त पैसे म्हणजे 450 कोटी रुपयांना विकत घेतली तेव्हा त्याची खूप चर्चा झाली होती. पण या वेळच्या IPL मध्ये 2022 च्या लखनऊ सुपर जायंट या नव्या Team ला खरेदी करण्यासाठी कितीची बोली लागलीय माहीत आहे का ? 7090 करोड . हो एक टीम खरेदी करण्यासाठी एवढी बोली लागली आहे. कोणी खरेदी केलीय ? तर ते आहेत RPG group चे मालक संजीव गोयंका.
पहिल्या IPL मधील सगळ्या टीम चा खर्च 3000 ते 4000 करोड होता आणि 2022 ची एक Team ची किंमत आहे 7090 करोड. तर दुसरी Team विकत घेOतली 5625 कोटी मध्ये CVC group ने. आता एवढी मोठी रक्कम खर्च का करतायेत संजीव गोयंका आणि CVC Group ? त्यांचा पैसा किती माघारी येईल ? ते त्यातून नक्की किती कमाई करतील ? तर हा Game नक्की कशाचा आहे.
2022मध्ये जेव्हा 2 नव्या Team निर्माण होणार हे ठरलं तेव्हा त्यांना खरेदी करण्यासाठी बोली लागली पण नक्की कोण बोली लावू शकत होत तर त्याचा Criteria ठरवला गेला. ज्यांची personal income 2500 करोड असेल किव्हा त्यांच्या कंपनीची income 3000 करोड असेल.
संजीव गोयंका यांनी 7090 कोटी मध्ये Team खरेदी केली. ही फक्त Team चे पैसे जे BCCI ला घेणार. खेळाडू खरेदी वेगळी , त्यांचं व्यवस्थापनसाठी वेगळे. हॉटेल , प्रवास यांसाठी वेगळे पैसे द्यावे लागणार. मग आता हे यातून कमवणार किती ?
यांचे पैसे रिकव्हर होणार कसे ते आपण पाहू ...
1. मीडिया राइट :-
पैसे मिळणार कोठून तर मीडिया राइट IPL दाखवणार कोण यासाठी बोली लागली जाते. कोणत्या चॅनेल वर मॅच असतील. पा या वर्षी Star India मागील 5 वर्षासाठी 16200 कोटींना IPL चे राइट खरेदी केले होते. आता यापुढील 5 वर्षासाठी खरेदी साठी 32000 कोटींची बेस प्राईस ठेवली आहे. यातुन निम्मे पैसे BCCI कडे आणि निम्मे पैसे या सगळ्या टीम ला मिळणार.
2. जाहिरात ( Advertisement) :-
Match ज्या ग्राउंड वर असतील तिथे तिथे दाखवल्या जाणाऱ्या जाहिराती मधून मिळणारा पैसा अर्धा BCCI आणि अर्धा सगळ्या Team वाटून घेतात. या सगळ्या मधून मागच्या वर्षी प्रत्येक Team मालकाला 200 ते 250 कोटी मिळाले आहेत. यापुढे तर प्रत्येक Team ला 400 ते 500 कोटी मिळतील. Team ची खरेदी ही 10 वर्षा साठी असेल. प्रत्येक वर्षी 400 ते 500 कोटी...
3. ब्रँडिंग :-
प्रत्येक Team चे वेगवेगळ्या ब्रँड शी करार आहेत. त्यातून त्यांना पैसे मिळतात. तसेच Team चे खेळाडूंना जाहिरातीमधून मिळणारे उत्पन्न सुद्धा मिळते. IPL टीम मालक यांमधून आपला पैसा cover करतात.
4. Team Event :-
आपल्या IPl Team च्या खेळाडूंचे जे इव्हेंट होतात त्यामधून जो पैसा मिळतो तो ही मालकाला मिळत असतो.
5. Match Ticket :-
ज्या ज्या ठिकाणी match होतील त्या त्या ठिकाणचे तिकिटाचे काही टक्के पैसे यांना मिळतात.
Current affairs , Films review , social , Economy updates , Politics and About life Life changing thoughts
गुरुवार, १२ मे, २०२२
IPL : The Game of Money | IPL पैशांचा खेळ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Shaarad Sir
उर्मिला
उर्मिला... रामायण माहीत असत, पण उर्मिला नक्की कोण हेच काही जणांना माहीत नसतं... जेव्हा कळतं तेव्हा काय तर लक्ष्मणाची पत्नी एवढंच... एखादी ...
-
ICC world cup 2023 ICC Cricket World Cup 2023 is the 13th tournament this time. Interestingly, this 2023 World Cup will be held in India. 1...
-
कोठारी कमिशन - प्राथमिक शिक्षणाला स्वतंत्र जरी नाही तरी खरा न्याय मिळाला तो 1964 ते 1966 या काळात कार्यरत झालेल्या शैक्षणिक आयोगाकडूनच. -...
-
Why International Yoga Day should be celebrated..... International Day of Yoga is celebrated on 21st June every year to create awareness ab...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा