MH SET Result, Cut Off Marks 2023..
![]() |
| MH SET 2023 |
Current affairs , Films review , social , Economy updates , Politics and About life Life changing thoughts
10 एप्रिल 2023 म्हणजे सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्षां संदर्भात माहीत जाहीर केली यामध्ये काही नवीन पक्षाला राष्ट्रीय दर्जा दिला गेला तर काही राजकीय पक्षांचा दर्जा काढून टाकण्यात आला.
![]() |
| Criteria as a National Party in India राष्ट्रीय पक्ष म्हणून |
यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाला (AAP) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला.
तर
● राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP)
● तृणमूल काँग्रेस (TMC)
● कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (CPI)
या तीनही पक्षांचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतला.
तसेच निवडणूक आयोगाने असंही जाहीर केलं की राष्ट्रवादी काँग्रेस( नागालॅण्ड ) आणि तृणमूल काँग्रेसचा (मेघालय )या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून जो दर्जा असेल तो कायम राहील.
कारण की आताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी चांगली कामगिरी केली आहे.
राजकिय पक्ष म्हणून जो दर्जा असतो त्या बद्दलही निवडणूक आयोगाने काहीराजकीय पक्षांचा राज्यपक्ष म्हणून असलेला दर्जा काढून घेतला यामध्ये.....
● राष्ट्रीय समाज पार्टी (पश्चिम बंगाल)
● पीएमके (पुद्दुचेरी)
● राष्ट्रीय लोकदल (उत्तर प्रदेश)
●भारत राष्ट्र समिती (आंध्र प्रदेश),
● पीडीए (मणिपूर),
● एमपीसी (मिझोराम )
या सहा पक्षांचा राज्यस्तरीय पक्ष म्हणून असलेला दर्जा काढून घेतला.
राजकिय पक्षांना राष्ट्रीय दर्जा मिळतो कसा आणि त्याचे काय निकष असतात ते आज आपण पाहू या...
◆ राष्ट्रीय पक्ष म्हणजे काय ?
● ज्या राजकीय पक्षाची चार राज्यांत किंव्हा त्यापेक्षा अधिक राज्यांमध्ये नोंदणी आहे.
● ज्या राजकीय पक्षांना शेवटच्या लोकसभा किंव्हा विधानसभा निवडणुकीत पक्षांच्या उमेदवारांना 6% पेक्षा अधिक वैध मते मिळालेली असावीत.
● शेवटच्या लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाचे कमीत कमी 4 खासदार निवडणूक आलेले असावेत.
● तसेच कमीत कमी तीन राज्यांत लोकसभेच्या एकूण जागांपैकी 2 % जागा जिंकल्या असाव्यात.
या सगळ्या अटी पूर्ण करणाऱ्या राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून निवडणूक आयोग दर्जा देतो.
आणि या अटींची पूर्तता जर एखादा पक्ष करत नसेल तर त्याची राजकीय पक्ष म्हणून मान्यता काढून घेतली जाते.
हे झाल राष्ट्रीय पक्ष म्हणून तर राज्यपक्ष यासाठी सुद्धा काही अटींची पुर्तता करावी लागते...
राज्यपक्ष/प्रादेशिक पक्ष :-
● झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यामध्ये कमीत कमी 6% वैध मते त्या पक्षाला मिळालेली असावीत. किंव्हा त्या राजकिय पक्षाचे कमीतकमी दोन आमदार असावेत.
● झालेल्या लोकसभा निवडणुकीत कमीत कमी 6% वैध मते त्या पक्षाला मिळालेली असावीत. किंव्हा त्या राजकिय पक्षाचे कमीतकमी एक खाजदार निवडून आलेला असावा.
● विधानसभा निवडणुकीत कमीतकमी 3% जागा त्या पक्षाने जिंकलेल्या असाव्यात किंव्हा 3 आमदार निवडून आलेले असावेत. या दोन्ही पैकी जे अधिक असेल ते आयोग ग्राह्य धरेल.
● लोकसभा निवडणुकीत 25 जागांमागे कमीतकमी 1 तरी जागा त्या पक्षाने जिंकलेली असावी.
● लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्या राजकिय पक्षांना एकूण 8 % वैध मते मिळालेली असावीत.
आता केंद्रीय निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली ती कशी त्याबाबत माहिती घेऊया...
¶ आम आदमी पक्षाने दिल्ली , गोवा , पंजाब आणि गुजरात या राज्यांमध्ये मतदानाचे निकष पूर्ण केले आहेत.
¶ गुजरात मध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने 13 % मते मिळवलेली आहेत तिथे त्यांना फक्त 6 % मते हवी होती..
¶ गुजरात हे आम आदमी पक्षाचे 6 % पेक्षा जास्त मते मिळविण्याचे चौथे राज्य आहे...
¶ गोवा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने 6 % च्या पेक्षा जास्त मते मिळाली आहेत.
¶ पंजाब आणि दिल्ली या दोन राज्यांत या पक्षाची सत्ताचं आहे..
आता आम आदमी पक्ष हा भाजपा आणि काँग्रेस प्रमाणे राष्ट्रीय पक्ष म्हणून गणला जाणार आहे.
तर आपल्या महाराष्ट्रामधील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष याची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता का काढून घेतली ते पाहू या ..
● राष्ट्रीवादी पक्षाची स्थापना झाली ती 10 जून 1999 मध्ये.
● या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळावी ती लगेच 10 जानेवारी 2000 ला.
● परंतु 2014 च्या निवडणुकीपासून जो राष्ट्रीय पक्ष म्हणून असणारे निकष हा पक्ष पूर्ण करू शकला नाही.
● राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने वेळोवेळी नोटीस पाठवून याची माहिती दिलेली आहे. परंतु निकषात ना बसल्यामुळे त्याची मान्यता काढून टाकली गेली.
● तसेच आत्ता झालेल्या निवडणूकीत गोवा , मणिपूर, मेघालय , नागालँड आणि अरुणाचल प्रदेश
मध्ये पक्षाचे मतदार कमी झालेले आहेत.
या कारणांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेला दर्जा निवडणूक आयोगाने काढून घेतला आहे...
दलाई लामा आणि वाद
![]() |
The Dalai Lama and Controversyकाही दिवसांपूर्वी बौद्ध धर्मगुरू दलाई लामा चर्चेत आले. कारण होत की त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यात ते एका मुलाला जवळ बोलावून कार्यक्रमात कॅमेऱ्यासमोर त्यांनी प्रथम त्यांच्या ओठांचा kiss घेण्यास सांगतात. नंतर ते त्या मुलाला त्यांची जीभेला kiss करण्यास सांगतात.
या घटनेबद्दल त्यांनी नंतर माफी सुद्धा मागितली. आणि असं करणं चुकीचे आहे हे मान्य ही केलं.
पण त्यामुळे पुन्हा दलाई लामा यांच्या कडे सगळ्यांचे लक्ष खेचले गेले. पण नक्की कोण आहेत हे दलाई लामा आणि नक्की दलाई लामा म्हणजे काय?
हा प्रश्न सर्वसामान्य माणसांच्या मनात निर्माण झाला. तर आज आपण याबद्दल माहिती पाहू या...
आता चे जे बौद्ध धर्मगुरू दलाई लामा आहेत ते आत्ता पर्यंतचे 14 वे दलाई लामा आहेत.
त्यांचा जन्म 6 जुलै 1935 रोजी झाला. त्यांचा जन्म तिबेट मधील एका शेतकऱ्याच्या घरी झाला. त्या शेतकऱ्याच्या गोठ्यात त्यांचा जन्म झाला.
पहिले दलाई लामा कोण आहेत ते माहीत आहे का ते आहेत.
- Gedun Drup
हे त्सोंगकापा यांचे शिष्य होते.
ते 'पहिले दलाई लामा' म्हणून ओळखले जातात.
तिबेट मधील जे बौद्ध धर्मगुरू असतात ते सगळ्या बौद्ध धर्मियांसाठी मार्गदर्शक असतात. यामुळे सगळ्या बौध्द धर्मियांसाठी तिबेट ही महत्त्वाचे स्थान आहे.
जगामध्ये शांती ,अहिंसा आणि प्रेमाचा प्रसार करणारे बौद्ध धर्म गुरु दलाई लामा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे.
मागील 63 वर्षांपासून ते भारतात राहत आहेत.
कारण 1959 मध्ये चीन ने तिबेटच्या लोकांवर अत्याचार केल्यामुळे दलाई लामा यांना तिबेट सोडावे लागले. भारताने त्याना शरण दिले. यामुळेच भारत आणि चीन संबंधात कटुता आली.
दलाई लामा यांना जगात मानणारे आणि त्यांच्या वर प्रेम करणारे लोक आहेत. जवजवळ 50 देशांना त्यांनी भेटी दिल्या आहेत ते जगात शांतीचा संदेश देणारे दूत आहेत. 2010 मध्ये त्यांनी अमेरिकेच्या अध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेतली.या भेटीला चीन ने विरोध केला होता.
14 वे दलाई लामा यांची प्रसिद्धी खूप आहे 2013 मध्ये जेव्हा सर्वेक्षण करण्यात आले की जगातील लोकप्रिय व्यक्ती कोण तर त्यावेळी जगातील दोन सर्वात लोकप्रिय नेत्यांपैकी एक दलाई लामा होते आणि दुसरे होते अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा...
दलाई लामा यांनी 2014 साली म्हंटले होते की,
" तिबेट हा चीनचा भाग होऊ शकतो पण जेव्हा चीन तिबेटला तिबेटची संस्कृती ,परंपरा आणि तिबेटीयन लिपी जपण्याची परवानगी देईल. तिबेटच स्वतंत्र अस्तित्व जर चीनने मान्य केलं केलं तरच तिबेट चीनचा भाग होऊ शकतो."
चीन आणि तिबेट यांमध्ये कायम संघर्ष राहिला आहे. दलाई लामा आणि तिबेट वर शांततापूर्ण मुक्तीसाठी सतरा कलमी करार स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता
1959 मध्ये ज्या वेळेस तिबेटमध्ये बंडखोरी झाली त्यामुळे 14 व्या दलाई लामा भारतात पळून गेले, तेथून त्यांनी निर्वासित सरकारचे नेतृत्व केले होते.
चीनच्या विरुद्ध गनिमी मोहीम सुरू करण्यासाठी दलाई लामा व त्यांच्या प्रशासनाला सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीने 1960 च्या दशकात दलाई 1.7 दशलक्ष डॉलर प्रतिवर्षी निधी दिला होता.
तिबेटचे तमूळ ध्येय तिबेटसाठी चीन पासून पूर्ण स्वातंत्र्य होते, पण पुढे हे ध्येय 1980 नंतर ते उच्च स्वायत्ततेची मागणी पर्यंत आले.
तिबेट आणि चीन संघर्ष सुरू राहिला त्यांनी चीनकडून अधिकाधिक स्वायत्ततेची मागणी करण सुरू ठेवले.
पण पुढे निर्वासित संसदेच्या डेप्युटी स्पीकर डोल्मा ग्यारी म्हणाल्या होत्या...
"जर मध्यम मार्ग अल्पावधीत अयशस्वी झाला, तर आम्हाला संपूर्ण स्वातंत्र्य किंवा संयुक्त राष्ट्राचे स्वावलंबन निवडण्यास भाग पाडले जाईल."
दलाई लामा यांनी 2018 मध्ये विधान केले की "युरोप युरोपियन लोकांचे आहे" आणि ज्यांचे जीवन धोक्यात आहे अशा निर्वासितांना मदत करणे युरोपचे नैतिक कर्तव्य आहे. युरोपने निर्वासितांना स्वीकारले पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे आणि त्यांना शिक्षित केले पाहिजे परंतु शेवटी त्यांना त्यांच्या देशांचा विकास करण्यासाठी परत केले पाहिजे.
पुढच्या वर्षी एका मुलाखतीत त्यांनी अशीच टिप्पणी केली होती, ज्यात त्यांनी असेही म्हटले होते की "जर महिला दलाई लामा आल्या तर ते अधिक आकर्षक असावेत"
मार्च 2019 मध्ये, दलाई लामा यांनी त्यांच्या उत्तराधिकार्याबद्दल सांगितले की,
" त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा भारतात पुनर्जन्म होण्याची शक्यता आहे. उत्तराधिकारात चीनचा कोणताही हस्तक्षेप कायदेशीर मानला जाऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला."
ऑक्टोबर 2020 मध्ये, दलाई लामा म्हणाले होते की ,
" ते तिबेटच्या स्वातंत्र्याचे समर्थन करत नाहीत आणि नोबेल पारितोषिक विजेते म्हणून चीनला भेट देण्याची आशा आहे.
"मी चीनच्या पीपल्स रिपब्लिकपेक्षा 'प्रजासत्ताक' संकल्पनेला प्राधान्य देतो. प्रजासत्ताक संकल्पनेत तिबेटी, मंगोल, मांचुस आणि शिनजियांग उईघुर यांसारखे वांशिक अल्पसंख्याक एकोप्याने राहू शकतात".
दलाई लामा यांनी 2021च्या शेवटी, त्यांनी जगभरात धार्मिक सलोख्यासाठी भारताचे आदर्श म्हणून कौतुक केले.
चीन तिबेटवर हक्क सांगतो. त्याला दलाई लामा विरोध करतात त्यामुळे चीन दलाई लामा यांच्यावर आरोप करतो की ते अलगावादी आहेत.
50 च्या दशकात सुरू झालेला तिबेट चीन वाद आजही सुरू आहे.
Hindenburg Research and Adani/हिंडेंनबर्ग रिचर्स आणि अदानी
What exactly is the case with Hindenburg Research and Adani?
हिंडेंनबर्ग या कंपनीचा अदानी उद्योग समूहाबद्दल आलेला रिपोर्ट आणि त्यानंतर अदानी यांची जगातील श्रीमंत लोकांच्या तिसऱ्या स्थानावरून झालेली घसरण ही आधी आठव्या स्थानी आणि आता टॉप टेन च्या बाहेर हे प्रकरण नक्की काय आहे ते आपण सोप्या भाषेत समजून घेऊ या....
हिंडेंनबर्ग असं या कंपनीच नाव का आहे ते आधी पाहू या ...
6 मे 1937 मध्ये जर्मनी मधील एका एअरशिपला आग लागली आणि त्यामधुन प्रवास करणारे 100 लोकांच्या पैकी 35 लोकांचा मृत्यू झाला. हा घडलेला अपघात हा मानवी चुकीमुळे झालेला होता. त्यालाच हिंडेंनबर्ग अपघात म्हंटल जात. हा अपघात आपण टाळू शकलो असतो पण तो घडला.
नेथन अँडरसन ज्यांनी हिंडेंनबर्ग रिचर्स च्या नावाने 2017 ला कंपनी सुरू केली ते इस्राएलचे आहेत तर कधी काळी ते इस्राएलमध्ये अंबुलन्स चालवण्याचे काम करत होते.
यांचं म्हणणं आहे की हा मानवाच्या चुकीमुळे झालेला अपघात होता आणि तो आपण टाळू शकलो असतो. आता ही आमची कंपनी जगामध्ये होणारे आर्थिक घोटाळे लवकर ओळखून ते टाळण्याच काम करेल. तसेच लोकांचे बुडणारे पैसे वाचवेल...
पण लक्षात घ्या की हिंडेंनबर्ग रिचर्स ही समाजसेवा करणारी कंपनी नाही ती पण शॉर्ट सेल करून पैसे कमावते हे त्यांनी लपवून ठेवलेले नाही. आता आपल्याला हे लोक रिसर्च करून पैसे कसे कमावतात हा प्रश्न पडला असेल तर हे लोक शॉर्ट सेल करून पैसे कमावतात...
आता Short sell म्हणजे काय तर शेअर मार्केट मध्ये आपण एखादा शेअर खरेदी केला आणि त्याची किंमत वाढली तर आपल्याला फायदा होतो पण दुसऱ्या प्रकारे तुम्ही Short sell करून पण पैसे कमवू शकता..
Short sell म्हणजे काय तर आपण एक साध उदाहरण पाहू...
राम ला 1 तारखेला माहिती मिळाली की 10 तारखेला एका शेअर ची किंमत 1000 रु वरून 500 रु होणार आहे..
तर राम ब्रोकर कडून ते काही शेअर उधार घेईल जे तो 11 तारखेला परत करेल.
1 तारखेला उधार घेतलेले शेअर तो लगेच 1000 विकून टाकेल.. आणि 10 तारखेला त्याची किंमत 500 झाली की तो ते खरेदी करेल आणि ब्रोकरला माघारी देईल... यात रामला मिळाले 500 रु काहीही पैसे खर्च न करता...
अशा प्रकारे लाखो करोडो मध्ये असे व्यवहार होतात... त्यालाच Short selling म्हणतात...
हाच व्यवसाय ही कंपनी करते... एक कंपनी निवडतात आणि त्यावर रिचर्स करतात आणि जमा झालेला रिचर्स ते सोशल मीडियावर पोस्ट करतात. मग मार्केट मध्ये राडा सुरू होतो..
त्या कंपनीचे शेअर खाली येतात. हिंडेंनबर्ग रिचर्स ते Short sell करते आणि पैसे कमावते...
ही सगळी माहिती पब्लिक करण्याआधी हिंडेंनबर्ग रिचर्स ही माहिती आपल्या इन्व्हेस्टर ला देतात आणि मग त्यांना झालेल्या नफ्यातुन यांना कमिशन मिळते. ह्यांच्या वर या प्रकाराबद्दल कोणतीही कारवाई करता येत नाही कारण हे USA मध्ये कायदेशीर आहे...
यांनी ज्या कंपनी बद्दल रिसर्च केला आता पर्यंत त्या त्या कंपन्यांचे शेअर 50% खाली आले आहेत तर त्या कंपन्यांवर नंतर कारवाई सुद्धा सुरू झालेली आपल्याला दिसून येते..
हिंडेंनबर्ग रिचर्स जे सांगते की ह्या कंपनी चे शेअर तेवढेच टक्के शेअर खाली जातात.
त्यांनी अदानी यांच्या बद्दल 85 % शेअर उतरतील हे सांगितले आहे...
पण हिंडेंनबर्ग रिचर्स ने यांच्या बॉण्ड मधील व्यवहारात रिचर्स केला आहे कारण त्यांच्या इन्व्हेस्टर ला भारतीय शेअर मार्केट मध्ये शेअर खरेदी विक्री करण्याची परवानगी नाही...
हिंडेंनबर्ग रिचर्स ने जे 88 आरोप अदानी यांच्यावर ठेवलेत.
त्यातील काही महत्त्वाचे आरोप पाहू
● शेअर ची किंमत आर्टीफिशयल पणे वाढविणे :- हा महत्वाचा आरोप आहे. आणि यामध्ये आपण पाहिलं तर तथ्य पण आहे. अदानी चे शेअर कमी कालावधीत खूप प्रमाणात वाढलेले दिसून येतात. त्यामुळे त्यांची संपत्तीही वाढली आणि श्रीमंत लोकांच्या यादीत त्यांचे स्थान वर गेले.
यामध्ये SBI आणि LIC यांनी गुंतवणूक केली त्यामुळे त्यांच मार्केट मधील स्थान उंचावल आणि विश्वास वाढला. त्यामुळे त्यामध्ये अधिकाकाधिक गुंतवणूक होत गेली.
● 75 % पेक्षा जास्त शेअर स्वतःकडे ठेवणे
● प्रमाणापेक्षा जास्त कर्ज :-
शेअर ची किंमत वाढत गेली आणि ह्याच शेअर बदल्यात खूप मोठे कर्ज ( 2 लाख करोड ) अदनींनी बँकांकडून उचलले.
प्रमाणापेक्षा जास्त कर्ज अदनींनी घेतलेलं आहे आणि हे ते कसं परत करणार आहेत ??
● अदनींनीच्या सगळ्या कंपन्या ह्या एकमेकांवर अवलंबून आहेत. त्यामुळे जर एक कंपनी बुडली तर इतरही आपलं कर्ज फेडू शकणार नाहीत...
अदानी सारखी कंपनी आहे म्हणून तरी त्यांनी हा धक्का पचवला आहे नाही तर हिंडेंनबर्ग रिचर्स चा इतिहास पाहता दुसरी कोणतीही कंपनी असती तर पार कोलमडून गेली असती. हे ही तितकंच खरं आहे..
अदानींनी पैसे उभारण्यासाठी जे मार्ग वापरले ते काही नवीन नाहीत सगळ्याच कॉर्पोरेट कंपन्या अस करतात.
अदानींनी या हिंडेंनबर्ग रिचर्स च्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत आणि त्यांना धमकी पण दिली आहे की त्यांच्या विरोधात ते केस करतील.. याला उत्तर देताना हिंडेंनबर्ग रिचर्स ने ही सांगितले आहे की बिनधास्त करा...
फॅक्ट चेक केलं तर अस दिसत की हिंडेंनबर्ग रिचर्स चे आत्ता पर्यंत 70% रिचर्स बरोबर येतात.
हिंडेंनबर्ग रिचर्स या कंपनीवर सुध्दा खूप सारे आक्षेप आहेत हे ही खरं आहे..
SEBI आणि RBI यांनी देखील अदानींच्या बाबत चौकशी सुरू केली आहे... पाहू आता काय होत ते
Wait and watch ...
Free IPL and jio Cinema...
![]() |
| IPL and Jio Cinema |
2023 चे IPL पहाण्यासाठी jio ने ते free मध्ये उपलब्ध करून दिले आहे. फ्री फ्री का बरं jio ने असे केले आहे. IPL दाखवण्यासाठी किती तरी वाहिन्या भलीमोठीं रक्कम मोजायला तयार असतात ते jio cinema फुकट का दाखवतोय. नक्की काय कारणे आहेत. मुकेश अंबानी यांचा नक्की काय प्लॅन आहे...
lPL चे ब्रॉडकास्टिंग चे अधिकार हे 2017 ते 2022 पर्यंत TV आणि डिजिटल चे अधिकार 16000 करोड रुपया मध्ये विकले गेले होते.
आणि आता 2023 ला हे ब्रॉडकास्टिंग चे अधिकार फक्त डिजिटल चे 23000 करोड रुपयांमध्ये jio ने विकत घेतले. आता ही गुंतवणूक केलेली रक्कम jio कसा वसूल करणार आहे ते आपण पाहू या ....
OTT वर 2018 मध्ये कोणाचं राज्य होत तर ते होत Hotstar चं पण hotstar चे कस्टमर कधी वाढले तर ते वाढले IPL सुरू झाल्यावर किती तर 5 पट...
अंबानींनी 23000 करोड रुपये खर्च केलेत 5 वर्षांसाठी नक्की काय गेमप्लॅन आहे jio चा. कारण hotstar हा महिन्याला 200 - 300 रुपये चार्ज करत होता. पण jio cinema ने हे सगळं फ्री मध्ये दिल आहे ...
सगळयात आधी अंबानी या प्लॅटफॉर्म वर ट्रॅफिक आणतील.. लोकांना सवय लागलेल फ्री ची ..यामध्ये पहा फक्त jio चे कस्टम नाही तर सगळ्या युजर साठी ही सेवा फ्री असणार आहे. म्हणजे ज्याला ज्याला IPL फ्री पाहायचं असेल त्याने Jio Cinema वर पाहायचं..
● विशेष म्हणजे इंग्लिश समजत नाही तुम्ही तुमच्या भाषेत पाहू शकता...
● TV वर पाहताना आपल्याला TV जस दाखवतोय तसंच पाहावं लागत पण Jio Cinema वर आपण वेगवेगळ्या कॅमेऱ्यात पाहू शकतो...
● Live match सुद्धा तुम्ही रिव्हर्स मध्ये पाहू शकता. Match स्टॉप करू शकता..
यामुळे भरपूर लोक ipl पाहतील आणि हा आकडा मागच्या पेक्षा पाचपट असेल. आणि आता लक्ष्यात घ्या की जिथे कस्टमर तिथे बिजनेस...
आता Jio Cinema चे ग्राहक वाढणार आणि मग यावर ऍड दाखवण्यासाठी ऍड कंपन्या Jio Cinema शी करार करणार यातूनच पैसा मिळणार.. ऍड दाखवण्यात सुद्धा Jio ने कश्या अधिक कंपन्या येतील ह्याचा विचार केला आहे.. आणि यामुळेच IPL सुरु होण्यापूर्वीच जवळ जवळ 500 कंपन्यांनी करार केला आहे.
Data वापर मोबाईल वर match पहायची असेल तर त्यासाठी खूप deta लागेल. आणि डेटा आला की पैसा आलाच...
Jio fiber चा प्लॅन आहे की 399 मध्ये unlimited data म्हणजे match पहायची असेल तर data गरजेचा आणि यामुळे काय होईल तर Jio fiber चे कस्टमर वाढतील.
अजून एक गोष्ट म्हणजे Jio ने एक प्रोडक्ट बाजारात आणलं आहे ते म्हणजे Gio glass.
यावरून आपण match चा फिल वेगळ्याच प्रकारे घेऊ शकतो.. म्हणजे Jio Glass ची विक्री तुन अंबानी पैसा कमावतील...
Jio mobile मध्ये सुद्धा तुम्ही IPL पाहू शकतो.
तसेच मीडिया केबल चा वापर करून सुद्धा तुम्ही TV वर match पाहू शकता.
Match पहायची तर TV वर पण सुविधा Jio Cinema सारखी हवी तर त्यासाठी मेडिया केबलचा वापर करा आणि घरी TV वर match चा आनंद घ्या.. म्हणजे केबल च्या विक्रीतून सुद्धा अंबानी पैसा कामावतील..
एकदा का सगळ्यांना Jio Cinema ची सवय लागली की परत मग तुम्ही त्याचाच वापर करणार पुढे आपण त्यावर फिल्म सुद्धा पाहू शकतो. Web seris सुद्धा पुढे Jio Cinema वर प्रदर्शित होतील कारण तिथे खूप कस्टमर असतील..
आज Jio Cinema फ्री मध्ये आहे उद्या तो असेलच असे नाही. Jio SIM सारख free होईल एकदा का सवय लागली की मग सगळीकडे jio cinema चं असेल....
अंबानी मग त्यातून पैसा कमावतील..
असा आहे हा त्यांचा गेमप्लॅन...
Free IPL and jio Cinema
पैसा हा हुशार माणसाचा गुलाम आणि मूर्खांचा मालक असतो का? याबाबत विचार करूया.
अर्थसंकल्प आणि Income Tax
![]() |
| Budget and Income Tax 2023-24 |
1 फेब्रुवारी 2023 ला मा.अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पाकडे सर्वसामान्य लोकांचं लक्ष होत की Tax slab मध्ये नक्की काय बदल केला जातोय.
2014 सालापासून जो Tax Slab आहे तोच ठेवला जातोय का ? का त्यामध्ये काही बदल केला जातोय...
परंतु जुन्या Tax slab मध्ये काहीच बदल न करता सरकारने नवीन Tax Slab मध्ये बदल केला. नक्की कसा आहे हा नवीन tax Slab ते आपण पाहू या..
जुना Tax Slab आणि नवीन Tax Slab यातील आपल्याला कोणता फायदेशीर आहे ते पाहू या ...
लक्षात घ्या नवीन TAX Slab मध्ये जरी बदल केला असला तरी जुना Tax Slab हा ही आहेच तो बंद केलेला नाही...
●● New Tax Slab 2023 ●●
3,00,000 :- Nil
3,00,000 to 6,00,000 :- 5 %
6,00,000 to 9,00,000 :- 10 %
9,00,000 to 12,00,000 :- 15 %
12,00,000 to 15,00,000 :- 20 %
15,00,000 + :- 30 %
...... No any deductions .....
●● Old Tax Slab ●●
2,50,000 :- Nil
2,50,000 to 5,00,000 :- 5 %
5,00,000 to 7,50,000 :- 10 %
7,50,000 to 10,00,000 :- 15 %
10,00,000 to 12,50,000 :- 20 %
12,50,000 to 15,00,000 :- 25 %
15,00,000 + :- 30 %
Available any Deductions
जुना TAX Slab गुंतवणूक करण्यासाठी प्रेरित करत होता. त्यामुळे आपण गुंतवणूक करून Tax Saving करत होतो.
पण काही जणांना ही सक्तीची गुंतवणूक नकोशी असते त्यांना मग काय पर्याय ? तर या नवीन Tax Regime मध्ये हा पर्याय दिला आहे...
ज्याला गुंतवणूक नको आहे त्यांनी हा Tax slab स्वीकारावा...
ज्यांना गुंतवणूक करायची आहे किंव्हा ज्यांची गुंतवणूक आहे त्यांनी जुना TAX Slab स्वीकारला तरी चालेल...
जे नोकरदार आहे, Salaried person आहेत ते प्रत्येक वर्षी कोणताही Tax Slab स्वीकारु शकतात....
( त्यांना संधी आहे ज्या TAX Slab फायदा होतो तो ते प्रत्येक वर्षी स्वीकारू शकतात..)
पण
जे व्यावसायिक आहेत, Businessman आहेत त्यांनी लक्षपूर्वक Tax Slab स्वीकारावा कारण त्यांना एकदाच बदल करता येईल... पुन्हा life time तोच Tax Slab असेल.
तर चला मग हे Tax Slab चे प्रकरण तुम्हांला समजलं असेलच...
नवीन आणि जुना दोन्हीपैकी तुम्हांला जो फायद्याचा असेल तो स्वीकारण्यासाठी शुभेच्छा...💐💐
उर्मिला... रामायण माहीत असत, पण उर्मिला नक्की कोण हेच काही जणांना माहीत नसतं... जेव्हा कळतं तेव्हा काय तर लक्ष्मणाची पत्नी एवढंच... एखादी ...