पैसे कमवण्यापेक्षा ते कसे वापरतो हे महत्वाचे असते.
पैसे manage करायला यायला हवं. तरच आपण कमावलेले पैसे टिकू शकतात. नाही तर ते कधी आपल्या पासून निघून जातील हे आपल्याला कळणार सुद्धा नाही. मग आता अनेकांना प्रश्न असेल की पैसे manage करणे म्हणजे नेमके काय ? ते काय असत ? ते कसं करतात ?
आत्ता पर्यंत आपल्याला पैसे कसे कमवायचे हे शिकवलं पण ते कसे manage करायचे हे शिकवल नाही. सामाजिक , राजकिय साक्षरते बरोबरचं आर्थिक साक्षरता खूप महत्त्वाची असते. पण सध्या समाजात आर्थिक साक्षरतेचे प्रमाण खूप कमी आहे. आता हे ज्ञान मिळवण्यासाठी कुठे मोठ अर्थशास्त्र शिकाव लागणार का ? का मोठं मोठं पुस्तक वाचावी लागतील तर नाही. एक साधा आणि सोपा नियम लक्षात घेतला तर हे आपल्यालाही जमू शकत. आपण ही आपले पैसे manage करू शकतो.
तुम्हांला तुम्ही किती पैसे कमावता हे नक्की माहीत असलं पाहिजे. तो पैसा तुमच्या कडे कसा येतो , कोणत्या मार्गाने येतो ,पैसे येण्याचे कोणकोणते मार्ग आहेत , तो येण्यासाठी तुम्ही काय काय करता हे सगळं माहिती असायला हवं. वर्षभरात नक्की तुम्ही किती पैसा मिळवता याची नोंद आपल्या कडे हवी.
पैसे मिळवण्याची जी साधने असतात त्यांना Assets म्हणतात. आणि ज्यामुळे पैसे खर्च होतात त्यांना liabilities म्हणतात. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर...
Assets :-
तुमच्या खिशात ज्यामुळे पैसा येतो त्यांना Assets म्हणतात.
Liabilities :-
ज्यामुळे तुमच्या खिशातुन पैसा जातो त्यांना Liabilities म्हणतात.
तुमचे Assets जर जास्त असतील आणि Liabilities कमी असतील तर तुम्ही श्रीमंतीकडे वाटचाल कराल. आणि Liabilities जास्त असतील आणि Assets कमी तर तुम्हांला गरीब होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. पैसा वाचवत चला आणि त्या वाचवलेल्या पैशातून नवनवीन Assets तयार करा.
पैशाच नियोजन करा. तुम्हांला नक्की कधी आणि किती पैसा हवाय हे ठरवा. खूप पैसा पाहिजे. लगेच हवाय. अशी मोघम ध्येय नकोत. एकदम सुनियोजित ध्येय ठरवा. त्यासाठी योग्य ते नियोजन करा. कधी आणि किती पैसा हवाय तो कशासाठी हवाय हे नक्की माहीत असलं की त्याच आपण योग्य नियोजन करू शकतो. त्यासाठी नक्की काय करायचंय हे आपल्याला समजत. जर तुम्ही एखाद्या गावाला निघाला आणि त्याचं नावच तुम्हांला माहीत नसेल आणि रस्ता सुद्धा माहिती नसेल तर तुम्ही त्या गावाला कधी पोहचू शकाल का ? तर नाही ना मग तुमचे पैशाबाबतच ध्येय सुद्धा अचूक ठरवा.
पैशाची नोंद ठेवा. आलेला पैसा आणि खर्च झालेला याची नोंद करा. Balance sheet तयार करा. महिण्याची महिन्याला तुमची आणि तुमच्या सगळ्या कुटुंबातील सदस्यांची. म्हणजे नक्की किती पैसा येतोय आणि किती खर्च होतोय हे आपल्या समजेल. त्यानुसार कोणते खर्च टाळता येऊ शकतात हे लक्ष्यात येईल. बचतीचे प्रमाण वाढवण्यासाठी काय करावे लागेल हे ही लक्षात येईल. नियोजन करण्यासाठी याची मदत होईल. कुठे फायदा आहे कुठे तोटा होतोय हे समजलं की मग तोटा कमी करण्यासाठी काय काय करता येईल ते करा. फायदा कसा होईल आणि तो अधिकाधिक कसा वाढत नेता येईल याकडे लक्ष द्या.
पैशाला manage करताना सर्वात best formula आहे. तो म्हणजे
50 : 30 : 20
तुमचं जेवढं income असेल त्याच्या 50 % तुम्ही तुमच्या गरजांवर खर्च करा.
30 % income invest करा.
20 % income save करा.
तुमचा खर्च जर जास्त असेल तर तो कसा कमी करता येईल याचा विचार करा. खरच एखाद्या गोष्टीचा आपल्याला गरज आहे का याचा विचार करा आणि मगचं त्यासाठी खर्च करा. Need आणि want यातील फरक समजून घ्या. पैसा वाचवा. वाचवलेला पैशाची गुंतवणूक करा.
लक्षात ठेवा पैसा हा खतासारखा असतो त्याची योग्य गुगुंतवणूक केली तर तो कित्येक पटीने वाढतो. जर त्याला नुसतं साठवलं तर तो कुजतो.
जर तुम्ही पैशाला manage करायला शिकला नाही तर तुम्ही कितीही पैसा कमावला तरी तो एक दिवस तुमच्याकडून निघून जाईल. करोडो रुपयांची लॉटरी लागलेली माणसे काही वर्षांनी भिकारी होताना आपण पाहतोय. याच कारण माहीत आहे का तर पैशाचं चुकलेले management.
जगातील 5% लोकांनकडे भरपूर संपत्ती आहे आणि आपण जर जगातील सगळा पैसा सगळ्या लोकांना समान वाटला तरी काही वर्षांत तो सगळा पैसा पुन्हा 5 % लोकांच्या कडे जाईल कारण त्यानां माहीत असलेले पैशाच व्यवस्थापन.
म्हणूनच लक्षात ठेवा. पैसे कमवण्यापेक्षा ते वापरणे , त्याचं management येणं हे खूप महत्वाचे असते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा