शनिवार, २७ मे, २०२३

मुंबई इंडियन्स ला 62 रन्स ने हरवून गुजरात टायटन्स IPL फायनल मध्ये..

 मुंबईला हरवून गुजरात टायटन्सची IPL फायनल मध्ये कूच...


मुंबई इंडियन्स ला 62 रन्स ने हरवून गुजरात टायटन्स फायनल मध्ये..


मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्या मध्ये 26 मे झालेला प्ले ऑफ मधील सामना म्हणजे एक अविस्मरणीय होता. कारण होत शुभनम गिल ची खेळी..



मुंबई इंडियन्स ने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग घेतलीं. मुंबई चा हा निर्णय शुभमन गिल ने चुकीचा ठरवला..


गुजरात टायटन्स ने प्रथम फलंदाजी करताना 233 रन्स बनवले यामध्ये सर्वात जास्त योगदान दिल ते शुभमन गिल ने या फलंदाजाने 60 बॉल मध्ये 129 रन्स बवनवले.. या IPL मध्ये शुभमन गिलने आपले तिसरे शतक पूर्ण केल. सर्वात जास्त रन्स बनवण्याचा या IPL मधील विक्रम त्याच्याच नावावर राहिला. 

 


शुभमन गिल ला साथ दिली ती रिद्धीमान सहा आणि साई सुदर्शन


प्रथम सुरुवात एकदम संयमी खेळी करत करत या दोघांनी संघाला अर्धशतका पर्यंत पोहोचवले. शुभमन गिल याचा 27 रन्स वर असताना सोडलेला झेल मुंबईला खूप महागात पडला. त्यामुळे तर सगळा सामना फिरला.. 


पियुष चावला ने पहिला बळी मिळवला तो रिद्धीमान सहा च्या रूपाने. 


शुभमन गिल बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्याने राहिलेल काम पूर्ण केलं त्याने शेवटच्या षटकात 19 रन्स काढून संघाचा स्कोर 233 रन्स वर नेला.


मुंबई इंडियन्स या धावांचा पाठलाग करताना मुंबई ची सुरुवात रोहित शर्मा आणि निहाल वडेरा यांनी केली.. परंतु निहाल वडेरा ला मोहम्मद शमी ने अवघ्या 4 रन्स वर बाद केलं.


कँमरून ग्रीन हार्दिक पांड्याच्या गोलंदाजी वर हाताला दुखावत झाल्यामुळे तो बाहेर गेला.

मोहम्मद शमी ने दुसऱ्या षटकात मुंबई इंडियन्स चा कर्णधार रोहित शर्माला बाद केलं.


तिलक वर्मा ने मोहम्मद शमी च्या एकाच षटकात 4 फोर आणि 1 सिक्स मारत 24 रन्स चोपले...

तिलक वर्मा ला राशीद खान ने बाद केलं परंतु तो पर्यंत त्याने 14 बॉल मध्ये 43 रन्स काढून संघाला एका चांगल्या स्थितीत आणून ठेवले...


दुखावत झालेला कँमरून ग्रीन पुन्हा मैदाना वर आला आणि सुर्यकुमार यादव बरोबर मुंबईचा सामना हळू हळू पुढे नेला. संयमी खेळी करत रन रेट कमी होऊ न देता रन्स बनवले..


12 व्या षटकात लिटीन कँमरून ग्रीन ला बॅड केलं.

कँमरून ग्रीन ने 20 बॉल मध्ये 30 रन्स बनवले..


सुर्यकुमार यादव ला मोहित शर्मा ने बाद केलं आणि मुंबईच्या सगळ्या अपेक्षांवर पाणी पडलं.. सुर्यकुमार यादव ने 38 बॉल मध्ये 63 रन्स केलं..


त्याच षटकात मोहित शर्मा ने दुसरी विकेट घेतली आणि मुंबईला बॅकफूट वर आणलं...


त्यानंतर डेव्हिड , जॉर्डन असे फलंदाज बाद होत गेले.. 


मुंबईने सामना गमावला...

 

गुजरात टायटन्सने या सामन्यात 62 रन्स विजय मिळवला....


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Shaarad Sir

उर्मिला

  उर्मिला... रामायण माहीत असत, पण उर्मिला नक्की कोण हेच काही जणांना माहीत नसतं... जेव्हा कळतं तेव्हा काय तर लक्ष्मणाची पत्नी एवढंच... एखादी ...