The Competition itself / स्पर्धा स्वतःशीच.....
स्पर्धा म्हटलं की त्यात मध्ये प्रतिस्पर्धी आलाच आणि हरणं आणि जिंकणं सुद्धा आलं.
आजच्या युगात सगळ्यांनाच सगळ्याच स्पर्धेत जिंकायचं असत. स्पर्धा कोणतीही असली तरी प्रत्येकाला जिंकायच असत. नवीन काही शिकायचं नसतं. हरणं नको असत. असं का बरं तर लहापणा पासून आपल्याला हेच शिकवलं जातं. आणि आपण ही आपल्या मुलांना हेच शिकवत असतो त्यांच्या कडून हीच अपेक्षा ठेवत असतो.
पण स्पर्धा नेहमी इतरांशीच करतात का ? तर नाही. सर्वात चांगली स्पर्धा कोणाशी असेल तर ती असते स्वतःशी. हो स्वतःशी. पण ती नक्की कशी करावी. तर आज जे काही केलं आहे त्या पेक्षा उद्या आणखी चांगलं करावं. किव्हा तस करण्याचा प्रयत्न करावा.
नेहमी नवीन काहीतरी शिकावं. जे काही आपलं चुकत असेल ते प्रथम आपण मान्य करावं आणि त्यात काय काय सुधारणा करता येईल याचा विचार करावा. सतत स्वतःमध्ये चांगला बदल करवा. आपण मोबाईल वापरतो त्यामध्ये भरपूर अँप्स असतात पण काही काळानंतर ते व्यवस्थित चालत नाहीत अशा वेळी त्यांना अपडेट करावं लागतं. म्हणजे काळानुसार आपणही अपडेट व्हावं. तस झालं तरच आपण आऊटडेटेड होणार नाही. यासाठी आपण स्पर्धेचा वापर करायला हवा. आपल्याला कोणाशीही स्पर्धा कारायची नाही तर स्वतःशीच रेस लावायची ती ही दररोज आणि जिंकायचं, आणि हरलो तर पुन्हां जिंकण्यासाठी प्रयत्न करायचा.
लक्षात ठेवा.
" हार और जीत बहादूर के किस्मत के दो सिक्के होते हैं। "
कोणत्याही स्पर्धेत बिनधास्त उतारा. स्वतःचे जे काही सामर्थ्य असेल ते आजमावून पहा. आपली कुवत कळेल आपण काय काय करू शकतो ते नव्याने समजेल. फक्त स्पर्धेला घाबरून त्यात सहभागी होण्याचं टाळू नका.
स्पर्धा कोणतीही असली तरी त्यातील आनंद अनुभवता आला पाहिजे. हरण्याची भीती नाही वाटली पाहिजे. त्यातून आपल्याला आनंद मिळाला पाहिजे. आपल्याला नवीन काही तरी शिकायला मिळालं पाहिजे. आपण हरू किंव्हा जिंकू तो नंतरचा विषय आहे. पण त्यात आपण बिनधास्त सहभागी व्हायला पाहिजे. यातून आपला आत्मविश्वास वाढतो. बिकट प्रसंगाशी लढण्याची हिंमत निर्माण होते. संकटातून मार्ग काढण्याची सवय लागते.
जिंकलो तर हरणाऱ्याला कमी न समजता त्याचा ही मान ठेवायला शिकलं पाहिजे. आणि हरलो तरी खचून न जाता पुन्हा उभारी घ्यायला शिकावं. आपलं कुठं आणि काय चुकलं हे पाहता आलं पाहिजे. आपली चूक मान्य करता आली पाहिजे. एखादी चूक जर सुधारायची असेल तर सर्वात प्रथम ती आपल्याला कळली पाहिजे आणि त्यानंतर ती आपण मान्य केली पाहिजे. तरच ती सुधारता येते. आपण कधी ती मान्यच करत नाही. मग प्रॉब्लेम सुरू होतात. हे समजण्यासाठी स्पर्धा खूप महत्त्वाची भूमिका बजावते.
स्वतःशी असलेली स्पर्धा आपल्याला सर्वोच्च स्थानी पोहोचण्यासाठी मदत करते. तर मग चला करूया सुरुवात स्पर्धेची स्वतःची स्वतःशी.....

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा