हंटर आयोग (भारतीय शिक्षण आयोग)
- वुड्सच्या खलित्यामुळे क्रांतिकारी परिवर्तन झाले. त्यानंतरचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे 1882 साली लॉर्ड रिपन यांनी आपल्या मंडळाचे सदस्य सर जॉन हंटर ह्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेला 'भारतीय शिक्षण आयोग' होय.
- त्यांच्यापुढे ज्या महत्त्वपूर्ण साक्षी झाल्या, त्यामध्ये महात्मा फुल्यांनी प्राथमिक शिक्षण हे शेती आणि उद्योगधंदे, विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित असावे, अशी मागणी केली होती.
- त्यातूनच हंटर ह्यांच्या आयोगाची 'व्यवसायाधिष्ठित शिक्षण' ही शिफारस प्रकट झाली. या शिक्षण आयोगाला 'भारतीय शिक्षण आयोग' असे नाव होते.
- त्यांनी प्राथमिक शिक्षणासाठी अतिशय महत्त्वाच्या शिफारशी केल्या व त्यानुसार झालेली कार्यवाही पुढीलप्रमाणे -
- प्राथमिक शिक्षणासाठी राज्यांनी कठोर परिश्रम करावेत. या शिफारशी व त्यानुसार केलेली कार्यवाही
¶ शिफारशी :
- राज्यांनी कठोर परिश्रम केले पाहिजेत.
¶ कार्यवाही :
- नगरपालिका, महापालिका, जिल्हा बोर्ड या ठिकाणी स्थानिक शिक्षण मंडळे स्थापन केली व त्यांच्यावर शिक्षणाची जबाबदारी सोपविली. प्रशिक्षित शिक्षकांच्या संख्येत वाढ केली. मुलांच्या पटनोंदणीत वाढ केली.
¶ शिफारशी :
- उच्च शिक्षणाकडे केवळ पूर्वतयारी म्हणून न पाहता व्यक्तीला आयुष्यभर उपयोगी पडणाऱ्या विषयांचे व कौशल्यांचे शिक्षण द्यावे. जीवन व शिक्षण ह्यांची सांगड घालावी ते स्वयंपूर्ण आहे.
¶ कार्यवाही :
- शिक्षणाच्या जीवन शिक्षण, व्यावसायिक शिक्षण ह्या संकल्पना उदयास आल्या. प्राथमिक शिक्षण हे मूलभूत शिक्षण झाले.
¶ शिफारशी :
- जनतेच्या बोलीभाषेतून दिले जाणारे शिक्षण असावे.
¶ कार्यवाही :
- शिक्षणात मातृभाषेचा वापर सुरू झाला. बोली भाषेतून छापील पुस्तके निघू लागली.
¶ शिफारशी :
- नियंत्रण जिल्हास्तरीय मंडळाकडे द्यावे.
¶ कार्यवाही :
- जिल्ह्यात लोकल बोर्डात जिल्हा स्कूल बोर्ड अस्तित्वात आले आणि प्राथमिक शिक्षण पूर्णपणे त्यांच्या ताब्यात आले.
¶ शिफारशी :
- स्वदेशी शाळांना प्रोत्साहन द्यावे आणि राष्ट्रीय शिक्षणाच्या पद्धतीत त्यांनाही स्थान असावे.
¶ कार्यवाही :
- स्वयंसेवी संस्थांनी प्राथमिक शाळा चालविण्यास घेतल्या. त्यांना व्हालंटरी स्कूल असे म्हणतात.
¶ शिफारशी :
- अभ्यासक्रम लवचीक, सोपा व स्थानिक परिसरास पोषक असावा. शाळेची वेळ व तास ह्यांच्यात लवचीकता असावी.
¶ कार्यवाही :
- व्यापक अभ्यासक्रमाची रचना उदयास आली. स्रोत पद्धती जन्माला आली. शिक्षण प्रसारासाठी दुबार शाळा ही संकल्पना उदयास आली. देश काल परिस्थितीनुसार अभ्यासक्रमात लवचीकता स्वीकारण्यात आली.
¶ शिफारस :
- स्थानिक निधी हा प्रामुख्याने प्राथमिक शिक्षणासाठी वापरला जावा.
¶ कार्यवाही :
शासनाने फक्त प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी घेतली. वय वर्षे 6 ते 14
¶ शिफारस :
- प्राथमिक शिक्षकांचे भरीव प्रशिक्षण करावे.
¶ कार्यवाही :
- मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण विद्यालये निघाली. नवीन अध्यापन पद्धतींचा अवलंब सुरू झाला. प्राथमिक शिक्षणाची इयत्तावार रचना निश्चित झाली. वर्षाच्या अखेरीस अंतिम परीक्षा संकल्पना उदयास आली. धर्मनिरपेक्ष शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
" सरकारने जरी प्राथमिक शिक्षणाची पूर्ण जबाबदारी घेतली नाही तरी जनतेचे प्राथमिक शिक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि ती पूर्ण न केल्यास जनता सरकारला जाब विचारू शकेल, अशी जाणीव शासनाच्या मनात निर्माण करण्यात हा आयोग निश्चितच यशस्वी झाला."






