गुरुवार, २३ मे, २०२४

Primary Education in British Era | ब्रिटिश काळातील प्राथमिक शिक्षण | Language of Education | 'McCullough's Minutes

 ब्रिटिश काळातील प्राथमिक शिक्षण



1813 च्या सनदी कायद्यात उल्लेख केल्याप्रमाणे भारतात तीन प्रकारच्या प्राथमिक शाळा अस्तित्वात

आल्या. त्या म्हणजे :-

1. मिशनरी शाळा

2. मिशनऱ्यांपासून स्फूर्ती घेऊन काही भारतीय संस्थांनी चालविलेल्या खाजगी शाळा

3. सरकारने उघडलेल्या प्राथमिक शाळा


¶ शिक्षणाची भाषा :-

- मिशनऱ्यांनी जरी सुरुवातीला एतद्देशीय भाषांमध्ये शिक्षण देण्यास सुरुवात केली तरी हळूहळू भारतीय शिक्षणाचे माध्यम इंग्लिश भाषा असावे, असा जोरदार आग्रह धरला. 

- चार्ल्स ग्रॅव्ह यांनी हा विचार 1792 साली मांडला आणि त्यातून 1813 मध्ये इस्ट इंडिया कंपनीसाठी जो सनदी कायदा संमत झाला त्यानुसार त्यांच्या ताब्यातील मुलखातीत प्रजेच्या शिक्षणाची जबाबदारी कंपनीवर निश्चित करण्यात आली.

- अर्थात ह्या कायद्याने भारतीय शिक्षणाचे माध्यम मूळ पौर्वात्य भाषा असावे की इंग्रजी भाषा असा जो वाद दहा- पंधरा वर्षे भारतात रंगला त्यालाच पाश्चात्त्यवादी विरुद्ध प्रौर्वात्यवादी विचारधारा असे म्हणतात. 

- यामध्ये सर्वात महत्त्वाचे योगदान लॉर्ड मेकॅलो यांचे आहे. गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिंगचा सल्लागार म्हणून मेकॅलोचे भारतात आगमन झाले होते.


¶ 'मेकॅलोचे मिनिटस्' :- 

- सर्व लोकशिक्षण पद्धतींचा मेकॅलोने बारकाईने अभ्यास केला आणि भारतीय शिक्षणाविषयी आपली मते मांडली. 

- त्याने आपले मत ज्या खलित्याद्वारे 1835 साली लॉर्ड बेंटिंग यांच्याकडे पाठविले त्याला 'मेकॅलोचे मिनिटस्' असे म्हणतात. 

- त्यात त्यांनी प्राधान्याने शाळांमधून आधुनिक आणि प्रगत अशा पाश्चिमात्य साहित्याचे आणि ज्ञान-विज्ञानाचे शिक्षण द्यावे व ते इंग्रजीमधून देण्यात यावे, असे आग्रही मत मांडले. 

- मेकॅलोने भारतीयांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी जे शिक्षण चांगले ते देण्याची जबाबदारी इंग्लंडची आहे, असे ठासून सांगितले होते.


● मेकॅलोच्या मिनिटस् मुळे भारतीय शिक्षणात झालेले 

बदल :- 

¶ शिक्षणाची जबाबदारी हे शासनाचे महत्त्वपूर्ण कर्तव्य आहे.

¶ शिक्षण उच्च-नीचतानिरपेक्ष असावे.

¶ पालकाच्या आर्थिक परिस्थितीचा शिक्षण घेण्याशी संबंध असू नये.

¶ योग्यतेनुसार शिक्षण मिळावे.

¶ समान शिक्षण असल्यास समान प्रतिष्ठा हे सामाजिक न्यायाचे तत्त्व सांगितले.

¶ औपचारिक शिक्षणाचा आकृतिबंध निश्चित करण्यासाठी मार्गदर्शन झाले. तसेच शिक्षणाचे स्तरीकरण करण्यात आले.


● मेकॅलोची काही मते आतताई होती. उदाहरणार्थ :-

- पौर्वात्य संपूर्ण वाईट आणि पाश्चात्त्य तेवढेच चांगले हा दूराग्रह होता.

- शिक्षणात मातृभाषा आणि देशी भाषा ह्यांचे महत्त्व नाकारले होते.

- भारताच्या सांस्कृतिक प्रगतीला हीन लेखले होते.

- मिशनऱ्यांच्या मताला झुकते माप दिले होते.

- पाझर सिद्धांताचा केलेला पुरस्कार पूर्णपणे चुकीचा होता.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Shaarad Sir

उर्मिला

  उर्मिला... रामायण माहीत असत, पण उर्मिला नक्की कोण हेच काही जणांना माहीत नसतं... जेव्हा कळतं तेव्हा काय तर लक्ष्मणाची पत्नी एवढंच... एखादी ...