आपणं आजूबाजूला पाहत असतो की घरात जर मुलगा आणि मुलगी हे दोघे असतील तर मुलाला हवं ते करण्यासाठी पाठिंबा दिला जातो. त्याच जे काही स्वप्न असेल त्यासाठी घरचे त्याला मदत करतात. आर्थिक पाठींबा दिला जातो. जर त्या कुटुंबाची परिस्थिती नसेल तर त्याच्या शिक्षणासाठी, व्यवसायासाठी, प्रकल्पा साठी कर्ज काढले जाते. त्याने काही कौतुकास्पद काम केलं तर त्याच घरात खुपचं कौतुक केलं जातं. या सगळया बद्दल माझा काहीही आक्षेप नाही. आणि आक्षेप असण्याचं कारण पण नाही. पण त्या मुलाच्या जागी त्याच घरातील मुलगी असेल तर तिच्यासाठी नक्की काय केलं जातं ? नसेल तर का ? सरळ प्रश्न आहे.
मुलगीला घरात कमी लेखल जात. ती आपल्यावर एक जबाबदारी आहे असं वागवलं जात. तिची स्वप्न काय आहेत याचं कोणालाही काही पडलं नसत. फक्त तिच योग्य वय होईपर्यंत जस जमेल तसं तिचं शिक्षण करायचं आणि वय झालं की लग्न करून देऊन जबाबदारीतून मुक्त व्हायचं. ती शिक्षणात उत्तम असली तरी तिच्या शिक्षणापेक्षा लग्नाला प्राधान्य दिलं जात. ती शिकून काय करणार. तिला जरी नोकरी लागली तरी त्याचा आपल्या काय फायदा जो काही फ़ायदा होयाचा असेल तो तिच्या नवऱ्याला होणार मग कशाला ? बऱ्यापैकी घरांमध्ये अशी परिस्थिती असते.
पण असं का घडत ? तर याला खूप कारणे आहेत. आपली पुरुषप्रधान संस्कृती. लहानपणा पासून मुलांच्या मनावर बिंबवलं जात की मुलगा घर चालवणार आहे. जर कुटुंब पुढे जायचं असेल तर ते काम फक्त मुलगाच करू शकतो. तोच मोठा होऊन कुटूंब प्रमुख होणार आहे. मुलगा हाच म्हातारपणाची काठी असतो. तो वंशाचा दिवा आहे. वंश परंपरा पुढे जायची असेल तर त्यासाठी मुलगा हवा. अगदी छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा मुलाला घरात झुकत माप दिल जात. पण मुलीच्या बाबत मात्र असं होतं नाही किंव्हा तिला काटेकोर पणे नियमांचं पालन करावं लागतं. समाजात आणि कुटुंबात जी काही बंधने असतील ती फक्त मुलीवर असतात. तिला सर्वजण नियमात बांधून ठेवतात. मात्र मुलांना याबाबतीत मोकळीक असते. ना बंधने ना काही नियम.
समाज आता सुशिक्षित झाला आहे. पण मुलीच्या बाबतीत तो अजूनही योग्य शिक्षित झाला असं म्हणावसं वाटतं. मुलगा आणि मुलगी हे समान आहेत आणि त्यांना दोघांनाही घरात समाजात समानतेची वागणूक मिळायला हवी. आपण लहानपणापासून घरातील मुलांवर या गोष्टी बिंबवायला हव्यात. तेव्हा कुठं ते त्यांच्या घरातील मुलगा आणि मुलगी यांत भेदभाव करणार नाहीत. समाजात खूप खोलवर ही भेदभावाची मूळ गेलेली आहेत ती सहजासहजी संपणार नाहीत. त्यासाठी योग्य प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरापासून सुरुवात करावी. आपल्या मुलांमध्ये समानतेची भावना प्रयत्नपूर्वक रुजवावी .
ज्या काही पूर्वसमज आहेत त्याबाबत जागृतची गरज आहे. ती जेव्हा आपल्या घरापासून होईल तेव्हाच बदल घडण्यास सुरुवात होईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा