प्रेम आंधळं असत. प्रेमात पडल्यावर माणसाला काहीही कळत नाही. प्रेमात पडल्यानं त्याची जिंदगी वाया गेली. तो प्रेमात आकंठ बुडाला आहे. उभारिच्या काळात प्रेमामुळं पोरग वाया गेलं. त्याच करियर बरबाद झालं. अशी चर्चा आपण कायम ऐकत असतो. पाहत असतो. खरंच प्रेम वाईट आहे का ?.... त्यामुळे जीवन वाया जात का ?..... माणूस वेडा होतो का ?..... असे खूप प्रश्न समोर उभे राहतात.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रेम म्हणजे नक्की काय ? त्याचा अर्थ नक्की काय आहे ? ते आपल्याला समजलं आहे का ? नसेल तर त्यावर विचार करावा लागेल..
प्रेम म्हणजे दुसऱ्यात विरघळून जाणे, स्वतःला समर्पित करणे किंवा दुसऱ्याच्यात एकात्म होणे नव्हे . स्वतःला विखरून टाकणे म्हणजे प्रेम नव्हे.
तर
प्रेम म्हणजे ......
स्वतः परिपक्व होणे.....
दुसऱ्यासाठी अवघे विश्व बनणे.....
स्वतःच्या बरोबरचं प्रेमाचा विचार करणे .....
मी ... माझं... विसरून आमचं ,आपलं याचा विचार करणे....
दुसऱ्याच्या आनंदासाठी सदैव झटत राहणे......
प्रेम ही उच्च प्रेरणा देणारी गोष्ट आहे.
प्रेम फक्त पुरुष आणि स्त्री याचंच असत का ? आई आणि मुला मध्ये..... भाऊ आणि बहीण यांच्यामध्ये...... भाऊ आणि भाऊ यांच्या मध्ये....... मित्रांमध्ये..... शिक्षक आणि विद्यार्थी यांमध्ये..... प्राणी पक्षी यांवर पण प्रेम असतं पण आपण त्याला एकदम संकुचित करून ठेवलंय. आपण त्याचा व्यापक अर्थ न घेता संकुचित अर्थ घेतो आणि तिथेच चुकतो....
प्रेम माणसाला जगायला शिकवते. ते त्याला अंतर्बाह्य बदलवून टाकते. जगण्याची उमेद निर्माण करते. स्वतः वर प्रेम करायला शिकवते. आयुष्य पूर्णत्वाला नेण्यास प्रेम मदत करत.
खरंच हे सगळं आपल्या आयुष्यात घडण्यासाठी माणसाने एकदा प्रेमात पडावं. भरभरून प्रेम करावं , त्यातील नशा अनुभवावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा