स्वयंपाक करण ही तर बायकांची काम आहेत. तो त्यांनीच करावा. एखादा पुरुष जर स्वयंपाक करत असेल तर त्याला बायकी म्हणून संबोधले जाते. स्वयंपाक करणं हे काम आपलं नाही किंवा त्या कडे तुच्छतेने पाहिलं जातं. पण खरंच स्वयंपाक येणे किती गरजेचे आहे , त्याच काय महत्व असतं हे कळायला लागलं आहे. त्याकडे एक काम म्हणून न पाहता ती एक कला आहे असं म्हणून पाहिलं तर तो करताना आनंद अनुभवता येतो.
आजच्या स्पर्धेच्या युगात घरातील पुरुष आणि महिला या दोघांनाही नोकरी करावी लागते. मग घरी येऊन त्या महिलेला स्वयंपाक करावा लागतो. पण जर तो दोघांनीही केला तर तिलाही बरं वाटत. अशा परिस्थितीत पुरुषांनी स्वयंपाक करण्याच्या कामात खरंच मदत करणं गरजेचं आहे. जीवनात सर्व काही करायचं ते पोटासाठी मग त्यात कसंही आणि काहीही टाकायचं का ? जर आपल्याला स्वयंपाक येत असेल तर नवनवीन पदार्थ बनवून त्याची चव आपण घेऊ शकतो. जे आपल्याला हवं ते बनवून खाऊ शकतो. स्वयंपाक करताना नवनविन प्रयोग करू शकतो.
स्वयंपाक करता आला की आपलं कोणावरही अवलंबून राहत नाही. घरी स्वयंपाकाच्या कामात आईला मदत करू शकतो. शिक्षण, नोकरी, व्यवसाय यांमुळे जरी बाहेर राहण्याची वेळ आली तर स्वयंपाक जर येत असेल तर आपली काही अडचण होत नाही. चांगलं पौष्टिक बनवून खाऊ शकतो. आरोग्याचे प्रश्न निर्माण होत नाहीत.
कोणतंही काम छोटं असत नाही. आजकाल आपण पाहतोय की बाहेर हॉटेलमध्ये कूक हे सर्रास पुरुषच आहेत. त्यांनी बनविलेले पदार्थ पाहिले की वाटत की असा स्वयंपाक आपल्यालाही यायला हवा. तुम्ही एक उत्तम स्वयंपाकी असाल तर बाहेरच्या जगात तुम्हाला खूप संधी आहेत. मोठमोठ्या हॉटेल मालक उत्तम कूकला भरपूर पगार देण्यासाठी तयार आहेत. पण तुमच्या कडे ते कौशल्य असलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हॉटेल,रेस्टॉरंट, ढाबा हे प्रसिद्ध होतात वा नावारूपाला येतात त्याच सगळं श्रेय त्या कूकच असत.
खरंच स्वयंपाक करता येणं खूप गरजेचं असतं. ज्यांना हे कौशल्य आत्मसात आहे ते खरच भाग्यवान आहेत पण ज्यांना याचा गंध नाही त्यांनी प्रयत्न पूर्वक हे शिकायला हवं अस मला वाटत. जे स्वयंपाक शिकण्यासाठी प्रयत्न करतायेत त्यांना माझ्या शुभेच्छा....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा