आपण पाहतो की आपल्या आजूबाजूला काहीजण निराश चेहऱ्याने वावरत असतात. जस काही यांना जगाची काळजी आहे. कायम कसल्याना कसल्या चिंतेत राहत असतात. मनमोकळेपणे हसणं म्हणजे गंभीर गुन्हाच आहे असं त्यांना वाटत. जगातली सगळी दुःख अपल्यालाचं आहेत. अस त्यांना वाटत.
खरंच ही माणसं आनंद साजरा करत असतील का नाही हा प्रश्न पडतो. आनंद झाल्यावर तो बेभानपणे आपल्याला व्यक्त करता आला पाहिजे. तो साजरा करताना नाचता, गाता , ओरडता आलं पाहिजे. त्या सगळ्यातली मज्जा अनुभवता आली पाहिजे.
जगात अस कोणी आहे का की त्याला कशाचं दुःख नाही. तर अस कोणीही नसतं मग काही लोक सदैव दुःखात का असतात. आपण लक्षात घ्यायला हवं की दुःख हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे ते येणारचं आहे त्याला आपण थांबवू शकत नाही मग त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग काढायचा की त्याला कवटाळून स्वतःला त्रास करून घ्यायचा. बिनधास्त येणाऱ्या समस्येशी भिडायचं. त्यातून मार्ग काढायचा. आनंदात जगायचं आनंदात जगण्याची सवय लावून घ्यायची.ल्या
कुठल्याही परिस्थितीत आनंद मानायचा. आयुष्यात कोणतीही प्रसंग आला तरी त्यामुळं आपण आनंदी व्हायचं का दुःख करत बसायचं हे आपलं मन ठरवतं. निर्णय हा आपलाच असतो. आपण आपल्या मनाला असं काही ट्रेंनिग द्यायचं की ते कायम आनंदच शोधेल. आपण स्वतःला इतकं आनंदी ठेवायचं की आपल्या कडे दुःख यायला सुद्धा घाबरल पाहिजे.
छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधा आणि तो साजरा करा. मग कसलंही दुःख आलं तरी त्याला तुम्ही समर्थ पणे तोंड देऊ शकता. आनंद हा मानण्यात असतो. ज्या गोष्टी आपल्या अखत्यारीत नाहीत त्यांच्या विषयी चिंता करणे सोडा. जे काही आपल्या कडे आहे त्याचा विचार करा. आनंदी राहण्यासाठी प्रयत्न करा.
जीवनात सगळे प्रॉब्लेम आपल्याला सुटणार नाहीत पण असे काही प्रॉब्लेम असतात की ते आपण सोडून दिले की सुटतात. विनाकारण चिंता करत बसू नका. सगळं काही ठीक होणार आहे हे मनात म्हणत राहा. सकारात्मक राहण्यासाठी प्रयत्न करा. जीवनात आनंदी व्यक्ती सगळ्यांना आवडतात. त्यांचा सहवास आवडतो. रडणाऱ्यां पासून लोक दूर राहतात. त्यांची मैत्री सुद्धा त्यांना नको असते.
आनंदाशिवाय जगण्याचा मी विचार सुध्दा करू शकत नाही. आता तुम्ही ठरवा आयुष्य रडत रडत जगायचं का आनंदात जगायचं कारण ते काही थांबणार नाही. जस की आइस्क्रीम टेस्ट केली वितळते आणि नाही केली तरी वितळते.
मग तसच आपल्या आयुष्याचं आहे. आता तुम्ही ठरवा टेस्ट करायचं का वेस्ट ???....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा