मूळ घटनेत न्यायाधिकरणांसंबंधी तरतुदी नाहीत. 42 सावी घटनादुरुस्ती अधिनियम 1976 अन्वये घटनेत नव्या भाग 14 A चा समावेश करण्यात आला. या भागाचे शीर्षक 'न्यायाधिकरणे' असे असून त्यामध्ये फक्त दोन कलमे आहेत.
प्रशासकीय न्यायाधिकरणासंबंधी कलम 323 A आणि इतर बाबींच्या न्यायाधिकरणासंबंधी कलम 323 B
¶ प्रशासकीय न्यायाधिकरण :-
- केंद्र, राज्ये, स्थानिक संस्था, सार्वजनिक निगम आणि इतर लोक प्राधिकरणे यांच्या लोकसेवेमध्ये नियुक्त केलेल्या व्यक्तींच्या भरतीसंबंधी आणि सेवाशर्तीसंबंधी विवादांवर निर्णय घेण्यासाठी प्रशासकीय न्यायाधिकरणे स्थापन करण्याचा अधिकार कलम 323 A संसदेला देते.
- वेगळ्या शब्दांत सांगावयाचे तर कलम 323 A मधील तरतुदींच्या आधारे सेवांसंबंर्धीच्या विवादांवर निर्णय घेण्यासाठी असे विवाद दिवाणी न्यायालये व उच्च न्यायालये यांच्याकडून काढून घेऊन ते प्रशासकीय न्यायाधिकरणापुढे मांडणे संसदेला शक्य झाले आहे.
- कलम 323 A अनुसार संसदेने 1985 मध्ये प्रशासकीय न्यायाधिकरण कायदा संमत केला.
- या कायद्यामुळे एक केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरण व राज्य प्रशासकीय प्राधिकरणे स्थापन करण्याचा संसदेला अधिकार प्राप्त झाला असून पीडित लोकसेवकांना त्वरित व कमी खर्चात न्याय मिळण्याचे नवे पर्व सुरू झाले आहे.
¶ केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण :-
- केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाची स्थापना 1985 मध्ये करण्यात आली, त्याचे मुख्य पीठ दिल्ली येथे आहे व अतिरिक्त पीठे विविध राज्यांत आहेत.
- सध्या त्याची 17 नियमित पीठे असून त्यांपैकी 15 पीठे उच्च त्यायालयाच्या ठिकाणी असून उरलेली दोन लखनौ व जयपूर येथे आहेत.
- ही पीठे उच्च न्यायालयाच्या इतर पीठांच्या ठिकाणी फिरत्या पद्धतीने कामकाज चालवितात.
- त्यांच्या कार्यक्षेत्रातील लोकसेवकांच्या भरती आणि सेवाशर्ती या बाबत केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाला मूळ अधिकारक्षेत्र असते.
- त्यांच्या अधिकारक्षेत्रात अखिल भारतीय सेवा, केंद्रीय नागरी सेवा, केंद्रामधील नागरी पदे आणि संरक्षण सेवातील नागरी सेवा येतात.
- परंतु संरक्षण दलाचे सदस्य, सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी व कर्मचारी आणि संसदेचे सचिवालयीन कर्मचारी यांचा त्यात समावेश होत नाही.
- केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण ही बहुसदस्यीय संस्था असून त्यात अध्यक्ष व सदस्य असतात.
- सुरुवातीला केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य असत.
- 2006 मध्ये न्यायाधिकरण अधिनियम, 1985 मधील दुरुस्तीनंतर सदस्यांना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा दर्जा देण्यात आला.
- 2016 अखेरच्या स्थितीनुसार एक अध्यक्ष आणि 65 सदस्य ही केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाची मान्यताप्राप्त संख्या आहे.
- हे सदस्य न्यायिक व प्रशासकीय या दोन्ही शाखांतून घेतले जातात; राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करतो.
- त्यांचा कार्यकाल पाच वर्षे किंवा अध्यक्षासाठी वयाची 65 वर्षे आणि सदस्यासाठी वयाची 62
वर्षे यांपैकी जे अगोदर पूर्ण होईल तोपर्यंत असतो.
- ते नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांनुसार कार्य करते. या तत्त्वांमुळे केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाचा दृष्टिकोन लवचीक असतो.
- अर्जदाराने केवळ रुपये 50 इतके नाममात्र शुल्क भरावयाचे असते. अर्जदार स्वतः किंवा वकिलातर्फे उपस्थित राहू शकतो.
- सुरुवातीला केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या आदेशांविरुद्ध फक्त सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येत असे.
- या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागता येत नसे; परंतु, न्यायिक पुनरावलोकन हा घटनेच्या
मूळ संरचनेचा भाग असल्याने उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रावरचे हे बंधन घटनाबाह्य असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने 1997 मध्ये चंद्रकुमार खटल्यामध्ये' दिला.
केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या आदेशांविरुद्ध संबंधित उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे दाद मागता येईल असा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला.
परिणामी, आता पीडित लोकसेवकास केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या आदेशाविरुद्ध प्रथम संबंधित उच्च न्यायालयात गेल्याशिवाय थेट सर्वोच्च न्यायालयात जाता येत नाही.
¶ राज्य प्रशासकीय न्यायाधिकरणे :-
- प्रशासकीय न्यायाधिकरण अधिनियम, 1985 अनुसार संबंधित राज्यांच्या विशिष्ट विनंतीवरून राज्य प्रशासकीय न्यायाधिकरणे स्थापन करण्याचा केंद्र सरकारला अधिकार आहे.
- 2016 च्या अखेरीपर्यंत आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, ओडिशा, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तमिळनाडू, पश्चिम बंगाल व केरळ या 1 राज्यांमध्ये राज्य प्रशासकीय न्यायाधिकरणे स्थापन करण्यात आली आहेत.
- पुढे मध्य प्रदेश, तमिळनाडू आणि हिमाचल प्रदेश यांमधील न्यायाधिकरणे रद्द केली गेली.
- केरळ प्रशासकीय न्यायाधिकरण 26 ऑगस्ट, 2010 रोजी स्थापन झाले.
- केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाप्रमाणे राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण हे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या भरती व सेवांच्या सर्व मुद्द्यांबाबत मूळ अधिकार क्षेत्र (Original Jurisdiction) आहे.
- संबंधित राज्याच्या राज्यपालाशी विचारविनिमय करून राष्ट्रपती राज्य प्रशासकीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांची नियुक्ती करतो.
- कायद्यामध्ये दोन किंवा अधिक राज्यांसाठी संयुक्त प्रशासकीय न्यायाधिकरण स्थापन करण्याची तरतूद आहे.
- संयुक्त प्रशासकीय न्यायाधिकरणाला त्या-त्या राज्यांच्या प्रशासकीय न्यायाधिकरणाचे अधिकार व अधिकार क्षेत्र असते.
- संबंधित राज्यांच्या राज्यपालांशी विचारविनिमय करून राष्ट्रपती संयुक्त प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या अध्यक्षांची व सदस्यांची नियुक्ती करतो.
¶ इतर बाबींसाठी न्यायाधिकरणे :-
- कलम 323 B अनुसार खालील मुद्यांबाबतच्या विवादांवर निर्णय देण्यासाठी न्यायाधिकरण स्थापन करण्याचे संसदेला आणि राज्य विधिमंडळांना अधिकार आहेत.
● कर प्रणाली
● परकीय चलन, आयात व निर्यात
● उद्योग आणि श्रम
● जमीन सुधारणा
● शहरी मालमत्तेवर मर्यादा
● संसद आणि राज्य विधानमंडळाच्या निवडणुका
● अन्नपदार्थ
● भाडे व भाडेकरूचे अधिकार'
कलम 323 A आणि 323 B मध्ये खालील तीन फरक आहेत :-
1. कलम 323 A मध्ये लोकसेवांबाबत न्यायाधिकरण स्थापन करण्याची तरतूद आहे, तर कलम 323 B मध्ये (वर नमूद केलेल्या) इतर बाबींसाठी न्यायाधिकरण स्थापन करण्याची तरतूद आहे.
2. कलम 323 A मधील न्यायाधिकरणाची स्थापना फक्त संसद करू शकते, तर कलम 323 B मधील न्यायाधिकरणाची स्थापना त्यांच्या कायदेशीर अधिकार क्षेत्रानुसार संसद व राज्य विधिमंडळे करू शकतात.
3. कलम 323 A अनुसार केंद्रासाठी एक आणि प्रत्येकी एका राज्यासाठी किंवा दोन किंवा अधिक राज्यांसाठी एक प्राधिकरण स्थापन करता येते. न्यायाधिकरणाची श्रेणीबद्धता असत नाही, पण कलम 323 B अनुसार न्यायाधिकरणाची श्रेणीबद्धता स्थापन करता येते.
चंद्रकुमार खटल्यात (1997) या दोन कलमांमधील उच्च न्यायालये व सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र वगळणाऱ्या तरतुदी सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरविल्या. त्यामुळे या न्यायाधिकरणाऱ्या आदेशांविरुद्ध न्यायिक उपाय उपलब्ध आहेत.








