भारतीय समाजामध्ये आता काही नवीन संकल्पना रुजायला लागल्या आहेत. बदलत्या जगासोबत चालायचं, जुनं आता काही राहील नाही , परंपरागत गोष्टीतून बाहेर पडायला हवं , स्वातंत्र्य हवं याच्या नावाखाली तरुण पिढी लिव्ह एन रिलेशनशिप ला प्रोत्साहन देऊ लागली आहे.
नक्की ही संकल्पना आहे काय ? तर लग्नाआधीचं तरुण तरुणी एकत्र राहायचं त्याचं एकमेकांशी पटलं तर लग्न करायचं नाही तर एकमेकांना मोकळं करायचं. कसलीही बंधनं नाहीत. जबाबदाऱ्या नाहीत.
लग्न करून जर एकमेकांशी पटलं नाही. त्यानंतर वाद सुरू झाले, घटस्फोट घ्यावा लागणार त्यापेक्षा आधीच लिव्ह एन रिलेशनशिप मध्ये राहायचं. म्हणजे पुढचे त्रासच नकोत. कुटुंबातील व्यक्तींना पण त्रास नको. अशी कारणे देऊन लिव्ह एन रिलेशनशिप च समर्थन केलं जातं.
पण हे सामाजिक दृष्टीने बरोबर आहे का ? भारतीय समाज त्याला मान्यता देईल का ? ज्या देशात लग्न हा खूप महत्त्वाचा सोहळा मानाला जातो. दोन कुटुंब एकमेकांसोबत जोडली जातात. लग्न म्हणजे सात जन्मीचे बंधन मानले जाते. ते पवित्र बंधन टिकवण्यासाठी सर्वजण खूप प्रयत्न करतात. भारतीय संस्कृतीत वटपौर्णिमेसारखा सण आणि करवाचौथ हे सण जे पती आणि पत्नी मधील नात घट्ट करण्यासाठी साजरा केला जातो. अशा देशात लग्न न करता एक तरुण मुलगा आणि तरुण मुलगी एकत्र राहणे ही संकल्पनाच विचित्र आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा